Pune Metro should be connected to the Pune airport for the convenience of passengers   | MLA Sunil Tingre’s demand in the assembly

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Metro should be connected to the Pune airport for the convenience of passengers

 | MLA Sunil Tingre’s demand in the assembly

Pune – (The Karbhari Online) – Pune Metro network is being built in Pune city.  However, the metro line has not been connected to the Pune airport, Sunil Tingre, MLA of Vadgaon Sheri, demanded in the assembly that the metro line should be taken to the airport for the convenience of passengers.
        MLA Tingre participated in the discussion on Resolution 293 in the Legislative Assembly.  On this occasion, he said, Metro network is spreading in the city on a large scale, it is getting response from passengers.  This metro has connected important parts like Shivajinagar, Pune Station Railway Station, Swargate ST Stand.  However, the city seems to have forgotten that it has an airport.  This metro has reached Ramwadi on city road.  However, it is not connected to the airport, thus causing inconvenience to passengers traveling to and from the airport.  We see direct metro facility from airport abroad.  Similarly, MLA Tingre demanded from the government that metro should be taken to Pune airport for the convenience of passengers.
 ———————
 Housing should be provided to slum dwellers by 2024
 The SRA scheme implemented to provide rightful housing to slum dwellers has been providing housing to slum dwellers till 2011.  However, MLA Tingre also requested the government to amend the rules of this scheme to include the slum dwellers till 2024 and give them houses, so that the slum dwellers who have raised their families can benefit from it.
 ——–

Shiv Sena Thackeray Group Plays “Band Baja” Against Nilesh Rane 

Categories
Breaking News PMC Political पुणे

Shiv Sena Thackeray Group Plays “Band Baja” Against Nilesh Rane

 Shiv Sena Bandabaja Rane’s door against Property tax embezzlement
 Pune – (The karbhari Online) –  Shiv Sena aggressively played “band baja” on behalf of Uddhav Balasaheb Thackeray’s party near the building of R Deccan in Deccan area of ​​Pune.  Pune Municipal Corporation has sealed the property of BJP leader Nilesh Rane in R Deccan area for non-payment of income tax.  On behalf of Shiv Sena, the “Band Baja” movement was launched against BJP leader Nilesh Rane.  On this occasion, loud slogans were also made by attaching Nilesh Rane’s photo.
 Nilesh Rane was slapped by the Pune Municipal Corporation and the municipality had issued a notice to Rane in the case of exhausting property in R Deccan Mall in Deccan area.  Thereafter, the tax collection department of the Municipal Corporation sealed the portion of the outstanding income.  There was arrears of about three and a half crores of related income.  This tax was not paid even after issuing a notice from the Pune Municipal Corporation.  So finally, the Municipal Corporation has sealed the upper two floors of the three-storey building.  However, even though one income was sealed, the administration, which made a lot of noise, expressed surprise that this information was kept confidential.  Similarly, why is there a different justice for the common Pune people and different justice for the BJP leaders, does the common man have no respect, is the Pune administration afraid of the BJP or Rane?  Such a question was asked in the movement.  Shiv Sena city chief Sanjay More said that if Rane does not pay income tax this week, Shiv Sena will come again in front of the hotel in Deccan and protest with bands.
 On this occasion, Shiv Sena City Chief Sanjay More, Gajanan Tharkude, City Organizer Rajendra Shinde, Prominent Chief Anant Gharat, Kishore Rajput, Balasaheb Bhande, Atul Dighe, Mahesh Pokle, Umesh Wagh, Chandan Salunkhe, Mukund Chavan, Karuna Ghadge, Santosh Bhutkar, Nagesh Khadke, Sandeep  Gaikwad, Rajesh More, Imran Khan, Sanjay Walhekar, Kiran Shinde, Rahul Shedge, Adinath Bhakere, Sachin Gholap, Vicky Dhotre, Praveen Dongre, Ranjit Shinde, Prateek Galinde Ganesh Khalate, Hari Sapkal, Anil Inamdar, Shashank Solankhi were present.

BJP Leader Nilesh Rane PMC Property Tax | निलेश राणेंच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने वाजविला “बँड”

Categories
Breaking News PMC Political social पुणे

BJP Leader Nilesh Rane PMC Tax | निलेश राणेंच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने वाजविला “बँड”

| मिळकत करबुडवेगिरी विरोधात शिवसेना बँडबाजा राणेंच्या दारात.

 

पुणे – (The Karbhari Online ) –  पुण्यातील डेक्कन परिसरातील आर डेक्कन येथील इमारतीसमाेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाच्या वतीने आक्रमकपणे “बँड बाजा” वाजविला. पुणे महापालिकेने (PMC Pune) आर डेक्कन (R Deccan Mall Pune) परिसरात भाजप नेते निलेश राणेंची (BJP Leader Nilesh Rane) मिळकत कर न भरल्यामुळे सील केली. शिवसेनेच्या वतीने भाजप नेते निलेश राणेंच्या विरोधात “बँड बाजा” आंदोलन छेडले. यावेळी निलेश राणेंच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

निलेश राणे यांना पुणे महापालिकेने दणका देत डेक्कन भागातील आर डेक्कन मॉलमध्ये मिळकत थकवल्या प्रकरणी पालिकेने राणेपुत्राला नोटीस बजावली होती. त्यानंतर महापालिकेच्या कर संकलन विभागाने थकित मिळकतीचा भाग सील केला. संबंधित मिळकतीची सुमारे साडेतीन कोटी रुपयांची थकबाकी होती. पुणे महापालिकेकडून नोटीस बजावूनही हा कर भरला जात नव्हता. त्यामुळे अखेर महापालिकेने तीन मजल्यांच्या मिळकतीचे वरचे दोन मजले सील केले आहेत. मात्र, एरवी एक मिळकत सील केली, तरी मोठा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाकडून मात्र ही माहिती गोपनीय ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. अशातच सामान्य पुणेकरांना वेगळा न्याय आणि भाजप नेत्यांना वेगळा न्याय असे का, सामान्य माणसाला सन्मान नाही का, पुणे प्रशासन भाजप किंवा राणे यांना घाबरते का? असा प्रश्न आंदोलनात विचारण्यात आला. यावेळी या आठवड्यात जर राणे यांनी मिळकत कर नाही भरला तर शिवसेना पुन्हा डेक्कन येथील हॉटेल समोर येऊन बँडबाजा घेऊन आंदोलनं करणार असे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले .

यावेळी शिवसेना शहप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, प्रसिध्दी प्रमुख अनंत घरत, किशोर राजपूत, बाळासाहेब भांडे, अतुल दिघे, महेश पोकळे, उमेश वाघ, चंदन साळुंखे, मुकुंद चव्हाण, करुणा घाडगे, संतोष भुतकर, नागेश खडके, संदीप गायकवाड, राजेश मोरे, इम्रान खान, संजय वाल्हेकर, किरण शिंदे, राहुल शेडगे, आदिनाथ भाकरे, सचिन घोलप, विकी धोत्रे, प्रवीण डोंगरे, रणजित शिंदे, प्रतीक गालिंदे गणेश खलाटे, हरी सपकाळ, अनिल इनामदार, शशांक सोळंखी उपस्थित होते.

Sachin Ahir | Shivsena UBT Pune | खडकवासलामध्ये शेकडोजणांचा शिवसेनेत प्रवेश

Categories
Breaking News Political आरोग्य पुणे

Sachin Ahir | Shivsena UBT Pune | खडकवासलामध्ये शेकडोजणांचा शिवसेनेत प्रवेश

राज्यात आरोग्यसेवाच व्हेंटिलेटरवर – संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर

पुणे|  राज्यातील तिघाडी सरकार केवळ सत्ता उपभोगण्यात दंग आहे. आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये मृत्यूचे सत्र सुरूच असून, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर गेली आहे. हजारोंच्या संख्येने नोकऱ्या गेल्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढत चालली आहे. अशावेळी महाराष्ट्राला केवळ सत्ताधारी नेतृत्व नको, तर राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी केले.

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रदीप दोडके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना, युवा सेना यांच्या वतीने आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना अहिर बोलत होते. जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, शहर समन्वयक बाळा ओसवाल, विस्तारक राजेश पळसकर, नीलेश बडदे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी सचिन पासलकर, विधानसभा प्रमुख नितीन वाघ, युवा सेना शहर अधिकारी सनी गवते, राम थरकुडे, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, संतोष गोपाळ, तालुकाप्रमुख तानाजी पवळे, उपजिल्हाप्रमुख रवी मुजुमले, समन्वयक गणपत खाटपे, शिवम लांडगे, निवृत्ती वाव्हळ यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सचिन अहिर म्हणाले, राज्यातील तिघाडी सरकारच्या अनास्थेमुळे राज्यातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर गेली आहे. आरोग्य विभागाचे जबाबदार मंत्र्यांकडून या परिस्थितीत जबाबदारी झटकून आपली कातडी वाचवली जात आहे. कोरोनाच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केवळ राज्यच सावरले नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्था देखील सांभाळून प्रत्येक प्रसंगाची व घटनेची जबाबदारी स्वतः स्वीकारली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. ‘फोक्सवॅगन’चा प्रकल्प पुणे जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यात गेला. अनेक उद्योग बंद पडले, त्यामुळे राज्यात आणि जिल्ह्यात बेरोजगारी चे वाढली आहे. तिघाडी सरकारमुळे हे प्रश्न निर्माण झाले असून, सरकारला धडा शिकवण्यासाठी ही या योग्य वेळ असल्याचे अहिर म्हणाले.

शिवसेनेत यांनी प्रवेश केला.
खडकवासला मतदारसंघातील प्रदीप दोडके, प्रीतम दोडके, केतन दोडके, भालचंद्र सणस, श्रीकांत चौघुले, स्वप्नील कांबळे, स्वप्नील उत्तेकर, अक्षय सावंत, विशाल साळवी, विठ्ठल दाभेकर, विजय पन्हाळे, अजय पन्हाळे, सूरज मैंदाड यांच्यासह अनेकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या हाती भगवा झेंडा देऊन त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले.

Pune Shivsena UBT | पुणे विधानसभेची जबाबदारी चार निष्ठावंत माजी नगरसेवकांकडे

Categories
Breaking News Political पुणे

Pune Shivsena UBT | पुणे विधानसभेची जबाबदारी चार निष्ठावंत माजी नगरसेवकांकडे

 

Pune Shivsena UBT | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी (Loksabha and Vidhansabha Elections) सर्वच पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाने (Shivsena UBT) इतर काही महत्वाच्या जिल्ह्यांसह पुण्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. आता ठाकरे गटाने पुण्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Pune Vidhansabha Election) हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी विविध मतदारसंघाची जबाबदारी चार निष्ठावंत माजी नगरसेवकांकडे दिली आहे. यामध्ये माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar), विशाल धनवडे (Vishal Dhanvade), बाळा ओसवाल (Bala Oswal) आणि संजय भोसले (Sanjay Bhosale) यांचा समावेश आहे.

आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे जास्तीत जास्त आमदार आणि नगरसेवक निवडून आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. यासाठी चार माजी नगरसेवकांकडे प्रत्येकी दोन दोन विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत. हे चारही माजी नगरसेवक या मतदारसंघात निवडणूक समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. (Maharashtra Vidhansabha Elections)

 

  • पृथ्वीराज सुतार – कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
  • बाळा ओसवाल – पर्वती आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ
  • विशाल धनवडे – कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
  • संजय भोसले – वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ

 

पुणे शहर शिवसेना कात टाकणार. यंदाच्या विधानसभा आणि महापालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणार याकरिता शिवसेनेचे 4 नगरसेवक पुणे शहर पिंजून काढणार. संघटना बळकट करणार आणि याकरिता पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या शहरातील प्रमुख नगरसेवकांना जबाबदारी दिली आहे व दिलेली जबाबदारी आम्ही समर्थपणे स्वीकारू आणि शिवसेना वाढवू. असे या माजी नगरसेवकांनी यावेळी सांगितले.


News Title | Pune Shivsena UBT | Four loyal former corporators are in charge of the Pune Vidhan Sabha

Kothrud Constituency | Shivsena UBT | कोथरूड विधानसभा मतदार संघात होऊ द्या चर्चा, बोलघेवडया सरकारचा भांडाफोड कार्यक्रमाचे आयोजन 

Categories
Breaking News Political social पुणे

Kothrud Constituency | Shivsena UBT | कोथरूड विधानसभा मतदार संघात होऊ द्या चर्चा, बोलघेवडया सरकारचा भांडाफोड कार्यक्रमाचे आयोजन

 

Kothrud Constituency | Shivsena UBT|शिवसेना कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये ६ ऑक्टोबर रोजी होऊ द्या चर्चा, बोलघेवडया सरकारचा भांडाफोड या कार्यक्रमाचे कोथरूड मध्ये सुतार दवाखाना, आशिष गार्डन चौक, किनारा हॉटेल, मोरे विद्यालय चौकसुतारदरा, नवभूमी शास्त्रीनगर, किष्किंदानगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक कोथरूड गावठाण या ठिकाणी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये लोकत सांस्कृतिक ग्रुपच्या वतीने पथनाटयद्वारे नागरिकांमध्ये सत्तारूढ पक्षाच्या नाकर्तेपणाची माहिती देण्यात आली. (Kothrud Constituency | Shivsena Pune)

कार्यक्रमासाठी सह- संपर्क प्रमुख अदित्यजी शिरोडकर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, योगेश मोकाटे, चंद्रकांत मोकाटे , शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार उपस्थित होते, तसेच या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, बेरोजगार तरूण, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ठिकठिकाणी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवाधिकारी राम थरकुडे, नितीन शिंदे, अनिल भगत, आकाश सुतार, विशाल उभे, उमेश भेलके, जयदिप पडवळ, योगेश थोरात, चेतन डेरे, भारत सुतार, दिलीप गायकवाड, नितीन पवार, पुरषोत्तम विटेकर, मनोज आल्हाट, श्रीपाद चिकणे, कांता बराटे, सुधीर जानोरकर यांनी सहकार्य केले.

Pune Potholes | ‘पुण्यातील खड्डे.. भाजपचे भ्रष्टाचाराचे अड्डे” म्हणत पुण्यात शिवसेनेचे आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

Pune Potholes | ‘पुण्यातील खड्डे.. भाजपचे भ्रष्टाचाराचे अड्डे”  म्हणत पुण्यात शिवसेनेचे आंदोलन

| शिवसेनेचे शनिपार चौकात आंदोलन

Pune Potholes | पुण्याच्या रस्त्यानी आणि खड्डयांनी पुणेकरांच्या मागचा सहा वर्षे पाठलाग सोडला नाही. त्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.  या सहावर्षात पाच वर्षे भाजपचे पुण्यात 96 नगरसेवक, 6 आमदार, 1 खासदार असूनही फक्त टेंडर आणि टक्केवारी यामुळे पुणेकरांचे हाल झाले आणि 2500 कोटी रुपये खर्च होऊनही नशिबी खड्डेच आले या विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या (Shivsena UBT Agitation) वतीने पुणे शहरात आंदोलन करण्यात आले. (Pune Potholes)
यावेळी शिवसैनिकांनी प्रशासन , आयुक्त आणि भाजप याविरोधात घोषणा दिल्या तसेच 2500 कोटी पुणेकरांचे खड्ड्यात खर्च झाले त्याचा हिशोब व्हावा ह्यासाठी पुन्हा एकदा CBI चौकशीची मागणी केली , यावेळी घोषणा देताना
 ” डांबर खडी चा मेळ .. भाजप आणि प्रशासनाचा खेळ”
“ED बाई ED… तिला पुण्यातला खड्ड्यांचा भ्रष्टाचार दिसत का नाही’ ? अश्या घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले पुणे महानगरपालिका रस्ते का दुरुस्त करत आहे ? तर फसलेली 24 ×7 पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज देखभाल दुरुस्तीची कामे, क्षेत्रीय कार्यालय स्तरावर विकास कामे करताना होणारी खोदाई, रिलायन्स कंपनीची केबल टाकणे, पावसाळी गटाराची कामे अशी अनेक स्वरूपाची नियोजन नसलेली कामे केल्यामुळे रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. परंतु या कामाच्या दर्जाकडे प्रशासनाचे लक्ष नाही. काम करताना खोदाई केलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला इस्टिमेट मध्ये नियोजन केलेले असते व सदर ठेकेदार सदर कामाचे बिल वसूल करत असताना जर त्याने केलेल्या कामामुळे खड्डे पडले असतील तर डिफेक्ट लायब्लिटी कालावधी मध्ये त्याच ठेकेदारांनी पुन्हा रस्ता पूर्ववत करणे आवश्यक आहे. महानगरपालिका ठेकेदारावर आर्थिक भार  पडू नये आणि सर्वांना मलिदा खाता यावा म्हणून पुन्हा त्याच ठेकेदाराला पैसे पुरवून खड्डे भरण्याचे काम दिले जाते. सर्वसामान्य पुणेकरांच्या पैशातून ठेकेदारांनी केलेला कामचुकारपणा लपवण्याचे काम होत आहे. एकाच कामावर वारंवार खर्च करून मनपा पुणेकरांना आर्थिक खड्ड्यात घालण्याचे काम करत आहे. तसेच मर्जीतील ठेकेदारालाच काम देण्याची व्यवस्था केली जाते व दुसऱ्याच्या मर्जीतील ठेकेदाराने टेंडर भरले तर कादपत्रात काहीतरी उणीवा काढून त्याला अपात्र केले जाते. हा सर्व 2600 कोटीचा भ्रष्टाचार उघड झालाच पाहिजे. सीबीआय मार्फत चौकशी झालीच पाहिजे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी राजीनामा दिलाच पाहिजे. यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि पुण्यातील मतदार या निवडणुकीत भाजपला खड्डा नक्की  दाखविणार असे म्हणाले.
  यावेळी शहरप्रमुख संजय मोरे , गजानन थरकुडे , उपशहरप्रमुख बाळासाहेब ओसवाल, समीर तुपे, भरत कुंभारकर, बाळासाहेब मालुसरे , संजय भोसले, प्रशांत राणे , तानाजी लोणकर, अशोक हरणावळ, राजेंद्र बाबर, राजाभाऊ होले, उत्तम भुजबळ, अजय परदेशी, अतुल गोंदकर, विजय नायर महिला शहर संघटिका पल्लवी जावळे , संगीता ठोसर , सविता मते , कल्पना थोरवे , शहर संघटक किशोर राजपूत , राजेंद्र शिंदे, अनंत घरत, नंदू येवले , मुकुंद चव्हाण, नागेश खडके, विश्वास चव्हाण, शेखर जावळे, गोविंद निंबाळकर, अमर  मारटकर, संतोष भूतकर , नितीन दलभंजन विकी धोत्रे, संजय वाल्हेकर, अरविंद दाभोलकर, दिलीप पोमन,  रुपेश पवार, अमोल दांगट, प्रसाद काकडे, रवी भोसले, राजेश मांढरे, निखिल जाधव , अजय भुवड, संजय लाहोट, राहुल शेडगे, प्रतीक गलींदे , नागेश खडके, हर्षद ठाकर, विलास नावडकर, परेश खांडके, सूरज मोराळे, निकिता मारटकर, करुणा घाडगे, अमृता पठारे, वैशाली दारवटकर, रोहीणी कोल्हाळ, पल्लवी नागपुरे, रेखा कोंडे, सुनीता खंडाळकर, सविता गोसावी, योगिता शिर्के, गौरी चव्हाण, सुलभा तळेकर, सरोज कार्वेकर, गायत्री गरुड, मिनाक्षी रावळ, स्वाती ठकार, इतर शिवसैनिक उपस्थित होते .

Shivsena UBT Agitation | Pune | केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

 Shivsena Agitation | Pune | केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

 Shivsena Agitation | Pune  | केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana), पेन्शन योजना (Pension Scheme), भारतमाला, अयोध्या रामजन्मभूमी खरेदी , सह सात योजनांमधून मोठा घोटाळा झाल्याचे ताशेरे “कॅग” (CAG) ने आपल्या जाहिर केलेल्या अहवालात ओढले आहेत. मोदी सरकारच्या (Modi Government) कारभाराच्या विरोधात शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहराच्या (Shivsena UBT Pune) वतीने भ्रष्ट केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात डेक्कन येथे आंदोलन  करण्यात आले. (Shivsena Agitation | Pune)
कॅगने आत्तापर्यंत ज्या राज्य सरकारवर व महापालिकेवर ताशेरे ओढले त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात आली. मग आता कॅगने ताशेरे ओढलेल्या, केंद्र सरकारने केलेल्या भ्रष्टाचारावर कारवाई होणार का ? यावर मोदी सरकार राजीनामा देणार का ? हा प्रश्न आंदोलकांनी विचारला.
मोदी सरकारचा निषेध करताना शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गौरव करीत ”देश का नेता कैसा हो उद्धव ठाकरे जैसा हो’ च्या घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे यांनी मोदी सरकारचा निषेध नोंदवीत कॅगच्या अहवाला नुसार संबंधितांवर कारवाई करणार का असा प्रश्न केला ? टोल घोटाळा, हिंदुस्थान एराॅनाॅटिक्स, अयोध्या विकास प्रकल्प, द्वारका एक्सप्रेस वे, भारतमाला प्रकल्प, गोरगरिबांच्या आयुष्मान भारत, दिव्यांग, विधवा महिला, यांच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर या भ्रष्ट केंद्र सरकारने पायउतार व्हावे असे ते म्हणाले.
      यावेळी आंदोलनास शहरप्रमुख संजय मोरे , उपशहरप्रमुख प्रशांत राणे, भरत कुंभारकर, बाळासाहेब भांडे , सागर माळकर , शहर संघटक राजेंद्र शिंदे , किशोर राजपूत, अनंत घरत , संतोष गोपाळ, युवासेना अधिकारी राम थरकुडे, समन्वयक युवराज पारीख,  उपशहरसंघटक नितीन पवार, उमेश गालिंदे , उमेश वाघ, विभागप्रमुख प्रविण डोंगरे, मुकुंद चव्हाण, चंदन साळुंके, महेश पोकळे, योगेश पवार, राजेंद्र शाह, अजय भुवड, विलास सोनवणे, संजय वाल्हेकर, अतुल दिघे, राहुल जेकटे, अजय परदेशी, दीपक शेंडे, नंदू घाटे, संतोष तोंडे, दिनेश बराटे, राम बाटुंगे, इम्रान खान, गजानन बगाडे, पराग थोरात, मकरंद पेठकर, सचिन देडे, अतुल कवडे, लोकेश जानगवळी, प्रतीक गालिंदे, आदिनाथ भाकरे, नागेश खडके, हर्षद ठकार, नितीन दलभंजन , समीर कानडे, रवी भोसले , सूर्यकांत पवार, तारीख शेख, बबलू पठाण, भावना थोरात , विजया मोहिते , सुरज गुळवे, अमोल घुमे, राहुल शेडगे, राजेश वाल्हेकर , संजय लोहोट , निलेश पाटील, नाना मरगळे, श्रीनिवास आखाडे, कल्पेश वाजे, अविनाश मांजरे  असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
——-
News Title | Shivsena Agitation | Pune | Shiv Sena’s agitation against the central government

Shivsena Pune | उबाठा गटाच्या मकरंद केदारींचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

Categories
Breaking News Political पुणे

Shivsena Pune | उबाठा गटाच्या मकरंद केदारींचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

Shivsena Pune | उबाठा गटाचे (Shivsena UBT) विभाग प्रमुख मकरंद केदारी (Makrand Kedari) यांनी काल शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आ.भरतशेठ गोगावले (MLA Bharat Gogawale) व शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Bhangire) यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. (Shivsena Pune)
पुणे शहरात शिवसेनेत विविध पदाधिकाऱ्यांचा येण्याचा ओघ वाढला असून यामुळे इतर पक्षात अस्वस्थता वाढली आहे. वानवडी परिसरातील उबाठा गटाचे विभाग प्रमुख मकरंद केदारी  यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुण्यातील शिवसेनेचे संघटन बळकट करण्यासाठी पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. शहरात शिवसेनेची ताकद वाढत असून दरम्यानच्या काळात पुणे महानगरपालिकेचे काही माजी नगरसेवक व इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्ष संघटन बळकट केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्याच्या विकासासाठी सातत्याने लक्ष असून पुण्यासाठी कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही असा शब्द दिल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे मुख्य प्रतोद आ.भरतशेठ गोगावले यांनी विभाग प्रमुख मकरंद केदारी यांना शुभेच्छा देतांना एक खंदा शिवसैनिक शिवसेनेत परत आल्याची भावना व्यक्त केली.  शिवसेनेचा आत्मा हा शिवसैनिक असून शिवसेनेकडे त्याचा ओढा कायम राहील असेही ते म्हणाले. यावेळी शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, शहर प्रवक्ते अभिजीत बोराटे व असंख्य शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
—-
News Title |Shivsena Pune | Makarand Kedari of UBT group announced entry into Shiv Sena!

Environment Law | Shivsena UBT | पर्यावरण हिताचा कायदा पुन्हा लागू करण्यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Categories
Breaking News Political social पुणे

Environment Law | Shivsena UBT | पर्यावरण हिताचा कायदा पुन्हा लागू करण्यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Environment Law | Shivsena UBT |  महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पर्यावरणाच्या हिताचा हेरिटेज ट्री आणि २०० हून अधिक वृक्षतोडीवर नियंत्रणासाठी कायदा अमलात आणला होता . महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरण स्थापन करुन अवैद्य वृक्षतोडीवर आळा बसविणारा हा कायदा लोकप्रिय झाला होता . आत्ताच्या त्रिकुट सरकारने विकासला विरोध म्हणून हा कायदा रद्द करुन वृक्ष तोडीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थानाच दिले आहे यामुळे असंख्य वृक्षतोड होणार असून या विरोधात शिवसेना ( उद्भव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी पुणे कार्यालयावर आंदोलन करण्यात आले तसेच निवेदन ही देण्यात आले. (Environment Law | Shivsena UBT)
शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले महाराष्ट्रातील वृक्षांच संवर्धन व्हावं आणि या महाराष्ट्र सुजलाम रहावा. हिरवाई अशीच कायम टिकून रहावी, म्हणून नवीन कायदा अमलात आणला होता. आणि त्याद्वारे  महाराष्ट्रातील झाडांची कत्तल थांबणार होती. सर्व थरातून या नवीन कायद्याच कौतुक झालं होत. आदित्य ठाकरेंच झालेल कौतुक या आताच्या चालू त्रि कुटील सरकारला बघवल गेल नाही म्हणून अधिवेशनामध्ये या सरकारने नवीन विधेयक आणून मविआने केलेला कायदा रद्दबादल ठरवण्यात आला. त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून केलेला कायदा जर अमलात आला असता आणि टिकला असता तर या महाराष्ट्रातील संपूर्ण झाडे सांभाळली गेली असती, पुण्यातील वेताळ टेकडीवरील झाडे असतील, नदी सुधार प्रकल्पातील जी साडेसात हजार झाडांची कत्तल होणार आहे ती थांबण्यासाठी मदत झाली असती. पर्यावरणाचा होणारा र्हास थांबण्यास मदत झाली असती.
थरकुडे म्हणाले पुण्यातल पर्यावरण म्हणून आदित्य ठाक,ए आग्रही होते. त्यांनी पुण्यात अनेक संस्थासोबत, अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्या होत्या. पुण्याचीच हरितकरण व्हावे म्हणून ते आग्रही होते.
याप्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला शहरसंघटिका संगिता ठोसर, पल्लवी जावळे, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, भरत कुंभारकर, तानाजी लोणकर, अनंत घरत, उमेश गालिंदे, उमेश वाघ, विश्वास चव्हाण, रविंद्र मुजुमले, विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, राजेंद्र बाबर, नितीन शिंदे, रामदास गायकवाड, विभाग प्रमुख राजेश मोरे, संतोष सोनवणे, अतुल गोंदकर, भगवान वायाळ, चंदन साळुंके, मुकुंद चव्हाण, बाळा अल्हाट, युवासेनेचे सनी गवते, परेश खांडके, निकिता मारटकर, गायत्री गरूड, आदर्श नानावरे, नागेश खडके, संतोष शेलार , संतोष गोपाळ, प्रविण डोंगरे, नंदू घाटे, अजय परदेशी, विकी धोत्रे, संजय वाल्हेकर, बाळासाहेब मोडक, देवेंद्र शेळके, संदिप नवले, मारूती ननावरे, रमेश सोनवणे,विजय परदेशी, दत्ता घुले, शरद गुप्ते, नरेंद्र दरवडे, परवेश राव, विलास कथलकर, ज्ञानेश्वर पोळ, काका कुलकर्णी , शाहेबाज पंजाबी, सागर मोकर, संदीप सोनार, राहुल शेडगे, प्रविण रणदिवे , हर्षद ठाकर, राहुल बोडके , विशाल डोंगरे, नितीन थोपटे, नितीन रावळेकर, दिलीप महादे, नंदू जांभळे , इतर शिवसैनिक उपस्थित होते ..