Pune Power Supply | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वीज पुरवठा विस्कळीत | महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Power Supply | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वीज पुरवठा विस्कळीत  | महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

Pune Power Supply | Shivsena UBT | पुणे – सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील अनेक पेठांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून वीज पुरवठा (Power supply in Peth Area) वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच ज्ञानप्रबोधिनी भागात कालपासून वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Shivsena UBT) तक्रारी केल्या. त्यामुळे शिवसेनाच्या वतीने महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. (Pune Municipal Corporation)
शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले कि, नारायण पेठेतील महावितरण केंद्रावर चौकशी केली असता तेथून मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेच्या रस्ता दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांकडून वेळोवेळी महावितरणच्या केबलचे नुकसान केले जाते. त्यामुळे पेठेतला वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून संबंधित घटनेची आणि ठेकेदारांची चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेण्याची मागणी शिवसेना पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत यांनी केली. यासाठी पुणे महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार आणि महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. योग्य कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने महावितरणावर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.
———————–

Mahavitran | MSEDCL | महावितरणच्या उदासीन कामकाजाचा नागरिकांना ‘शॉक’

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Mahavitran | MSEDCL | महावितरणच्या उदासीन कामकाजाचा नागरिकांना ‘शॉक’

| महावितरण ची बिलं मिळाली नसल्याने नागरिक हैराण

Mahavitran | MSEDCL | महावितरण च्या उदासीन कामकाजाचा शॉक नागरिकांना लागत आहे. मे महिन्याची नागरिकांना अजून बिले (Light Bill) मिळाली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी बिले भरली नाहीत. तर दुसरीकडे बिल भरले नाही म्हणून महावितरण च्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम केले आहे. या कारभारामुळे नागरिक हैराण आहेत. (Mahavitran News)

| महावितरण च्या एजेन्सी बदलाचा नागरिकांना फटका

महावितरण कडून नागरिकांना दर महिन्याला प्रिंटेड बिले पाठवली जातात. त्यानुसार नागरिकांकडून बिलांचा भरणा केला जातो. बिल उशिरा भरले तर दंड असतो आणि नाहीच भरले तर वीज कनेक्शन तोडले जाते. म्हणून नागरिक वीज बिल भरण्याची घाई करत असतात. वाकडेवाडी, शिवाजीनगर परिसरातील काही नागरिकांनी सांगितले कि,  मात्र जून महिन्याची 15 तारीख आली तरी मे महिन्याचे बिल अजूनही नागरिकांना मिळाले नाही. नेहमी महिन्याच्या सुरुवातीला बिल येत असते. बिल आले नसल्याने आम्ही बिल भरण्याचे विसरून गेलो. त्याचा फटका तात्काळ बसला. आमचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. दुसऱ्या एका नागरिकांना सांगितले कि वीज कनेक्शन तोडताना आम्ही कर्मचाऱ्यांना ऑनलाईन वीज बिल भरल्याची पावती दाखवत होतो. त्यांनी आमचे न ऐकता आम्हांला महावितरणच्या मुख्य कार्यालयात जा म्हणून सांगितले.
नागरीकांच्या या तक्रारी घेऊन आम्ही जेव्हा याबाबत महावितरण च्या अधिकाऱ्यांना विचारले तेव्हा सांगण्यात आले कि बिलाच्या कामाची एजेन्सी बदलली असल्याने हा गोंधळ झाला आहे. लवकरच बिले पाठवण्यात येतील.
News title | Mahavitran |  ‘Shock’ to the citizens of the depressed functioning of Mahavitran

Power Cut In Pune News | महावितरण अधिकाऱ्यांनो कारभार सुधारा अन्यथा नागरिकांसह भव्य मोर्चा काढू

Categories
Breaking News Political social पुणे

Power Cut In Pune News | महावितरण अधिकाऱ्यांनो कारभार सुधारा अन्यथा नागरिकांसह भव्य मोर्चा काढू

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा महावितरण अधिकाऱ्यांना इशारा

 

Power Cut In Pune News | महावितरणच्या (Mahavitran) कारभाराचे सगळीकडे वाभाडे निघत आहेत. तरी देखील त्यांच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा होताना दिसत नाही. गुरुवारी तब्बल आठ तास ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित (Pune Power Cut) करण्यात आला. त्याचा नाहक त्रास नागरिकांना झाला. महावितरणच्या कारभारात सुधारणा न झाल्यास नागरिकांसह भव्य मोर्चा महावितरणच्या कार्यालयावर आयोजित करू, असा इशारा पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Former Deputy Mayor Dr Siddharth Dhende) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. (Power Cut in pune news)

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (दि. १८) रात्री ७ वाजून १० मिनिटांनी अचानक तांत्रिक बिघाड झाला. परिणामी चाकण एमआयडीसीसह पुणे शहरातील नगररोड विभाग आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी व भोसरी विभागातील सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. सुमारे ३९६ मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगावशेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी आदी परिसरातील सुमारे १ लाख २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. (Pune power cut PGCIL)

महावितरणच्या या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. प्रभाग क्रमांक दोन मधील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, नागपूर चाळ, त्रिदलनगर सह अन्य भागातील नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. पुण्यात उन्हाचा पारा वाढला आहे. दिवसा बाहेर पडण्यास नागरिक धजावत नाहीत. घरात बसूनही प्रचंड गर्मीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. गर्मीने त्रस्त असताना यामधे महावितरणच्या गलथान कारभाराची भर पडली आहे. (Mahavitran Marathi news)

वास्तविक पाहता देखभाल दुरुस्तीसाठी खासगी ठेकेदार कंत्राटी कर्मचारी नेमून लाखो रुपये खिशात घालत आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी मोठी रक्कम खर्च होत असेल तर तांत्रिक बिघाड कसा होतो, असा सवाल डॉ. धेंडे यांनी उपस्थित केला. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार धरावेत. तसेच वीज पुरवठा खंडित करून ही यंत्रणा खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव बंद करा. अन्यथा या गलथान कारभाराचा तीव्र मोर्चा आयोजित करून निषेध करू, असा इशारा डॉ. धेंडे यांनी दिला. (Pune power cut)
—————————

News Title | Reform the administration or else we will take out a grand march with the citizens- Former Deputy Mayor Dr. Siddharth Dhende’s warning to the General Distribution Officers

Power outage : Pune : Pimpri-chinchwad : पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित

: महापारेषणच्या ४०० केव्ही टॉवर लाईनमध्ये बिघाड

पुणे: महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३०च्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी ६ वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.

अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले. तसेच महत्वाचे दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे देण्यात येत आहे.

महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करीत आहेत. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो. सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.