Murlidhar Mohol Vs Prashant Jagtap | मुरलीधर मोहोळ यांनी केली फडणवीसांची पोलखोल | प्रशांत जगताप | जलसंपदा खात्याच्या चुकीमुळे पुणे शहर पाण्यात | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आक्रमक

Categories
Breaking News Political social पुणे

Murlidhar Mohol Vs Prashant Jagtap | मुरलीधर मोहोळ यांनी केली फडणवीसांची पोलखोल | प्रशांत जगताप

| जलसंपदा खात्याच्या चुकीमुळे पुणे शहर पाण्यात | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आक्रमक

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे शहराचे खासदार तथा केंद्रीय नागरी उड्डाण, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी पुणे शहरात आलेल्या प्रलयास राज्याचे जलसंपदा खाते जबाबदार असल्याचे म्हटले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच राज्याच्या जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री असल्याने मुरलीधर मोहोळ यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांचा निष्क्रीय कारभार पुण्यातील महापूरास जबाबदार असल्याचे मान्य केले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून लाखो पुणेकरांच्या दुर्दशेस कारणीभूत ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व पुणेकरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.

विरोधकांनी आरोप केला तर त्याला फडणवीस नॅरेटीव्ह म्हणतात, आता स्वतःच्याच पक्षातील केंद्रीय मंत्र्यांनी पोलखोल केल्यानंतर तरी फडणवीसांनी आपली चूक कबूल करावी व झालेल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून पदाचा त्याग करावा. असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.

Mahesh Pokale | सिंहगड रोड परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या | शिवसेना नेते महेश पोकळे यांची मागणी 

Categories
Breaking News PMC social पुणे

Mahesh Pokale | सिंहगड रोड परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या | शिवसेना नेते महेश पोकळे यांची मागणी

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुण्यात आलेल्या महापुराचा फटका सिंहगड रोडवरील नागरिक आणि व्यापाऱ्यांना बसला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या. अशी मागणी ठाकरे गटाचे नेते महेश पोकळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

 

पोकळे यांच्या निवेदनानुसार 2५ जुलै २०२४ रोजी संपूर्ण पुणे शहराला पावसाने झोडपले. विशेष करून सिंहगड रोडवरील सामान्य नागरिक व व्यापारी यांना याचा खूप फटका बसला. कोणाचे घरातील साहित्याचे नुकसान झाले तर कोणाच्या दुकानातील संपूर्ण साहित्य पाण्यामुळे वाहून गेले. सामान्य लोकांच्या नशिबात नेहमीच संघर्ष येतो. मात्र राज्य सरकारने या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. असे पोकळे यांनी म्हटले आहे.

Shivsena Pune | शिवसेनेकडून पुण्यातील पाण्याखालील परिसरातील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

Categories
Breaking News Political social पुणे

Shivsena Pune | शिवसेनेकडून पुण्यातील पाण्याखालील परिसरातील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

 

Pune News – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या आदेशान्वये पुणे शहरातील सिंहगड रोडवरील एकता नगरी,निंबजनगर, विठ्ठल नगर, जलपूजन अपार्टमेंट तसेच पुलाची वाडी, पाटील इस्टेट विश्रांतवाडी,वारजे,दत्तवाडी, दांडेकर पूल,कोरेगाव पार्क, बोपोडी,येरवडा या परिसरात साचलेला गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यासाठी युद्ध पातळीवर मोहिम राबविण्यात आली असून 200 स्वयंसेवकांच्या टीम कडून पाण्याखालील परिसरातील गाळ उपसून काढण्यात सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना पुणे शहराचे प्रमुख प्रमोद नाना भानगिरे स्वतः घटनास्थळी पोहोचत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार, ‘शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे’ यांनी आवश्यक ती पाऊले उचलत, पुणे शहरातील सिंहगड रोड, संचेती पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलाचीवाडी आदी भागात मनपाच्या सफाई कामगारांना सोबत घेवून, आपण स्वत: तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खासगी कंपनीच्या मदतीने अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने परिसरातील चिखल उपसायला सुरवात केली आहे व आवश्यक ती मदत देखील तेथील नागरिकांना पुरवण्यात येत आहे.
पुणेकरांना मदत करण्याससाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून स्वतंत्र मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. पुणे शिवसेनेमार्फत शिवाजीनगर परिसरातील पूरग्रस्त नागरिकांसाठी शिवाजीनगर मतदारसंघातील पी. एम. सी. कॉलनी वाकडेवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, वाकडेवाडीतील न. ता. वाडी शाळा, शिवाजीनगर मेट्रो स्टेशनमागील खाशाबा जाधव शाळा, आणि संगमवाडी येथील मेजर राणे शाळा या ठिकाणी भोजनाची सोय करण्यात आलेली आहे.

शिवसेनेमार्फत अतिमुसळधार पावसामुळे व पुरामुळे शहरातील विविध ठिकाणी नागरिक अडकले असता त्यांना तातडीने सुरक्षितरित्या हलविण्यात आले व यावेळी नागरिकांना झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय मदत पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने पुरवण्यात आली आहे. तसेच पुरानंतर उद्भवू शकणाऱ्या संभाव्य साथ रोगाच्या शक्यतेमुळे नागरिकांना आवश्यक ती वैद्यकीय मदत शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाकडून देण्यात येणार आहे. तसेच
पुरामुळे नागरिकांचे झालेले नुकसान विचारात घेवून, शिवसेना पुणेतर्फे संसारोपयोगी साहित्याची मदत करण्यात येणार आहे.
पुरामुळे नुकसान झालेल्या पुरग्रस्त नागरिकांना स्वत:च्या घराची स्वच्छता करण्यासाठी मदत करण्यासह परिसरातील चिखल काढून परीसराची स्वच्छता करण्यासाठी, शहराध्यक्ष प्रमोदनाना भानगिरे, रमेश बापू कोंडे, निलेश गिरमे व शिवसेनेचे पदाधिकारी, विभागप्रमुख,उपविभागप्रमुख, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Amol Balwadkar | प्रशासनाच्या भरोशावर न थांबता अमोल बालवडकर यांची स्वतःची एक यंत्रणा! | जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे केले आवाहन 

Categories
Breaking News Political social पुणे

Amol Balwadkar | प्रशासनाच्या भरोशावर न थांबता अमोल बालवडकर यांची स्वतःची एक यंत्रणा! | जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे केले आवाहन

 

Pune Rain – (The Karbhari News Service) – अती पावसामुळे बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, म्हाळुंगे, कोथरुड भागात अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. त्यामुळे लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने वतीने नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. स्वतः अमोल बालवडकर देखील प्रत्येक्ष बाहेर पडून नागरीकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या करिता त्यांनी प्रशासनाच्या भरोशावर न थांबता स्वतःची एक यंत्रणा उभी केली आहे. ज्यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

याबद्दल माहिती देताना अमोल बालवडकर यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे आपल्या परिसरामध्ये नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे नागरिकांना या अडचणीतून दिलासा मिळावा म्हणून ज्या नागरिकांना जनरेटर, ॲम्बुलन्स, पाणी टँकर, जेसीबी, मड पंप व इतर कोणतीही मदत हवी असेल तर त्यासाठी माझ्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा अशी सर्वांना विनंती. मी स्वतः देखील बाहेर पडून सर्व गोष्टींकडे लक्ष ठेऊन आहे. तरी नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व आपल्या परिसरात काही अडचण निर्माण झाल्यास आमच्याशी संपर्क साधावा.

नागरिकांना पावसामुळे समस्या निर्माण झाल्या असल्यास मदत हवी असेल तर अमोल बालवडकर जनसंपर्क कार्यालयात 9028790999 या नंबर वर संपर्क साधावा. असे आवाहन अमोल बालवडकर यांनी केले आहे.

Pune News | बाणेर-बालेवाडी-सोमेश्वरवाडीतील नाल्यांना संरक्षक भिंत उभारा | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून बाणेर परिसरातील पूरग्रस्त भागांची पाहणी

Categories
Breaking News Political social पुणे

Pune News | बाणेर-बालेवाडी-सोमेश्वरवाडीतील नाल्यांना संरक्षक भिंत उभारा | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून बाणेर परिसरातील पूरग्रस्त भागांची पाहणी

 

 

Chandrakant Patil – (The Karbhari News Service) –  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बाणेर, बालेवाडी, सोमेश्वरवाडी भागातील पूरग्रस्त भागांची पाहणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील नाल्यांना संरक्षक भिंत नसल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण असून पुणे महापालिकेने सर्वेक्षण करुन नाल्यांना संरक्षक भिंत उभारण्याचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, अभियंता दीपक लांडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, शहरातील सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी आदी भागात नाल्यांना संरक्षक भिंत नसल्याने सोसायटी भाग आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याची बाब नागरिकांनी निदर्शनास आणून दिली आहे. भविष्यात पुरपरिस्थिती टाळण्याकरीता पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची रुंदी वाढविण्याबाबत सर्वेक्षण करावे. या कामी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, श्री. पाटील म्हणाले.

Chandrakant Patil | पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मदत करू -चंद्रकांतदादा पाटील | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Chandrakant Patil | पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मदत करू -चंद्रकांतदादा पाटील

| उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी

 

 

Pune News – (The Karbhari News Service) –  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एरंडवणे येथील पूरग्रस्त भागाला भेट देवून येथील नागरिकांशी संवाद साधला. पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून पुरग्रस्त नागरिकांना तात्काळ आवश्यक सर्व मदत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुणे महानगरपालिका उपायुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त विजय नायकल, डॉ. संदीप बुटाला, पुनीत जोशी आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील यांनी रजपूत विटभट्टी, कोथरूड येथील शाहू वसाहत, एरंडवणे येथील प्रतिज्ञा मंगल कार्यालय आणि कर्वे नगर येथील स्पेन्सर चौक भागाला भेट दिली. पूराचे पाणी शिरलेल्या घरांची पाहणी करून त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पुण्यात बुधवारी मध्यरात्रीपासून झालेला पाऊस हा असाधारण होता. मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागले, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. कोथरुडमधील पूरग्रस्त नागरिकांना जेवण- नाश्त्याची सर्व व्यवस्था करण्यात आली, तसेच रात्री ब्लँकेटदेखील देण्यात आले. पुरामुळे घरांच्या झालेल्या नुकसानाची माहिती घेवून प्रशासनाच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून मदत केली जाईल, अशा शब्दात त्यांनी नागरिकांना दिलासा दिला.

वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश श्री.पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Pune Flood News | केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Flood News | केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

|अतिवृष्टीच्या काळात सर्व शासकीय यंत्रणेने समन्वयाने कामे करावीत-मुरलीधर मोहोळ

 

Murlidhar Mohol – (The Karbhari News Service) –  जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन बाधित नागरिकांना तात्काळ मदत करावी, आपत्तीच्या काळात सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत,असे निर्देश केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. (Pune News)

शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

श्री. मोहोळ म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पुरबाधित क्षेत्रातील स्थलांतरीत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. या भागात स्वच्छता करण्यासोबतच नागरिकांना अन्न, स्वच्छ पाणी देण्याची सोय करावी. नागरिकांची आरोग्य तपासणी करावी, रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. याकरीता पुरेसे मनुष्यबळ वाढवावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरीता पुराच्या पाण्यात खराब झालेले किंवा वाहून गेलेले दाखले उपलब्ध करून द्यावेत.

धरणातील पाण्याचा विसर्गामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता विसर्ग करण्यापूर्वी जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महसूल, महानगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक यंत्रणांना कळवावे, जेणेकरुन त्यासूचना नागरिकांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल. नदीपात्रावरील गावातील नागरिकांना स्थानिक यंत्रणेच्या माध्यमातून धरणातील पाणी विसर्गाबाबत सूचना द्याव्यात. शहरातील पुरबाधित भागात सीसीटिव्ही यंत्रणा कायान्वित करण्यात यावी. महावितरणच्यावतीने खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पुर्वरत करावा. पुणे शहरात निर्माण झालेली पूरपरिस्थिती भविष्यात उद्भवणार नये, याबाबत दक्षता घेण्यात यावी,असेही श्री. मोहोळ म्हणाले.

श्री. पाटील म्हणाले, पुरबाधित भागात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. तसेच या भागांतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करुन नुकसानीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीस उपस्थितीत लोकप्रतिनिधींनी धरणातील पाणीसाठा, विसर्गाबाबत वेळोवेळी अद्ययावत सूचना, पुरबाधित भागातील नुकसानीचे पंचनामे करुन बाधित नागरिकांना मदत, त्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई, नदीपात्रातील भराव काढणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केल्या.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, भारतीय हवामान खाते आणि कृषी विभागाच्या स्कायमेट यंत्रणेकडून येणाऱ्या पर्जन्यमानाच्या अंदाजाच्या सुक्ष्म निरीक्षणाकरीता पुणे महानगरपालिकेने एक स्वतंत्र कक्ष निर्माण करावा. जलसंपदा विभागाने धरणातील येवा तसेच धरणातून करण्यात येणारा पाण्याच्या विसर्गाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महसूल, महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक यंत्रणांना संदेश व दूरध्वनी, इमेलद्वारे कळवावे, त्याची नोंदही घेण्यात यावी. पुरबाधित झालेल्या भागातील नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत करण्याची करावी. विशेष मदतीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही डॉ. पुलकुंडवार म्हणाले.

डॉ. दिवसे म्हणाले, पुरबाधित परिसरातील नागरिकांना मदतकार्य सुरू असून बाधित क्षेत्रातील सुमारे ४ हजार ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांना जेवण, नाश्ता, ब्लॅकेट आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पुणे शहर व हवेलीचे उप विभागीय अधिकारी यांच्या मदतीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीसाठीचे प्रस्ताव तात्काळ शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. अतिवृष्टीच्या काळात मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीकरीता प्रस्तावाकरीता सादर करण्यात येणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजाबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून त्यानुसार जिल्ह्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. दिवसे यांनी दिली.

श्री. अमितेश कुमार आणि डॉ. भोसले यांनी पुणे शहरात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे बाधित भागात करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत माहिती दिली.

जलसंपदा विभागाचे श्री. कपोले आणि श्री. गुणाले यांनी धरणक्षेत्रातील पाण्याच्या स्थिती, धरणातील येव्याच्या मोजमापाबाबत माहिती दिली.

Pune Irrigation Department | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यावरून टीका झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने दिला खुलासा!

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Pune Irrigation Department | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यावरून टीका झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने दिला खुलासा!

 

Khadakwasla Dam – (The Karbhari News Service) – पुणे शहरात महापूर सारखी परिस्थिती निर्माण होण्यास पाटबंधारे विभाग कारणीभूत आहे. नागरिकांना न कळवता पाटबंधारे विभागाने जास्त पाण्याचा विसर्ग केला आणि पूरस्थिती उद्भवली. असा आरोप खासदार मुरलीधर मोहोळ आणि बऱ्याच राजकीय नेत्यांनी केला. यावर पाटबंधारे विभागाने आपला खुलासा सादर केला आहे. (Pune Rain News)

खडकवासला समुहातील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणाच्यावरील भागात २५ जुलै २०२४ रोजी पहाटे २ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत अतिवृष्टी झाली. या २४ तासांत ११८ ते ४५३.५ मी.मी. इतकी अचानक अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे खडकवासला धरण ते पुणे शहर या भागामध्ये १०८ ते १६७.५ मी.मी. इतका पाऊस झाला व तो विक्रमी स्वरुपाचा होता. त्यामुळे खडकवासला धरणातील मोठ्या प्रमाणातील येवा तसेच शहरातील नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. या अचानक आलेल्या पाऊसामुळे धरणातील विसर्ग सोडणे आवश्यक होते. त्यानुसार नियोजन करुन नदीत पाणी सोडण्यात आले होते.

जलसंपदा विभागाने या संदर्भात सतत संनियंत्रण करुन पाणी सोडण्याची पुर्वसूचना २२ जुलै २०२४ पासून पुणे महानगरपालिका नियंत्रण कक्ष व जिल्हा आपत्ती निवारण कक्ष यांना देण्यात आली होती. जलसंपदा विभाग महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्यात योग्य तो समन्वय राखण्यात आलेला आहे, असेही खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे पाटबंधारे मंडळ पुणे यांनी कळविले आहे.

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाचे आवाहन

खडकवासला धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्यास परिस्थितीनुसार धरणातून विसर्ग करण्यात येणार असून नदीकाठच्या नागरीकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

पुणे शहरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन व त्यांची गैरसोय होऊ नये याकरीता जलसंपदा विभागाचे अधिकारी सतर्क आहेत. खडकवासला पाटबंधारे विभाग जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांच्या संपर्कात असून वेळोवेळी धरणातील पाण्याच्या विसर्गाची माहिती अवगत करीत आहे.

 

Pune Rain | PMC Deputy Commissioner | शासनाकडील अनुभवी उपयुक्तांना दिली जावी महापूरात सापडलेल्या विस्थापितांची जबाबदारी! | विविध क्षेत्रातून मागणी

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Rain | PMC Deputy Commissioner | शासनाकडील अनुभवी उपयुक्तांना दिली जावी महापूरात सापडलेल्या विस्थापितांची जबाबदारी!  | विविध क्षेत्रातून मागणी

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – पुणे शहर आणि परिसरात गेले काही दिवस पडत असलेल्या पावसाने कहर केला आहे. कित्येक लोकांना आपले घर सोडून राहावे लागत आहे. महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत मात्र कर्मचाऱ्यांच्या अभावी पालिकेवर ताण येत आहे. दरम्यान पालिकेत नुकतेच सरकारकडील ४ अधिकारी उपायुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यातील काही अधिकाऱ्यांनी याआधी पालिकेत विविध झोनला काम पाहिले आहे. पूरग्रस्त आणि विस्थापित लोकांची जबाबदारी या अनुभवी उपायुक्त यांना दिली तर चांगला समन्वय साधला जाईल. अशी मागणी विविध क्षेत्रातून महापालिका आयुक्त यांच्याकडे केली जात आहे. (Pune News)
पुणे महापालिका क्षेत्रात पडलेला पाऊस आणि धरणातून केलेला विसर्ग यामुळे पुणे शहरात महापुराची स्थिती निर्माण झाली. लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांना विस्थापित व्हावे लागले. तसेच त्यांचे आर्थिक नुकसान देखील झाले. शिवाय त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ लागला आहे. महापालिकेकडून आता पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र हे काम करण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. (Pune PMC News)
दरम्यान पालिकेत नुकतेच सरकारकडील ४ अधिकारी उपायुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यातील काही अधिकाऱ्यांनी याआधी पालिकेत विविध झोनला काम पाहिले आहे. पूरग्रस्त आणि विस्थापित लोकांची जबाबदारी या अनुभवी उपायुक्त यांना दिली तर चांगला समन्वय साधला जाईल. यासाठी शहरांचे दोन भाग पाडून  दोन उपायुक्त अधिकऱ्यांची नेमणुक करावी.
कारण नुकसान भरपाई आणि पंचनामा यासारखे विषय महसूल विभागातील अधिकारी चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. त्याचे चांगले ज्ञान देखील त्यांना असते. असे झाले तर शहरात चांगले काम होईल. नागरिकांना मदत मिळण्यात कसूर होणार नाही. नागरिकांचा पालिकेवरील विश्वास वाढेल. त्यामुळे महापालिकेची प्रतिष्ठा देखील सरकारी अधिकाऱ्यांमुळे वाढीस लागेल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Pune Rain News | पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

Pune Rain News | पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी |  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

 

CM Eknath Shinde – (The Karbhari News Service) – पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. (Pune News)

पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरामध्ये चिखल शिरला आहे. त्यामुळे याभागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याची त्वरित दखल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतली असून जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल साफ करण्यासाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणार असून त्यांच्या माध्यमातून घरांमधील चिखल काढून साफसफाई करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुराचे पाणी, चिखल यामुळे परीसरात रोगराई पसरू नये यासाठी महापालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.