PMC Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियान अंतर्गत  नदी स्वच्छता मोहिमेत 370 किलो सुका कचरा संकलित 

Categories
Breaking News PMC social पुणे

 PMC Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियान अंतर्गत  नदी स्वच्छता मोहिमेत 370 किलो सुका कचरा संकलित

PMC Majhi Vasundhara Abhiyan – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र शासनाच्या सन २०२४ च्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation (PMC) २२ एप्रिल ते २८ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये स्वच्छता अभियान सिंगल युज प्लास्टिक बंदी अंमलबजावणी बाबत जनजागृती व कारवाई, ई-कचरा संकलन मोहीम अशा विविध स्वच्छता विषयक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने २६ रोजी स.०७.०० ते ९.०० या वेळेत भिडे पूल नदीकाठ परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यात एकूण ३७० किलो सुका कचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Sandip Kadam PMC) यांनी दिली. (PMC Solid Waste Management Department)
या नदी स्वच्छता अभियानामध्ये  पृथ्वीराज बी.पी. मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट), संदीप कदम, मा. उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन,  माधव जगताप, उपायुक्त, पर्यावरण विभाग, डॉ. केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन, रवी खंदारे, महापालिका सहाय्यक आयुक्त, शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय, मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, पुणे महानगरपालिका, ब्रॅन्ड अॅम्बॅसीडर रुपाली मगर,  विक्रांत सिंग, इमामुद्दिन इनामदार, प्रमुख आरोग्य निरीक्षक, व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच सदर नदी स्वच्छता अभियानामध्ये मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांनी देखील आपला सहभाग नोंदविला.
एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, कै.बंडोजी खंडोजी चव्हाण महाविद्यालय, कावेरी इंटरनॅशनल स्कूल, हिराभाई व्ही. देसाई कॉलेज, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स अशा विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, आदर पूनावाला क्लिनसिटी इनिशिएटिव्ह या संस्थांचे प्रतिनिधी तसेच शिवाजीनगर घोलेरोड व कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी यांनी या नदी स्वच्छता अभियानामध्ये सक्रीय सहभाग घेतला.

या अभियानामध्ये पर्यावरणपूरक, जागतिक तापमानवाढ संबंधीत व स्वच्छता विषयक गीत सादर करण्यात आले. मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व पर्यावरणपूरक सवयी जोपासण्याविषयी आवाहन केले. सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने जनजागृती करून उपस्थित प्रत्येक सहभागींना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या कापडी पिशव्या अक्षरस्पर्श मतिमंद विद्यालय / कार्यशाळा यांचेकडील अपंग. मतिमंद व निराधार विद्यार्थ्यांमार्फत तयार करण्यात आलेल्या होत्या.उपस्थित सर्व सहभागींनी माझी वसुंधरा व मतदार जागृती शपथ घेतली व सदरील कार्यक्रम संपन्न झाला. सदर नदी स्वच्छता अभियानामध्ये एकूण २५० सहभागींनी आपला सहभाग नोंदविला व एकूण ३७० किलो सुका कचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

Oath of Voting | मतदानाची शपथ घेणे महापालिका कर्मचाऱ्यांना अनिवार्य | अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

Oath of Voting | मतदानाची शपथ घेणे महापालिका कर्मचाऱ्यांना अनिवार्य | अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांचे आदेश

Oath of Voting | Prithviraj B P IAS – (The Karbhari News Service) – मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मतदार जनजागृती करणेसाठी मतदानाची शपथ घेणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Employees? अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी 11:30 वाजता महापालिका भवनात हजर राहण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)

अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मतदार जनजागृती करणेसाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण पद्धतीने मतदान करणेबाबत शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचेकडून सूचित करणेत आले आहे. त्यानुषंगाने सोमवार रोजी सकाळी ११:३० वा. ( अकरा वाजून तीस मिनिटे) मनपा भवन येथील हिरवळीवर आयोजित करणेत आलेला आहे. या दिवशी ह्या कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी व वेळी न चुकता हजर राहावयाचे आहे. सर्व अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी सदरचे कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे मनपा मुख्य भवन, शिवाजीनगर येथील हिरवळीवर उपस्थित राहावे. असे आदेशात म्हटले आहे.
The karbhari - PMC circular

  Prithviraj B P IAS accepted charge of the post of Additional Pune Municipal Commissioner 

Categories
PMC पुणे

  Prithviraj B P IAS accepted charge of the post of Additional Pune Municipal Commissioner

 Prithviraj B P IAS – (The Karbhari News Service) – Pune Municipal Corporation Additional Commissioner (E) post Prithviraj B.P. IAS) Accepted today from Dr Kunal Khemnar IAS.
 Dr.  Kunal Khemnar welcomed them with a bouquet.  Additional Municipal Commissioner (E) of Pune Municipal Corporation B.P.  After accepting Prithviraj  he said that it is a great opportunity to work in Pune Municipal Corporation.  Will work with everyone.  (Pune Municipal Corporation (PMC)
 Additional Municipal Commissioner Ravindra Binwade IAS was present on this occasion.
 Dr Kunal Khemnar (IAS) working as Additional Commissioner in Pune Municipal Corporation has been transferred.  In his place, the state government has appointed Prithviraj B P IAS as Municipal Additional Commissioner.
 Dr. Khemnar’s term had been completed for a long time.  Finally, the government has transferred him.  Dr. Khemnar has been transferred by the government as Commissioner of Sugar, Pune.  So Dr. Khemnar will stay in Pune.  Meanwhile, after the vacancy of Dr. Khemnar, the state government has immediately appointed a new additional commissioner to the Pune Municipal Corporation.  Government has appointed Prithviraj BP as Additional Commissioner of Pune Municipal Corporation.  Prithviraj was working as the CEO of Nagpur Smart City.

Prithviraj B P IAS | सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार | पृथ्वीराज बी पी यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार

Categories
Breaking News PMC पुणे

Prithviraj B P IAS | सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार | पृथ्वीराज बी पी यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार

 

Prithviraj B P IAS – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा (Pune Municipal Corporation Additional Commissioner) पदभार  पृथ्वीराज बी.पी.  (Prithviraj B P IAS ) यांनी  डॉ. कुणाल खेमनार (Dr Kunal Khemnar IAS) यांचे कडून आज  स्वीकारला.

डॉ. कुणाल खेमनार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पुणे महानगरपालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार  पृथ्वीराज यांनी स्वीकारल्या नंतर, त्यांनी सांगितले कि, पुणे महानगर पालिकेत काम करण्याची उत्तम संधी मिळालेली आहे.  सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

या प्रसंगी  अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज ) रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) उपस्थित होते.

The Karbhari - Prithviraj B P Ias

पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणारे डॉ कुणाल खेमनार (Dr Kunal Khemnar IAS) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्य सरकारने महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांची नियुक्ती केली आहे.
डॉ खेमनार यांचा कालावधी पूर्ण होऊन बराच कालावधी झाला होता. अखेर सरकारने त्यांची बदली केली आहे. डॉ खेमनार यांची सरकारने साखर आयुक्त, पुणे या ठिकाणी बदली केली आहे. त्यामुळे डॉ खेमनार हे पुण्यातच राहणार आहेत. दरम्यान डॉ खेमनार यांची जागा रिक्त झाल्यानंतर राज्य सरकारने पुणे महापालिकेला तात्काळ नवीन अतिरिक्त आयुक्त दिले आहेत. सरकारने पृथ्वीराज बी पी यांची पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. पृथ्वीराज हे नागपूर स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते.

Transfer of IAS Dr. Kunal Khemnar! | Prithviraj BP is the new Additional Commissioner of Pune Municipal Corporation

Categories
Breaking News PMC पुणे

Transfer of IAS Dr. Kunal Khemnar! | Prithviraj BP is the new Additional Commissioner of Pune Municipal Corporation

Prithviraj B P IAS | Dr Kunal Khemnar – (The Karbhari News Service) – Dr Kunal Khemnar (IAS) working as Additional Commissioner in Pune Municipal Corporation has been transferred. In his place, the state government has appointed Prithviraj B P IAS as Municipal Additional Commissioner.

Dr. Khemnar’s term had been completed for a long time. Finally, the government has transferred him. Dr. Khemnar has been transferred by the government as Commissioner of Sugar, Pune. So Dr. Khemnar will stay in Pune. During his tenure, Khemnar has worked to make the Municipal Corporation a pioneer by implementing many new ideas in the Solid Waste Department and Property Tax Department.

Meanwhile, after the vacancy of Dr. Khemnar, the state government has immediately appointed a new additional commissioner to the Pune Municipal Corporation. Government has appointed Prithviraj BP as Additional Commissioner of Pune Municipal Corporation. Prithviraj was working as the CEO of Nagpur Smart City.

Dr Kunal Khemnar IAS | Prithviraj B P IAS | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांची बदली! | पृथ्वीराज बी पी पुणे महापालिकेचे नवीन अतिरिक्त आयुक्त

Categories
Breaking News PMC पुणे

Dr Kunal Khemnar IAS | Prithviraj B P IAS | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांची बदली! | पृथ्वीराज बी पी पुणे महापालिकेचे नवीन अतिरिक्त आयुक्त

Prithviraj B P IAS | Dr Kunal Khemnar – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणारे डॉ कुणाल खेमनार (Dr Kunal Khemnar IAS) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्य सरकारने महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांची नियुक्ती केली आहे.
डॉ खेमनार यांचा कालावधी पूर्ण होऊन बराच कालावधी झाला होता. अखेर सरकारने त्यांची बदली केली आहे. डॉ खेमनार यांची सरकारने साखर आयुक्त, पुणे या ठिकाणी बदली केली आहे. त्यामुळे डॉ खेमनार हे पुण्यातच राहणार आहेत. खेमनार यांनी त्यांच्या कालावधीत घनकचरा विभाग आणि प्रॉपर्टी टॅक्स विभागात बऱ्याच नवीन कल्पना राबवून महापालिकेला अग्रेसर बनवण्याचे काम केले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

दरम्यान डॉ खेमनार यांची जागा रिक्त झाल्यानंतर राज्य सरकारने पुणे महापालिकेला तात्काळ नवीन अतिरिक्त आयुक्त दिले आहेत. सरकारने पृथ्वीराज बी पी यांची पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. पृथ्वीराज हे नागपूर स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते.

दरम्यान सरकारने नुकतीच महापालिका आयुक्त पदी डॉ राजेंद्र भोसले यांची नियुक्ती केली आहे. विक्रम कुमार यांच्या जागी डॉ भोसले यांना नियुक्त करण्यात आले आहे.