Pune Power Supply | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वीज पुरवठा विस्कळीत | महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Power Supply | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वीज पुरवठा विस्कळीत  | महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

Pune Power Supply | Shivsena UBT | पुणे – सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील अनेक पेठांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून वीज पुरवठा (Power supply in Peth Area) वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच ज्ञानप्रबोधिनी भागात कालपासून वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Shivsena UBT) तक्रारी केल्या. त्यामुळे शिवसेनाच्या वतीने महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. (Pune Municipal Corporation)
शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले कि, नारायण पेठेतील महावितरण केंद्रावर चौकशी केली असता तेथून मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेच्या रस्ता दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांकडून वेळोवेळी महावितरणच्या केबलचे नुकसान केले जाते. त्यामुळे पेठेतला वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून संबंधित घटनेची आणि ठेकेदारांची चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेण्याची मागणी शिवसेना पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत यांनी केली. यासाठी पुणे महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार आणि महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. योग्य कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने महावितरणावर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.
———————–

Indrayani River Pollution | इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी सोडणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

Categories
Breaking News Political पुणे

Indrayani River Pollution | इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी सोडणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

Indrayani River Pollution | आळंदी (Alandi) परिसरातून वाहणारी इंद्रायणी नदी (Indrayani River) हा सर्वांच्या आस्थेचा, प्रथा, परंपरा, श्रद्धेचा विषय असून, नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी येऊ नये, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायत हद्दीतील गावांमधील दैनंदिन वापराचे ६० ते ६५ एमएलडी पाणी कुठलीही प्रक्रिया न करता दूषित पाणी (Polluted water) थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे संबंधित कंपन्या सहकारी सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्थांचे बेजवाबदार अधिकारी, औद्योगिक वसाहतींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या (Shivsena UBT) वतीने करण्यात आली आहे. (Indrayani River Pollution)

या परिसरातील औद्योगिक वसाहती आणि काही लघु, माध्यम कारखाने नदीत थेट सांडपाणी सोडत असल्याचे निदर्शनास येत आहे. आषाढी वारी पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ऐन वारीच्या तोंडावर आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या, भाविकांच्या जीवाशी खेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित कंपन्या सहकारी सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्थांचे बेजवाबदार अधिकारी, औद्योगिक वसाहतींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. लवकरात लवकर यावर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या पुणे विभाग प्रादेशिक अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवा सेनेचे युवराज पारीख, विभागप्रमुख राजेश मोरे, शिवाजीनगर विभाग संघटक अतुल दिघे, शाखाप्रमुख राजेश शेलार, राजा गांजेकर, अभिषेक जगताप उपस्थित होते.

अनंत घरत (Anant Gharat) म्हणाले की, इंद्रायणीतील केमिकलसह सांडपाणी मिश्रीत पाणी वारकऱ्यांना तीर्थ म्हणून प्यावं लागत आहे हे आमच्यासाठी धार्मिक भावना दुखावल्या इतकेच धक्कादायक आहे. आषाढी वारीच्यावेळी राज्यभरातील चार ते पाच दिवस लाखो भाविकांना याच पाण्यात आंघोळ करावी लागते. शिवाय काही ठराविक वेळेला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीला मुखवट्याला देखील इंद्रायणीच्या पाण्याने अभिषेक केला जातो. प्रदूषित पाण्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. प्रशासनाकडून देखील याकडे लक्ष दिलं जात नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अलंकापुरी जणू इंद्रायणीला काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे वेळेप्रसंगी अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे “नाठाळाच्या माथी हाणू काठी” चा वापर करावा लागेल असे घरत म्हणाले.
——————

News Title |Indrayani River Pollution | Shiv Sena’s demand to file criminal charges against those responsible for discharging polluted sewage into Indrayani river

cartoon competition | “बाळकडू” व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

“बाळकडू” व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन

पुणे| जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त (५ मे) पुण्यामध्ये “बाळकडू” या राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सारसबागसमोरील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे या स्पर्धेतील व्यंगचित्रांचे प्रदर्शन दिनांक ५ मे रोजी होणार आहे. नुकतेच या स्पर्धेच्या पोस्टरचे उद्घाटन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, युवासेनेचे राजेश पळसकर, अविनाश बलकवडे, सनी गवते, युवराज पारीख, संजय साळवी आणि शिवसैनिकांसह विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना प्रसिद्धी प्रमुख पुणे अनंत घरत, व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी केले आहे.

जास्ती जास्त युवकांपर्यंत ही स्पर्धा नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे वरुण सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. मराठी मातीतील कुंचल्याचे फटकारे, देशातील राजकिय, सामाजिक घडामोडींवर भाष्य करणारे, निर्भीड व्यंगचित्रकारांचे एक व्यासपीठ उभे करण्याचे आमचे उदिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धकांनी सहभाग नोंदवण्यासाठी २ मे पर्यंत amit.papal19@gmail.com यावर आपले व्यंगचित्रकार पाठवावे किंवा ९०२८९०२१८०, ९९२२९२७९५९ यावर संपर्क साधावा.