NCP – Sharadchandra Pawar Pune |आयुष्मान भारत योजना रुग्णांच्या नव्हे तर विमा कंपन्यांच्या भल्यासाठी ! | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

NCP – Sharadchandra Pawar Pune |आयुष्मान भारत योजना रुग्णांच्या नव्हे तर विमा कंपन्यांच्या भल्यासाठी ! | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने आंदोलन

 

Pune – (The Karbhari News Service) – मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने केईएम् हॉस्पिटल चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. विविध घोषणा देत केंद्र सरकारच्या योजनेचा व केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. “मोदी सरकारच्या घोषणा फसव्या योजना, मोदी सरकारचा गोलमाल गोरगरीब रुग्णांचे हाल, आयुष्मान भारतचा केवळ प्रचार गोरगरीब रुग्ण झाले बेजार, मोदी सरकार डोळे उघडा” अशा योजनांनी परिसर दणाणून गेला.

याबाबत प्रशांत जगताप आणि सांगितले कि,  आयुष्मान भारत योजनेची जाहिरात आपल्या माथी मारण्यासाठी मोदी सरकार आपल्याच खिशातून कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. प्रत्यक्षात मात्र ही योजना गोरगरीब रुग्णांना नव्हे तर केवळ विमा कंपन्यांना फायदा देणारी आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना अक्षरशः रुग्णालयांच्या दारात पडून राहावे लागत आहे. गोरगरीब रुग्णांचे हाल होत असताना योजनेत सुधारणा करायचे सोडून मोदी सरकार केवळ जाहिरातबाजीत मग्न आहे.
——

 गेल्या एक महिन्यापासून आम्ही या योजनेच्या अंमलबजावणीचा मागोवा घेत आहोत. पुणे शहरातील सरकारी हॉस्पिटल्स वगळता एकाही हॉस्पिटल मध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार मिळत नाहीत. सरकारी हॉस्पिटल्स मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वांना उपचार मोफत मिळतात, म्हणून आयुष्मान भारत योजना ही केवळ धूळफेक असून देशाच्या नागरिकांच्या भावनांसोबत हा क्रूर खेळ आहे.

प्रशांत जगताप, शहराध्यक्ष

Shivsena UBT Agitation | Pune | केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

 Shivsena Agitation | Pune | केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

 Shivsena Agitation | Pune  | केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana), पेन्शन योजना (Pension Scheme), भारतमाला, अयोध्या रामजन्मभूमी खरेदी , सह सात योजनांमधून मोठा घोटाळा झाल्याचे ताशेरे “कॅग” (CAG) ने आपल्या जाहिर केलेल्या अहवालात ओढले आहेत. मोदी सरकारच्या (Modi Government) कारभाराच्या विरोधात शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहराच्या (Shivsena UBT Pune) वतीने भ्रष्ट केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात डेक्कन येथे आंदोलन  करण्यात आले. (Shivsena Agitation | Pune)
कॅगने आत्तापर्यंत ज्या राज्य सरकारवर व महापालिकेवर ताशेरे ओढले त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात आली. मग आता कॅगने ताशेरे ओढलेल्या, केंद्र सरकारने केलेल्या भ्रष्टाचारावर कारवाई होणार का ? यावर मोदी सरकार राजीनामा देणार का ? हा प्रश्न आंदोलकांनी विचारला.
मोदी सरकारचा निषेध करताना शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गौरव करीत ”देश का नेता कैसा हो उद्धव ठाकरे जैसा हो’ च्या घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे यांनी मोदी सरकारचा निषेध नोंदवीत कॅगच्या अहवाला नुसार संबंधितांवर कारवाई करणार का असा प्रश्न केला ? टोल घोटाळा, हिंदुस्थान एराॅनाॅटिक्स, अयोध्या विकास प्रकल्प, द्वारका एक्सप्रेस वे, भारतमाला प्रकल्प, गोरगरिबांच्या आयुष्मान भारत, दिव्यांग, विधवा महिला, यांच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर या भ्रष्ट केंद्र सरकारने पायउतार व्हावे असे ते म्हणाले.
      यावेळी आंदोलनास शहरप्रमुख संजय मोरे , उपशहरप्रमुख प्रशांत राणे, भरत कुंभारकर, बाळासाहेब भांडे , सागर माळकर , शहर संघटक राजेंद्र शिंदे , किशोर राजपूत, अनंत घरत , संतोष गोपाळ, युवासेना अधिकारी राम थरकुडे, समन्वयक युवराज पारीख,  उपशहरसंघटक नितीन पवार, उमेश गालिंदे , उमेश वाघ, विभागप्रमुख प्रविण डोंगरे, मुकुंद चव्हाण, चंदन साळुंके, महेश पोकळे, योगेश पवार, राजेंद्र शाह, अजय भुवड, विलास सोनवणे, संजय वाल्हेकर, अतुल दिघे, राहुल जेकटे, अजय परदेशी, दीपक शेंडे, नंदू घाटे, संतोष तोंडे, दिनेश बराटे, राम बाटुंगे, इम्रान खान, गजानन बगाडे, पराग थोरात, मकरंद पेठकर, सचिन देडे, अतुल कवडे, लोकेश जानगवळी, प्रतीक गालिंदे, आदिनाथ भाकरे, नागेश खडके, हर्षद ठकार, नितीन दलभंजन , समीर कानडे, रवी भोसले , सूर्यकांत पवार, तारीख शेख, बबलू पठाण, भावना थोरात , विजया मोहिते , सुरज गुळवे, अमोल घुमे, राहुल शेडगे, राजेश वाल्हेकर , संजय लोहोट , निलेश पाटील, नाना मरगळे, श्रीनिवास आखाडे, कल्पेश वाजे, अविनाश मांजरे  असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
——-
News Title | Shivsena Agitation | Pune | Shiv Sena’s agitation against the central government

ABHA Card | Ayushman Bharat Digital Mission | राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी | सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

Categories
Breaking News social आरोग्य देश/विदेश महाराष्ट्र

ABHA Card | Ayushman Bharat Digital Mission | राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी

| सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

ABHA Card | Ayushman Bharat Digital Mission | आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा) (Ayushman Bharat Digital Mission)चा एक भाग म्हणून भारत सरकारने (Indian Government) डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या आभा कार्डसाठी (Abha Card) नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने (Public Health Department) केले आहे. (ABHA Card | Ayushman Bharat Digital Mission)
             रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि ती ही डिजिटल स्वरूपात मिळावी, म्हणून आभा कार्ड (Abha Card) सुरू करण्यात आले आहे. सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते. दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल सोबत बाळगावी लागते. त्याचप्रमाणे डॉक्टरांनासुद्धा मागील सर्व रिपोर्ट्स तपासून पहावे लागतात. या सर्व बाबीचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना आभा आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. आभा आरोग्य कार्ड म्हणजेच आयुष्मान भारत आरोग्य खाते (Ayushman Bharat Health Account) होय. आभा कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी मिळणार असून, या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेले उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आभा कार्डवर साठविली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार आदींची माहिती  जलद आणि सोयीस्करपणे समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. (Ayushman Bharat Mission)
             आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे. या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
            आभा कार्डसाठी आधार कार्ड आणि आधार संलग्न असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. आभा कार्ड मुळे उपचार  करण्यासाठी प्रत्येक जागी रिपोर्ट आणि कागदपत्र घेऊन जाण्याची गरज नाही. आभा कार्डमध्ये तुमचा ब्लड ग्रुप, आजार, मेडिकल इत्यादीबदलची संपूर्ण माहिती असेल. ऑनलाईन उपचार, टेलिमेडिसिन, ई- फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड इत्यादी सुविधा यामध्ये नागरिकांना मिळतील. आपला मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड सहजरित्या तुम्ही हॉस्पिटल, मेडिकल, इन्शुरन्स यांना शेअर करू शकाल, असे अनेक फायदे आभा कार्डचे आहे.

असे काढाल आभा आरोग्य कार्ड

            तुम्ही भारतात कुठेही राहत असाल, तरी ही तुमच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड काढू शकता. कार्ड बनविण्यासाठी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळ healthid.ndhm.gov.in  वर जावे लागेल. नंतर होम पेज वर ‘Create ABHA Number’ असे बटन असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढच्या पेजवर तुमच्या समोर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील. म्हणजेच तुम्ही तुमच्या 1) आधार कार्ड, 2) ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून तुमचे हेल्थ कार्ड तयार करू शकता.
             जर तुमच्या आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक नसेल, तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पर्याय निवडा. कारण पुढे जेव्हा तुम्ही आधार कार्ड क्रमांक टाकणार आहात तेव्हा तुम्हाला आधार लिंक मोबाइल क्रमांकावर  ओटीपी येईल.
            पुढील पेजवर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आणि ‘I Agree’ वर क्लिक करून ‘i am not robot’ वर क्लिक करायचे आहे व कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर ‘Submit’ या बटनवर क्लिक करायचे आहे. नंतर आधार लिंक मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तो बॉक्स मध्ये टाकून ‘Next’ बटनवर क्लिक करायचे आहे.
             त्यानंतर तुम्हाला ‘Aadhaar Authentication Successful’ असा मेसेज दिसेल, आणि आधारमध्ये फिड असलेली तुमची वैयक्तिक माहिती खाली दिसेल. ती एकदा तपासून नंतर तुम्हाला Next बटनवर क्लिक करायचे आहे. आता आपला मोबाइल क्रमांक टाकायचा आहे, जो ‘ABHA’ कार्डला लिंक होईल व पुढे जाऊन तो लॉगिन करताना कामी येईल. पुढच्या पेज वर तुमचा ‘ABHA’ क्रमांक तयार झाल्याचा मेसेज दिसेल. हा क्रमांक ऑटोमॅटिक तयार होतो, जसा आधार क्रमांक असतो तसा. हा 14 अंकी क्रमांक लक्षात ठेवणे कठीण जाते. त्यामुळे ‘आभा’ने आभा ऍड्रेस ही सुविधा चालू केली आहे. यामध्ये आपण आपले आवडते नाव ऍड्रेस म्हणून वापरू शकतो जसे, name1234@abdm त्यासाठी तुम्ही आधी ‘Link ABHA Address’ बटनवर क्लिक करा. नंतर ‘No’ वर टिक करून ‘Sign Up for ABHA Address’ बटनवर क्लिक करायचे आहे.
            आता आपल्याला आवडते नाव ABHA ऍड्रेस म्हणून तयार करायचे आहे, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये ते टाईप करून Create And Link बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्यासमोर ABHA क्रमांक, ABHA ऍड्रेसला यशस्वीपणे लिंक झाल्याचा मेसेज दिसेल. नंतर Go Back to your ABHA… बटनवर क्लिक करायचे आहे.
            त्यानंतर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला, ABHA क्रमांक किंवा तुमचा मोबाइल क्रमांक आणि जन्म वर्ष टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे. पुढे OTP साठी कोणत्या मोबाइल क्रमांकावर OTP पाठवावा ते विचारले जाईल  आधार लिंक मोबाइल नंबर किंवा ABHA नंबर लिंक मोबाइल क्रमांक. योग्य तो पर्याय निवडून Continue बटन वर क्लिक करायचे आहे. पुढच्या पेज वर तुमचे ABHA क्रमांक कार्ड/हेल्थ कार्ड तयार होऊन येईल. तुम्ही ते Download ABHA number Card बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
             जर कार्डमध्ये काही माहिती चुकलेली असेल, तर वरती My Account मेनू वर क्लिक करून Edit Details ऑप्शनवर क्लिक करा. उघडलेल्या पेजवर तुम्ही तुमची नवीन माहिती टाकून Submit बटन वर क्लिक करा. तसेच तुम्ही Set Password ऑपशन वर क्लिक करून आभा अकाउंटचा पासवर्ड सेट करू शकता.
            या डिजिटल आभा आरोग्य कार्डचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी आपले ‘आभा’ कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
०००
News Title |ABHA Card | Ayushman Bharat Digital Mission | All citizens of the state should register for ‘Abha’ card| Public Health Department appeal

Ayushman Bharat | Mahatma Phule Jan Arogya Yojana | आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे महाराष्ट्रातील सर्व 12 कोटी जनतेला एकिकृत कार्ड

Categories
Breaking News Political social आरोग्य महाराष्ट्र

Ayushman Bharat | Mahatma Phule Jan Arogya Yojana | आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे  महाराष्ट्रातील सर्व 12 कोटी जनतेला एकिकृत कार्ड

– केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया

– केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणार

Ayushman Bharat | Mahatma Phule Jan Arogya Yojana | आयुष्यमान भारत (Ayushman Bharat) आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना (Mahatma Phule Jan Arogya Yojana) एकिकृत पद्धतीने राबवून महाराष्ट्रातील संपूर्ण 12 कोटी नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात येणार आहे.  या योजनेतून 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियेसह उपचार मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandviya) यांनी दिली. (Ayushman Bharat | Mahatma Phule Jan Arogya Yojana)
            आयुष्यमान भारत योजनेची (Ayushman Bharat Yojana) आढावा बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथी गृह येथे करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. मांडविया बोलत होते.
            बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपालकृष्णन, उपसंचालक रोहित झा, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव श्री. सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            जनऔषधी केंद्र (Janaushadhi Kendra) अधिक संख्येने उघडण्यात येणार असून त्यातून नागरिकांना स्वस्तात औषधी उपलब्ध होणार आहे.  जी बाजारपेठेतील औषधांच्या किंमतीपेक्षा अर्ध्या किंमतीत मिळतील. प्रत्येक जिल्ह्यात 50 खाटांचे एक क्रिटीकल केअर युनिट ऑक्सिजन सुविधेसह उघडण्यात येणार आहे.  त्यासाठीही केंद्र सरकार मदत करणार असल्याचेही आरोग्य मंत्री श्री. मांडविया यांनी सांगितले.
            राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करण्याच्या सूचना करीत आरोग्य मंत्री श्री मांडविया म्हणाले,  केंद्राची व राज्याची योजना समन्वयाने राबवल्यास केंद्र शासनाचा 60 टक्के निधी मिळतो. राज्याची बचत होते. त्यासाठी भारत सरकार आयुष्यमान केंद्र योजनेला व्यापक स्वरूप देत आहे. समन्वित योजनेतून लाभार्थ्याला त्याच्या आजारावर किती पैसा खर्च केला, याचा संदेश जाणार आहे. तसेच रुग्णालयांना रक्कमही लवकर मिळणार आहे.  संकेतस्थळावरून लाभार्थी स्वतः आपले कार्ड डाऊनलोड करू शकतो. गावातच त्याला कार्ड मिळेल. गावातील कार्ड धारकांची यादी ग्रामसभेकडे असेल. (Ayushman Bharat Yojana Card)
            ते पुढे म्हणाले, या योजनेत सर्वच सार्वजनिक रुग्णालयांना जोडावे. रुग्णालयातील काम करणाऱ्या डॉक्टरला यामध्ये प्रोत्साहन भत्ता देता येतो. तसेच आशा सेवकांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून कार्ड बनवून दिल्यास आशा सेवकांना प्रति कार्ड पाच रुपयेदेखील मिळणार आहेत.  गावातील आशा कार्यकर्ती यांना गावातील लाभार्थ्यांची यादी पोहोचवावी. योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक रुग्णालय बळकट झाली आहे. देशात रुग्णालय मोठ्या संख्येने जोडत आहेत. प्रत्येक सहभागी रुग्णालयात आयुष्यमान भारतचा किऑस्क असावा. किऑस्कमधून लाभार्थ्यांना योजनेविषयी संपूर्ण सुविधा दिली जाईल. कोविड काळात अखर्चित असलेला निधी राज्याच्या आरोग्य विषयक मूलभूत सुविधा उभारण्यासाठी वापरावा. नॅशनल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन मधून प्रत्येक जिल्ह्याला निधी देण्यात येत आहे. या निधीतून वैद्यकीय सोयी सुविधा भक्कम कराव्यात. (Mahatma Phule Jan Arogya Yojana card)

केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

             केंद्राच्या यादीप्रमाणे 1900 आजार यात समाविष्ट करुन येत्या 1 महिन्यात 1 कोटी आणि 6 महिन्यात 10 कोटी लोकांना हे कार्ड वितरित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी  सांगितले.
            प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा फुले जन आरोग्य योजना समन्वयातून राबविल्यास राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट होणार आहे.  यामुळे लाभार्थ्यांना अधिकचा लाभ देणे शक्य होईल. राज्यात सार्वजनिक रुग्णालय एकत्र आणून त्यांच्यासाठी ‘प्रोत्साहन निधी ‘ देण्याची योजना तयार करावी. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राज्यात प्रभावीपणे राबविण्यात  यावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
            ते पुढे म्हणाले, की महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा पाच लाख रुपये करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा देखील सारखीच राहणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीचे काम मिशन मोडवर करावे. केंद्र सरकारचा निधी पूर्णपणे खर्च करावा, त्यातून राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करावी.
००००
News Title | Ayushman Bharat |  Mahatma Phule Jan Arogya Yojana |  Ayushman Bharat, Mahatma Phule Jan Arogya Yojana unified card for all 12 crore people of Maharashtra