Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

Categories
Breaking News social पुणे

Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

 

Pune Lok Sabha Election 2024 : (The Karbhari News Service) –  जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ८ हजार ३८२ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रकिया करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरवले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ११ हजार ८९८ बॅलेट युनिट, ११ हजार ८९८ कंट्रोल युनिट आणि १२ हजार ७४९ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.

सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत. या यंत्रांपैकी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या १४१ टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १५२ टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूममध्ये आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठीची यंत्रे भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्या-त्या विधानसभा मतदारसंघात देखील मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे डॉ.दिवसे यांनी सांगितले.

सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे योगेश बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे गणेश नलावडे, भारतीय जनता पार्टीचे राजाभाऊ शेडगे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अशोक कांबळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रमेश सकट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित गव्हाणे, शिवसेनेचे राजू गवळी आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Pune Loksabha Election | पुणे लोकसभा निवडणूक | कसब्याची पुनरावृत्ती की भाजप वचपा काढणार?

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha Election | पुणे लोकसभा निवडणूक | कसब्याची पुनरावृत्ती की भाजप वचपा काढणार?

Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार कि एकतर्फी होणार, याबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात होते. कारण काँग्रेसचा उमदेवार ठरत नव्हता. अखेर काँग्रेसकडून आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Pune) यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol BJP Pune) विरुद्ध रविंद्र धंगेकर ही लढत आता ठरली आहे. साहजिकच लोकांच्या मताप्रमाणे यात रंगत येणार आहे. कारण कसब्याचा अनुभव पाहता काँग्रेस तुल्यबळ ठरली होती. तर तीच जखम उराशी बाळगून भाजप दुप्पट बळ घेऊन या लढतीत उतरणार, हे आता निश्चित झाले आहे. (Pune Politics)
काँग्रेस ने लोकसभेसाठी नुकतेच 57 लोकांची उमेदवारी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील 7 लोकांचा समावेश आहे. पुणे लोकसभेसाठी आमदार रविंद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली आहे. पुणे लोकसभेसाठी याआधीच भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे पुण्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता यात कोण बाजी मारणार, हाच प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे.
भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे या लढतीत रंगत येणार, हे जगजाहीरच आहे. ही लढत मराठा विरुद्ध ओबीसी अशी देखील मानली जात आहे. तसेच ही लढत सामान्य कार्यकर्त्यांची अशी देखील मानली जात आहे. काँग्रेस ने कसबा पोटनिवडणुकीत बाजी मारली होती, मात्र लोकसभा जिंकणं एवढं सोपं नाही. भाजपला देखील ते सोपे नाही. कारण दोन्ही उमेदवारांना अंतर्गत वादाचा फटका हा जाणवणारच आहे. कारण अंतर्गत नाराजी दोन्हीकडे आहे. कारण निष्ठावंतांवर अन्याय का? हा प्रश्न दोन्हीकडे विचारला जात आहे.
या सगळ्या गोष्टींचा सामना करत या दोन्ही उमेदवारांना पुढे जावे लागणार आहे. महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुकीची आखणी करणार आणि भाजप मागचा वचपा काढण्यासाठी कसे डावपेच आखणार? हे पाहणे या निमित्ताने महत्वाचे ठरणार आहे.
—-

Pune Loksabha – Pune Congress | मराठा विरुद्ध ओबीसी लढत पुण्यात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha – Pune Congress | मराठा विरुद्ध ओबीसी लढत पुण्यात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार!

| मराठा विरुद्ध ओबीसी लढत, पुण्यात काँग्रेसला विजयाची गॅरंटी

Pune Loksabha – Pune Congress – (The Karbhari News Service) – राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यंदा मतदानातून सत्ताधारी भाजपलाच काय त्यांच्यासमवेत सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेना – राष्ट्रवादी पक्षांना ( गट) त्याची मोठी झळ बसणार असल्याची दाट शक्यता आहे.नेमक्या या स्थितीचा काँग्रेसने फायदा उठवला तर पुणे लोकसभा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याची नामी संधी काँग्रेसला आहे ;मात्र त्यासाठी ओबीसी उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरविल्यास ओबीसी वर्गासह मराठा समाजाची मते काँग्रेससाठी निर्णायक ठरतील. त्यातही काँग्रेस पक्षाने केलेल्या नव्या धोरणानुसार ‘इलेक्टीव्ह मेरीट’ असलेला निष्ठावंत चेहरा दिला तर पुणे लोकसभा मतदारसंघावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकल्याचे चित्र पाहावयास मिळू शकते.

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने मराठा कार्ड खेळले असले तरी मराठा आरक्षण प्रश्नावरून मतांची विभागणी अटळ असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे काँग्रेसने यंदा ओबीसी उमेदवार देऊन मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट लढत केल्यास काँग्रेसच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर ठरेल मात्र नवा चेहरा रिंगणात उतरविल्यास मतांचे समीकरणही सहज साध्य आहे. त्यामुळे एकेकाळी पुण्याचा हा महत्वाचा लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून ‘इलेक्टीव्ह मेरीट’ असलेल्या जुन्या निष्ठावंतांना संधी दिली तर काँग्रेसला विजयाची गॅरंटी निश्चित राहील. यंदा लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने एक महत्वाचे धोरण तयार केले आहे.

लोकसभेची प्रत्येक जागा महत्वाची आहे आणि विजय कसा मिळेल यासाठी हे धोरण आहे. त्यानुसार विजयाची खात्री असलेल्या नव्या व्यक्तींना यंदा प्राधान्य दिले जात आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. या धोरणानुसार एका व्यक्तीला दोन पदे मिळणार नाहीत, की विद्यमान आमदारांना लोकसभेसाठी रिंगणात उतरवले जाणार नाही तसेच ज्यांनी आजवर लोकसभा,विधानसभा निवडणूक लढवली ;पण पराभव पत्करला आहे. त्यांनाही संधी देऊ नये असे हे धोरण आहे. त्यामुळे पुण्यात ओबीसी नवीन उमेदवार दिला तर काँग्रेसला विजय निश्चित आहे.

Muralidhar Mohol Pune Loksabha ‘मोहोळ’ यांच्या नावावर ‘मोहोर’! पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी! 

Categories
Breaking News Political पुणे

Muralidhar Mohol Pune Loksabha ‘मोहोळ’ यांच्या नावावर ‘मोहोर’! पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी!

| महाविकास आघाडी टाकतेय सावध पाउल

Muralidhar Mohol Pune Loksabha – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Loksabha Constituency) हा भाजपचा (BJP)  बालेकिल्ला मानला जातो. पुणे लोकसभेसाठी यावेळी भाजपकडून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Ex Mayor Pune Muralidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मात्र जपून आणि सावध पावले टाकताना दिसून येत आहे. आता महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून कळणार आहे कि पुणे लोकसभा निवडणूक किती रंगतदार होणार आहे. (Pune Loksabha Election)
देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदारपणे वाहू लागले आहे. सगळेच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. मात्र यात भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे. भाजपने उमेदवार जाहीर करण्यात मुसंडी मारली आहे. भाजपने आपल्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. आज भाजपने महाराष्ट्रतील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे.
पुणे लोकसभेसाठी बरेच लोक इच्छुक होते. यामध्ये मोहोळ, जगदीश मुळीक, सुनिल देवधर अशी नावे आघाडीवर होती. अखेर मोहोळ यांच्या नावावर मोहोर उमटवली गेली आहे. मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर राहिले आहेत.
दरम्यान भाजपकडून दोन याद्या जाहीर केल्या तरीही विरोधी पक्षाकडून हालचाल दिसून येत नाही. महाविकास आघाडीने मात्र जपून आणि सावध पाऊल टाकायचे ठरवलेले दिसत आहे. कारण महाविकास आघाडीने अजून आपले पत्ते ओपन केले नाहीत. पुणे ही सगळ्यासाठी प्रतिष्ठेची जागा आहे. खासकरून भाजप साठी तर जास्तच. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत तेव्हाच कळणार आहे जेव्हा महाविकास आघाडी पुण्यासाठी उमेदवार जाहीर करेल!

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस कडून इच्छुकांची भली मोठी यादी! | 20 लोकांची निवडणूक लढवण्याची इच्छा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस कडून इच्छुकांची भली मोठी यादी!

| अर्ज करण्यासाठी आज होता शेवटचा दिवस

 

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress |  पुणे | लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) कांग्रेस ने जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Constituency) इच्छुक उमेदवारांचे अर्ज काँग्रेस कडून (Pune City Congress) मागवण्यात आले होते. त्यासाठी 9 जानेवारी ची  मुदत देण्यात आली होती. या कालावधीत शहर कार्यालयाकडे बऱ्याच इच्छुक लोकांनी आपले अर्ज सादर केले आहेत. यामध्ये जवळपास 20 उमेदवारानी निवडणूक लढवण्याची आपली इच्छा दर्शवली आहे.  यामध्ये बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी,  शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, आबा बागुल, माजी शहर अध्यक्ष अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे,  यांच्यासह 20 लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात आरजे संग्राम खोपडे यांचा देखील समावेश आहे. (Pune Lok Sabha Constituency | Pune Congress) 

प्रदेश काँग्रेसने (Maharashtra Congress) लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपला (BJP) या निवडणुकीत मात देण्यासाठी काँग्रेस (Congress) ने कंबर कसली आहे. खासकरून पुणे शहरावर काँग्रेसने (Pune City Congress) चांगलेच लक्ष दिले आहे. दरम्यान पुणे लोकसभा मतदार संघ (Pune Lok Sabha Constituency) समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्याकडे देण्यात आली आहे.
प्रदेश काँग्रेस कडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शहर काँग्रेस ने हे आदेश पारित केले होते. पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडी मध्ये   अजून जागा वाटप झाले नसले तरीही परंपरे नुसार ही जागा काँग्रेस च्या वाट्याला येते. त्यानुसार काँग्रेस यावर  पहिल्यापासूनच दावा करत आली आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस कडून इच्छुकांची भाऊगर्दी झाली असल्याचे दिसून आले आहे. जवळपास 14 लोकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. मात्र प्रदेश कडून कुणा एकालाच उमेदवारी दिली जाणार आहे.

| अविनाश बागवे यांचा अर्ज डायरेक्ट प्रदेश अध्यक्षांकडे?

दरम्यान या 20 लोकांमध्ये माजी शहर अध्यक्ष रमेश बागवे किंवा माजी नगरसेवक अविनाश बागवे यांचा समावेश नाही. सूत्रांच्या माहितीनुसार अविनाश बागवे हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांनी काँग्रेस भवन ला अर्ज न भरता आपला अर्ज डायरेक्ट प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे पाठवला आहे. यावर आता प्रदेश कुणाला उमेदवारी देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

| हे आहेत इच्छुक

1. अरविंद शिंदे (अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस)
2. बाळासाहेब शिवरकर ( माजी मंत्री)
3. रविंद्र  धंगेकर (आमदार)
4. मोहन जोशी
5. अभय छाजेड (सरचिटणीस, म.प्र.काँ.क.)
6. अनंत गाडगीळ (माजी आमदार )
7.  दिप्ती चवधरी ( माजी आमदार )
8.  संजय बालगुडे
9. आबा बागुल ( माजी उपमहापौर )
10. दत्ता बहिरट
11. गोपाळ तिवारी ( प्रवक्ते, म.प्र.काँ.क.)
12. विरेंद्र किराड
13.  यशराज पारखी ( प्रदेश प्रतिनिधी)
14. मुकेश धिवार
15. राजू  नागेंद्र कांबळे
16. मनोज पवार
17.  संगीता तिवारी ( उपाध्यक्ष, म.प्र. म. काँ.क.)
18 नरेंद्र व्यवहारे
19. संग्राम खोपडे (आर. जे.)
20.  दिग्विजय जेधे