Mahesh Pokale | सिंहगड रोड परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या | शिवसेना नेते महेश पोकळे यांची मागणी 

Categories
Breaking News PMC social पुणे

Mahesh Pokale | सिंहगड रोड परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या | शिवसेना नेते महेश पोकळे यांची मागणी

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुण्यात आलेल्या महापुराचा फटका सिंहगड रोडवरील नागरिक आणि व्यापाऱ्यांना बसला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या. अशी मागणी ठाकरे गटाचे नेते महेश पोकळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

 

पोकळे यांच्या निवेदनानुसार 2५ जुलै २०२४ रोजी संपूर्ण पुणे शहराला पावसाने झोडपले. विशेष करून सिंहगड रोडवरील सामान्य नागरिक व व्यापारी यांना याचा खूप फटका बसला. कोणाचे घरातील साहित्याचे नुकसान झाले तर कोणाच्या दुकानातील संपूर्ण साहित्य पाण्यामुळे वाहून गेले. सामान्य लोकांच्या नशिबात नेहमीच संघर्ष येतो. मात्र राज्य सरकारने या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. असे पोकळे यांनी म्हटले आहे.

Amol Balwadkar | प्रशासनाच्या भरोशावर न थांबता अमोल बालवडकर यांची स्वतःची एक यंत्रणा! | जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे केले आवाहन 

Categories
Breaking News Political social पुणे

Amol Balwadkar | प्रशासनाच्या भरोशावर न थांबता अमोल बालवडकर यांची स्वतःची एक यंत्रणा! | जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे केले आवाहन

 

Pune Rain – (The Karbhari News Service) – अती पावसामुळे बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, म्हाळुंगे, कोथरुड भागात अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. त्यामुळे लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने वतीने नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. स्वतः अमोल बालवडकर देखील प्रत्येक्ष बाहेर पडून नागरीकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या करिता त्यांनी प्रशासनाच्या भरोशावर न थांबता स्वतःची एक यंत्रणा उभी केली आहे. ज्यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

याबद्दल माहिती देताना अमोल बालवडकर यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे आपल्या परिसरामध्ये नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे नागरिकांना या अडचणीतून दिलासा मिळावा म्हणून ज्या नागरिकांना जनरेटर, ॲम्बुलन्स, पाणी टँकर, जेसीबी, मड पंप व इतर कोणतीही मदत हवी असेल तर त्यासाठी माझ्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा अशी सर्वांना विनंती. मी स्वतः देखील बाहेर पडून सर्व गोष्टींकडे लक्ष ठेऊन आहे. तरी नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व आपल्या परिसरात काही अडचण निर्माण झाल्यास आमच्याशी संपर्क साधावा.

नागरिकांना पावसामुळे समस्या निर्माण झाल्या असल्यास मदत हवी असेल तर अमोल बालवडकर जनसंपर्क कार्यालयात 9028790999 या नंबर वर संपर्क साधावा. असे आवाहन अमोल बालवडकर यांनी केले आहे.

Pune Rain | PMC Deputy Commissioner | शासनाकडील अनुभवी उपयुक्तांना दिली जावी महापूरात सापडलेल्या विस्थापितांची जबाबदारी! | विविध क्षेत्रातून मागणी

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Rain | PMC Deputy Commissioner | शासनाकडील अनुभवी उपयुक्तांना दिली जावी महापूरात सापडलेल्या विस्थापितांची जबाबदारी!  | विविध क्षेत्रातून मागणी

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – पुणे शहर आणि परिसरात गेले काही दिवस पडत असलेल्या पावसाने कहर केला आहे. कित्येक लोकांना आपले घर सोडून राहावे लागत आहे. महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत मात्र कर्मचाऱ्यांच्या अभावी पालिकेवर ताण येत आहे. दरम्यान पालिकेत नुकतेच सरकारकडील ४ अधिकारी उपायुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यातील काही अधिकाऱ्यांनी याआधी पालिकेत विविध झोनला काम पाहिले आहे. पूरग्रस्त आणि विस्थापित लोकांची जबाबदारी या अनुभवी उपायुक्त यांना दिली तर चांगला समन्वय साधला जाईल. अशी मागणी विविध क्षेत्रातून महापालिका आयुक्त यांच्याकडे केली जात आहे. (Pune News)
पुणे महापालिका क्षेत्रात पडलेला पाऊस आणि धरणातून केलेला विसर्ग यामुळे पुणे शहरात महापुराची स्थिती निर्माण झाली. लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांना विस्थापित व्हावे लागले. तसेच त्यांचे आर्थिक नुकसान देखील झाले. शिवाय त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ लागला आहे. महापालिकेकडून आता पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र हे काम करण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. (Pune PMC News)
दरम्यान पालिकेत नुकतेच सरकारकडील ४ अधिकारी उपायुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यातील काही अधिकाऱ्यांनी याआधी पालिकेत विविध झोनला काम पाहिले आहे. पूरग्रस्त आणि विस्थापित लोकांची जबाबदारी या अनुभवी उपायुक्त यांना दिली तर चांगला समन्वय साधला जाईल. यासाठी शहरांचे दोन भाग पाडून  दोन उपायुक्त अधिकऱ्यांची नेमणुक करावी.
कारण नुकसान भरपाई आणि पंचनामा यासारखे विषय महसूल विभागातील अधिकारी चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. त्याचे चांगले ज्ञान देखील त्यांना असते. असे झाले तर शहरात चांगले काम होईल. नागरिकांना मदत मिळण्यात कसूर होणार नाही. नागरिकांचा पालिकेवरील विश्वास वाढेल. त्यामुळे महापालिकेची प्रतिष्ठा देखील सरकारी अधिकाऱ्यांमुळे वाढीस लागेल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Pune Rain News | पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

Pune Rain News | पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी |  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

 

CM Eknath Shinde – (The Karbhari News Service) – पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. (Pune News)

पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरामध्ये चिखल शिरला आहे. त्यामुळे याभागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याची त्वरित दखल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतली असून जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल साफ करण्यासाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणार असून त्यांच्या माध्यमातून घरांमधील चिखल काढून साफसफाई करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुराचे पाणी, चिखल यामुळे परीसरात रोगराई पसरू नये यासाठी महापालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

Pune School Closed | पुणे शहर आणि परिसरातील शाळांना उद्या देखील सुट्टी | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी जारी केले आदेश

Categories
Breaking News Education social पुणे

Pune School Closed | पुणे शहर आणि परिसरातील शाळांना उद्या देखील सुट्टी | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी जारी केले आदेश

Pune School Closed- (The Karbhari News Service) – भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ जुलै व २६ जुलै २०२४ रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at few places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार आज (२५ जुलै) शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे उद्या (२६ जुलै) देखील पुणे शहर आणि परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश जारी केले आहेत. (Dr Suhas Diwase IAS)

जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील
शाळा २६ जुलै २०२४ रोजी बंद ठेवणे आवश्यक आहे. तसेच खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग
सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. (Pune News)

या सर्व बाबींचा विचार करता भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २६ जुलै २०१४ रोजी सुट्टी जाहिर करीत आहे. असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती
व्यवस्थापनाचे कामकाज करावे. असेही आदेशात म्हटले आहे.

 

PMC Fire Brigade | अग्निशमन दलाने २५४ नागरिकांची केली सुखरुप सुटका

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Fire Brigade | अग्निशमन दलाने २५४ नागरिकांची केली सुखरुप सुटका

PMC Fire Brigade -(The Karbhari News Service) – आत्तापर्यंत अग्निशमन दलाने जवळपास २५४ नागरिकांची सुखरुप सुटका केली/सुरक्षित स्थळी हलविले आहे. बोटी, रश्शी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग असे विविध साहित्य वापरले. स्वत: मुख्यअग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे तसेच वीस अग्निशमन अधिकारी व राञीपासून जवळपास दोनशे फायरमन कार्यरत आहेत. (Pune Rain News)

झाडपडी – ७८

घरपडी/भिंत पडणे – ०४ (भवानी पेठेत वाड्याची भिंत पडली व कोरेगांव पार्क, बर्निंग घाट नजीक भिंत पडली/खड्डा पडला – वडगावबुद्रुक – रविवार पेठ, पासोड्या विठोबा मंदिर – )

पाणी शिरले – २५ (वारजे, स्वामी विवेकानंद सोसायटी व फ्युचेरा सोसायटीत – शिवणे, सदगुरू सोसायटीत – सिहंगड रोड याठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी व इतर तीन सोसायटीमध्ये – नदीपाञ रस्ता, रजपुत वीटभट्टी नजीक, गंजपेठ, चांदतारा चौक – शिवाजीनगर, कर्वेनगर, पुलाची वाडी, पाटील इसटेट व इतर विविध परिसर)

सद्यस्थितीत अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान कार्यरत असून पाणी शिरलेल्या घटनास्थळी अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याकामी कार्यवाही करीत आहेत.

 

(वरिल सर्व घटनांमध्ये अद्याप कुठे ही जखमी वा जिवितहानी नाही)

Datta Bahirat Pune Congress | शॉक लागून झालेल्या ३ मृत तरुणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी | कॉंग्रेस नेते दत्ता बहिरट यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी 

Categories
Breaking News Political social पुणे

Datta Bahirat Pune Congress | शॉक लागून झालेल्या ३ मृत तरुणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी | कॉंग्रेस नेते दत्ता बहिरट यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

 

Datta Bahirat Pune Congress – (The Karbhari News Service) – छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा मतदार संघात पुराच्या पाण्यात विजेचा शॉक लागून 3 तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुलाची वाडी येथे घडली. डेक्कन नदीपात्रातील अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना शॉक लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुणांच्या नातेवाईकांना शासकीय निकषानुसार रोख शासकीय मदत करण्यात यावी तसेच कुटुंबातील कर्ते युवक गमावले असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी. अशी मागणी कॉंग्रेस नेते दत्ता बहिरट यांनी  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

बहिरट यांच्या निवेदनानुसार  पहाटे तीन वाजताच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला होता. हे तीन तरुण अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले होते. तेव्हा त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले होते. सदर तरुणांना उपचारांती डॉक्टरांनी पाहटे पाच वाजताच्या दरम्यान मृत घोषित केले आहे.

अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष 25) आणि आकाश विनायक माने (वय वर्ष 21) राहणार पूलाची वाडी डेक्कन , शिवा जिदबहादुर परिहार (वय वर्ष १८ )नेपाळी कामगार अशी मृत तरुणांची नावे आहेत.
महावितरणाने घटनेची पुष्टी केली आहे. पोलीस, महापालिका अधिकारीही घटनास्थळी गेले होते.

मृत तरुणांच्या नातेवाईकांना शासकीय निकषानुसार रोख शासकीय मदत करण्यात यावी तसेच कुटुंबातील कर्ते युवक गमावले असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी.

पुणे शहरात अचानक उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे नदी किनारी असलेल्या पुलाची वाडी, पाटील इस्टेट, मुळा रोड, भैय्या वाडी , खडकी, बोपोडी येथील वसाहतींमध्ये शेकडो घरांमध्ये नदीचे पाणी शिरले आणि नागरिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व नुकसान भरपाईचे प्रशासन स्तरावरून तातडीने पंचनामे करून नागरिकांना मदत करावी. असे बहिरट यांनी म्हटले आहे.

Pune Smart City | स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्यात दोन दिवसांच्या पावसात महावितरण च्या सेवेची दैना!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Smart City | स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्यात दोन दिवसांच्या पावसात महावितरण च्या सेवेची दैना!

 

Pune Rain | MSEDCL – ( The Karbhari News Service)– पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे आणि अनेक यंत्रणांच्या कामाच्या दर्जाचे पितळ उघडे पडायला सुरुवात झाली आहे. रस्त्यांची दुर्दशा महापालिकेची अब्रू चव्हाट्यावर आणतीये तर काल मध्यरात्रीपासून शहरातील पेठांपासून ते कात्रज पर्यंतच्या अनेक भागात अनेक तास लाखो नागरीक अंधारात बसल्यामुळे महावितरणच्या कारभाराचे पण धिंडवडे निघाले आहेत. अशी टीका सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे. (Vivek Velankar Sajag Nagrik Manch)

वेलणकर म्हणाले,  दोन्हीही यंत्रणा सगळा दोष पावसावर ढकलून मोकळे होत आहेत. मुंबई मध्ये पुण्यापेक्षा जास्त पाऊस असूनही वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना अपवादानेच का दिसतात, यांचे उत्तर महावितरणकडे नाही. मान्सून पूर्व देखभाल दुरुस्ती पुण्यासारख्या स्मार्ट सिटी मधे काय दर्जाची झाली आहे याचा आरसाच आजच्या अंधाराने दाखवून दिला आहे.

——-

पुणे हे महावितरणला राज्यातले सगळ्यात जास्त महसूल देणारे आणि नगण्य वीजचोरी असणारे शहर असूनही याचे फळ पुणेकरांना काय मिळतंय ते दिसतंच आहे. महावितरणकडे असलेल्या वीज पुरवठ्याच्या मक्तेदारी मुळे ही मस्ती सुरू आहे. जोपर्यंत टेलिफोन प्रमाणे वीज क्षेत्रातही स्पर्धा येत नाही तोपर्यंत पुणेकरांची अवस्था मुकी बिचारी कुणी हाका अशीच राहणार आहे यात शंका नाही.

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

Khadakwasla Dam  | खडकवासला प्रकल्पातील ४ धरणे ७५ टक्के क्षमतेने भरली | ६ वाजल्या पासून खडकवासला मधून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग 

Categories
Breaking News PMC social पुणे

Khadakwasla Dam  | खडकवासला प्रकल्पातील ४  धरणे ७५ टक्के क्षमतेने भरली | ६ वाजल्या पासून खडकवासला मधून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update – पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान  खडकवासला प्रकल्पातील पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी ४ धरणे ७५% क्षमतेने भरली आहेत. दरम्यान पावसाचा जोर पाहून खडकवासला धरणातून ६ वाजल्या पासून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. (Pune News)
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 15000क्युसेक्स विसर्ग वाढवून करून सं 6.00वा. 40000 क्यूसेक्स* करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो.  तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

खडकवासला मधून आतापर्यंत १.३ टीएमसी पाणी सोडण्यात आले

खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत २२.०३ टीएमसी म्हणजे ७६.५७% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) १.९४ टीएमसी म्हणजे ९८%, पानशेत धरणांत (Panshet Dam) ८.६९ टीएमसी म्हणजे ८१.६२% वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) ८.९१ टीएमसी म्हणजे ६९.४८% तर टेमघर धरणांत (Temghar Dam) २.४९ टीएमसी म्हणजे ६७.०८  इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत १७.८४ टीएमसी म्हणजे ६१.२०% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
दरम्यान रात्री पाणी जास्त सोडले जाऊ नये यासाठी सायंकाळी ६ वाजता खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
तर जून महिन्यापासून आतापर्यंत खडकवासला धरणातून १.३ टीएमसी पाणी मुठा आणि मुळा नदीच्या माध्यमातून कालव्यात सोडण्यात आले आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.
—-

DCM Ajit Pawar on Pune Rain | पावसामुळे दहावी-बारावीची परीक्षा न देऊ शकलेल्यांची स्वतंत्र परीक्षा घेणार | अजित पवार

Categories
Breaking News Education PMC Political social पुणे

DCM Ajit Pawar on Pune Rain | पावसामुळे दहावी-बारावीची परीक्षा न देऊ शकलेल्यांची स्वतंत्र परीक्षा घेणार | अजित पवार

 

Pune Rain News – (The Karbhari News Service) –  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील परिस्थिती बघता आवश्यक त्या उपाययोजना करुन नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. (10th, 12th Students Exam)

यावेळी यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (Divisional Commissioner Chandrakant Pulkundwar), पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS), जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS), पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे (PMRDA Commissioner Yogesh Mhase), महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. पृथ्वीराज (Prithviraj B P IAS) , भारतीय सैन्यदलाचे अमितेश पांण्डेय, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने (Ganesh Sonune PMC) आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, पुणे शहरातील एकतानगर सिहंगड रोड, संगम परिसर, शिवाजीनगर, हॅरीस ब्रिज शांतीनगर झोपडपट्टी, दांडेकर पुल दत्तवाडी आणि विश्रांतवाडी या परिसरात भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीएचे पथक तैनात करण्यात आले असून बचाव व मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. धरणातील पाण्याचा विसर्गामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता तसेच त्यांना करण्यात येणाऱ्या मदत व बचाव कार्यास अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता शक्यतो धरणातून दिवसा पाण्याचा विसर्ग वाढवावा. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यातून टंचाई भागातील तलाव भरून घ्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

श्री.पवार म्हणाले, पुरबाधित परिसरातील नागरिकांना मदतकार्य सुरू असून ज्या गृहनिर्माण संस्थांच्या पाण्याच्या टाकीत पुराचे पाणी शिरले आहे तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग नियंत्रित करून पूर नियंत्रणाचे प्रयत्न करण्यात येत आहे. पुरामुळे अन्नधान्य खराब झाले असलेल्या बाधितांच्या घरी शिधा पोहोचविण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना पूरस्थितीतमुळे दहावी-बारावीची परीक्षा देता आली नाही त्यांची स्वतंत्र परीक्षा घेण्यात येईल. स्थलांतंरीत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अतिवृष्टीच्या काळात दुर्घटनेत जखमी व्यक्तींचा उपचाराचा खर्च शासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. पूर परिस्थती आटोक्यात आण्याकरीता जिल्हा प्रशासन सतर्क राहून काम करीत आहे. नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी व्हावे. पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी द्यावे.

लवासा येथे दरड कोसळलेल्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढील ४८ तास धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली असून बंदी असलेल्या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. नागरिकांनी घाबरुन जावू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

यावेळी जिल्ह्यातील परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे आणि शहरातील परिस्थितीबाबत मनपा आयुक्त डॉ. भोसले यांनी माहिती दिली.