NCP – Sharadchandra Pawar Pune |आयुष्मान भारत योजना रुग्णांच्या नव्हे तर विमा कंपन्यांच्या भल्यासाठी ! | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

NCP – Sharadchandra Pawar Pune |आयुष्मान भारत योजना रुग्णांच्या नव्हे तर विमा कंपन्यांच्या भल्यासाठी ! | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने आंदोलन

 

Pune – (The Karbhari News Service) – मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने केईएम् हॉस्पिटल चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. विविध घोषणा देत केंद्र सरकारच्या योजनेचा व केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. “मोदी सरकारच्या घोषणा फसव्या योजना, मोदी सरकारचा गोलमाल गोरगरीब रुग्णांचे हाल, आयुष्मान भारतचा केवळ प्रचार गोरगरीब रुग्ण झाले बेजार, मोदी सरकार डोळे उघडा” अशा योजनांनी परिसर दणाणून गेला.

याबाबत प्रशांत जगताप आणि सांगितले कि,  आयुष्मान भारत योजनेची जाहिरात आपल्या माथी मारण्यासाठी मोदी सरकार आपल्याच खिशातून कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. प्रत्यक्षात मात्र ही योजना गोरगरीब रुग्णांना नव्हे तर केवळ विमा कंपन्यांना फायदा देणारी आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना अक्षरशः रुग्णालयांच्या दारात पडून राहावे लागत आहे. गोरगरीब रुग्णांचे हाल होत असताना योजनेत सुधारणा करायचे सोडून मोदी सरकार केवळ जाहिरातबाजीत मग्न आहे.
——

 गेल्या एक महिन्यापासून आम्ही या योजनेच्या अंमलबजावणीचा मागोवा घेत आहोत. पुणे शहरातील सरकारी हॉस्पिटल्स वगळता एकाही हॉस्पिटल मध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार मिळत नाहीत. सरकारी हॉस्पिटल्स मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वांना उपचार मोफत मिळतात, म्हणून आयुष्मान भारत योजना ही केवळ धूळफेक असून देशाच्या नागरिकांच्या भावनांसोबत हा क्रूर खेळ आहे.

प्रशांत जगताप, शहराध्यक्ष

PM Vishwakarma Scheme 2023 | पंतप्रधान मोदी एक नवीन योजना सुरू करत आहेत | अर्ज करण्याची ही अट आहे

Categories
Breaking News Commerce cultural Education Political social देश/विदेश

PM Vishwakarma Scheme 2023 |  पंतप्रधान मोदी एक नवीन योजना सुरू करत आहेत | अर्ज करण्याची ही अट आहे

 PM Vishwakarma Scheme 2023: केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये PM विश्वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा केली होती.  या योजनेसाठी आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28 पर्यंत 13,000 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत.
 PM Vishwakarma Scheme 2023: यावेळी लाल किल्ल्यावरून PM मोदींनी विश्वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा केली, ज्याची उलटी गिनती सुरू झाली आहे.  17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू करणार आहेत.  केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा केली होती.  या योजनेसाठी आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28 पर्यंत 13,000 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत.

 कलाकार आणि कारागीर यांच्या पारंपारिक कौशल्याला वाव मिळेल

 वित्त मंत्रालयाच्या कार्यालयाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी पीएम विश्वकर्मा योजना सुरू करणार आहेत.  या योजनेचा उद्देश कारागीर आणि कारागीर त्यांच्या हातांनी आणि साधनांनी काम करणार्‍या पारंपारिक कौशल्यांच्या सरावाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना बळकट करणे हा आहे.  आमची विश्वकर्मा उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता तसेच सुलभता सुधारणे हा यामागचा उद्देश आहे.

 रु. 15,000 चे टूलकिट प्रोत्साहन

 मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना 15,000 रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन दिले जाईल.  यासोबतच लाभार्थ्यांना 500 रुपये प्रतिदिन स्टायपेंडसह मूलभूत कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.  विश्वकर्मांचे उत्थान करणे, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे आणि लाभ देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा त्याचा उद्देश आहे.

 या लोकांना योजनेचा लाभ मिळणार आहे

 या महत्त्वाकांक्षी योजनेत केंद्र सरकार 1. सुतार, 2. बोटी बनवणारे, 3. बंदूकधारी यांना मदत करणार आहे.  4. लोहार, 5. हातोडा आणि टूलकिट बनवणारा, 6. लॉकस्मिथ, 7. सोनार, 8. कुंभार, 9. शिल्पकार, दगड तोडणारा, 10 1. मोची/जूता बनवणारा/पादचारी कारागीर, 11. मेसन, 12. बास्केट/चटई /झाडू मेकर/कॉयर विणकर, 13. बाहुली आणि खेळणी बनवणारा (पारंपारिक), 14. नाई, 15. गार्लंड मेकर, 16. वॉशरमन, 17. शिंपी आणि 18. फिशिंग नेट मेकर.

 विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाईल

 या योजनेंतर्गत 30 लाख कुटुंबातील कोणतीही एक व्यक्ती जोडली जाईल.  योजनेंतर्गत, 5 टक्के सवलतीच्या व्याजदरासह त्या लोकांना 1 लाख रुपये (पहिला हप्ता) आणि 2 लाख रुपये (दुसरा हप्ता) पर्यंत कर्ज सहाय्य प्रदान केले जाईल.  याशिवाय, कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे नोंदणी केल्यानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल.  या योजनेंतर्गत कौशल्य विकास, बाजारपेठेतील प्रवेश आणि या कामांशी संबंधित लोकांचा आर्थिक पाठबळ याकडे लक्ष दिले जात आहे.  त्यांना मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षण दिले जाईल.  डिजिटल व्यवहारांनाही प्रोत्साहन दिले जाईल.
——
News Title | PM Vishwakarma Scheme 2023 | Prime Minister Modi is launching a new scheme This is the condition of application

PM Modi Pune Tour | पंतप्रधान 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर | लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित करण्यात येणार

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

PM Modi Pune Tour | पंतप्रधान 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर | लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित करण्यात येणार

PM Modi Pune Tour | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर (PM Modi Pune tour) जाणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात (Dagadusheth Temple pune)  जाऊन दर्शन घेऊन   पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला (Pune Metro) हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. (PM Modi Pune Tour)

पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो (Pune Metro) टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत. हे विभाग फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत आहेत. 2016 मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडतील. देशभरातील नागरिकांना आधुनिक आणि पर्यावरणस्नेही गतिमान शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या दिशेने हे लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेत मेट्रो रेल्वे मार्गावरील काही मेट्रो स्थानकांची रचना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकांची रचना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी परिधान केलेल्या पगडी सारखी म्हणजेच ज्याला “मावळा पगडी” देखील म्हटले जाते, या सारखी आहे. शिवाजी नगर भूमिगत मेट्रो स्थानकाची एक विशिष्ट रचना आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची आठवण करून देते.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवाणी न्यायालय मेट्रो स्थानक. हे देशातील सर्वात खोलवर असलेल्या मेट्रो स्थानकांपैकी पैकी एक आहे, ज्याचा सर्वात खोल बिंदू 33.1 मीटर आहे. सूर्यप्रकाश थेट फलाटावर पडेल अशा पद्धतीने या स्थानकाचे छत बनवण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 2.5 लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाईल. (

सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली 1280 हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली 2650 हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. त्यांनतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्‍या सुमारे 1190 घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधानांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा आरंभ टिळक स्मारक संस्थेने 1983 मध्ये केला. देशाची प्रगती आणि विकास यासाठी कार्य केलेल्या तसेच त्या बाबतीत उल्लेखनीय आणि विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्टला दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो.

पंतप्रधान या पुरस्काराचे 41 वे मानकरी असतील. हा पुरस्कार मिळालेल्या दिगजांमध्ये डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन आर नारायण मूर्ती, डॉ. ई‌. श्रीधरन या व्यक्तींचा समावेश आहे.


News Title |PM Modi Pune Tour | Prime Minister to visit Pune on August 1 The Prime Minister will be honored with the Lokmanya Tilak National Award

Pune News | Mohan Joshi | पुणेकरांनी भाजपला खूप काही दिले; पण भाजपने शहराला काय दिले? | मोहन जोशी यांचा भाजपला सवाल 

Categories
Breaking News Political पुणे

Pune News | Mohan Joshi | पुणेकरांनी भाजपला खूप काही दिले; पण भाजपने शहराला काय दिले?

| मोहन जोशी यांचा भाजपला सवाल

Pune News | Mohan Joshi | पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची नऊ वर्षाची कारकीर्द धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. नवा भारत नवी संसद याचे नारे दिले जात आहेत पण काँग्रेसचा (Pune congress) शहर भाजपाला (Bjp Pune) यानिमित्त एकच प्रश्न आहे तो म्हणजे पुणेकरांनी तुम्हाला भरपूर दिले पुणे शहराला तुम्ही काय दिले? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार  मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी जोशी यांनी हा सवाल केला आहे. (Pune News)
जोशी म्हणाले, दोन खासदार, 5 विधानसभा मतदारसंघात आमदार महानगरपालिकेत 98 नगरसेवक केंद्रात राज्यात आणि मनपात एक हाती सत्ता. पुणेकरांनी उदार मनाने इतके राजकीय यश दिले, त्या बदल्यात पुणे शहराच्या पदरी काय पडले? फक्त भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी.  केंद्र सरकारने जायका,  समान पाणीपुरवठा, मेट्रो, स्मार्ट सिटी,  पंतप्रधान आवास योजना आणखी काही योजना जाहीर केल्या त्या कागदावर आहेत.  (Pune Congress)
जोशी पुढे म्हणाले, महापालिकेची सत्तेची पाच वर्षे निव्वळ भ्रष्टाचारात गेली हे. सर्व पुणे शहराने पाहिले त्या भ्रष्टाचाराच्या भीतीने आता भाजप महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला तयार नाही. घरपट्टीत महापालिकेने ठराव करून घेतलेली नागरिकांना दिलेली ४० टक्के सवलत यांनी काढून घेतली. वसुली लावली ती सुद्धा चार वर्षापासून. वीस ते बावीस हजार रुपयांच्या बोजा साधे घर असणाऱ्यापर्यंत पडत होता. याबाबत आंदोलने करावी लागली. तेव्हा कुठे परत निर्णय फिरवला. आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा विषय विधिमंडळात मांडून या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवून दिला. (BJP Pune)
भ्रष्टाचारी लोक या शहरातील  नागरिकांचे गुन्हेगार आहेत. असा काँग्रेसचा आरोप आहे यांना सत्ता दिली ती स्वतःसाठी वापरली केंद्र सरकारची ९ वर्ष कसली साजरी करता महानगरपालिकेतल्या सत्तेतला पाच वर्षाचाकामचा  लेखा जोखा पुणेकरांना हिम्मत असेल तर द्या ? असे काँग्रेसने भाजपाला आव्हान दिले आहे.
जोशी म्हणाले, तेरा वर्षाच्या  कांग्रेस पक्ष च्या  प्रयत्नांमुळे 2013 रोजी मेट्रो मंजूर झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ डिसेंबर 2016 रोजी पुणे मेट्रोची पायाभरणी केली. तब्बल सहा वर्षांनी पूर्ण झालेल्या गरवारे ते वनाज या छोट्या मार्गाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. ३४.६ किमी चा मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मोदींनी कोणतेही आग्रह केल्याचे  अजूनही ऐकिवात नाही. मोदीजींनी पुणेकरांना उत्तर द्यावे की अजूनही मेट्रो का सुरू होत नाहीये.
पंतप्रधान आवास योजना दुर्बल घटकांसाठी या योजनेतून सन 2022 पर्यंत मोफत घरे देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. योजनेअंतर्गत किती घरे बांधून दिली याची माहिती भाजपा का लपवत आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, जाहिराती फोटो आणि बातम्या झाले की जणू विकास झाला असे भाजप दाखवते, पुण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घोषणांचा सुकाळ आहे. मात्र अंमलबजावणी चा दुष्काळ आहे. पुण्याची शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन मंजूर झालेले आयआयएम नागपूरला गेली. प्रकाश जावडेकर माहिती आणि नभोवाणी मंत्री असताना पुण्यातील नॅशनल फिल्म अर्किव ची स्वायत्तता संपली. दूरदर्शन केंद्र मराठी बातम्या आकाशवाणी याची स्वायत्तता संपली.
पत्रकार परिषद वेळी  काँग्रेसचे सरचिटणीस प्रवक्ते रमेश अय्यर, शहर कॉंग्रेस उपाध्यक्ष शाबीर खान, ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत सुरसे, शहर काँग्रेसचे चिटणीस चेतन अग्रवाल, प्रदेश प्रतिनिधी यशराज पारखे उपस्थित होते.
—-
News Title | Pune News | Mohan Joshi | The people of Pune gave a lot to the BJP; But what did the BJP give to the city?| Mohan Joshi’s question to BJP

NCP Youth | April Fool | “एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस” | राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने एप्रिल फुल आंदोलन

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

“एप्रिल फुलचा दिवस म्हणजे  मोदी विकासाचा वाढदिवस”

| राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने एप्रिल फुल आंदोलन

भारतीय नागरीकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशात आणि महाराष्ट्रात फसवा विकास केला आहे, हा फसवा विकास म्हणजेच मोदी विकास. अशी व्याख्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आली आहे. म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस 1 एप्रिल म्हणजेच “एप्रिल फुल” या दिवशी साजरा करून पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज डेक्कन येथील गुडलक चौकात प्रतिकात्मक आंदोलन करुन मोदी वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

दरवर्षी देशात दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार, वेदांत फॉक्सकॉन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार, पेट्रोल – डिझेल दरवाढ कमी करणार, महागाई कमी करणार, प्रत्येक नागरीकाला पंधरा लाख रुपये देणार अशा अनेक खोट्या घोषणा मोदी यांनी निवडणूकीपूर्वी केल्या परंतु यातील एकही घोषणा त्यांनी पुर्ण केली नाही याचा यावेळी निषेध करण्यात आला.


आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक प्रदेश कार्याध्यक्ष राकेश कामठे, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर,अभिषेक बोके,मयूर गायकवाड उपस्थित होते.

Rahul Gandhi | मी गांधी आहे. आणि गांधी कधी माफी मागत नाहीत – राहुल गांधी.

Categories
Breaking News Political देश/विदेश

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही.

या देशाने मला सगळं दिलं. प्रेम, आदर दिला. म्हणून मी देशासाठी लढणार.

मोदी आणि अदानी यांचे नाते सगळेजण सांगतात.

मोदी माझ्या पुढील भाषणाला भीत होते. कारण मी अदानी बद्दल बोलणार होतो. म्हणून माझी खासदारकी रद्द केली.

मी जे पण प्रश्न उपस्थित करतो, ते खूप विचार करून करतो.

यांनी काहीही करू द्या. मी काम करणे थांबवणार नाही.

अदानी च्या कंपनीत 20 हजार कोटी कुठून आले?

जनतेच्या मनात आता प्रश्न उपस्थित होत आहे कि भ्रष्ट अदानीला का वाचवले जात आहे?

मी लढत राहणार. लोकशाही तंत्र मजबूत करण्यासाठी लढणार.

अदानी मुद्द्यांवरील लक्ष हटवण्यासाठी देशद्रोह, खासदारकी रद्द करणे, ओबीसी असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत.

मी गांधी आहे. आणि गांधी कधी माफी मागत नाहीत.

Nana patole | congress | अदानी समुहात केलेली गुंतवणूक धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती | नाना पटोले

Categories
Breaking News Commerce Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

अदानी समुहात केलेली गुंतवणूक धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती | नाना पटोले

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अलका टॉकीज र्चाक येथील LIC बिल्डींगच्या समोर अदानी समुहात केंद्र सरकारच्या आदेशावरून केलेल्या गुंतवणुकीच्या निषेधार्थ निदर्शने आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ. नानाभाऊ पटोले, माजी गृहमंत्री मा. सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण, आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, पुणे जिल्हा निरीक्षक आ. संग्राम थोपटे, आ. अमर राजूरकर, आ. संजय जगताप, माजी आ. उल्हास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील  जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. तरीही केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. ‘अदानी’ समूहातील गैरकारभाराची चौकशी करावी व जनतेचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे.’’

यानंतर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘‘एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे गौरव आहेत. या वित्तीय संस्थांमध्ये सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतविला आहे. परंतु मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतविला आहे. अदानी समुहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या ३९ कोटी पॉलिसीधारक व गुंतवणूकदारांचे ३३ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे तसेच भारतीय स्टेट बँक व इतर बँकांनी मिळून तब्बल ८० हजार कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सरकारी वित्तीय संस्थांमधील अदानी समुहात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीसंदर्भात संसदेत चर्चा व्हावी व गुंतवणूक दारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य ते निर्णय घ्यावा.’’

यानंतर प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तीय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. अदानी समुहातील आर्थिक गैर कारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत. उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ट संबंध जगजाहीर आहेत. या संबंधातूनच सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांनी जनतेच्या कष्टाचा पैसा अदानीच्या उद्योग समुहात कसलाही विचार न करता गुंतवला आहे. विमानतळ, रेल्वे, वीजसेवा, रस्ते, बंदरे यासह देशातील सर्व महत्वाचे सरकारी उद्योग अदानींच्या घशात घातलेले आहेत. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक व सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी मधील जनतेचा पैसाही अदानीच्या खिशात घातला आहे. अदानीच्या गैरकारभाराचा फुगा आता फुटला असून लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, हा पैसा जनतेचा आहे. एवढा मोठा घोटाळा होऊनही मोदी सरकार, पंतप्रधान आणि अर्थमंत्री गप्प आहेत हे अतिशय लाजीरवाणे व असंवेनशीलपणाचे लक्षण आहे.’’

या आंदोलनाचे सूत्रसंचालन ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर यांनी केले तर आभार सुजित यादव यांनी मानले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड, अमिर शेख, लता राजगुरू, रफिक शेख, अजित दरेकर, शिवाजी केदारी, पुजा आनंद, मेहबुब नदाफ, नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट, मुख्तार शेख, सुनिल शिंदे, साहिल केदारी, राहुल शिरसाट, प्रवीण करपे, सतिश पवार, सुनिल घाडगे, शोएब इनामदार, रमेश सकट, भुषण रानभरे, अनिल सोंडकर, भरत सुराणा, राहुल तायडे, रवि आरडे, शिवराज भोकरे, हेमंत राजभोज, अक्षय माने, सुंदरा ओव्हाळ, पपिता सोनावणे, राधिका मखामले, सुमन इंगवले, सौरभ अमराळे, वाल्मिक जगताप, अजय खुडे, राकेश नामेकर, राजू नाणेकर, राजू शेख, गणेश शेडगे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Congress Vs PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी ! मोहन जोशी | गॅस सिलिंडरवर मर्यादा लावून मोदी सरकारकडून जनतेची क्रूर थट्टा

Categories
Breaking News Commerce Political social पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी ! मोहन जोशी

| गॅस सिलिंडरवर मर्यादा लावून मोदी सरकारकडून जनतेची क्रूर थट्टा

जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सध्या सर्वात निच्चांकी पातळवीर आहेत पण देशात पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर मात्र मोदी सरकार कमी करत नाही. मागील तीन महिन्यापासून क्रूड ऑईलचे दर कमी होत आहेत पण पेट्रोल, डिझेलचे दर कमी न करता मोदी सरकार त्यातून जनतेची लूट करत आहे. आतातर मोदी सरकारने घरगुती सिलिंडर वापरावरच मर्यादा आणून जनतेची क्रूर थट्टा केली आहे. नरेंद्र मोदींच्या व्यापारी वृत्तीमुळे जनता मात्र भिकारी झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे फक्त भांडलदारांचे हित जोपासणारे सरकार आहे. या सरकारच्या काळात मोजक्या भांडवलदारांची संपत्ती झपाट्याने वाढत आहे तर गरिब, मध्यमवर्ग, सर्वसामान्य जनता मात्र समस्यांच्या गर्तेत ढकलली जात आहे. नरेंद्र मोदींनी व्यापारी वृत्तीमुळे देशातील सगळी संपत्ती विकून टाकली आहे. केवळ हम दो हमारे दो, हेच मोदी सरकारचे काम आहे. सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी सारख्या समस्यांनी त्रस्त आहे आणि मोदी व मोदींचे मित्र मात्र मस्त आहेत. महागाईच्या आगडोंबाने जनतेला जगणे कठीण झाले आहे तसेच जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून महागाई वाढवण्यात आणखी हातभार लावला जात आहे. पेट्रोल, डिझेलच्या करातून मोदी सरकारने २७ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. मोदी देश विकून देश चालवत आहेत त्यांच्या या व्यापारीवृत्तीमुळे देश रसातळाला जात आहे असेही मोहन जोशी म्हणाले.

PM Awas Yojana | PM आवास योजना 2024 पर्यंत वाढवण्यास मंजुरी | 122 लाख लोकांना मिळणार घर  | सरकारचा मोठा निर्णय

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश

PM आवास योजना 2024 पर्यंत वाढवण्यास मंजुरी | 122 लाख लोकांना मिळणार घर  | सरकारचा मोठा निर्णय

 पीएम आवास योजना: या योजनेंतर्गत 122 लाख घरे बांधकामासाठी मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 65 लाख घरे पूर्ण झाली आहेत.  याचा अर्थ 122 लाख लोकांना लवकरच घरे मिळणार आहेत.
 PM Awas Yojana: तुम्ही देखील PM आवास योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे.  केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेला 2 वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे.  या योजनेंतर्गत 122 लाख घरे बांधण्यासाठी मंजूरी देण्यात आली असून, त्यापैकी 65 लाख घरे पूर्ण झाली आहेत.  याचा अर्थ 122 लाख लोकांना लवकरच घरे मिळणार आहेत.
 केंद्र सरकार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गरिबांना घरे देण्याचे काम करत आहे.  यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांचे आत्तापर्यंतचे स्वप्न पूर्ण होणार आहे.  मोदी सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट गरीबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे.
 पीएम आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा
 pmaymis.gov.in वर भेट देऊन अर्ज कसा करावा (pmaymis.gov.in वरून PMAY साठी अर्ज कसा करावा)
 सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmaymis.gov.in ला भेट द्या
 वेबसाइटच्या वरच्या बाजूला तुम्हाला ‘Citizen Assessment’ चा पर्याय मिळेल.  त्यावर क्लिक करा.  येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील.  तुम्ही तुमच्या मुक्कामानुसार पर्याय निवडा.  यानंतर तुम्हाला आधार क्रमांक भरावा लागेल आणि चेकवर क्लिक करावे लागेल.  यानंतर एक ऑनलाइन फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा. अर्ज भरल्यानंतर संपूर्ण माहिती पुन्हा एकदा वाचा.  तुमचे समाधान झाल्यानंतर सबमिट करा.
 अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नंबर दिसेल.  त्याची प्रिंट काढा आणि भविष्यासाठी जतन करा.

 या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेली कोणतीही व्यक्ती, ज्यांच्याकडे कोणतेही घर नाही, त्यांना याचा लाभ घेता येईल.  या योजनेत शासनाकडून 2.50 लाखांची मदत दिली जाते.  यामध्ये तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात.  पहिला हप्ता 50 हजार.  1.50 लाखांचा दुसरा हप्ता.  त्याचवेळी 50 हजारांचा तिसरा हप्ता दिला आहे.  राज्य सरकार एकूण 2.50 लाखांसाठी 1 लाख देते.  त्याचबरोबर केंद्र सरकार 1.50 लाख अनुदान देते.

Agnipath | मोदीजींचा नारा ‘मर जवान, मर किसान’ | अग्निपथ वरून राष्ट्रवादीची टीका

Categories
Uncategorized

शास्त्रीजी म्हणाले होते ‘जय जवान, जय किसान’ पण मोदीजींचा नारा ‘मर जवान, मर किसान’

…. अग्निपथ वरून राष्ट्रवादीची टीका, युद्धस्मारकाजवळ जोरदार आंदोलन

पुणे – केंद्र सरकारने सैन्यभरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेवरून युवकांमध्ये संपूर्ण देशभर अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून सुमारे १४ राज्यांतील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. ही योजना केंद्र सरकारने कोणत्याही समाजघटकांशी चर्चा न करता नेहमीप्रमाणे अतिशय घाईघाईने रेटली आहे. परंतु यामुळे सैन्यदलासारख्या अतिशय महत्वाच्या संस्थेवर आघात होत असल्याची टिकाही पक्षाकडून करण्यात आली आहे. शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मराठा युद्ध स्मारक कॅम्प येथे आंदोलन करण्यात आले.

सध्याची सैन्यभरतीची प्रक्रिया अतिशय उत्तम दर्जाची असून यातून निवड झालेल्या अधिकारी आणि जवानांनी वेळोवेळी सीमेवर शौर्य गाजवून देशाचे रक्षण केले आहे. याशिवाय देशांतर्गत शांतता राखण्यासाठी देखील जवानांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाचा देशातील प्रत्येक जनतेला अभिमान आहे. सैन्यभरतीची ही अतिशय सक्षम यंत्रणा असताना अग्निपथ सारखी योजना अचानक राबविण्याची सरकारला का घाई आहे असा सवालही पक्षाकडून विचारण्यात आला आहे.

या देशाने आतापर्यंत तीन-चार युद्धांचा प्रत्यक्ष सामना केले आहे. जेंव्हा देशावर परचक्र आणि अन्नटंचाई असे दुहेरी संकट होते तेंव्हा तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान,जय किसान’ अशी घोषणा देऊन देशाच्या उभारणीतील जवान आणि किसान यांचे महत्त्व अधोरेखित केले होते. परंतु केंद्रातील सरकार बहुमताच्या अहंकारात एवढे अंध झाले की, त्यांनी देशाच्या विकासाचा मूलमंत्र असणारी ही घोषणाच संपविण्याचा घाट घातला आहे. शेतकऱ्यांना पूर्णतः चिरडल्यानंतर आता हे जवानांकडे वळले असून ‘मर जवान, मर किसान’ असा यांचा उघड नारा आणि अजेंडा असल्याचे आता उघड झाले आहे.

आपल्या हातून देशसेवा घडावी तसेच आपल्या कुटुंबाचा चरितार्थ ही चालावा अशा दुहेरी उद्देशातून देशभरातील अनेक युवक सैन्यदलामध्ये भरती होण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करीत असतात. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार सैनिक भरती होणाऱ्या युवकांना फक्त चारच वर्षे नोकरी मिळणार असून सैन्यदलाच्या या कंत्राटीकरणामुळे त्याचे पुढील भवितव्य अंधःकारमय असणार आहे एकीकडे बुलेट ट्रेन सारख्या अनावश्यक योजनांवर एक लाख कोटी रुपयांचा खर्च केला जातो अनेक उद्योगपती मित्रांची कर्जे मोदी सरकारकडून रद्द केली जातात. पण दुसरीकडे देशाच्या संरक्षणाकरता पैसे शिल्लक नाही असे सांगितले जाते यातूनच ते देशाच्या संरक्षण क्षत्राविषयी गंभीर नाहीत हेच दिसत आहे , देशातील सार्वजनिक उपक्रम मोडीत काढताना ते पन्नास वर्षे शंभर वर्षे एवढ्या मोठ्या काराराने भाड्याने दिले जातात मात्र गोरगरीब युवकांना पूर्णवेळ नोकरी न देता तो कालावधी मात्र फक्त चारच वर्षांचा असतो यामागे सरकारची व्यापारी मानसिकता दिसून आलेली आहे अशी टिका यावेळी पक्षाकडून करण्यात आली.

केंद्रीय मंत्री जी कृष्णन रेड्डी व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी सैनिकांबद्दल केलेल्या वक्तव्याचाही तीव्र निषेध करण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख रवींद्र माळवदकर, किशोर कांबळे मृणालिनी वाणी ,अजिंक्य पालकर ,मनोज पाचपुते, गोविंद जाधव , पुजा झोळे ,राहूल तांबे , सौ. सुगंधा तिकोणे,मंगेश मोरे, धनंजय पायगुडे,सौ.वंदना मोडक, आदिल सय्यद , विकास झेंडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते