Congress Vs PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी ! मोहन जोशी | गॅस सिलिंडरवर मर्यादा लावून मोदी सरकारकडून जनतेची क्रूर थट्टा

Categories
Breaking News Commerce Political social पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी ! मोहन जोशी

| गॅस सिलिंडरवर मर्यादा लावून मोदी सरकारकडून जनतेची क्रूर थट्टा

जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सध्या सर्वात निच्चांकी पातळवीर आहेत पण देशात पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर मात्र मोदी सरकार कमी करत नाही. मागील तीन महिन्यापासून क्रूड ऑईलचे दर कमी होत आहेत पण पेट्रोल, डिझेलचे दर कमी न करता मोदी सरकार त्यातून जनतेची लूट करत आहे. आतातर मोदी सरकारने घरगुती सिलिंडर वापरावरच मर्यादा आणून जनतेची क्रूर थट्टा केली आहे. नरेंद्र मोदींच्या व्यापारी वृत्तीमुळे जनता मात्र भिकारी झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे फक्त भांडलदारांचे हित जोपासणारे सरकार आहे. या सरकारच्या काळात मोजक्या भांडवलदारांची संपत्ती झपाट्याने वाढत आहे तर गरिब, मध्यमवर्ग, सर्वसामान्य जनता मात्र समस्यांच्या गर्तेत ढकलली जात आहे. नरेंद्र मोदींनी व्यापारी वृत्तीमुळे देशातील सगळी संपत्ती विकून टाकली आहे. केवळ हम दो हमारे दो, हेच मोदी सरकारचे काम आहे. सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी सारख्या समस्यांनी त्रस्त आहे आणि मोदी व मोदींचे मित्र मात्र मस्त आहेत. महागाईच्या आगडोंबाने जनतेला जगणे कठीण झाले आहे तसेच जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून महागाई वाढवण्यात आणखी हातभार लावला जात आहे. पेट्रोल, डिझेलच्या करातून मोदी सरकारने २७ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. मोदी देश विकून देश चालवत आहेत त्यांच्या या व्यापारीवृत्तीमुळे देश रसातळाला जात आहे असेही मोहन जोशी म्हणाले.