Eknath Shinde Foundation | दोन्ही फुफ्फुस निकामी झालेल्या शेतमजूर गरीब मुलीच्या मदतीला धावून आले एकनाथ शिंदे फाउंडेशन..!!

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र

Eknath Shinde Foundation | दोन्ही फुफ्फुस निकामी झालेल्या शेतमजूर गरीब मुलीच्या मदतीला धावून आले एकनाथ शिंदे फाउंडेशन..!!

 

Eknath Shinde Foundation | पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील (Pune Sasoon Hospital) श्वसनरोग विभागात उपचार घेत असलेल्या नीलम जाधव या अत्यंत गरीब मुलीच्या उपचाराचा खर्च व औषधोपचारासाठी एकनाथ शिंदे फाउंडेशन (Eknath Shinde Foundation) आता पुढे आलं असून या मुलीच्या वैद्यकीय खर्चासाठी तातडीने एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने एक लाख रुपयांची तात्काळ मदत करण्यात आली. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी दिली.

तसेच फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी ही एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने उपचार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यावेळी एकनाथ शिंदे फाउंडेशनचे प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की गेल्या सहा महिन्यांपासून ससून हॉस्पिटलमध्ये नीलम उपचार घेत असून तिचे दोन्ही फुफ्फुस निकामी झाली असून तिला आम्ही एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने सर्वतोपरी मदत करणार आहोत. तसेच प्रत्यारोपणाची सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी सुद्धा तातडीने प्रयत्न करणार आहोत. नीलम जाधव यांना लागणारी सर्व वैद्यकीय मदत देण्यासाठी एकनाथ शिंदे फाउंडेशन ची टीम सातत्याने प्रयत्नशील असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत संवेदनशील असून त्यांच्या दिलेल्या सेवेच्या मार्गांवरच एकनाथ शिंदे फाउंडेशन मार्गक्रमण करत आहे. यावेळी नीलमचे वडील नानासाहेबजाधव, लहान बहीण पल्लवी व दिलशाद अत्तार उपस्थित होत्या.

Sasoon Hospital Drug Racket | बोलघेवडे भाजप नेते गप्प का? सरकार कोणत्या मंत्र्याला वाचवतंय?

Categories
Breaking News Political आरोग्य पुणे महाराष्ट्र

Sasoon Hospital Drug Racket | बोलघेवडे भाजप नेते गप्प का? सरकार कोणत्या मंत्र्याला वाचवतंय?

– माजी आमदार मोहन जोशी यांचा खडा सवाल

 

Sasoon Hospital Drug Racket | पुणे – ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थांच्या व्यवहाराचे रॅकेट (Sasoon Hospital Drug Racket) उघड होऊन ११ दिवस लोटले तरी राज्य सरकार ढिम्मच आहे, बोलघेवडे भाजप नेते चुपचाप बसले आहेत, असा आरोप माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांनी केला असून, या प्रकरणात राज्य सरकार कोणत्या मंत्र्याला वाचवतंय का? असा सवालही जोशी यांनी केला आहे.

सामान्य लोकांसाठी आधार असलेले ससून सर्वोपचार रुग्णालय अमली पदार्थांच्या तस्करीचा अड्डा बनले, ही बाब पुणेकरांना धक्का देणारी आहे. वास्तविक पाहता हे प्रकरण उघडकीस येताच राज्याच्या मुख्य मंत्री आणि दोन उपमुख्य मंत्र्यांनी दखल घेऊन कठोर कारवाया करायला हव्या होत्या. ते अजूनही ढिम्मच आहे आणि एवढा शरमेचा प्रकार घडलेला असतानाही एरवी कोणत्याही प्रश्नावर वायफळ बडबड करणारे भाजपचे बोलघेवडे नेते आता मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांचे मौनही संतापजनक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

अंमली पदार्थ तस्करी आणि त्यातील आरोपी ललित पाटील याचे पलायन ही बाब आणखी धक्कादायक आहे. महायुती सरकारमधील एका मंत्र्याशी ललित पाटील याचे कनेक्शन होते, हे ही उघड होऊ लागलेले आहे. वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या चौकशा समित्या नेमणे हा निव्वळ फार्स आहे. समित्या कसल्या नेमताय? ससूनमधील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, अशी मागणी आहे. या प्रकरणात महायुतीतील एका मंत्र्याला वाचविण्याचा खटाटोप चाललाय का? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.

सामान्य माणसाचा आधार असलेल्या ससूनमध्ये अमली पदार्थांची तस्करी चालते, हा प्रकारच अस्वस्थ करणारा आहे. मुख्य मंत्री आणि उपमुख्य मंत्र्यांनी यावर कडक उपाययोजना कराव्यात, अन्यथा असे प्रकार आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

Sasoon Hospital Pune | ससून रुग्णालयात कैद्यांवर उपचार करा; पाहुणचार नको | शिवसेना शहर प्रमुखांची ससूनच्या डीन कडे कारवाईची मागणी

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे

Sasoon Hospital Pune | ससून रुग्णालयात कैद्यांवर उपचार करा; पाहुणचार नको | शिवसेना शहर प्रमुखांची ससूनच्या डीन कडे कारवाईची मागणी

Sasoon Hospital Pune | ससून सर्वोपचार रुग्णालयात (Pune Sasoon Hospital) उपचार करण्यासाठी येत असलेल्या कैद्यांचा उपचार सोडून पाहुणचार होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. रुग्णालयात उपचार घेत  असलेला कैदी परवा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला आहे. त्यामुळे यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी ससूनच्या डीन (Sasoon Dean) कडे केली आहे.
 भानगिरे यांनी दिलेल्या पत्रानुसार अमली पदार्थाच्या तस्करीतील प्रमुख सूत्रधार असलेला ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला. तसेच या रुग्णालयात कैद्यांना मिळत असलेल्या विशेष उपचारांची माहिती ही उघड झाली आहे. ससून रुग्णालयात दाखल होणाऱ्या कायद्यांची शहानिशा करून रुग्णालयातील दाखल होणाऱ्या कैदयांच्या आरोग्याची माहिती ही संबंधित डॉक्टरांकडून त्यांच्यावर कोणते उपचार करण्यात येतात. त्याबाबतच्या त्यांच्या कोणत्या तपासण्या होतात. तसेच प्रलंबित असलेल्या तपासण्यांना अतिशय गांभीर्याने घेऊन कोणत्याही कैद्यावर अत्यावश्यक उपचार सोडून प्राथमिक उपचारासाठी भरती करू नये, तसेच वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली सरकारी रुग्णालयातून अमली पदार्थाचे रॅकेट चालवण्यात येत असल्याच्या बातम्या या अतिशय वेदनादायी आहेत. आपण अधिष्ठाता या नात्याने या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून यापुढे रुग्णालयात दाखल होणाऱ्या कैद्यांवर अतिशय पारदर्शकपणे उपचार होतील यासंबंधीची दक्षता घ्यावी. तसेच अशा पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कठोर कार्यवाही करण्यात यावी. असे भानगिरे यांनी म्हटले आहे. (Pune Shivsena)
——