Pune Loksabha Election | कामगारांना रस्त्यावर आणण्याचे‌ काम भाजप सरकारने केले |  कामगार संघटना संयुक्त कृती‌ समितीचा आरोप

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Loksabha Election | कामगारांना रस्त्यावर आणण्याचे‌ काम भाजप सरकारने केले |  कामगार संघटना संयुक्त कृती‌ समितीचा आरोप

 

Pune Loksabha Election – (The karbhari News Service) – मोदी सरकारने केवळ बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना खुश करण्यासाठी कामगारांची अधिकाधिक कोंडी करण्याचे धोरण अवलंबले आहे. मोदी सरकारने कामगार कायद्यात तस अन्यायकारक बदल करून गेल्या ७५ वर्षांत कामगारांसाठी असलेले संरक्षणाचे कायदे काढून कामगारांना रस्त्यावर आणण्याचे‌ काम केले आहे. मोदी शहांनी कामगारांना गुलामगिरीत लोटले आहेअसा आरोप शहरातील कामगार संघटना संयुक्त कृती‌ समितीच्या‌ पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

 

असंघटित कामगारांबाबत पोकळ प्रचारी आणि बोगस घोषणाबाजी करण्यापलिकडे या सरकारने काहीही केलेले नाही. त्यामुळे आम्ही‌सर्व कामगार संघटनांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहण्याचा व त्यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याचेही‌ त्यांनी सांगितले.

 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ ‘देशातील सत्ताधारी पक्षाचे कामगार विरोधी धोरण’ या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस संयुक्त कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक कॉ. अजीत अभ्यंकरजिल्हा घरकामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघेशिवसेना कामगार संघटनेचे रघुनाथ कुचिककृती समितीचे अघ्यक्ष व महाराष्ट्र इंटक संघटनेचे अध्यक्ष कैलास कदमकामगार नेते सुनिल शिंदेयांची पत्रकार परिषद आयोजित केली होती.

 

कॉ. अजित अभ्यंकर म्हणालेडॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडीत‌ जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या‌ कामगार कायद्यांचा फायदा कामगारांना होत होता. मात्रआताच्या मोदी‌ सरकारने हे कायदे बदलून अन्यायकारक कायदे‌ लादले. कारखाना बंद करण्याचा कायदा ठाकरे सरकारने नाकारला होतामात्र राज्यात घटनाबाह्य सरकार आल्यानंतर त्यांनी दोन वर्षापूर्वीची तारीख टाकून तो मान्य केला. कारखान्यांना आगी लागतातकामगार मरतातमात्रत्यावर काहीच केले जात नाही. हे सरकार कामगार विरोधी व कंत्राटदारांच्या बाजूने आहे.

 

रघुनाथ कुचिक म्हणालेकेंद्र सरकारने आचानक भारत बंद करून कामगारांचे अतोनात हाल केले. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कामगारांना अनेक कष्ट घ्यावे लागले. केंद्राने मजुरांच्या‌ स्थलांतरासाठी एक हजार कोटी खर्च केल्याचे सांगितले. मात्र माहिती अधिकारात याबाबत काहीच माहिती देत नाहीत. इलेक्टोल बॉंडनंतर सर्वात मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून झाला आहे. कामगार कायदा संघर्षातून मिळाले आहेतमात्र या कायद्यांचा मुडदा पाडण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. हे काम उद्योगपतींना खूश करण्यासाठी करण्यात आले. कामगारांच्या आत्महतेवर फारसे लिहीले व बोलले जात नाही. राज्यात आज रोजी रोज सात कामगार आत्महत्या करतात. कामगारांच्या‌ आत्महत्येवर मते मागता येत नाहीतम्हणून त्यावर बोलले जात नाही. आत्महत्या‌ करणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांची संख्याही जास्त आहे. सलगपणे कंत्राटीकरण करण्याचा झपाटा सरकारने लावला आहे.

 

किरण मोघे म्हणाल्याघरेलू कामगारांमुळे कोवीडचा प्रसार होतोअसा गौरसमज पसरला होतात्यामुळे त्या काळात घरेलू कामगारांना समस्यांचा‌ सामना करावा लागला. ही अडचण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्यानंतर‌ सरकारने मदतीसाठी योजना आणली. मात्रराज्यातील सरकार बदलल्यानंतर ती बंद केली. कामगारांच्या हक्कावर गदा आणण्याचे काम सरकारने केल्याने आम्ही घरेलू कामगारांनी भाजप महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचा प्रचार घरोघरी जावून करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सुनिल शिंदे म्हणालेजे‌ कामगार कायदे आहेतते काँग्रेसच्या काळातील आहेत. मात्र आजवर असंघटित कामगारांसाठी एकही कायदा नाही. किमान वेतन कायदा असंघटीत कामगारांना लागू होत नाही. या विरोधात‌ कुठे दादही मागता येत नाही. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात असंघटीत कामगारांचा कायदा करण्याची ग्वाही दिली आहे.

 

कैलास‌ कदम म्हणालेदेशातील मोदी शहा सरकारने कामगारांच्या हक्कांवर घाला घातला. देशातील कामगार रस्त्यावर आणण्याचे काम मोदी शहांनी केले. कामगारांच्या ४४ कामगार कायद्यांएवजी चार श्रमसंहिता आणण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे देशातील विविध कामगार संघटनांनी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीचे उमेदवार निवडून गेल्यानंतर कामगारांवर लादलेले अन्यायकारक कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आम्ही केली आहे. यावेळी प्रचारप्रमुख मोहन जोशी, पक्ष सरचिटणीस अजित दरेकर, राज अंबिके आदी उपस्थित होते राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

Devendra Fadnavis | नेता नाही, नीती नाही, नियत नाही – देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका 

Categories
Breaking News Political पुणे

Devendra Fadnavis | नेता नाही, नीती नाही, नियत नाही – देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका

 

Devendra Fadnavis – (The Karbhari News Service) – महाआघाडीकडे विकासाची दृष्टी नसून, त्यांची अवस्था दिशाहिन झाली आहे. त्यांच्याकडे नेता नाही, नीती नाही आणि नियत ही नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Mahavikas Aghadi)

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित केलेल्या पदयात्रेत सहभागी झाल्यानंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, सुनील देवधर यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, पुण्याचे जे ट्रान्सफमेशन दिसत आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारमुळे आहे. आम्हाला पुण्याला एक व्हायब्रंट शहर बनवायचे आहे. देशातले टेक्नॉलॉजीचे शहर म्हणून विकसित करायचे आहे. जो काही विकास दिसतोय तो आमच्या काळातील आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, पुणेकरांमध्ये प्रचंड उत्साह असून, गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीवर विश्वास ठेवला. गिरीश बापट यांनी शहरात चांगले काम केले. आता मुरलीधर मोहोळ यांच्या सारखा तरुण तडफदार आणि यशस्वी महापौर आम्ही उमेदवार म्हणून दिला आहे. ते प्रचंड मतांनी निवडून येतील. जनता मोदींच्या पाठीशी असून, राज्यात महायुतीच्या मागील वेळेपेक्षा जास्त जागा निवडून येतील.

——-

चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री 

जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील. गिरीश बापट यांना सव्वा तीन लाखाचे मताधिक्य होते. जर यापेक्षा अधिक मताधिक्य मोहोळ यांना द्यायचे असेल तर प्रत्येक बूथवर 75 टक्के मतदान झाले पाहिजे आणि त्यापैकी 75 टक्के मतदान महायुतीला होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. संपूर्ण जिल्ह्यात आपले नातेवाईक आहेत. त्यांना सर्वांना महायुतीला मतदार करा असे आवाहन करा.

——-

मुरलीधर मोहोळ 

राजमाता जिजाऊ यांनी ज्या भूमीत सोन्याचा नांगर फिरवला आणि हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जी कर्मभूमी म्हणून ओळखली जाते अशा पुण्यासारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या शहरात महायुतीच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना मनापासून आनंद झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डाजी, गृहमंत्री अमितभाई शहा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मनसेचे नेते राज ठाकरे, आरपीआयचे नेते रामदासजी आठवले आणि महायुतीतील घटक पक्षांनी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करीन.

श्रद्धेय अटलजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माझे मार्गदर्शक गोपीनाथजी मुंडे, गिरीश बापट, मुक्ता टिळक यांची आज मला प्रकर्षाने आठवण होत आहे.

संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली विकासाची यात्रा २०१४ मध्ये सुरू झाली आहे. ही यात्रा अधिक वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चितपणे करीन.

पुण्यात पुढील पन्नास वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. त्याचा प्रारंभही झाला आहे. पुणे शहर आणि परिसरात ५० हजार कोटींची विकास कामे सुरू आहेत.

पुणे देशातील प्रथम क्रमांकाचे शहर व्हावे, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. मूलभूत सुविधा पुरवतानाच पुण्याची ओळख स्वच्छ पुणे, प्रदूषणमुक्त पुणे, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे पुणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे पुणे अशी होईल यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करीन. पुण्याची ओळख आयटी हब अशी देखील आहे. त्यामुळे या क्षेत्रात अधिकाधिक उद्योग येतील आणि त्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती होईल, यावरही आमचा भर राहील. उत्तम आरोग्य सेवा पुणेकरांना मिळावी यासाठीही प्रयत्न केले जातील.

पुणेकरांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी आणि ते अधिक उंचावण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य सरकारकडे पुण्याचा खासदार म्हणून मी पुण्याची बाजू प्रभावीपणे मांडेन, याची ग्वाही देतो.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करून पुणेकरांनी भरघोस आणि विक्रमी मतांनी मला निवडून द्यावे, असे आवाहन यानिमित्ताने करतो.

माझे कार्य आणि लोकसंपर्क यातून पुणेकरांचा हक्काचा खासदार म्हणून माझी ओळख निर्माण करण्यात मी निश्चितपणे यशस्वी होईन.

Vishwambhar Choudhari | Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या महापौरपदाचा कार्यकाळ शहराच्या पर्यावरणासाठी घातकी – डॉ. विश्वंभर चौधरी

Categories
Breaking News Political पुणे

Vishwambhar Choudhari | Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या महापौरपदाचा कार्यकाळ शहराच्या पर्यावरणासाठी घातकी – डॉ. विश्वंभर चौधरी

 

Vishwambhar Choudhari – Murlidhar Mohol – (The karbhari news Service)  – शहरातील सर्व आमदारखासदारशंभर नगरसेवक निवडून देवून पुणेकरांनी भाजपला एकहाती सत्ता दिली. मात्र या काळात भाजपच्या सत्ताधार्‍यांनी पुण्यासाठी काही दिले नाही. त्यांनी नदीचे वाटोळे केलेशहरातील टेकड्या उद्धवस्त करण्याचा घाट घातला. भाजप कार्यकाळ आणि मुरलीधर मोहोळ यांच्या महापौरपदाचा कार्यकाळ शहराच्या पर्यावरणासाठी घातकी ठरला आहेअशी टिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केली.

 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीइंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चौधरी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशीवीरेंद्र किराडराज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी इत्यादी उपस्थित होते.

 

चौधरी म्हणालेभाजपने शहराची सत्ता उपभोगताना पर्यावरणवाद्यांना विश्वासात न घेतापर्यावरणाला मारक ठरणारे प्रकल्प आणले. त्यांचा कारभार हुकूमशाही पद्धतीने केला. पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. पाण्याचा प्रश्न ही गंभीर होत आहेत्यांनी यावर काहीच केले नाही. या गोष्टी आम्ही ‘निर्भय बनो’ सभेच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडणार आहोत. आम्ही उमेदवारांचा थेट प्रचार करत नाही. मात्र देशातील परिस्थिती पाहून आम्ही महाविकास आघाडीला पाठींबा देत आहोत. आम्ही मत मागत नाही पण लोकांची मते बदलतो. विदर्भात काँग्रेसची लाट आहे. तर मराठ्यात उद्धव ठाकरे व शरद पवार यांची लाट आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील,  असेही चौधरी म्हणाले.

 

गेल्या दहा वर्षातील मोदी यांच्या कारकिर्दीचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसल्याचे विदर्भमराठवाडा येथे घेतलेल्या निर्भय बनोच्या सभामध्ये निदर्शनास आले. नरेंद्र मोदींनी सत्तेच्या माध्यमातून संविधानाला नख लावण्याचे आणि लोकशाही संपवण्याचे काम सुरू केले आहे. भाजपने लोकसभेच्या पहिल्या दोन निवडणुकांमध्येही विकासाचा मुद्दा आणला नाही. ही निवडणुक निवडणुक रोखे व विकासावर आधारीत आहेत्यामुळे मोदींनी दोऩ दिवसांपासून हिंदु मुस्लिमांवर भर देण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्यायव इतर गोष्टी आहेत. मात्रभाजपकडून काँग्रेसच्या जाहीरनाम्यासंदर्भात धादांत खोटा प्रचार केला जात आहे. रामाचा मुद्दा संपलेला आहे. त्यामुळे ते धर्माकडे निवडणुक नेते आहेत. राज्यात मागील दोन महिन्यात 457 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. मात्रयावर भाजपचे कोणीच बोलत नाहीत. 

 

 

————-

वंचितमुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होणार ः

अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची विनंती केली होती. तसे पत्रही दिले होते. मात्रत्याला यश मिळाले नाही. वंचितने पुण्यात उमेदवार देवू नयेअशीही आमची मागणी होती. मात्र ती मान्य झाली नाही. वंचितच्या उमेदवारामुळे भाजप विरोधी मतांचे विभाजन होणार आहेत्याला आता कोणी काहीच करू शकत नाही.

 

—————-

पुण्यात लवकरच निर्भय बनो सभा ः

मोदींच्या कारकीर्दीच्या विरोधात आम्ही राज्यात निर्भय बनोच्या 65 सभा घेतल्या. आणखी 18 मे पर्यंत आम्ही सभा घेणार आहोत. यामध्ये पुण्यात एक सभा होणार आहे. पुण्यात आमच्या वर हल्ला झाल्यानंतर राज्यातील इतर सभांसाठी आम्हाला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी संरक्षण दिले. लोकसभा निवडणुक झाल्यानंतर पुन्हा आम्ही राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये जावून निर्भय बनोच्या सभा घेणार आहोतअसेही चौधरी म्हणाले.

 

———————

धंगेकरांच्या प्रचाराला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ः जोशी

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. परिवर्तनाची लाट पुण्यात आली आहेयाची प्रचिती दररोज आम्हाला येत आहे. प्रचाराचा पहिला टप्पा पार पडला आहे. लोकांमध्ये भाजपविरोधात मोठा रोष असल्याचे या टप्प्यात निदर्शनास आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी यांनी दिली.

Loksabha Election Voting | अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करावे – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election Voting | अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करावे – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

 

Loksabha Election Voting – (The Karbhari News Service) –  भारत निवडणूक आयोगाच्या (Election commission of India) – सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळेस अधिसूचित अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून विहीत मुदतीत नमुना १२ डी सादर केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. (Dr Suhas Diwase IAS)

टपाली मतदानाचा नमुना १२ डी चा अर्ज सादर केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्र (पीव्हीसी) स्थापन करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी जाऊन संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करावे.

टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यरत राहतील. ३५ बारामती लोकसभा मतदार संघात १ ते ३ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायं. ५ वाजेपर्यंत, ३३ मावळ लोकसभा मतदार संघ, ३४ पुणे लोकसभा मतदार संघ व ३६ शिरूर लोकसभा मतदार संघात ७ ते ९ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायं. ५ वाजेपर्यंत टपाली मतदान केंद्रे कार्यरत राहतील, असेही जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

PM Modi in Pune | पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिलला  सभा |  मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

PM Modi in Pune | पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिलला  सभा

|  मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

 

PM Modi in Pune – (The Karbhsri News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघासाठी (Pune Loksabha Constituency)  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (ए) महायुतीच्या वतीने मुरलीधर मोहोळ (Murlihar Mohol)  गुरुवारी (23 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी पुण्यात सभा होणार असल्याची माहिती आज महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. (Mahayuti Pune)

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, आर पी आय चे शहराध्यक्ष संजय सोनावणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जोगेंद्र कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राजाभाऊ कांबळे, लोक जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय आल्हाट, लहुजी शक्ती सेनेचे नितीन वायदंडे, शिवसंग्राम पक्षाचे शहराध्यक्ष भरत लगड,, प्रदेश प्रवक्ते व महायुती समन्वयक संदीप खर्डेकर या वेळी उपस्थित होते.

घाटे म्हणाले, कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सकाळी नऊ वाजता पदयात्रेला सुरुवात होईल. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पदयात्रेचा समारोप केला जाईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय मंत्री आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते सभेला मार्गदर्शन करणार आहेत. शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हेही या सभेला उपस्थित राहणार आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 तारखेला संध्याकाळी पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर सभा घेणार आहेत. या सभेपूर्वी त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही मोठे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या सभा आयोजित केल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक लाख नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

मानकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केलेला आहे निवडणुकीसाठी वातावरण खूप चांगले आहे. मुरलीधर मोहोळ हे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी पुणेकरांची सेवा केली. समाजासाठी जीवनदान देणारा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास आहे. बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्राताई पवार, मावळ मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे, पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा होणार असून, त्याला चारही मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळेल.

मनसेचे नेते राजेंद्र वागस्कर म्हणाले, रॅलीच्या नियोजनासाठी आम्ही सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये नियोजन करीत आहोत. 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुरलीधर मोहोळ हे अभ्यासू आणि चांगले उमेदवार असून, पुणेकरांच्या आवडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे ते मताधिक्याने विजयी होतील.ही रॅली ही महायुतीच्या विजयाची नांदी असेल असे सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितले तसेच महायुतीतील सर्व घटक पक्ष हे एक दिलाने काम करून उमेदवार विजयी करतील असा विश्वास ही यावेळी सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी व्यक्त केला

Kasba Peth Constituency | कसबा पेठ विधानसभा मतदार संघात ३ लाख ८० हजार रुपये जप्त

Categories
Breaking News Political social पुणे

Kasba Peth Constituency | कसबा पेठ विधानसभा मतदार संघात ३ लाख ८० हजार रुपये जप्त

Kasba Constituency – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत कसबा पेठ विधानसभा मतदार संघात निवडणूक कामासाठी नियुक्त स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत दुपारच्या सुमारास ३ लाख ८० हजार ५०० रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे. (Pune Loksabha Election)

फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत शनिवार वाडा गेटसमोर आज दुपारी १२ वाजता एका इसमाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. रकमेबाबत सदर व्यक्तीने योग्य स्पष्टीकरण न दिल्याने ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

00

Aba Bagul Pune Loksabha | आबा बागुल यांची नाराजी दूर होईल | बाळासाहेब थोरात

Categories
Breaking News Political पुणे

Aba Bagul Pune Loksabha | आबा बागुल यांची नाराजी दूर होईल | बाळासाहेब थोरात

 

Aba Bagul Pune Loksabha – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने महापालिकेतील माजी गटनेते आबा बागुल नाराज आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी बागुल यांची भेट घेतली होती. या संदर्भातील प्रश्नावर थोरात म्हणालेनाराज्यांकडे जाणे बोलणे, आमचे काम आहे, बागुल‌ यांची नाराजी दूर होईल अशी अपेक्षा आहे.

| इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास निवडणुक रोख्यांचा तपास‌ करू – पृथ्वीराज चव्हाण

 

ईडी‌ सीबीआयच्या धाडी‌ टाकून मोदी सरकारने मोठ्या कंपन्या व व्यक्तींना भिती दाखवत निवडणुक रोख्याच्या नावाखाली पैसा गोळा केला. त्यांनी  निवडणुक रोख्याच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. देशात इंडीया आघाडीचे‌ सरकार आल्यावर‌ आम्ही निवडणुक रोखे प्रकरणाचा तपास करू, असेही ते म्हणाले.

 

पुणे लोकसभेचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चवधरी, ॲडअभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड,गोपाल तिवारी इत्यादी  उपस्थित होते.

 

चव्हाण म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील विकास‌ दर जेवढा होता, तेवढा विकास दर मोदींच्या काळात राहिला असता तर आपली अर्थव्यवस्था आज जगात‌ तिसऱ्या नंबरवर गेली असती. मात्र, मोदींच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेचा दर खाली आला आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आज देशावर २०६ लाख कोटी‌ कर्ज आहे. लोकांना चुकीची माहिती देवून भुरळ टाकण्याचे काम मोदी करत आहेत.

 

मोदी सरकारने दहा वर्षात काय केलं याची‌ श्वेत पत्रिका काढावी, म्हणजे २०१४ पूर्वी आणि नंतर काय झालं याची‌ तुलना करता येईल.  दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दहा वर्षात २० कोटि लोकांना रोजगार मिळायला हवा होता, मात्र काहीच झाले नाही, उलट देशात बेरोजगारी वाढली. डिझेल पेट्रोलचा‌ भाव ३५ रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, यांशिवाय शंभर शहरे‌ स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याचे काय झाले याचा अहवाल मोदींनी तयार करावा, असेही चव्हाण म्हणाले.

 

मोदी सरकार शेतकऱ्याच्या जीवनात वीष कालवत आहे. कोणालाही विश्वासात न घेता शेतीसंदर्भात तीन काळे कायदे केले. शेतकरी आंदोलनात सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा‌जीव गेला. शेत मालास भाव नाही. कांदा, गहू, साखर, तांदुळ यांवर निर्यातबंदी घातल्यामुळे भाव पडले आहेत. त्यामुळे‌या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे मतदान महत्वाचे आहे.

 

२०१९ मध्ये‌ सत्तर टक्के लोकांनी मोदी विरोधी मते दिली. मात्र मत विभाजनामुळे मोदी सत्तेवर आले. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडी उभे केली आहे. भाजपला राज्य घटना बदलायची आहे, त्यासाठी त्यांचे नेते ४०० पार म्हणत आहेत. मात्र, देशात मोदी विरोधी वातावरण आहे, पंतप्रधानांचा दांभिकपणा व खोटारडेपणा जनतेसमोर आलेला आहे. त्यामुळे निवडणुकीचा‌ निकाल लागल्यानंतर भाजप २०० पारही करू शकले नाही, हे कळेल. मत विभाजनासाठी भाजपकडून वंचित व एमआयएमचे उमेदवार निवडणुकीत उतरवले जात आहेत. मागच्या वेळी वंचित व एमआयएमची आघाडी होती, या निवडणुकीत ती नाही. आता संविधान बचावण्यासाठी मोदींचा पराभव गरजेचे आहे. ही निवडणुक संविधान व देश वाचवणारी आहे, त्यामुळे वंचित व एमआयएमच्या उमेदवारांना जनता मते देणार नाहीत.

 

शेतकरी, युवक, महिला, कामगार व सामाजिक न्याय यावर आधारीत काँग्रेसचा जाहीरनामा आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर स्वतंत्र आयोग असेल. आम्ही कर्नाटकातील पाचही आश्वासने पूर्ण केली आहेत. लोकसभेसाठी‌ दिलेली देखील सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करू, असेही चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. राज्यात आर्थिक व नैतीक भ्रष्टाचार आहे. फोडा फोडीचा लोकांना राग आलेला आहे. आमदार तिकडे गेलेले असले तरी जनता गेलेली नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला प्रचंड मोठा विजय मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

 

——————-

४८ पैकी ४६ ठिकाणी एकमताने

 

महाविकास आघाडीतील जागा वाटप ४८ पेकी ४६ ठिकाणी एकमताने झाले. दोन जागांबाबत तिढा निर्माण झाला. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, तेथे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आम्ही शेवटपर्यंत आग्रही होतो. ती जागा आमची हक्काची आहे. मात्र आता निवडणुक सुरू झाल्याने सर्वांनी एकत्र येवून लढणे गरजेचे आहे, विशाल पाटील माघार घेतील आणि सांगलीतही गोड शेवट होईल अशी आम्हाला आशा आहे , असेही‌ चव्हाण म्हणाले.

 

————

 

 

————–

 

काळ्या पैशामध्ये मोदींचे तोडपाणी :

 

परदेशी बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये  १५ लाख रुपये‌जमा करण्याचे आश्वासन देवून नरेंद्र मोदी २०१४ मध्ये‌ सत्तेवर आले. त्यानंतर भारत सरकारकडे विविध संस्थांच्या माध्यमातून स्विस बँक आणि परदेशात गुंतवलेल्या काळ्या पैशाची‌ सर्व माहिती आली. आजही भारत सरकारकडे यांची माहिती आहे.  तरीही मोदी सरकारने आजवर संबंधीतांवर  कारवाई केला नाही. याचा अर्थ यामध्ये कुठेतरी तोडपाणी झाले आहे. इंडिया आघाडीचे‌ सरकार आल्यानंतर आम्ही याबाबत माहिती उघड करू, असेही‌चव्हाण म्हणाले

Dr Kumar Saptarshi | मोदी – शहा‌ यांनी राजकारणाचा व्यापार मांडला | डॉ. कुमार सप्तर्षी

Categories
Breaking News Political पुणे

Dr Kumar Saptarshi | मोदी – शहा‌ यांनी राजकारणाचा व्यापार मांडला | डॉ. कुमार सप्तर्षी 

 

 

Dr Kumar Saptarshi – (The Karbhari News Service) – नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजकारणाचा व्यापार मांडला असून भाजपमधील ३० टक्के नेते इतर पक्षातून आयात केलेले आहेत. हे करूनही भाजप मजबुत झालेली नाही. लोकसभेच्या १०२ जागांसाठी झालेल्या मतदानावरून मोदी यांची लाट ओसर्याचे लक्षात येते. त्यामुळे या निवडणुकीत भाजप महायुतीला दोनशे ते सव्वा दोनशे जागा मिळतील,आणि त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात येईल, असे भाकीत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.

 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सप्तर्षी बोलत होते. डॉ. सप्तर्षी म्हणाले, कोणताही पक्ष ४०० पार म्हणतो, तेव्हा थडकी भरते. ऐवढी काय भाजपची‌ किमया आहे, की लोकांनी त्यांना चारशे पार जागा निवडून द्याव्यात. आरएसएसला हिंदु राष्ट्र आणायचे आहे. त्यामुळे त्यांच्या‌ जिवावर भाजप ४०० पारचा नारा देत आहे. या निवडणुकीत मोदी शहांचा पाडाव होणे गरजेचे आहे. तरच देशातील लोकशाही आणि संविधान सुरक्षात राहिल. मोदी शहांचा पराभव झाला‌तरच भाजपही जिवंत राहणार आहे. पैसे खाल्लेल्या लोकांना धमकावून, जेलची भिती दाखवून भाजपसोबत घेतले जात आहे. अजित पवार व त्यांचे नऊ मंत्री हे भाजपसोबत जाणे, हे‌ त्याचेच उदाहरण आहे. हे करूनही भाजप मजबुत झालेली नाही. मोदी-शहा ही व्यापारी जोडगोळी आहे. त्यांनी धाडी टाकून देणग्या घेतल्या. जनतेचा पैसा व्यापाऱ्यांनी वाटून घेतला. भाजपचे ३० टक्के लोक आयात केल्याने आयात आणि भाजपमधील हयात यांच्यात संघर्ष होणार आहे.

 

मोदींनी निवडणुकीतले एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. बेकारी व महागाईचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. मोदींना अर्थव्यवस्थेचे अकलन आहे, असे वाटत नाही. नोट बंदीमुळे कसलाही काळा पैसा बाहेर आला नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणीनंतर तुरुंगातील सगळ्यांना बाहेर सोडले, आचारसंहितेचा आदर केला.

 

 

जरांगे पाटील‌ यांच्या मराठा आंदोलनामुळे भाजपची अडचण झाली आहे. मराठा मतदार नाराज झाल्याने राज्यात भाजप विरोधी लाट निर्माण झाली आहे.  महाराष्ट्रात भाजपला अनुकुल वातावरण नाही.त्यामुळे यंदा‌ मागच्या वेळी पेक्षा कमी‌ जागा मिळणार आहेत. पुण्यात काँग्रेसचा मतदार आहे. पुण्याचा जो खासदार निवडून येतो,‌ तेव्हा वर त्या पक्षाची सत्ता येते. कलमाडी जेव्हा काँग्रेसपासून दूर गेले, तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला.

 

संविधान आहे तर आपण आहोत, अशी भावना दलित व मुस्लिमांची आहे, त्यामुळे ते आघाडीच्या मागे उभे राहतील. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने वंचित व एमआयएमला मते मिळणार नाहीत. पुणे जिल्ह्यातील चारही जागा महाविकास आघाडीजिंकेल, असा विश्वासही डॉ. सप्तर्षी यांनी व्यक्त केला. 

Sharad Pawar | भाजपाने दहा वर्षे जनतेची फसवणूक केली – शरद पवार

Categories
Breaking News Political पुणे

Sharad Pawar | भाजपाने दहा वर्षे जनतेची फसवणूक केली – शरद पवार

 

Sharad Pawar – (The karbhari News Service) – आज ज्यांच्या हातात सत्ता आहेत्यांनी गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. शेतकऱ्यांचे प्रश्नमहागाईबेरोजगारीमहिलांची सुरक्षितता याबाबत केलेली वक्तव्य आणि वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. तरूणांना दरवर्षी नोकरीराजगारांचे आश्वासन देऊन त्यांचीदेखील फसवणूक केली आहे. त्यामुळे   जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाहीहा ठाम निर्णय घेतला आहेअसा विश्वास जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

 

    जिल्हाधिकारी कार्यालयापासून  भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह जिल्हाभरातून आलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर हॉटेल शांताई येथे जाहीर सभा घेण्यात आली. सभास्थळी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वाढवण्यात आला.

 

यावेळी ते बोलत होते. या वेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातकाँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदमराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटीलशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिर सुषमा अंधारे आणि आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अभिजित फाटकेमाजी आमदार व पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशीपुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुणे लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगतापआमदार संग्राम थोपटेसंजय जगतापरोहित पवारमाजी आमदार उल्हासदादा पवारदीप्ती चवधरीजयदेव डोळे ,अशोक पवारमाजी उपमहापौर अंकुश काकडेरोहिणी खडसे,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरेगजानन थरकुडेआम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर उपस्थितीत होते.

 

       काँग्रेसराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेपदाधिकारी व हजारोंच्या कार्यकर्त्यांनी धंगेकर इंडिया आघाडीचा विजय असोअशा घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

 

     शरद पवार म्हणालेपंतप्रधान मोदी 2014 मध्ये सत्तेत आले. त्यावेळी पेट्रोलचे दर 71 रुपये होते. मोदी म्हणालेपन्नास दिवसांत पेट्रोलचे दर कमी  करतो. आज 3 हजार 650 दिवस झालेआज दर 106 रुपये झाले. घरगुती गॅस बाबत मोदी म्हणाले410 रुपयांवरून कमी आणणार. आता 1 हजार 160 रुपये झाला. मोदी तरूणांना रोजगार देणार होते. प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देणार होतेउलट रोजगार टक्का घसरला. आज 86 टक्के तरुण बेरोजगार आहेत. याचा अर्थ शब्द द्यायचा अन तो फिरवायचा. त्यामुळे जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाहीहा ठाम निर्णय घेतला आहे. मोदींनी जनतेची वेळोवळी फसवणूक केली आहे. आता त्यांना सत्ते पासून जनताच दूर करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

 

      जयंत पाटील म्हणालेमहाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार स्वाभिमानी आहेत. या उमेदवारांना मतदार संसदेत पाठवणार आहेत. भाजप- महायुतीला अजूनही उमेदवार मिळत नाही.  दिलेला उमेदवार त्यांना बदलावा लागत  असून  आपल्याला जनता आता स्वीकारणार नाहीहे त्यांना कळून चुकले आहे. त्यांचा आत्मविश्वास हरवला आहे. कसबा विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. धंगेकर यांच्या पाठीशी जनता उभी राहणार आहे.

 

    मोहन जोशी म्हणालेयंदा पुण्याचा खासदार काँग्रेसचाच होणार. धंगेकर यांना तळागाळातून पाठींबा आहे.

 सुषमा अंधारे म्हणल्यामोदीं सरकारची गॅरंटी ही जाहिराती पुरती आहे. जाहिरात वाईट गोष्टींची होते. जसे की रमी पें आवो ना महाराज. आदर्श घोटाळा70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणाऱ्या लोकांची मोदीं सरकारने  गॅरंटी घेतली आहे. पुण्याचा उडता पंजाब सारखी परिस्थिती सरकारे केली आहे. यावर ते बोलत नाही. रविंद्र  धंगेकर यांनी यावर आवाज उठवला. पुणे सुरक्षित ठेवण्यासाठी धंगेकर यांना निवडून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

 

   सचिन अहिर म्हणालेही लढाई पक्षापुरती नसून हुकूमशाही विरोधात आहे. शिवसेना फोडणाऱ्यांना जनता घरी बसवणार आहे.

 

रविंद्र धंगेकर म्हणालेआमची स्वाभिमानाची लढाई आहे. इतिहास सामान्य माणसांचा लिहिला जातो. पळून जाणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही. पुण्यात 10 वर्षात काम केले असा प्रश मी विरोधकांना विचारला असतात्यांनी दुसऱ्यांनी केलेल्या कामाचा आराखडा सांगितला.  जनता हुशार आहे आता फसवणे शक्य नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. जनता मला निवडून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

 

अमोल कोल्हे म्हणालेआत्ता फक्त ट्रेलर दाखवतोपिक्चर दाखवायला आपल्याकडेडं खुप वेळ आहे.

 

देशातल्या जनतेचं ठरलंयबळकट पंजाने स्वाभिमानाची मशाल पेटवायची अन विजयाची तुतारी फुंकायची.

 

  आता हे म्हणतायेत कचाकचा बटन दाबापाहिजे तेवढा निधी देतो. हा पैसा  काय ह्यांच्या खिशातला आहे काअहो आम्हा जनतेकडून तुम्ही कर घेता अन त्या कराच्या जोरावर तुम्ही कचाकचा बटन दाबायला सांगता का?

   कोट्यवधींना मोफत खाती उघडून दिलीनंतर त्या खात्यात दोन हजार रुपये रक्कम ठेवावीच लागेल असा नियम आणला. मग या खात्यांना आधार आणि पॅन कार्ड लिंक करायला लावलं. हे करण्यासाठी दोनशे रुपये फी आकारलीउशीर झाला तर दंड ही आकारला. मग हा निधी फोडाफोडी अन निवडणुकीसाठी पैसा वापरला जातोय.

  सुप्रिया सुळे म्हणाल्यामाझ्यावर आणि अमोल कोल्हेंवर   खूप टीका होत आहे. घटस्फोट होऊन सहा महिने झालेअठरा वर्षे आमच्यासोबत संसार करणारे आता वैयक्तिक टीका करतायेत. मात्र ही निवडणूक आता जनतेच्या हातात गेली आहे.

 

विश्वजित कदम म्हणालेसध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लाट आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा त्यांनी फासला आहे. आता जनता त्यांना काळीमा फासणार आहे.

 

बाळासाहेब थोरात म्हणलेही निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. तिन्ही उमेदवार निवडून येणारे आहेत. सर्वसामान्यांचा चेहरा धंगेकर आहेत. जनतेतू त्यांची मागणी झाली होतीत्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. बाळासाहेब थोरात यांनी पुढील मुख्यमंत्री मविआचा व्हायला हवाहे ध्येय बाळगून काम कराअसे आवाहन यावेळी केले.

 

पृथ्वीराज चव्हाण म्हणालेमोदी भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहेअसे म्हणतात. मात्रमनमोहन सिंग पंतप्रधान असताना विकासाची गती जशी होतीतशीच कायम राहिली असती तर आज आपण तिसऱ्या क्रमांकावर आलो असतो. हे मी नव्हे तर देशातील नामांकित संस्थांचा अहवाल सांगतो. याला मोदींची धोरणं कारणीभूत ठरली. मोदी फक्त गोलगोल फिरवतात   विकासाची व्याख्या मात्र सांगत नाहीत. मोदी फक्त प्रत्येक ठिकाणी आपला फोटो झळकवतात. 48 ठिकाणी त्यांचे फोटो झळकवले आहेत. त्यांना भीती आहेआपला फोटो जनतेसमोर नसेल तर जनता आपल्याला विसरून जाईल.

 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे म्हणाले की, लोकशाही, सर्व धर्म समभाव आणी सामाजिक समता या विचारांची शिदोरी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुण्यासारखे महत्वाचे शहर काँग्रेस पक्षाने विकासित केले मात्र गेल्या १० वर्षात भाजपाने पुण्याला १० वर्ष मागे नेले.

 

 

Abhay Chajed on Anis Sundke | एमआयएम चे अनिस सुंडके यांची उमेदवारी | पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र ! – ॲड अभय छाजेड

Categories
Breaking News Political पुणे

Abhay Chajed on Anis Sundke | एमआयएम चे अनिस सुंडके यांची उमेदवारी | पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र ! – ॲड अभय छाजेड

 

Abhay Chajed on Anis Sundke – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Pune Loksabha) यांना जनतेतून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे, एमआयएम चे अनिस सुंडके (Anis Sundke MIM) यांची उमेदवारी जाहीर करण्याचे पडद्यामागील षडयंत्र भारतीय जनता पक्षाने रचले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड अभय छाजेड (Adv Abhay Chajed) यांनी केला.

 

ॲड अभय छाजेड म्हणाले, अनिस सुंडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार गट ) यामध्ये होते पुण्यात भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा पराभव होण्याच्या शक्यतेच्या भीतीपोटी भाजपाने अनिस सुंडके यांचा एमआयएम मध्ये प्रवेश घडवून आणला आणि त्यांना एमआयएम तर्फे पुण्यात उमेदवारी मिळेल अशी व्यवस्था केली हे स्पष्ट दिसत आहे. अनिस सुंडके यांनी अनेक वेळा सोयीस्कर भूमिका घेऊन पक्ष बदलले आहेत त्यामुळेच त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले असून अशा एमआयएम उमेदवाराला मुस्लीम समाज मतदान करणार नाही. काँग्रेस पक्षाने बहुसंख्यांकां प्रमाणेच अल्पसंख्यांक समाजासाठी देखील मोठे योगदान दिले असून, त्यामुळे अल्पसंख्यांकांची मते देखील काँग्रेस पक्षाला पडतील आणि भाजपाचे एमआयएम चा उमेदवार पुण्यात उभा करण्याचे षडयंत्र अयशस्वी होईल व महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील अशा विश्वास ॲड अभय छाजेड यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पास्खला रोखण्यासाठी भाजपाने एमआयएमचे अनेक उमेदवार तिथल्या काँग्रेस विरोधी उभे करण्याचे षडयंत्र रचले होते एमआयएम हा पक्ष भाजपचा “B टीम” म्हणून ओळखला जातो. देशामध्ये भाजपाने याच B टीमचा वापर केला आहे, मात्र देशात आणि तेलंगणा मध्ये देखील त्याचा फायदा भाजपाला झाला नाही. तेलंगणा मध्ये एमआयएमचे अनेक उमेदवार उभे करायला लाऊनाही काँग्रेस पक्ष सगळीकडे विजयी झाला व भाजपाचे मनसुबे धुळीस मिळाले, पुण्यातही असेच घडेल अशा विश्वास ॲड अभय छाजेड यांनी व्यक्त केला.