Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | काँग्रेस कडून पुणे लोकसभा समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | काँग्रेस कडून पुणे लोकसभा समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे!

| पुण्यातील पदाधिकारी यांच्याकडे देखील विविध लोकसभा मतदार संघाची जबाबदारी

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress |  पुणे | प्रदेश काँग्रेसने (Maharashtra Congress) लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपला (BJP) या निवडणुकीत मात देण्यासाठी काँग्रेस (Congress) ने कंबर कसली आहे. खासकरून पुणे शहरावर काँग्रेसने (Pune City Congress) चांगलेच लक्ष दिले आहे. दरम्यान पुणे लोकसभा मतदार संघ (Pune Lok Sabha Constituency) समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्याकडे देण्यात आली आहे. नुकतीच प्रदेश काँग्रेस ने राज्यातील मतदार संघाच्या समन्वयक पदाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. (Pune Lok Sabha Constituency | Pune Congress)
विश्वजित कदम (Vishwajeet Kadam Congress) यांनी देखील पुणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना भाजपसमोर हार पत्करावी लागली होती. तेव्हापासून पुण्याकडे त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. सध्या ते विधानसभेचे आमदार आहेत. पुण्याची जागा निवडून आणण्यासाठी आता कदम यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश ने नुकतीच त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे.  (Pune News)
दरम्यान लोकसभा निवडणुकी साठी प्रदेश काँग्रेस कमिटी कडून पुण्यातील पदाधिकारी यांच्या कडे देखील विविध मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 १) माजी आमदार मोहन जोशी – अहमदनगर २) आमदार रवींद्र धंगेकर – सातारा ३) संजय बालगुडे – माढा ४) अभय छाजेड – हातकंनगले अशा या जबाबदाऱ्या आहेत.

Pune Airport New Terminal | पुणे विमानतळ येथील नूतन टर्मिनल २ पंधरा तारखेपर्यंत सुरू न केल्यास 16 जानेवारीला उद्घाटन करू  | मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

Pune Airport New Terminal | पुणे विमानतळ येथील नूतन टर्मिनल २ पंधरा तारखेपर्यंत सुरू न केल्यास 16 जानेवारीला उद्घाटन करू  | मोहन जोशी

Pune Airport New Terminal  | माजी आमदार उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मोहनदादा जोशी (Mohan Joshi), आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), दत्ता बहिरट, सुनील मलके यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणाचे संचालकाना भेटून गुलाब पुष्प आणि निवेदन देऊन गांधीगिरी ने आंदोलन केले. नवीन टर्मिनल लवकरच सुरू करण्यासंदर्भात विनंती केली असून ते टर्मिनल पंधरा तारखेला जानेवारीपर्यंत सुरू न केल्यास पुणेकरांसाठी 16 जानेवारी रोजी टर्मिनल चे उद्घाटन करून सर्वसामान्य पुणेकरांसाठी खुल्या करण्याच्या इशारा देण्यात आला आहे. (Pune Airport New Terminal )

यावेळी चेतन अग्रवाल nsui सरचिटणीस संकेत गलांडे युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे उपस्थितीत होते.

या संदर्भात एक मेल करून एक जानेवारी रोजी हे टर्मिनल सर्वसामान्य पुणेकरांसाठी खुले करावे अशी विनंती केली होती.

मात्र, आजतागायत याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन, पुढील 10 दिवसांत नवीन टर्मिनलचे उद्घाटन करा, असे न झाल्यास प्रवाशांच्या हितासाठी आम्हाला आमची पुढील कृती ठरवावी लागेल. पुणे नूतन टर्मिनल चे सर्व काम पूर्ण झाले असून या संदर्भात योग्य ती कारवाई पूर्ण झालेली आहे. या संदर्भात फक्त आणि फक्त उद्घाटन करण्याची तारीख बदलत असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

15 जानेवारीपर्यंत उद्घाटन न झाल्यास 16 जानेवारी रोजी उद्घाटन करून पुणेकरांसाठी एअरपोर्टचे नवीन टर्मिनल खुले करण्यात या इशारा देण्यात आलेला आहे.

Pune Airport Terminal | विमानतळ टर्मिनलचे उदघाटन मोदींसाठी थांबले हा प्रकार संतापजनक | माजी आमदार मोहन जोशी

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Airport Terminal | विमानतळ टर्मिनलचे उदघाटन मोदींसाठी थांबले हा प्रकार संतापजनक |  माजी आमदार मोहन जोशी

| १जानेवारीला उदघाटन व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन

 

Pune Airport Terminal | पुणे – प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल (Pune Airport New Terminal) कार्यान्वित होणे गरजेचे आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची वेळ मिळत नसल्याने उदघाटनासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. हा प्रकार पुणेकरांसाठी संतापजनक आहे, १जानेवारीपूर्वी उदघाटन व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. (Pune Airport New Terminal)

विमान प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने पुणे विमानतळावर अनेक गैरसोयी वाढू लागल्या. विमानाचे लॅन्डिंग करण्यातही अडथळे येत आहेत. विमान प्रवाशांची संख्या वर्षाकाठी ७०लाख होती, ती ९०लाखांपर्यंत जावून पोहोचलेली आहे. ती लवकरच १कोटीचा आकडा ओलांडेल, अशी शक्यता आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे गैरसोयी वाढल्या. विमानतळावरची शांतता संपून, गजबजाट झाला. विमानांच्या लॅन्डिंगला अडथळे येऊ लागले. यावर उपाययोजना म्हणून ५२५ कोटी रुपये खर्चून नवे टर्मिनल उभारण्यात आले. ऑगस्ट २०२३ पूर्वीच नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले, चाचण्याही झाल्या. टर्मिनल ताबडतोब कार्यान्वित व्हावे यासाठी विमान प्रवाशांनी सोशल मिडियाद्वारे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर पोर्ट ॲथॉरिटीचे लक्ष वेधले. त्याला दाद देण्यात आली नाही, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे. (Pune News)

नव्या टर्मिनलचे उदघाटन २०२३ सालातील सप्टेंबर महिन्यात होईल, असे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी जाहीर केले. सप्टेंबर महिना उलटला, मग ऑक्टोबर महिन्याचा वायदा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन व्हावे, यासाठी त्यांच्या कार्यालयाला पत्रही लिहीले. मात्र, पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात गुंतून पडलेल्या मोदींनी उदघाटनासाठी वेळ दिला नाही. नवे टर्मिनल चालू व्हावे यासाठी प्रवासी आतुर झाले आहेत. विमानतळाची प्रवासी क्षमता वाढणार आहे, विमानांची संख्या वाढणार आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांना कामाचे श्रेय घेऊन मिरवायचे आहे. याकरिता भाजपच्या नेत्यांकडून वेळकाढूपणा चालू आहेत. हे डावपेच निंदनीय आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा! 

 
 
 
Pune Loksabha 2024 | लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) तयारी अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यात आचारसंहिता देखील लागू शकते. कुठल्याही पक्षाने आपले पत्ते उघड केले नसले तरीही सर्वांची अंतर्गत तयारी जोरदारपणे सुरु आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपचा (BJP) उमेदवार कोण असेल याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. कारण गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने ही जागा रिक्त आहे. यासाठी आता नवीन उमेदवार कोण असणार? गेल्या काही दिवसापासून मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता सुनील देवधर (Sunil Devdhar) हे नवीनच नाव चर्चेत आले आहे. भाजप नेहमी नवीन चेहऱ्याच्या शोधात असते. तोच धागा पकडून भाजपने हा नवीन उमेदवार शोधला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 
 
 
 

कोण आहेत सुनील देवधर?

 

सुनील देवधर (जन्म 29 सप्टेंबर 1965). त्यांनी ईशान्य भारतातील माय होम इंडिया या एनजीओची स्थापना केली. 

2010 मध्ये, ते सक्रिय राजकारणात सामील झाले आणि जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष, भारतीय जनता पार्टी (भाजप) च्या ईशान्य भारत संपर्क सेलचे राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्त झाले. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग ३ वेळा निवडणूक लढविणारे तत्कालीन मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांनी गुजरातमध्ये पूर्णवेळ विस्तारक म्हणून काम केले. गुजरातमधील त्यांच्या मेहनतीने प्रभावित होऊन पंतप्रधान मोदींनी त्यांची वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर, 2016 मध्ये, त्यांची 2 दशकांहून अधिक काळ मार्क्सवादी पक्षाने राज्य केलेल्या त्रिपुरा राज्याचे पक्षाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. तत्कालीन भाजप अध्यक्ष श्री अमित शहा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, पंतप्रधान मोदींच्या प्रचंड लोकप्रिय प्रतिमेसह, त्यांच्या जमिनीवर कठोर परिश्रम करून, ते राज्यातील २५ वर्षांची कम्युनिस्ट राजवट संपवण्याचे प्रमुख साधन बनले. ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि जुलै २०१८ ते जुलै २०२३ पर्यंत आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी होते. २०१८ मध्ये ते भाजप आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी बनले.
दरम्यान मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक हे आपण उमेदवार असण्याची आस लावून आहेत. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न देखील सुरु आहेत. मुळीक यांनी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न केला होता. मोहोळ आणि मुळीक हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. असे असले तरी लोकसभेच्या उमेदवाराचा निर्णय ही केंद्रीय टीम करणार आहे. तसेच भाजप नेहमी ऐन वेळेला नवीन चेहरा देत असते. त्यानुसार या टीम ने सुनील देवधर यांच्या नावाला पसंती देण्याची तयारी चालवली आहे, अशी माहिती भाजपच्या गोटातून मिळाली. अशी देखील चर्चा आहे कि देवधर यांचा प्रचार बड्या उद्योगपतींच्या माध्यमातून सुरु आहे.
दरम्यान लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याबाबत कोर्टाच्या आदेशाने भाजपची गोची झाली आहे. कारण पोटनिवडणुकीची भाजपची सध्या तरी कुठली तयारी दिसत नाही किंवा भाजप त्या मनःस्थितीत नाही.
दरम्यान इकडे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्टवादी चे देखील अजून काही ठरलेले नाही. लोकसभेची जागा परंपरागत रित्या काँग्रेस कडे राहिलेली आहे. मागील वेळी मोहन जोशी यांना आपला करिष्मा दाखवता आला नव्हता. यावेळी काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर किंवा अरविंद शिंदे यांना संधी देऊ शकते. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांचे नाव देखील काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. मात्र आघाडीचे अजून तरी काही ठरलेले नाही.
मनसे ने मात्र आधीच आपला उमेदवार घोषित केला आहे. वसंत मोरे ना उमेदवारी दिली जाणार आहे. त्या दिशेने मोरेंनी आपली तयारी देखील सुरु केली आहे. शहर तसेच ग्रामीण भागात मोरे दौरे करत फिरत आहेत. तसेच मोरे नेहमीच आपल्या कामाच्या पद्धतीने प्रकाशझोतात असतात. सोशल मीडियावर त्यांना पसंत करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.

Mohan Joshi | Telangana Election Results| तेलंगणातील काँग्रेसच्या विजयात पुण्याच्या मोहन जोशींचा मोठा वाटा

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Mohan Joshi | Telangana Election Results| तेलंगणातील काँग्रेसच्या विजयात पुण्याच्या मोहन जोशींचा मोठा वाटा

 

Mohan Joshi | Telangana Election Results| पुणे : तेलंगणातील पेडा पल्ली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील ७ विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांचे विशेष आभार मानून त्यांचा सत्कार केला. (Mohan Joshi | Telangana Election Result)

कॉंग्रेस पक्षाने पेडापल्ली ल्तेकसभा क्षेत्रात निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. त्यात चेन्नूर,बेलामपल्ली, मंचे रीयाल, धर्मापुरी, रामागुंडम, मंथनी, पेडापल्ली विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. मावळते मुख्य मंत्री के. चंद्रशेखर राव यांचा हा बालेकिल्ला मानला जात होता, त्या ठिकाणी सातही मतदारसंघात काँग्रेस पक्ष विजयी झाला.

अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत मोहन जोशी यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा फायदा झाला, असे सांगून काँग्रेसच्या विजयी उमेदवारांनी मोहन जोशी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. तेलंगणा विधीमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आज सोमवारी झाली, त्यात मोहन जोशी सहभागी झाले होते.

पक्षाचा विचार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत नेणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.पक्षाच्या नेत्यांनी निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविल्याबद्दल जोशी यांनी नेत्यांचे आभार मानले.

PMPML Officer Transfer | महायुती सरकारने पीएमपी केली दिशाहीन |भाजपच्या हितसंबंधांसाठी अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या

Categories
Breaking News Political social पुणे

PMPML Officer Transfer | महायुती सरकारने पीएमपी केली दिशाहीन

|भाजपच्या हितसंबंधांसाठी अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या

– माजी आमदार मोहन जोशी यांचा आरोप

PMPML Officers Transfer | पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) अध्यक्ष सचिंद्र प्रतापसिंह (IAS Sachindra Pratap Singh) यांची अवघ्या चार महिन्यांत बदली करून महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुती सरकारने (Mahayuti) कारभार दिशाहीन केला असून, या बदल्यांमागे भाजपचे (BJP) हितसंबंध राखण्याचा हेतू आहे, असा आरोप माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
सर्वसामान्य प्रवाशांच्या दृष्टीने पीएमपीएमएल ची सेवा हा एकमेव पर्याय आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर तसेच जिल्ह्यातील सुमारे १२लाख प्रवासी पीएमपीतून दररोज प्रवास करतात. पीएमपीएमएल कडे सोळाशे बसगाड्या असून १०हजार कर्मचारी सेवेत कार्यरत आहेत. पीएमपीएमएल च्या कारभाराचा एवढा मोठा पसारा आहे. परंतु भाजपच्या नेत्यांचे हितसंबंध यातील खरेदी-विक्रीमध्ये दडलेले असल्याने  शिस्तप्रिय अधिकाऱ्यांना बदलले जात आहे. भाजपने पुण्याला नेहमीच दुय्यम वागणूक दिली असून, पीएमपीएमएल कडे जाणुनबुजून दुर्लक्ष करण्यामागे हेच कारण असल्याचा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे. (PMPML)
सचिंद्र प्रतापसिंह चांगला कारभार करत होते. कारभाराला शिस्त लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता,उत्पन्न वाढू लागले होते,प्रवासी वाढावेत अशा दिशेने ते काम करत होते. अवघ्या चार महिन्यांत त्यांची बदली करण्यात आली. यापूर्वी ओमप्रकाश बोकाडिया या प्रामाणिक अधिकाऱ्याची मुदतीपूर्वीच बदली करण्यात आली. असे मोहन जोशी यांनी निदर्शनास आणून दिले.
सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम व्हायला हवी, असे भाजप नेते भाषणांमधून सांगत असतात, प्रत्यक्षात कृती मात्र पीएमपीएमएल या सार्वजनिक सेवेला दिशाहीन करणारी आहे. भाजपच्या हितसंबंधांचा डाव पुणेकरांनी ओळखावा आणि पीएमपीएमएल ला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा, यासाठी पुणेकरांनी दबाव आणावा, असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे. सचिंद्र प्रतापसिंह यांची बदली अवघ्या चार महिन्यांत  केली, त्या बद्दल काँग्रेस पक्षातर्फे, महायुती सरकारचा निषेध  मोहन जोशी यांनी केला आहे.
——

Sasoon Hospital Drug Racket | बोलघेवडे भाजप नेते गप्प का? सरकार कोणत्या मंत्र्याला वाचवतंय?

Categories
Breaking News Political आरोग्य पुणे महाराष्ट्र

Sasoon Hospital Drug Racket | बोलघेवडे भाजप नेते गप्प का? सरकार कोणत्या मंत्र्याला वाचवतंय?

– माजी आमदार मोहन जोशी यांचा खडा सवाल

 

Sasoon Hospital Drug Racket | पुणे – ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थांच्या व्यवहाराचे रॅकेट (Sasoon Hospital Drug Racket) उघड होऊन ११ दिवस लोटले तरी राज्य सरकार ढिम्मच आहे, बोलघेवडे भाजप नेते चुपचाप बसले आहेत, असा आरोप माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांनी केला असून, या प्रकरणात राज्य सरकार कोणत्या मंत्र्याला वाचवतंय का? असा सवालही जोशी यांनी केला आहे.

सामान्य लोकांसाठी आधार असलेले ससून सर्वोपचार रुग्णालय अमली पदार्थांच्या तस्करीचा अड्डा बनले, ही बाब पुणेकरांना धक्का देणारी आहे. वास्तविक पाहता हे प्रकरण उघडकीस येताच राज्याच्या मुख्य मंत्री आणि दोन उपमुख्य मंत्र्यांनी दखल घेऊन कठोर कारवाया करायला हव्या होत्या. ते अजूनही ढिम्मच आहे आणि एवढा शरमेचा प्रकार घडलेला असतानाही एरवी कोणत्याही प्रश्नावर वायफळ बडबड करणारे भाजपचे बोलघेवडे नेते आता मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांचे मौनही संतापजनक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

अंमली पदार्थ तस्करी आणि त्यातील आरोपी ललित पाटील याचे पलायन ही बाब आणखी धक्कादायक आहे. महायुती सरकारमधील एका मंत्र्याशी ललित पाटील याचे कनेक्शन होते, हे ही उघड होऊ लागलेले आहे. वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या चौकशा समित्या नेमणे हा निव्वळ फार्स आहे. समित्या कसल्या नेमताय? ससूनमधील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, अशी मागणी आहे. या प्रकरणात महायुतीतील एका मंत्र्याला वाचविण्याचा खटाटोप चाललाय का? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.

सामान्य माणसाचा आधार असलेल्या ससूनमध्ये अमली पदार्थांची तस्करी चालते, हा प्रकारच अस्वस्थ करणारा आहे. मुख्य मंत्री आणि उपमुख्य मंत्र्यांनी यावर कडक उपाययोजना कराव्यात, अन्यथा असे प्रकार आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

Shivajinagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्थानक बाबत १५ दिवसात निर्णय घ्या| अन्यथा मुख्यमंत्र्यांना अडवू

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Shivajinagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्थानक बाबत १५ दिवसात निर्णय घ्या| अन्यथा मुख्यमंत्र्यांना अडवू

| माजी आमदार मोहन जोशी यांचा इशारा

| काँग्रेसचे जोरदार आंदोलन

 

Shivajinagar ST Stand |पुणे : प्रवाशांची सोय आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन शिवाजीनगर एसटी स्थानक (Shivajinagar ST Stand) पूर्ववत सुरू होण्यासाठी निर्णय घेतले जावेत. अन्यथा मुख्य मंत्र्यांना अडवू, असा इशारा माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi)  यांनी दिला आहे. (Pune Congress Agitation)

शिवाजीनगर बसस्थानक लवकरात लवकर पूर्ववत सुरू व्हावे या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर आज (गुरुवारी) आंदोलन करण्यात आले. आमचे छत्रपती शिवाजीनगर एसटी स्थानक परत द्या, पुणेकरांचा अंत पाहू नका, शासनाच्या बेपर्वाईमुळे पैसे आणि वेळ का वाया घालवायचा? असे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते. एसटीचे विभागीय नियंत्रक कैलास पाटील यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महामेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करण्यात आले. पुणे- मुंबई महामार्गालगत स्थलांतर झाल्याने वर्दळीच्या रस्त्यावर एसटी वाहनुकीची भर पडली. स्थलांतर तात्पुराने असल्याने वाहतुकीची गैरसोय सहन केली. महामेट्रोचे काम पूर्ण होऊन वर्ष झाले, अद्याप शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत सुरू झाले नाही. महामेट्रो आणि एसटी खात्यात समन्वय नाही. शिवाजीनगर एसटी स्थानकाचा आराखडा मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन खाते असल्याने त्यांच्याकडे सादर झाला. पण अद्याप निर्णय नाही. येत्या १५ दिवसात निर्णय होऊन एसटी स्थानक काम मूळ जागी सुरू व्हावे, असे निवेदनात म्हटले आहे.

या आंदोलनात मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, संजय बालगुडे, चंद्रशेखर कपोते, नुरुद्दीन सोमजी, नरेंद्र व्यवहारे, प्रवीण करपे, प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, शाबीर खान, भरत सुराणा, चेतन अग्रवाल, नितीन जैन, सुरेश कांबळे, अयुब पठाण, शंकर थोरवे, अविनाश अडसूळ, उमेश काची, स्वाती शिंदे, ॲड.रोहिणी शिंदे, अनिता माखवणा, अंजली सोलापुरे, मोना रायकर, मोहिनी मल्लव, संगीता थोरात, प्रशांत मिटपल्ली, अस्पाक शेख, विजय वारभुवन, डॉ अनुपकुमार बेघी, हेमराज साळुंखे, महेन्द्र चव्हाण, शकील ताजमत, दिलीप थोरात, लहू जावळेकर, नंदू बनसोडे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Pune Congress OBC Cell | पुणे शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने ओबीसी प्रवर्गातील विविध मागण्यांचे राष्ट्रपतीना निवेदन 

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Congress OBC Cell | पुणे शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने ओबीसी प्रवर्गातील विविध मागण्यांचे राष्ट्रपतीना निवेदन

Pune Congress OBC Cell |महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या सूचनेनुसार पुणे शहर ओबीसी विभागाच्या (Pune Congress OBC Cell) वतीने महामहीम राष्ट्रपती महोदय (President) यांना ओबीसी प्रवर्गातील (OBC Category) विविध मागण्याबाबत निवेदन सादर करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी (Pune Collector) यांना निवेदन देण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने

१. संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करावी.
२. लोकसभा, राज्यसभा,विधानसभा तसेच विधान परिषदेमध्ये महिला आरक्षणाचा ठराव संमत झाला असून 33% आरक्षणापैकी 15%आरक्षण हे ओबीसी महिलांकरता राखीव करण्यात यावे.
३. नॉन क्रिमिलियर ची अट संपूर्णपणे रद्द करण्यात यावी.

या मागण्या करण्यात आल्या असून देशामध्ये ओबीसी आरक्षणाबाबत कायम संभ्रमाचे व अस्थिर वातावरण निर्माण करण्याचे काम चालू आहे. यामुळे समाजामध्ये असंतोष निर्माण होत आहे. तरी कृपया आपण आमच्या वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी विनंती यावेळी करण्यात आलेली आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. आमदार मोहनदादा जोशी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे,सुनील पंडित , राजेंद्र बरकडे,उमेश काची, अक्षय सोनवणे ,राजेश जाधव नितीन येलारपुरकर, गणेश साळुंखे ,जीवन चाकणकर, राजू देवकर , रमेश राऊत , योगेश कलकुटे रवींद्र गागडे, फैजान अन्सारी आदि उपस्थित होते.

Mahatma Gandhi | Lal Bahadur Shastri Jayanti | गांधीजी आणि शास्त्रीजी च्या जयंतीनिमित्त कसबा मतदार संघात १८६९ तुळस व गुलाब रोप वाटप

Categories
Breaking News Political social पुणे

Mahatma Gandhi | Lal Bahadur Shastri Jayanti | गांधीजी आणि शास्त्रीजी च्या जयंतीनिमित्त कसबा मतदार संघात १८६९ तुळस व गुलाब रोप वाटप

Mahatma Gandhi | Lal Bahadur Shastri Jayanti |  २ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुरजी शास्त्री यांच्या जयंती निमित्त कसाब मतदार संघातील (Kasba Constituency) प्रभाग क्रमांक १८ परिसरातील विविध ठिकाणी (महात्मा गांधी यांचे १८६९ हे जन्म साल असल्याने) १८६९ तुळस व गुलाब रोप वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूरजी शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ, मोमीनपुरा, गुरुवार पेठ, गौरी आळी, वनराज मंडळ चौक शुक्रवार पेठ, महात्मा फुले वाडा, अश्या विविध ठिकाणी नागरिकांना रोपांचे वाटप करण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. आमदार मोहनदादा जोशी व आमदार रवींद्रभाऊ धंगेकर यांच्या हस्ते परिसरातील नागरिकांना रोपे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मोहन जोशी यांनी नागरिकांना संदेश देताना म्हणाले कि, मानव हा निसर्गाचा एक भाग आहे. आपल्या जीवनात झाडे हे महत्वाची भूमिका बजावतात. ते आपल्याला स्वच हवा, ताजे पाणी आणि अण्णा पुरवतात, ते हवामानाचे नियमन आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यास देखील मदत करतात. जेव्हा आपण झाडे लावतो आणि त्यांची काळजी घेतो, तेव्हा आपण आपल्या पृथ्वीची आणि भावी पिढ्यांसाठी खरा फरक करत असतो. निसर्गाचा योग्य उपयोग व विचार करून जीवनशैली ठरवण्याचा प्रयत्न म्हणजे गांधी विचार पुढे
नेणे.
आमदार रवींद्र धंगेकर यांनी नागरिकांना संदेश देताना म्हणलेले कि, या महात्मा गांधी व लालबहादूरजी शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आपण हरित भविष्यासाठी
आशेचे बीज रोवू या. निसर्गाशी सुसंगत राहण्यासाठी आणि आपल्या पुर्वीची काळजी घेण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, पर्यावरणाचा सन्देश देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाचे एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे सहभागींना रोपे भेट देण्याची प्रथा प्रत्येक रोप आशेचे प्रतीक म्हणून काम करते, हिरवेगार भविष्य घडवण्यात व्यक्तींना त्यांच्या भूमिकेची आठवण करून देते.
सदर कार्यक्रमास अॅड. शाबीर खान, हेमंत राजभोज, सागर कांबळे, अयुब पठाण, सौ. आयेशा पठाण, उमेश काची, सौ. भाग्यश्री काची, गणेश भंडारी, प्रा. अक्षय सोनावणे, विक्रम खन्ना, सैय्यद सईद बाबा साहेब, निखिल येलारपूरकर, नितीन येलारपूरकर, अश्फाक शेख, आदी यांनी आपापल्या भागात कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे आयोजन सी भावना निलेश बोराटे व काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, अॅड. निलेश शिरीष बोराटे यांनी केले. या प्रसंगी सुरेश कांबळे, प्रवीण करपे, चेतन अगरवाल, गोरख पळसकर, अक्षय नवगिरे, प्रज्ञेश बोराटे, शेखर पाटील, यश बोराटे, निखिल सणस, सतीश मरलं, योगेश शिर्के, राजू वाईकर, प्रीतम भुजबळ, सौराज पाथरे, आनंद ढोले, आकाश शेंडगे, सोमनाथ पवार, राजू खंडागळे, विशाल बोराटे, अतिअश झरूंगे, निशांत नेवरेकर, कुमार घाडगे, ओंकार ससाणे, जाकीर खान, प्रथमेश मोझे, देवांग देवळे, हर्षल वंजारी, रोहन गोरवाडे, उत्कर्षा सोनराज पाथरे, विद्या विलास रवळे, सुधा आनंद ढोले, सुनंदा बोराटे, संगीता बोराटे, रचना बोराटे, सोनाली गाढे अनिता बोराटे, पूजा बोराटे, पल्लवी बोराटे, दिपाली बोराटे, मंदा पवार, राणी जाधव, आदी मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.