Lok Sabha Election Results | मोदींचा हा नैतिक पराभव – पृथ्वीराज चव्हाण

Categories
Breaking News Political पुणे

Lok Sabha Election Results | मोदींचा हा नैतिक पराभव – पृथ्वीराज चव्हाण

 

Lok Sabha Election Results – (The Karbhari News Service) –  2024 ची लोकसभा निवडणूक जनता विरुद्ध मोदी अशी होती. मोदींनी स्वतः ला देशापेक्षा स्वतःला मोठे समजले व मी म्हणजेच ह्या देशात सर्व चालणार या अविर्भावात प्रचार केल्याने भाजपला बहुमत मिळाले नसल्याने हा मोदींचा नैतिक पराभव असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. (Prithviraj Chavan Congress)

यावेळी बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, काँग्रेस पक्षाने जनतेचे मुद्दे घेऊन प्रचार केला तर मोदींनी जाती धर्माचे राजकारण केले, कोणतेही विकासाचे मुद्दे न घेता द्वेषपूर्ण प्रचार करीत देशातील वातावरण बिघडविण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. देशातील पहिले पंतप्रधान असतील ज्यांनी प्रचारातच स्वतःच्या नावाने प्रचार केला, काही निवडणुकीत तर देवाचा अवतार असून आईच्या पोटी जन्म न घेता माझा थेट पृथ्वीवर जन्म झाले असल्याचे हास्यास्पद विधान केले होते. मोदींचे ध्रुवीकरणाचे राजकारण जनतेने नाकारले आहे.

महाराष्ट्रात अत्यंत अपेक्षितच निकाल लागला असून भाजप च्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने जागा दाखवली आहे.

सातारा च्या निकालाबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, सातारा लोकसभेचा निकाल अत्यंत धक्कादायक निकाल आहे. सातारा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात अत्यंत चांगला प्रचार केला गेला होता. एकजुटीने सर्वांनी प्रचार करूनही झालेला पराभव धक्कादायक आहे.

Rajni Tribhuvan Former Mayor Pune | सर्वांना आदराने वागवत ताई, दादा अशी हाक मारणाऱ्या, मनमिळाऊ माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Rajni Tribhuvan Former  Mayor Pune | सर्वांना आदराने वागवत ताई, दादा अशी हाक मारणाऱ्या, मनमिळाऊ माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन!

Rajni Tribhuvan Passes Away – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन (Former Mayor of Pune Rajni Tribhuvan) यांचं आज सकाळी निधन झालं. सर्वांना आदराने वागवत ताई, दादा अशी हाक मारणाऱ्या, मनमिळाऊ अशी त्यांची ओळख होती. शिपाई पासून ते अधिकारी, राजकीय पदाधिकारी अशा सर्वांनीच त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली आहे. (Rajni Tribhuvan Passes Away)
रजनी त्रिभुवन यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्या ६१ वर्षांच्या होत्या.

आज सकाळी त्यांच्या भावाचं निधन झालं होतं म्हणून त्या भावाच्या अंत्यदर्शनासाठी गेल्या होत्या. रडल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. भाऊ आणि बहिणीचे एकाच दिवशी निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेनं मात्र पूर्ण शहरातून दुःख व्यक्त केले जात आहे. (Pune Municipal Corporation Mayor)

2005-2007 कालावधीत महापौर

रजनी त्रिभुवन या 2005 ते 2007 दरम्यान पुणे शहराच्या महापौर होत्या. 18 फेब्रुवारी 2005 ला त्या महापौर झाल्या होत्या. पुढे पंचवार्षिक संपेपर्यंत त्यांनी महापौर म्हणून काम केले. ताडीवाला रोड प्रभागातून त्रिभुवन या दोन वेळा नगरसेविका झाल्या होत्या. 2002 ते 2007 आणि 2007 ते 2012 असा त्यांचा महापालिका सदस्य पदाचा कालावधी राहिला. झोपडपट्टीतून येणाऱ्या आणि मागासवर्गीय म्हणून त्या पहिल्या महिला महापौर होत्या. रजनी त्रिभुवन यांनी काँग्रेस पक्षात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या.

The Karbhari- Rajni Tribhuvan
पुणे महापालिकेच्या नगरसचिव विभागात महापौर पदाची असलेली नोंद

– ताडीवाला रोड परिसरातून नगरसेविका

रजनी त्रिभुवन  यांनी पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मेघडंबरी बसवण्याचे काम केले होते. तसेच ताडीवाला रोड प्रभागात त्यांनी पुणे शहरातील पहिला रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा बसवला होता. त्या महापौर त्यांचे पती हे रेल्वेत कामाला होते. घरी महापौर असला तरी ते कामाला जात राहिले. एवढी साधी राहणी त्यांच्या पतीची होती. तसेच माजी महापौर देखील सर्वाशी प्रेमाने वागत असायच्या.

– सोनिया गांधी यांनी घरी दिली होती भेट

काँग्रेसमध्ये सुरेश कलमाडी गटाच्या म्हणून त्या ओळखल्या जायच्या. त्या जेव्हा महापौर होत्या तेव्हा सोनिया गांधी यांचा पुणे दौरा झाला होता. त्यावेळी गांधी यांनी रजनी त्रिभुवन यांच्या घरी भेट दिली होती. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी पक्षाचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलं.

त्यांच्या आठवणी सांगताना काही महापालिका कर्मचाऱ्यांना गहिवरून आलं. काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं कि त्या लहान मोठा असा भेद करत नसत. सर्वांना ताई दादा म्हणून हाक मारत असत. साधी राहणी असलेल्या महापौर गेल्याने सर्वांनीच दुःख व्यक्त केले.

– महापालिकेला 1 तास अगोदर सुट्टी

दरम्यान रजनी त्रिभुवन यांच्या निधना निमित्त दुखवटा व्यक्त करण्यासाठी आज पुणे महापालिकेच्या कार्यालयांना 1 तास अगोदरच म्हणजे 5:15 ते 6:15 या कालावधीत सुट्टी देण्यात आली.

The Karbhari- PMC Circular
पुणे महापालिकेला 1 तासाची सुट्टी देण्यात आली.

Pune Cantonment Constituency | महाविकास आघाडीसाठी ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार !

Categories
Breaking News Political पुणे

Pune Cantonment Constituency | महाविकास आघाडीसाठी ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार !

 

Pune Cantonment Constituency- (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Loksabha) पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघ (Pune Cantonment Constituency) निर्णायक ठरणार आहे. विशेष करून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बाजूने या मतदारसंघात कौल मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा भाजपसाठी ‘डेंजर झोन ‘ असलेला हा मतदारसंघ परिवर्तनास हातभार लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Pune Loksabha Election 2024)

पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा मतांचे ‘गणित’ कोण कोणत्या विधानसभा मतदारसंघात फिसकटू शकते याचा आढावा घेतला तर यंदा भाजपच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होणार आहे. मुख्यत्वे वडगावशेरी , पुणे कॅंटोन्मेंट या दोन विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक फटका भाजपला बसण्याची चिन्हे आहे. इतकेच नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीतही परिवर्तन घडू शकते.अशी स्थिती आहे. त्यात सहाही विधानसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे मराठा समाजाची भूमिका ही महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकते.असे राजकीय अभ्यासकांचे ठाम मत आहे.

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात गत लोकसभा निवडणुकीत मिळालेले मतदान पाहता, महायुती पर्यायाने भाजपला ६७,१७७ तर महा विकास आघाडीला ५४,४४४ मते आणि वंचितला १४,६९९ व अन्य असे एकूण १,४०,३६४ मतदान झाले. यंदा या मतदारसंघात एकूण २ लाख ८० हजार ४०० मतदारांपैकी पुरुष १लाख ४३ हजार ०४५,महिला १लाख ३७ हजार ३२२ तर ३३ तृतीय पंथीय मतदार आहेत.सद्यस्थितीत इंडिया फ्रंटच्या एकीमुळे या मतदारसंघातही महाविकास आघाडी सरस ठरली आहे. गतवेळी मत विभाजनासाठी वंचित कारणीभूत ठरल्याची चर्चा जोरात झाली होती. मात्र भाजपची बी टीम म्हणून वंचितची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे यंदा महायुतीच्या मतांचे समीकरण बिघडण्यास वंचितच कारणीभूत ठरणार आहे. त्यात एमआयएमही स्वतंत्रपणे रिंगणात असली तरी मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते महाविकास आघाडीच्या पारड्यात जाणार आहे. आंबेडकरी चळवळीचे तसेच मुस्लिम समाजाचे मतदान हे महाविकास आघाडीसाठी जमेचे ठरणार आहे. एकप्रकारे आंबेडकरी चळवळ आणि मुस्लीम समाजाच्या एक गठ्ठा मतांपासून भाजप यंदा ‘वंचित’ होऊ शकतो. त्यात २००९ नंतर भाजपने सलग हा विधानसभा मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे.

मात्र विद्यमान आमदार सुनील कांबळे हे केवळ ५ हजार १२ मताधिक्य घेऊन विजयी झाले होते.मात्र या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रमेश बागवे यांना दुसऱ्या क्रमांकाची 47 हजार 148 मते मिळाली होती. आता राजकीय स्थिती बदलेली आहे आणि त्यावरून मतदारांच्या भावना संतप्त आहे. त्यात माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी मतदारसंघ बांधणीवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. त्यात सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचे काटेकोरपणे नियोजन त्यांनी केले आहे. माजी नगरसेवक अविनाश बागवे हेही मोदी सरकारच्या योजनांचा पंचनामा करत आहे.त्यात पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हेही याच मतदारसंघातील असून त्यांनी जोरदार ताकद लावली आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

याचबरोबर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची सभा याच मतदारसंघात पार पडली आणि या सभेने संपूर्ण चित्र पालटले आहे. राहुल गांधी यांच्या सभेने मतदारांवर प्रभाव पडला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर पुन्हा काँग्रेसला प्राबल्य मिळणार आहे. सद्यस्थितीत इंडिया फ्रंटमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ( उबाठा )आप व सर्व घटक पक्षांची बांधलेली मोट काँग्रेसच्या मतांचे समीकरण दृढ करेल असा ठाम विश्वास राजकीय अभ्यासकांचा आहे. प्रामुख्याने दाट लोकवस्ती असलेला हा मतदारसंघ संमिश्र आहे. कष्टकरी वर्गाचे मोठे प्रमाण आहे. वाढती महागाई हाच मुद्दा महायुतीला गारद करणार आहे.

या मतदारसंघात स्व. गिरीश बापट यांना १२७३३ मतांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव पत्करत बालेकिल्ला ही ओळख भाजपने जशी गमावली आहे.
तशी भाजपमधील अंतर्गत दुफळीमुळे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात लोकसभाच काय आगामी विधानसभा मतदारसंघाचे चित्र महाविकास आघाडीसाठी अनुकूल ठरणार आहे. विशेषतः राष्ट्रवादीच्या विभाजनाचा सर्वाधिक फटका हा या मतदारसंघात भाजपला बसणार आहे. त्यामागे स्थानिक पातळीवरील राजकीय महत्वाकांक्षा हे प्रमुख कारण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी – कार्यकर्ते मनापासून सहभाग देतील का ? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपची या मतदारसंघावर पकड आता कमकुवत झाली आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीला सहज खेचून आणता येईल.यासाठी हा मतदारसंघ निर्णायक ठरणार आहे.

Dr Shashi Tharoor Pune Tour |नव्या भारतात लोकशाही धोक्यात :  डॉ. शशी थरूर

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Dr Shashi Tharoor Pune Tour | नव्या भारतात लोकशाही धोक्यात :  डॉ. शशी थरूर

|  धंगेकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन

 

Dr Shashi Tharoor Pune Tour – (The karbhari News Service) – आताचा भारत आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेला नाही. आपल्या देशातले या पूर्वीचे सरकार कोणाची पूजा करावीकाय खावेकाय घालावे हे सांगत नाही. मात्रपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारतामुळे जुन्या भारतातील सामाजिक एकोपामूल्य आणि इतर चांगल्या गोष्टी नष्ट होत आहेत. संविधानीक तरतूदी बदलल्या जात आहेत. यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली असून देशातील लोकांना ‘मोदींची गॅरंटी’ नव्हे तर ‘लोकशाहीची गॅरंटी’ हवी आहेअशी टीका काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. शशी थरूर यांनी सोमवारी पुण्यात केली.

 

पुणे लोकसभा मतदार संघाचे  महाविकास आघाडीइंडीया फ्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन सोमवारी काँग्रेस भवनमध्ये डॉ. शशी थरुर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ‘ निरोगी, आनंदी, सुरक्षित पुण्यासाठी – माझा शब्द.’ असे जहर नामयाचे वैशिष्ट्य पूर्ण नाव ठाव्न्यात आले आहे. याप्रसंगी धंगेकर यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुखमाजी राज्यमंत्री रमेश बागवेमाजी आमदार उल्हास पवारप्रचार प्रमुख मोहन जोशी, अ. भा. काँग्रेस कमिटीचे प्रभारी आशिष दुआ, अभय छाजेड, अंकुश काकडे, गजानन थरकुडे, गोपाळ तिवारी, राज अंबिके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

डॉ. थरूर म्हणालेसरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे जनतेच्या मनात सत्ताधारी भाजप विरोधात रोष आहे. त्यामुळे चारशे पार तर सोडाच 300 सुद्धा पार होणार नाही. काँग्रेसने 60 वर्षात जनतेचे काहीही हिसकावून घेतले नाही. अनेक उद्योगांनी त्यांचे मुख्य कार्यालय परदेशातील दुबई सारख्या शहरात हलवले आहे. यंत्रणांचा वापर करून दबाव टाकला जातो. कर चुकवणारे देशभक्त होतात आणि सर्वसामान्य अँटी नॅशनल होतात.

 

मोदींनी 345 वर्षापूर्वीच्या औरंगजेबावर बोलण्यापेक्षा गेल्या 10 वर्षात काय काम केले यावर बोलावे. काँग्रेसच्या न्याय पत्रामध्ये कुठेही मुस्लिम धर्माचा उल्लेख नाहीअसे असताना नरेंद्र मोदी व भाजप नेते कोणत्या आधारावर बोलतात कळत नाही. निवडणूक रोख्यांबाबत मोदी सरकार माहिती दंडवत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मोदी सरकार उघडे पडले. त्यांनी निवडणूक रोख्यांतून स्वतः खाल्ले आणि इतरांना खऊ घातल्याची टीका डॉ. थरुर यांनी केली.

 

वायनाडमधून राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. तसेच उत्तर प्रदेशात काँग्रेसला आम्ही तुमच्याबरोबर आहोत हा संदेश द्यायचा आहे. रायबरेली लोकसभा 1959 पासून काँग्रेस लढवत आहे. सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यामुळे काँग्रेसने ही जागा लढवणे आवश्यक होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी जनतेसोबत असल्याचे दाखवत रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. पंतप्रधान पदाबाबत थरुर म्हणालेनिवडणुकीनंतर इंडीया आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षात एकोपा असून आघाडीच्या जागा महाराष्ट्रात वाढतीलआसा विश्वासही डॉ. थरुर यांनी व्यक्त केला.

 

धंगेकर म्हणालेकी सार्वजनिक वाहतूकज्येष्ठ नागरिकआरोग्यशिक्षणपर्यावरणसांस्कृतिक आणि पर्यटनश्रमिक आणि असंघटित कामकार या घटकांचा जाहीरनाम्यात समावेश आहे.

 

—————————-

करकरेंच्या मुत्यूची चौकशी झाली पाहिजे ः

शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झालेला नाहीअसे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर थरूर म्हणालेयामध्ये नेमके तथ्य काय आहेहे मला माहीत नाही. माजी पोलिस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकात तसा उल्लेख आला आहे. त्यामुळे हे गंभीर प्रकरण आहे. करकरे आणि माझे चांगले संबंध होते. त्यामुळे या प्रकरणाची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी झाली पाहिजे. जे काय खरे आहेते समोर आले पाहिजेअसेही डॉ. थरूर म्हणाले. 

Congress Guarantee Card | काँग्रेसचे गॅरंटी कार्ड साडेपाच लाख घरामध्ये पोहचणार | मोहन जोशी यांची माहिती

Categories
Breaking News Political पुणे

Congress Guarantee Card | काँग्रेसचे गॅरंटी कार्ड साडेपाच लाख घरामध्ये पोहचणार | मोहन जोशी यांची माहिती

 

Congress Guarantee Card – (The Karbhari News Service)लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशवासियांना हमी देण्यासाठी तयार केलेल्या न्याय पत्रातील (जाहीरनामा) तरतुदींची माहिती देण्यासाठी तयार केलेले गॅरंटी कार्ड पुणे लोकसभा मतदार संघातील पाच ते साडेपाच लाख घरांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेअशी माहिती पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख व माजी आमदार मोहन जोशी (Mohan Johsi Pune Congress) यांनी दिली. 

 

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने युवक न्यायमहिला न्यायशेतकरी न्यायश्रमिक न्यायभागीदारी न्याय आदी संकल्पनांतर्गत गॅरंटी कार्ड तयार केले आहे. यामध्ये प्रत्येक सुशिक्षित तरुणाला पहिली नोकरी मिळेपर्यंत एक लाख रुपये विद्यावेतनप्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी एक लाख रुपयेशेतकर्‍यांना कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला हमीभावाची कायदेशीर गॅरंटीमनरेगात दरदिवशी किमान 400 रुपये मजुरीसामाजिक व आर्थिक समानतेसाठी जनगणना आदींचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाचे हे गॅरंटी कार्ड शहरातील वीस लाख मतदारांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या व इंडीया फ्रंट व मित्र पक्षांच्या कार्यकर्ते मतदार संघातील पाच ते साडेपाच लाख घरांमध्ये जाणार आहेत. या कामासाठी सर्व घटकपक्षांच्या कायर्र्कर्त्यांच्या बुथनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीच्या माध्यमातून मतदार संघातील दोन हजार बुथवर एकाच वेळी गॅरंटी कार्ड पाठवण्याची मोहीम शनिवारपासून (27 एप्रिल) हाती घेण्यात येणार आहे.  या गॅरंटी कार्डच्या खाली असलेल्या स्लिपवर मतदाराचे नाव व इतर माहिती भरून घेवून त्या स्लिप संकलीत केल्या जाणार आहेत. हे काम आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन केले असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

 

सहा मतदार संघात विजयी रथ:

 

पुणे लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात सहा विजयी रथ फिरणार आहेत. या रथामधून एलईडीद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधीप्रियंका गांधीकाँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भाषणेकाँग्रेसचे गॅरंटी कार्ड व महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची कामे प्रदर्शित करण्यात येणार असल्याचेही मोहन जोशी यांनी सांगितले.

Aba Bagul | Pune Politics | निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

Categories
Breaking News Political पुणे

Aba Bagul | Pune Politics | निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

| काँग्रेसच्या धोरणाची राज्यात पायमल्ली: माजी उपमहापौर आबा बागुल यांची खंत

Aba Bagul | Pune Politics – (The Karbhari News Service) – एकीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे न्याय यात्रा काढत आहेत मात्र दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये निष्ठावंतावर अन्याय करण्याचे सत्र सुरू झाले आहे. मग न्याय कुणाकडे मागायचा, हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे. त्याहीपेक्षा काँग्रेसच्या धोरणाची पायमल्ली राज्यात कोण करत आहे. असा थेट सवाल पुणे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असणारे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवाय कार्यकर्ते ,मतदारांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. (Pune congress)

आबा बागुल म्हणाले की, गेली चाळीस वर्षे मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत आहे. यंदाच्या लोकसभेसाठी मी प्रबळ दावेदार असताना प्रदेश काँग्रेसने कोणत्या निकषावर मला उमेदवारी नाकारली. याचा खुलासा झाला पाहिजे. दुसऱ्या पक्षातून येवून जेमतेम दीड वर्षे होत नाही ते आमदार झाले मात्र त्यांना आता पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देणे म्हणजे निष्ठावंत लोकांवर अन्याय करण्यासारखेच आहे. एकप्रकारे ही निष्ठेची हत्या आहे. पक्षात माझ्यासह अनेक जण निवडून येण्याची क्षमता असणारे आहेत मग त्यांना डावलून परस्पर उमेदवारी जाहीर करणे हेच मुळात खेदजनक आहे. वास्तविक यंदा पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर उमेदवारी देण्यासंदर्भात धोरण ठरले आहे.त्यानुसार एक व्यक्ती एक पद हे पाहता विद्यमान आमदारांना उमेदवारी परस्पर कशी दिली गेली. जे यापूर्वी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांना उमेदवारी देता येणार नाही. या पक्षाच्या धोरणाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पायमल्ली केली आहे. याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले.

ज्यांनी दुसऱ्या पक्षात असताना काँग्रेस नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्यासमवेत असलेल्यांचे क्लिप उद्या व्हायरल झाल्यास त्यावर प्रदेश काँग्रेसची कोणती भूमिका राहील. असे नमूद करून आबा बागुल म्हणाले ,ज्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले. त्या निष्ठावंतांना हा धक्का आहे.त्यामुळे आम्ही निष्ठावंताची बैठक घेवून पुढील भूमिका जाहीर करणार आहोत. निष्ठेचा विचार करा आणि गटा तटाचे राजकारण बंद करा हेच मी सर्व नेत्यांना सांगत आहे. अजूनही पक्षाने माझा विचार करावा तसेच लवकरच पुढील दिशा स्पष्ट केली जाईल असेही ते म्हणाले.

Bharat Jodo Yatra :2 | भारत न्याय यात्रा : 14 जानेवारी ला मणिपूर मधून सुरुवात

Categories
Breaking News Political देश/विदेश

Bharat Jodo Yatra :2 | भारत न्याय यात्रा : 14 जानेवारी ला मणिपूर मधून सुरुवात

Bharat Nyay Yatra | लोकसभा निवडणुकीआधी एकीकडे भाजपकडून राममंदिर (Ram Mandir) उद्घाटनाची भव्य तयारी तर दुसरीकडे काँग्रेसकडून भारत जोडो दुसऱ्या टप्प्याची घोषणा (Bharat Jodo Yatra 2) करण्यात आली आहे.  (Bharat Nyay Yatra)
14 जानेवारीला मणिपूर मधल्या इंफाळ मधून राहुल गांधी भारत न्याय यात्रेला सुरुवात करणार आहेत.
14 राज्यांमधून, 6200  किलोमीटरअंतर पार करत 20 मार्चला मुंबईमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे.
यावेळी ही यात्रा बस आणि पायी अशा दोन्ही स्वरूपाची असणार आहे
 14 जनवरी पासून 20 मार्च
मणिपुर पासून मुंबई पर्यंत
6200 किमी. | 14 राज्य | 85 जिल्हे

Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा! 

 
 
 
Pune Loksabha 2024 | लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) तयारी अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यात आचारसंहिता देखील लागू शकते. कुठल्याही पक्षाने आपले पत्ते उघड केले नसले तरीही सर्वांची अंतर्गत तयारी जोरदारपणे सुरु आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपचा (BJP) उमेदवार कोण असेल याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. कारण गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने ही जागा रिक्त आहे. यासाठी आता नवीन उमेदवार कोण असणार? गेल्या काही दिवसापासून मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता सुनील देवधर (Sunil Devdhar) हे नवीनच नाव चर्चेत आले आहे. भाजप नेहमी नवीन चेहऱ्याच्या शोधात असते. तोच धागा पकडून भाजपने हा नवीन उमेदवार शोधला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 
 
 
 

कोण आहेत सुनील देवधर?

 

सुनील देवधर (जन्म 29 सप्टेंबर 1965). त्यांनी ईशान्य भारतातील माय होम इंडिया या एनजीओची स्थापना केली. 

2010 मध्ये, ते सक्रिय राजकारणात सामील झाले आणि जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष, भारतीय जनता पार्टी (भाजप) च्या ईशान्य भारत संपर्क सेलचे राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्त झाले. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग ३ वेळा निवडणूक लढविणारे तत्कालीन मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांनी गुजरातमध्ये पूर्णवेळ विस्तारक म्हणून काम केले. गुजरातमधील त्यांच्या मेहनतीने प्रभावित होऊन पंतप्रधान मोदींनी त्यांची वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर, 2016 मध्ये, त्यांची 2 दशकांहून अधिक काळ मार्क्सवादी पक्षाने राज्य केलेल्या त्रिपुरा राज्याचे पक्षाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. तत्कालीन भाजप अध्यक्ष श्री अमित शहा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, पंतप्रधान मोदींच्या प्रचंड लोकप्रिय प्रतिमेसह, त्यांच्या जमिनीवर कठोर परिश्रम करून, ते राज्यातील २५ वर्षांची कम्युनिस्ट राजवट संपवण्याचे प्रमुख साधन बनले. ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि जुलै २०१८ ते जुलै २०२३ पर्यंत आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी होते. २०१८ मध्ये ते भाजप आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी बनले.
दरम्यान मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक हे आपण उमेदवार असण्याची आस लावून आहेत. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न देखील सुरु आहेत. मुळीक यांनी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न केला होता. मोहोळ आणि मुळीक हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. असे असले तरी लोकसभेच्या उमेदवाराचा निर्णय ही केंद्रीय टीम करणार आहे. तसेच भाजप नेहमी ऐन वेळेला नवीन चेहरा देत असते. त्यानुसार या टीम ने सुनील देवधर यांच्या नावाला पसंती देण्याची तयारी चालवली आहे, अशी माहिती भाजपच्या गोटातून मिळाली. अशी देखील चर्चा आहे कि देवधर यांचा प्रचार बड्या उद्योगपतींच्या माध्यमातून सुरु आहे.
दरम्यान लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याबाबत कोर्टाच्या आदेशाने भाजपची गोची झाली आहे. कारण पोटनिवडणुकीची भाजपची सध्या तरी कुठली तयारी दिसत नाही किंवा भाजप त्या मनःस्थितीत नाही.
दरम्यान इकडे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्टवादी चे देखील अजून काही ठरलेले नाही. लोकसभेची जागा परंपरागत रित्या काँग्रेस कडे राहिलेली आहे. मागील वेळी मोहन जोशी यांना आपला करिष्मा दाखवता आला नव्हता. यावेळी काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर किंवा अरविंद शिंदे यांना संधी देऊ शकते. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांचे नाव देखील काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. मात्र आघाडीचे अजून तरी काही ठरलेले नाही.
मनसे ने मात्र आधीच आपला उमेदवार घोषित केला आहे. वसंत मोरे ना उमेदवारी दिली जाणार आहे. त्या दिशेने मोरेंनी आपली तयारी देखील सुरु केली आहे. शहर तसेच ग्रामीण भागात मोरे दौरे करत फिरत आहेत. तसेच मोरे नेहमीच आपल्या कामाच्या पद्धतीने प्रकाशझोतात असतात. सोशल मीडियावर त्यांना पसंत करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.

Congress Meeting | Pune | काँग्रेस भवन मध्ये प. महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Congress Meeting | Pune | काँग्रेस भवन मध्ये प. महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक

 

     Congress Meeting | Pune | अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची (AICC) हैद्राबाद येथे संपन्न झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्देशानुसार आज काँग्रेस भवन, पुणे (Pune Congress Bhavan) येथे पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीस प्रातांध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले (Nana Patole) , माजी केंद्रीय मंत्री मा. सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्‍हाण, प्रदेश कार्याध्यक्ष मा. बसवराज पाटील मुरूमकर, मा. आ. प्रणितीताई शिंदे, मा. आ. डॉ. विश्वजीत कदम, मा. आ. संग्राम थोपटे, प्रदेश महिला अध्यक्षा मा. संध्याताई सव्‍वालाखे आदींच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीची सुरूवात ‘काँग्रेस पक्षाचा इतिहास’ व ‘भारत जोडा’ यात्रेच्या छायाचित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन करून करण्यात आली. या छायाचित्र प्रदर्शनाचे संयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी केले होते आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीचे संपूर्ण नियोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले होते. 

     प्रांताध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी पत्रकार परिषदे दरम्यान या बैठकीविषयी माहिती दिली. संपूर्ण राज्यात विभागीय बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहे. या बैठकांमधून काँग्रेस पक्ष संघटनात्मक मजबुतीने लोकांपर्यंत पोहचला पाहिजे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे आणि सध्याच्या अत्याचारी सरकारचा खरा चेहरा लोकांपुढे आणणार आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय, महागाई, बेरोजगारी, गरीबांवरील अन्याय यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या कथनी व करणीतील फरक जनतेच्या निर्देशनास आणणार आहे. राज्यातील हे सरकार शेतकरी, गरीब जनता, तरूण, बेरोजगार यांच्या विरोधातील आहे. हे सेल्फीश सरकार आहे. सुप्रिम कोर्टानेही सरकारचा खरा चेहरा उघडा केला आहे. काही भागात ओला दुष्काळ तर काही भागात कोरडा दुष्काळ असूनही हे सरकार दुष्काळ जाहिर करत  नाही. 

    नांदेड व ठाणे येथील सरकारी रूग्णालयातील मृत्यूचे तांडव पाहूणही सरकारला जाग येत नाही. दोन्ही उपमुख्यमंत्राचा डोळामुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे.

     काँग्रेस जनतेसाठी लढत आहे. शाहू – फुले – आंबेडकर विचारांना वाचविण्याचे काम तसेच भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांनीही एकजूटीने काम करावे. या बैठकीमध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर शहर, कोल्हापूर ग्रामीण, सांगली शहर, सांगली ग्रामीण, सातारा, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहर आदी जिल्हांचा आढावा घेऊन बुथ कमिट्या, ब्लॉक कार्यकारिणी व संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. 

     यावेळी जिल्ह्याचे प्रभारी/सहप्रभारी, प्रदेश पदाधिकारी, आजी माजी आमदार, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी संघटना, विभाग व सेल अध्यक्ष, बुथ कमिटी सदस्य आदी उपस्थित होते. 

Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble | आमदार मिसाळ, कांबळे यांचे आंदोलन म्हणजे नौटंकी | अरविंद शिंदे यांचा आरोप

Categories
Breaking News Political पुणे

Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble | आमदार मिसाळ, कांबळे यांचे आंदोलन म्हणजे नौटंकी | अरविंद शिंदे यांचा आरोप

 

Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble |  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC Pune) भारतीय जनता पक्षाचे (BJP) बहुमत आहे. या भाजपच्या संचालकांनी नुकताच मार्केटयार्डमध्ये मासे, चिकन, मटण विक्रीसाठी जागा देण्याचा निर्णय घेतला, आता या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), आ. सुनिल कांबळे (MLA Sunil Kamble) आंदोलन करण्याची नौटंकी करत आहेत. भाजपच्या या दुटप्पीवागण्याचा, ढोंगीपणाचा करावा तेवढा निषेध कमी असल्याची भूमिका पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडली.

    शिंदे पुढे म्हणाले,  १८ पैकी १३ सदस्य बाजार समितीत भाजपाचे आहेत. या संचालकांनी घेतलेल्या निर्णयाला भाजपाचेच आमदार विरोध करतात यामध्ये कांहीतरी काळंबेरं नक्की आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर जैन बांधव राहतात. त्यांच्या श्रद्धा, भावनांशी खेळून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याची शंका यामुळे येत आहे. बहुमताच्या बळावर हुकूमशाही पद्धतीने निर्णय लादायचा आणि त्या निर्णयाविरोधात भूमिका घेवून जैन आणि वारकरी समुदायाची सहानुभूती मिळवायचा केविलवाणा प्रयत्न भाजपाकडून होतोय. याचा तिव्र निषेध पुणे शहर जिल्हा काँग्रेस कडून करण्यात येतं आहे.

      लोकनेते अण्णासाहेब मगर यांनी दूरदृष्टी ठेवून मोठया कष्टाने कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापन करून मार्केटयार्ड इथे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपाला, फळं आणि इतर कृषी मालाच्या खरेदी विक्रीला प्रोत्साहन दिले. यामध्ये जैन व्यापारी बांधवांचे योगदान ही मोठे आहे.

      आज मासे चिकन मटण विक्रीला परवानगी देतं आहेत उद्या दारू विक्रीला सुद्धा परवानगी मिळेल अशी शंका  आमच्या मनात निर्माण होतं आहे. यां सगळ्या गोष्टीला आत्ताच रोखले गेले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. 

      मार्केटयार्डात चिकन, मटण, मासे विक्रीस आमचा विरोध आहे. यां निर्णया विरोधात पुणे शहर काँग्रेसच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येणारं आहे. 

      मार्केटयार्डात शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला, फळं आणि इतर कृषी उत्पादनं खरेदी विक्री झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. असे शिंदे म्हणाले. 

—-

News Title | Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble MLA Misal, Kamble’s movement is a gimmick Arvind Shinde’s allegation