Pune Loksabha Election | कामगारांना रस्त्यावर आणण्याचे‌ काम भाजप सरकारने केले |  कामगार संघटना संयुक्त कृती‌ समितीचा आरोप

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Loksabha Election | कामगारांना रस्त्यावर आणण्याचे‌ काम भाजप सरकारने केले |  कामगार संघटना संयुक्त कृती‌ समितीचा आरोप

 

Pune Loksabha Election – (The karbhari News Service) – मोदी सरकारने केवळ बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना खुश करण्यासाठी कामगारांची अधिकाधिक कोंडी करण्याचे धोरण अवलंबले आहे. मोदी सरकारने कामगार कायद्यात तस अन्यायकारक बदल करून गेल्या ७५ वर्षांत कामगारांसाठी असलेले संरक्षणाचे कायदे काढून कामगारांना रस्त्यावर आणण्याचे‌ काम केले आहे. मोदी शहांनी कामगारांना गुलामगिरीत लोटले आहेअसा आरोप शहरातील कामगार संघटना संयुक्त कृती‌ समितीच्या‌ पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

 

असंघटित कामगारांबाबत पोकळ प्रचारी आणि बोगस घोषणाबाजी करण्यापलिकडे या सरकारने काहीही केलेले नाही. त्यामुळे आम्ही‌सर्व कामगार संघटनांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहण्याचा व त्यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याचेही‌ त्यांनी सांगितले.

 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ ‘देशातील सत्ताधारी पक्षाचे कामगार विरोधी धोरण’ या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस संयुक्त कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक कॉ. अजीत अभ्यंकरजिल्हा घरकामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघेशिवसेना कामगार संघटनेचे रघुनाथ कुचिककृती समितीचे अघ्यक्ष व महाराष्ट्र इंटक संघटनेचे अध्यक्ष कैलास कदमकामगार नेते सुनिल शिंदेयांची पत्रकार परिषद आयोजित केली होती.

 

कॉ. अजित अभ्यंकर म्हणालेडॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडीत‌ जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या‌ कामगार कायद्यांचा फायदा कामगारांना होत होता. मात्रआताच्या मोदी‌ सरकारने हे कायदे बदलून अन्यायकारक कायदे‌ लादले. कारखाना बंद करण्याचा कायदा ठाकरे सरकारने नाकारला होतामात्र राज्यात घटनाबाह्य सरकार आल्यानंतर त्यांनी दोन वर्षापूर्वीची तारीख टाकून तो मान्य केला. कारखान्यांना आगी लागतातकामगार मरतातमात्रत्यावर काहीच केले जात नाही. हे सरकार कामगार विरोधी व कंत्राटदारांच्या बाजूने आहे.

 

रघुनाथ कुचिक म्हणालेकेंद्र सरकारने आचानक भारत बंद करून कामगारांचे अतोनात हाल केले. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कामगारांना अनेक कष्ट घ्यावे लागले. केंद्राने मजुरांच्या‌ स्थलांतरासाठी एक हजार कोटी खर्च केल्याचे सांगितले. मात्र माहिती अधिकारात याबाबत काहीच माहिती देत नाहीत. इलेक्टोल बॉंडनंतर सर्वात मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून झाला आहे. कामगार कायदा संघर्षातून मिळाले आहेतमात्र या कायद्यांचा मुडदा पाडण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. हे काम उद्योगपतींना खूश करण्यासाठी करण्यात आले. कामगारांच्या आत्महतेवर फारसे लिहीले व बोलले जात नाही. राज्यात आज रोजी रोज सात कामगार आत्महत्या करतात. कामगारांच्या‌ आत्महत्येवर मते मागता येत नाहीतम्हणून त्यावर बोलले जात नाही. आत्महत्या‌ करणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांची संख्याही जास्त आहे. सलगपणे कंत्राटीकरण करण्याचा झपाटा सरकारने लावला आहे.

 

किरण मोघे म्हणाल्याघरेलू कामगारांमुळे कोवीडचा प्रसार होतोअसा गौरसमज पसरला होतात्यामुळे त्या काळात घरेलू कामगारांना समस्यांचा‌ सामना करावा लागला. ही अडचण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्यानंतर‌ सरकारने मदतीसाठी योजना आणली. मात्रराज्यातील सरकार बदलल्यानंतर ती बंद केली. कामगारांच्या हक्कावर गदा आणण्याचे काम सरकारने केल्याने आम्ही घरेलू कामगारांनी भाजप महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचा प्रचार घरोघरी जावून करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सुनिल शिंदे म्हणालेजे‌ कामगार कायदे आहेतते काँग्रेसच्या काळातील आहेत. मात्र आजवर असंघटित कामगारांसाठी एकही कायदा नाही. किमान वेतन कायदा असंघटीत कामगारांना लागू होत नाही. या विरोधात‌ कुठे दादही मागता येत नाही. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात असंघटीत कामगारांचा कायदा करण्याची ग्वाही दिली आहे.

 

कैलास‌ कदम म्हणालेदेशातील मोदी शहा सरकारने कामगारांच्या हक्कांवर घाला घातला. देशातील कामगार रस्त्यावर आणण्याचे काम मोदी शहांनी केले. कामगारांच्या ४४ कामगार कायद्यांएवजी चार श्रमसंहिता आणण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे देशातील विविध कामगार संघटनांनी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीचे उमेदवार निवडून गेल्यानंतर कामगारांवर लादलेले अन्यायकारक कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आम्ही केली आहे. यावेळी प्रचारप्रमुख मोहन जोशी, पक्ष सरचिटणीस अजित दरेकर, राज अंबिके आदी उपस्थित होते राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

Budget 2024 | अर्थसंकल्पात हवी गरिबी निर्मूलनासाठी तरतूद | जनअर्थसंकल्प प्रस्तावावरील चर्चेत मागणी

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश पुणे

Budget 2024 | अर्थसंकल्पात हवी गरिबी निर्मूलनासाठी तरतूद | जनअर्थसंकल्प प्रस्तावावरील चर्चेत मागणी

Budget 2024 | देशाचा अर्थसंकल्प हा गोपनीय पद्धतीने बनविला जात असून त्यात लोकसहभाग नसतो. त्यामुळे त्यात लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस कार्यक्रम नसतो. देशात आजही 23 कोटीहुन अधिक लोक गरिबीत जगत असून त्यांच्या उत्थानासाठी १ लाख कोटी रुपये देशाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद अपेक्षित आहे, असा सूर जनअर्थसंकल्प २०२४-२५ च्या प्रस्तावावरील चर्चासत्रात उमटला. (Budget 2024)

सेंटर फॉर हॉलिस्टिक ह्युमन डेव्हलपमेंट अँड रिसर्च च्यावतीने एस एम जोशी सभागृह येथे जनअर्थसंकल्प २०२४-२५ च्या प्रस्तावावर चर्चा आयोजित केली होती. यावेळी सेंटरचे प्रमुख विश्वेश्वर रास्ते, मार्क्सवादी नेते अजित अभ्यंकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल विमल आदी उपस्थित होते. यावेळी स्वप्ना अलुरी, शिवांगी बागेश्वरी, उत्कर्ष पांडे, प्रमोद दाहूले, जयश्री पाटील, नेहा मधवी, विजया लक्ष्मी यांनी मांडणी केली. उपस्थितांनी आपली मते व्यक्त केली. गरिबी निर्मूलन, रोजगार वृद्धी, सुनियोजित शहरीकरण, पर्यटन विकास, कौशल्य विकास, लोकशाही सबलीकरण, आहार साक्षरता, दर्जेदार व पुरेशी वीज, मुलींचे शिक्षण, नाशवंत शेतमालाचा टिकाऊपणा याकडे देशाच्या अर्थसंकल्पात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मुद्यांकडे अधिक लक्ष देऊन त्यासाठी भरीव तरतूद करण्याची गरज चर्चेत व्यक्त करण्यात आली. जनअर्थसंकल्प २०२४-२५ च्या प्रस्तावावर आलेल्या सूचना, मते लक्षात घेऊन जनअर्थसंकल्प २१ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्याची प्रत पंतप्रधान व अर्थमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याचे विशाल विमल यांनी सांगितले.

आपल्या १४० करोड लोकसंख्येमधील क्वचितच लोकांना देशाचा अर्थसंकल्प माहीत असतो. देशाचा अर्थसंकल्प सादर होतो तेव्हा दोन दिवस केवळ त्यावर चर्चा होते. ती चर्चाही केवळ आयकर किती वाढला, कमी झाला एवढ्यापुरती मर्यादित असते. अर्थसंकल्पामध्ये लोकांचे प्रश्न, समस्या, भविष्य याचे प्रतिबिंब हे अपवादात्मक असते. त्याचा एकूणच देशाच्या सर्वांगीण विकासावरती विपरीत परिणाम होत आलेला आहे, असे मत मार्क्सवादी नेते अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. आपल्या देशात 23 ते 27 कोटी लोक गरीबीत जगत आहे, या गरिबीच्या निर्मूलनासाठी देशाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही स्वतंत्र तरतूद नाही. गरिबी निर्मूलनासाठी लोकांना रोजगार, शिक्षण आणि नव्याने काही योजना आखण्याची गरज आहे. हे सातत्यपूर्ण चार ते पाच वर्षे केल्यास गरिबी नियंत्रणात येईल असे मत विश्वेश्वर रास्ते यांनी व्यक्त केले. शहरांची अनिर्बंध बकाल वाढ रोखून शहरांचे सुनियोजित व्यवस्थापन करण्याची गरज आहे. 73 व 74 वी घटना दुरुस्तीची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. पर्यटन व्यवसायामध्ये जागतिक पातळीवर विचार करता भारतामध्ये केवळ एक टक्का खर्च होतो. पर्यटन व्यवसायाचा विकास केल्यास ती गुंतवणूक वाढवून रोजगार आणि आर्थिक सुबत्ता निर्माण होईल, असेही रास्ते यांनी सांगितले.

लोकशाही पद्धती रुजवणुकीसाठी आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कुटुंब, संस्था, संघटना, राज्य आणि देशांमध्ये लोकांची मते विचार जाणून घेऊन लोकशाही प्रक्रिया राबवण्याची गरज आहे. लोकशाही प्रक्रिया रुजवण्यासाठी देशाच्या अर्थसंकल्पामध्ये किमान 500 कोटी रुपये तरतूद आवश्यक आहे. आपल्याकडे आहार साक्षरता घडवून आणण्याची आवश्यकता असून अतिसेवन आणि कुपोषण या मोठ्या समस्या आहेत. दर्जेदार, नियमित आणि गरिबांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. नाशवंत शेतीमाल पदार्थांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी शीतगृह आणि प्रक्रिया उद्योग आवश्यक आहे. त्यातून शेतकऱ्यांना स्थिर भाव मिळेल, या स्वरूपाची मांडणी स्वप्ना अलुरी, शिवांगी बागेश्वरी, उत्कर्ष पांडे, प्रमोद दाहूले, जयश्री पाटील, नेहा मधवी, विजया लक्ष्मी यांनी केली.