PMC Deputy Commissioner | आशा राऊत, चेतना केरुरे यांची पुन्हा पुणे महापालिकेच्या उपायुक्त पदी नियुक्ती! | राज्य सरकार कडून जारी केले गेले आदेश

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

PMC Deputy Commissioner  | आशा राऊत, चेतना केरुरे यांची पुन्हा पुणे महापालिकेच्या उपायुक्त पदी नियुक्ती! |  राज्य सरकार कडून जारी केले गेले आदेश

PMC Deputy Commissioner Transfer – (The Karbhari News Service) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून पुणे महापालिकेतील चार उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उपायुक्त चेतना केरुरे, आशा राऊत आणि संतोष वारुळे, प्रसाद काटकर यांचा समावेश होता दरम्यान आता चेतना केरूरे आणि आशा राऊत यांना पुन्हा एकदा महापालिकेच्या उपायुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.  (Pune Municipal Corporation (PMC)
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महापालिका मधील आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदल्यांचा धडाका लावला होता.  त्याआधी पुणे महापालिकेतील आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर उपायुक्तांच्या देखील बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये चेतना केरुरे आणि आशा राऊत यांचा समावेश होता. (Pune PMC News)

मॅट मध्ये केले होते अपील

दरम्यान राऊत आणि केरुरे यांची बदली केली होती तरी त्यांना नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवले होते. कारण आपला पुणे महापालिकेत उपायुक्त या पदावर तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला नाही, तरी बदली करण्यात आली, या शासनाच्या निर्णया विरोधात आशा राऊत आणि चेतना केरूरे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (Maharashtra Administrative Tribunal- MAT) मध्ये अपील केले होते. नुकतेच न्यायाधिकरणाने याबाबत आदेश जारी करत राऊत आणि केरूरे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. तसेच सरकारला याबाबत आदेश दिले होते.  त्यानुसार सरकारने राऊत आणि केरुरे यांची पुणे महापालिकेत उपायुक्त पदी नियुक्ती केली आहे. आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारून अहवाल देण्याचे आदेश शासनाचे अवर सचिव अ. का. लक्कस यांनी जारी केले आहेत.

PMC Employees Agitation | पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या वतीने महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनपा भवन समोर निदर्शने | मागण्यावर ८ दिवसामध्ये सकारात्मक निर्णय घेणार – अतिरिक्त आयुक्त 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Agitation | पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या वतीने महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनपा भवन समोर निदर्शने

| मागण्यावर ८ दिवसामध्ये सकारात्मक निर्णय घेणार – अतिरिक्त आयुक्त

 

PMC Employees Union – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेकडील कर्मचाऱ्यांच्या (PMC Employees) प्रलंबित प्रश्नाबाबत आज गुरुवार रोजी दुपारी  पुणे मनपा मुख्य इमारतीसमोर (PMC Main Building) भव्य निदर्शन तथा आंदोलन करण्यात आले. याआंदोलनात हजारो मनपा सेवकांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद देत प्रशासनाला धारेवर धरले. (Pune Municipal Corporation Employees Agitation)

 

 

यामध्ये मुख्यत:  राज्य शासनाची ग्रामपंचायतीकडील नवनिर्मित पदांना कोणतीही मान्यता नसताना तसेच ग्रामपंचायतीमधील आकृतिबंधामध्ये वरिष्ठ लिपिक या पदाची कोणीतीही तरतूद नसताना महानगरपालिकेच्या मूळ सेवाज्येष्ठता यादीमध्ये व आस्थापनेवर ग्रामपंचायतच्या 34 वरिष्ठ लिपीकांचा समावेशन करण्यात आलेले आहे. त्यांची कोणतीही अर्हता तपासली गेली नाही. विभागीय परीक्षा पास नाहीत, त्यांचा लिपिक या पादावर 3 वर्ष काम केल्याचा अनुभव नाही. तरीही मनपात वरिष्ठ लिपीक पदी नियुक्ती दिली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या मूळ सेवकांमध्ये तीव्र असंतोष असून प्राधान्याने मूळ सेवकांना प्रथम पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. (Pune PMC News)

तसेच वरिष्ठ लिपिक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी, उप कामगार अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता, सहाय्यक महापालिका आयुक्त या संवर्गातील पदांना देखील पदोन्नती दिली जात नाही. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. पद्स्कीप चा प्रस्ताव शासनदरबारी तत्कालीन आयुक्त यांनी पाठवलेले असतांना त्या वर आता समिती नेमून दिरंगाई का केली जाते. त्या साठी लागणारा मुख्यसभेचा ठराव पारीत करून तो शासनास पाठवावा तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर पदोन्नतीचा स्तर कमी करून लेखनिकि संवर्गाची पदसंरचना व वेतनश्रेणी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.

याचप्रमाणे सन २००५ नंतर पुणे मनपा सेवेत रुजू झालेल्या सेवकांना सेवानिवृत्तीनंतर वैद्यकीय अंशदायी सहाय्य योजना (CHS) सुरु ठेवण्याची मागणी करण्यात आली. सेवकांचे कोणत्याही प्रकारचे खुलासे न मागवता केलेले तूर्तातूर्त निलंबन प्राधान्याने रद्द करण्यात यावे. वर्ग 4 मधील अनुकंपा वरील सेवकांना वर्ग 3 मध्ये तात्काळ घेण्यात यावे अशी आग्रही भूमिका अध्यक्ष यांनी मांडली.

या आंदोलनामध्ये वरील मागण्याचे निवेदन  पृथ्वीराज बी पी ,अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांना देण्यात आलेले आहे.  मागण्यावर ८ दिवसामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांनी दिले.

निदर्शनामध्ये पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर, जनरल सेक्रेटरी  बापू पवार, सह सेक्रेटरी  राजू ढाकणे, गिरीष बहिरट , गणेश मांजरे, सोमनाथ गोरे, विशाल ठोंबरे, कार्याद्यक्ष श्रीमती पूजा देशमुख यांची सेवकांच्या मागणी बाबत भाषणे झाली. सदर निदर्शनाला मोठ्या संख्येने मनपा सेवक उपस्थित होते.


प्रशासनाने सेवकांच्या मागण्या बाबत लवकरात लवकर निंर्णय न घेतल्यास मोठं आंदोलन छेडणार. वेळ पडल्यास लेखणी बंद करणार. आताचे प्रशासक / आयुक्त  या बाबत लवकर धोरणात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.

  • बजरंग पोखरकर, अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉईज युनियन

PMC Building Devlopment Department |पाषाण परिसरात विनापरवाना शो रूम, हॉटेल्सवर महापालिकेची कारवाई  | 90 हजार चौरस फूट बांधकाम हटवले 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Building Devlopment Department |पाषाण परिसरात विनापरवाना शो रूम, हॉटेल्सवर महापालिकेची कारवाई

| 90 हजार चौरस फूट बांधकाम हटवले

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पाषाण मुंबई पुणे महामार्ग  वरील पाषाण परिसरात विनापरवाना शो रूम, हॉटेल्सवर महापालिका बांधकाम विकास विभागाचे वतीने आज पुन्हा जोरदार कारवाई करण्यात आली. यापुर्वी रस्त्याच्या पश्चिम बाजूस कारवाई करण्यात आली होती. आज पूर्व बाजूकडील 11 शो रूम, हॉटेल्स वर करून सुमारे 90 हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. अशी माहिती बांधकाम विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)

बांधकाम हे HEMRL या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या बाबत HEMRL कडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच सदर क्षेत्र PSP झोन मध्ये येत आहे. या मधील 7 मिळकतधारकांनी मे. न्यायालयातून स्थगिती आदेश प्राप्त केल्या मुळे यांचेवर कारवाई करण्यात आली नाही.
यावेळी jwa कटर मशीन, दोन jcb, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

चतुःशृंगी पोलीस स्टेशन चे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
खबरदारीचा उपाय म्हणून अग्नीशमन विभागाची गाडी तयार ठेवण्यात आली होती.

PMC Deputy Municipal Secretary Promotion | उपनगरसचिव पदाच्या बढती प्रक्रिये बाबत उचित कार्यवाही करण्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आदेश

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Deputy Municipal Secretary Promotion  | उपनगरसचिव पदाच्या बढती प्रक्रिये बाबत उचित कार्यवाही करण्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आदेश

PMC Municipal Secretary Department- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडील उपनगरसचिव (PMC Deputy Municipal Secretary) हे पद गेल्या 4 वर्षांपासून रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त पदभार आणि पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्तांची (PMC Commissioner) मान्यता प्राप्त झाली आहे. तरी देखील आणि पात्र असताना देखील आपल्याला या बढती पासून डावलले असल्याची तक्रार स्थायी समितीचे सचिव विष्णू कदम (Vishnu Kadam PMC) यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांच्याकडे केली. यावर मंत्री आठवले यांनी यावर उचित कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका सामान्य प्रशासन विभागाला (PMC General Administration Department) दिले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महानगरपालिकेतील एसी, एसटी व इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे/अनुशेष भरण्यासाठी काल सामाजिक न्याय मंत्रालय, भारत सरकार विभागाकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एसी, एसटी, इतर रिक्त पदाचा अनुशेष भरण्याविषयी पुणे महानगरपालिकेला आदेश दिले आहेत.

सप्टेंबर 2020 मध्ये उपनगरसचिव राजेंद्र शेवाळे सेवानिवृत्त झाले होते. तेव्हापासून हे पद देखील रिक्तच आहे. याचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. महापालिकेचे राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान राजशिष्टाचार अधिकारी आणि उपनगरसचिव हे पद आता समकक्ष करण्यात आले आहे. महापालिकेच्या नियमानुसार नगरसचिव हे उपनगरसचिव यांची नियुक्ती करत असतात. मात्र जिथे नगरसचिव नाहीत तिथे उपनगरसचिव यांची कोण नेमणूक करणार? आता हे पद पदोन्नती ने भरले जाणार कि अजून दुसऱ्या कुठल्या प्रक्रियेने, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र पदोन्नती प्रक्रिया न करता याचाही पदभार देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे पदोन्नती प्रक्रिया करून पदभार देण्याबाबत महापालिका आयुक्तांची मान्यता प्राप्त झाली आहे. असे असताना देखील सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबत अनास्था दाखवण्यात येत आहे. त्यामुळे विष्णू कदम यांनी याबाबत काल थेट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेतली. कदम यांनी तक्रार केली कि आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पदोन्नती पासून डावलले जात आहे. दरम्यान आठवले यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबत पालिका प्रशासनसोबत काल बैठक घेतली. यावेळी उपनगरसचिव पदाच्या बढती प्रक्रिये बाबत उचित कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री आठवले यांनी दिले आहेत. आता तरी सामान्य प्रशासन विभाग यावर निर्णय घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

PMC Action on Illegal Hotels | हडपसर हांडेवाडी रोड, पुणे सोलापूर रोड परिसरात अनधिकृत हॉटेल्स वर कारवाई

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Action on Illegal Hotels | हडपसर हांडेवाडी रोड, पुणे सोलापूर रोड परिसरात अनधिकृत हॉटेल्स वर कारवाई

 

PMC Building Devlopment Department – (The Karbhari News Service) – हडपसर हांडेवाडी रोड, पुणे सोलापूर रोड, साडे सतरा नळी येथील अनाधिकृत रूप टॉप हॉटेल व बार व रेस्टॉरंट तसेच अनाधिकृत बांधकाम यावर पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. (Pune Municipal Corporation)

पुणे महापालिकेकडून एम आर टी पी १९६६ अनन्वे कलम ५३ नुसार संबंधित sr no 45,46,67 हडपसर, पुणे सोलापूर रस्ता तसेच साडे सतरा नळी हडपसर येथे एकूण 11 अनधिकृत बार व रेस्टॉरंट व रूट टॉप व अनधिकृत आरसीसी बांधकाम यांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती.  तथापि संबंधितांनी स्वतःहून कोणतेही अनधिकृत बांधकाम काढून न घेतल्याने आज जी सदरचे बांधकामांचे क्षेत्रफळ 18700 चौरस फुट अनाधिकृत बाधकाम पाडण्यात आले. (Pune PMC News)

सदर चे बाधकाम पाडण्यासाठी महापालिकेकडून 4 ब्रेकर, 4 जेसीबी,5 ग्रॅस कटर,20 बिगारी , पोलिस वर्ग,समवेत कारवाई करण्यात आली,

कारवाई बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक 1 मार्फत करण्यात आली.

PMC Chief Auditor | मुख्य लेखा परीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार जितेंद्र कोळंबे यांच्याकडे! | महापालिका आयुक्तांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Auditor | मुख्य लेखा परीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार जितेंद्र कोळंबे यांच्याकडे! | महापालिका आयुक्तांचे आदेश

PMC Chief Auditor – (The Karbhari News Service) – महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक तथा सह महापालिका आयुक्त अंबरीष गालिंदे (Ambrish Galinde PMC) हे सेवानिवृत्त झाले आहेत. हे पद रिक्त झाल्याने या पदाचा अतिरिक्त पदभार हा पुणे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (PMC Chief Finance Officer) जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe PMC? यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी (PMC Chief Finance and Account Officer) राज्य सरकारकडून जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेले हे पद भरण्यात आले आहे. दरम्यान यामुळे मात्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांच्याकडील पदभार कमी केला आहे. कळसकर यांच्याकडे फक्त खर्च ची जबाबदारी आहे तर कोळंबे यांच्याकडे महसूल ची जबाबदारी  आहे. (PMC Chief Finance and Account Office)
कोळंबे हे महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीने आले आहेत. याआधी कोळंबे महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे इथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. वित्त व लेखा संचालक संवर्गात त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना सुधारित पदस्थापना देण्यात आली आहे.
दरम्यान कोळंबे यांच्याकडे आता मुख्य लेखा परीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार असणार आहे. 1 जुलै पासून हे प्रभारी कामकाज त्यांच्याकडे असणार आहे.

| मुख्य लेखा परीक्षक पदी शासनाचाच अधिकारी बसणार का?

दरम्यान अंबरीष गालिंदे यांच्या सेवानिवृत्तीने मुख्य लेखा परीक्षक तथा सह महापालिका आयुक्त हे पद रिक्त झाले आहे. या पदावर महापालिकेचा कुणी अधिकारी बसणार कि राज्य सरकारचा अधिकारी इथे येणार, याबाबत आता उत्सुकता लागून राहिली आहे.

Dr Ramesh Shelar PMC | मुख्य अभियंता (विद्युत) पद भरताना अनियमितता झाली असल्याचा डॉ रमेश शेलार यांचा आरोप | आस्थापना विभागाची चौकशी करण्याची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

Categories
Breaking News PMC पुणे

Dr Ramesh Shelar PMC | मुख्य अभियंता (विद्युत) पद भरताना अनियमितता झाली असल्याचा डॉ रमेश शेलार यांचा आरोप

| आस्थापना विभागाची चौकशी करण्याची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

PMC Chief Engineer (Electricity Department) – (The Karbhari News Service) – महानगरपालिका आस्थापनावर ‘मुख्य अभियंता’ (विद्युत) या पदावरील नेमणूकी मध्ये त्रुटी व चुका असल्याचा आरोप प्रभारी पर्यावरण व्यवस्थापक डॉ रमेश शेलार (Dr Ramesh Shelar PMC) यांनी केला आहे. पद भरताना राज्य सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे डॉ शेलार यांनी म्हटले आहे. त्यामुळे याबाबत सामान्य प्रशासन विभागाची सखोल चौकशी करण्याची मागणी डॉ शेलार यांनी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

डॉ शेलार यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्रानुसार पुणे महानगरपालिका अस्थापना 26 ऑगस्ट 2014 रोजी  शासन मान्य झाली. त्यामध्ये विद्युत
विभागाचे अधिक्षक अभियंता विद्युत हे पद उच्च होते. 6 नोव्हेंबर  2027 रोजी शासन निर्णयानुसार ‘मुख्य अभियंता’ (विद्युत) हे पद निर्माण करणेस अटी व शर्तीसह मान्यता झालेली होती. यामधील अट क्र.३ नुसार महानगरपालिकेने हे पद भरताना शासनाची पूर्व परवानगी घेण्यात यावी असे नमूद आहे. त्यानुसार आज्ञापत्रक प्रस्तुत झालेली दिसून येते; परंतु या आज्ञापत्रकानुसार खातेनिहाय बढती समितीने अहवाल, शहर सुधारणा समिती व मुख्य सभा ठराव करून आज्ञापत्रक प्रस्तुत केलेले दिसून येते. वास्तविक तत्कालीन खातेनिहाय बढती समिती यांनी शासन निर्णयाकडे कानाडोळा केलेचे आढळते. (Pune PMC News)
तसेच आज्ञापत्रकांत लेखनिक संवर्गातील अधिक्षक अभियंता (विद्युत) या संवर्गातील अभियंता ( विद्युत) वर्ग -१ असे नमूद केलेले आहे. अधिक्षक अभियंता (विद्युत) हे पद  अभियांत्रिकी सेवा या सदरांत २६/०८/२०१४ चे शासन मान्यतेसाठी नमूद आहे. अशा प्रकारे वर्ग -१ संवर्गातील पदासाठी तात्काळ पदोन्नतीने नेमणूक देण्यात येते. त्याचप्रमाणे वर्ग ४ मधील शैक्षणिक पात्रता असलेल्या सेवकांना २६/०८/२०१४ च्या सेवा नियमानुसार पदोन्नतीने नेमणूक तात्काळ का देऊ शकत नाही?  वर्ग ४ मधील सेवकांना पण तात्काळ त्यांच्या शैक्षणिक अहर्ता नुसार पदोन्नतीने नेमणुका देण्यात याव्यात. अशी मागणी डॉ शेलार यांनी आपल्या पत्रातून केली आहे. 
डॉ शेलार यांनी पुढे म्हटले आहे कि,  ‘मुख्य अभियंता’ (विद्युत) वर्ग -१ हे पद भरणेबाबत झालेली अनियमता तसेच या पदावरील व्यक्तीस अतिरिक्त महापालिका आयुक्त पदासाठी सक्षम दर्शविणारी आस्थापना विभाग यांचे सखोल चौकशी करावी.

Encroachment action on DP Road | डीपी रस्त्यावरील निळ्या पूर रेषा मध्ये येणारी बांधकामे महापालिकेने पाडली | 90 हजार चौरस फुट क्षेत्र मोकळे केले

Categories
Breaking News PMC social पुणे

Encroachment action on DP Road | डीपी रस्त्यावरील निळ्या पूर रेषा मध्ये येणारी बांधकामे महापालिकेने पाडली | 90 हजार  चौरस फुट क्षेत्र मोकळे केले

PMC Building Development Department- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) बांधकाम विकास विभागाच्या वतीने डीपी रोड राजाराम पुला जवळ विनापरवाना शेड वर कारवाई करण्यात आली. निळ्या पूर रेषा मध्ये येणारी विनापरवाना बांधकामे आज जमीनदोस्त करण्यात आली. अशी माहिती बांधकाम विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune PMC News)
उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश उठवल्या नंतर 24 तासाचे आत तातडीने ही कारवाई करण्यात आली . यावेळी 15 मिळकतीवर कारवाई करून सुमारे 90 हजार चौरस फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. 5 jcb , 2 gas कटर, 10 कामगार यांचे मदतीने ही कारवाई करण्यात आली.
यासाठी स्थानिक आणि अतिक्रमण विभागाचे पोलीस बंदोबस्त होता.  या ठिकाणी अग्निशमन विभागाची गाडी तयार ठेवण्यात आली होती. कारवाई उद्याही सुरू  राहणार आहे. असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

PMC commissioner gave strict instructions to the officials in the meeting of HODs

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC commissioner gave strict instructions to the officials in the meeting of HODs

| Orders to be prepared to face emergency situations

 Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – Heavy rains in the city on Saturday left Pune residents in a state of shock.  Pune PMC administration had to face criticism from social organizations and political parties in this regard.  Therefore, Municipal Commissioner Dr Rajendra Bhosale (Dr Rajendra Bhosale IAS) held a meeting with the HODs to plan in this regard.  (PMC Pune Municipal Corporation)
  Be ready to face the situation, don’t sit waiting for calls from the citizens, the response time should be reduced.  Rajendra Bhosle has given to the officials.
 Last week, the roads in the city were flooded due to rains on Friday and Saturday.  Due to this, the administration has started to be strongly criticized from all levels.  A delegation of BJP, MNS, Shiv Sena, Congress party and MP Supriya Sule met Commissioner Bhosale and read the complaints.  Due to this, on Wednesday Commissioner Bhosle held a meeting with all account heads, deputy commissioners and zonal officers and issued strict instructions.  The meeting lasted for about three hours.  (Pune PMC News)
 Commissioner Bhosle said about this meeting, all the regional officers have been asked to review the drainage in their area.  The concerned contractor has been ordered to carry out the rest of the work.  The responsibility of the contractor is to work till the end of monsoon.  In this regard, instructions have been given to inspect and do the work.  It has also been ordered to take proper action regarding pruning of branches to reduce the incidence of tree fall.
 In this meeting, it was also discussed to increase the coordination between the regional office and the main account, what preventive measures can be taken in the future.  Stating that there was a discussion about what can be done in the areas affected by the rain last week, Dr.  Bhosle said, the field offices have been asked to get the information about the machinery and equipment available from them, and accordingly they should be made available, and if there is time, it has been suggested that they should be purchased.  Field Offices must remain in touch with the Head Office throughout the monsoon period.  Also, we should discuss with the people’s representatives of the concerned areas, complete the works according to their suggestions, and prepare to face the emergency situation that will arise in the future.  Instructions have been given that special care should be taken in areas where water is always stored, places where water seeps into urban areas, and necessary measures should be taken there.

Pune Municipal Corporation Latest News | खराडी परिसरात बांधकाम विकास विभागाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई  | 15000 चौ.फूट क्षेत्र हटवले 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation Latest News | खराडी परिसरात बांधकाम विकास विभागाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई

| 15000 चौ.फूट क्षेत्र हटवले

 

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Servcie) – खराडी स.न. 3 पाटील बुवानगर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये 15000 चौ.फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. (PMC Building Devlopment Department)

तसेच सोमवारी खराडी क्षेत्रामध्ये जॉकटरची कारवाई करण्यात येणार आहे. व पुढे अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत. ही कारवाई अधिक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, कार्यकारी अभियंता अजित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता राजेंद्र फुंदे, मंगेश गायकवाड, आरेखक योगेश गुरव , टूलिप इंजिनिअर गिरीश कराळे यांच्या पथकाने जॉकटर, दोन जेसीबी, तीन ब्रेकर, एक गॅस कटर व दहा बिगारीच्या साहाय्याने ही कारवाई केली. या वेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अशा अनाधिकृत बांधकामामध्ये  नागरिकांनी घरे घेऊ नयेत असे पुणे महानगरपालिकेमार्फत अवाहन करण्यात आले आहे.