Dhiraj Ghate on MIM – एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा काँग्रेसचा दावा पोकळ – धीरज घाटे

Categories
Breaking News Political पुणे

Dhiraj Ghate on MIM – एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा काँग्रेसचा दावा पोकळ – धीरज घाटे

Dhiraj Ghate on MIM – (The Karbhari News Service) – एमआयएम पक्षाची पुण्यात अनिस सुंडके (Anis Sundke MIM Pune Loksabha) यांना उमेदवारी मिळणे हे पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड (Abhay Chajed Pune Congress) यांनी पत्रकाव्दारे केला आहे. त्या आरोपांचा समाचार पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate Pune BJP) यांनी सुस्पष्ट शब्दात घेतला. (Pune Loksabha Election)

घाटे म्हणाले, एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा दावा, तो दावा किती पोकळ आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. निवडणूक आयोगाने हैद्राबादमधील ५ लाख ४० हजार बोगस मतदारांची नावे काढून टाकली आहेत. तसेच हैद्राबादमध्ये मोठ्या संख्येने बोगसमतदार असल्याचा आरोपच तेथील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी जाहीरपणे केला होता. जर एमआयएम ही भाजपची बी टीम असती तर भाजपचे त्यांचे नुकसान ऐन निवडणुकीत केले असते का’

भारतीय जनता पक्ष हा दोन खासदारांपासून, ३०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा पक्ष आहे. हे साध्य करण्यासाठी भाजपने कधीही कोणतेही षडयंत्र केले नाही केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि मतदारांचा विश्वास मिळवत हे साध्य करून दाखवले आहे, हा इतिहास फार जुना नाही. देशातील मतदारच भाजपला तिसऱ्यांदा विजयी करत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पाहण्यासाठी उत्सुक आहे. सर्वच गोष्टी जर भाजपच्या बाजूने असतील, तर विजयासाठी पुण्यात भाजपला षडयंत्र करण्याची गरज नाही हे सामान्य मतदाराही समजते. उलट काहीही करा पण निवडणूक जिंकून सत्ता काबीज करा, हे अलिखित आणि अघोषिक धोरण गेली ६०-७० वर्षे देशात राबवणाऱ्या काँग्रेसचे चरित्र षडयंत्र रचण्याचेच आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी केला आहे.

ते म्हणाले, ‘गेली दहा वर्षे काँग्रेस सत्तेच्या बाहेर असल्याने त्यांना येनकेनप्रकारे त्यांना सत्ता हवी असल्याने त्यासाठी ते षडयंत्र रचण्याची शक्यता नाकारती येत नाही. पुण्यातील मतदारांनी सन २०१४ आणि २०१९ साली मोदीजींसाठी कसे मतदान केले याचा इतिहास ताजा आहे. यावेळीही मतदारांनी त्यांचे मन बनवले असून आता पुण्यातील नाही तर देशातील मतदार मोदीजींना पुन्हा तिस-यांचा पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.

घाटे यांनी सांगितले की, ‘अन्य पक्षातून काँग्रेसमध्ये केवळ तिकीटासाठी आलेल्या रविंद्र धंगेकरांना काँग्रेसने काही महिन्यापूर्वी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. आता पुन्हा त्यांनाच लोकसभेसाठी उमेदवारी दिली असल्याने धंगेकरांना उमेदवारीवरुन कार्यकर्त्यांच्यातील मोठा वर्ग नाराज आहे. ही नाराजी व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून भाजपसारख्या पक्षावर षडयंत्राचे आरोप केले जात आहेत.

ज्या काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात शपथेवर श्रीराम काल्पनिक असल्याचे सांगितले होते, त्याच काँग्रेसच्या सर्व नेत्यांवर रामनवमीच्या शुभेच्या देऊन पत्रकार परिषद सुरू करण्याची वेळ का आली ? आमची सत्ता राज्यात १९९५ साली आली पण नंतर पंधरा वर्षे नाही आली. जेव्हा काँग्रेसच्या कारभाराला लोक कंटाळले आणि त्यांनी २०१४ साली भाजपला सत्तेवर बसवले. जे राज्यात तेच केंद्रात, स्व. अटलजींचे सरकार २००४ साली गेल्यानंतर काँग्रेसची सत्ता देशात आली, पण अवघ्या दहाच वर्षात देशातील जनतेने बहुमताने भाजपला केंद्रात सत्ता दिली. त्यासाठी कोणतेही षडयंत्र करावे लागले नाही, कारण ते भाजपचे चरित्रच नाही, असेही घाटे यांनी स्पष्ट केले.

Abhay Chajed on Anis Sundke | एमआयएम चे अनिस सुंडके यांची उमेदवारी | पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र ! – ॲड अभय छाजेड

Categories
Breaking News Political पुणे

Abhay Chajed on Anis Sundke | एमआयएम चे अनिस सुंडके यांची उमेदवारी | पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र ! – ॲड अभय छाजेड

 

Abhay Chajed on Anis Sundke – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Pune Loksabha) यांना जनतेतून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे, एमआयएम चे अनिस सुंडके (Anis Sundke MIM) यांची उमेदवारी जाहीर करण्याचे पडद्यामागील षडयंत्र भारतीय जनता पक्षाने रचले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड अभय छाजेड (Adv Abhay Chajed) यांनी केला.

 

ॲड अभय छाजेड म्हणाले, अनिस सुंडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार गट ) यामध्ये होते पुण्यात भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा पराभव होण्याच्या शक्यतेच्या भीतीपोटी भाजपाने अनिस सुंडके यांचा एमआयएम मध्ये प्रवेश घडवून आणला आणि त्यांना एमआयएम तर्फे पुण्यात उमेदवारी मिळेल अशी व्यवस्था केली हे स्पष्ट दिसत आहे. अनिस सुंडके यांनी अनेक वेळा सोयीस्कर भूमिका घेऊन पक्ष बदलले आहेत त्यामुळेच त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले असून अशा एमआयएम उमेदवाराला मुस्लीम समाज मतदान करणार नाही. काँग्रेस पक्षाने बहुसंख्यांकां प्रमाणेच अल्पसंख्यांक समाजासाठी देखील मोठे योगदान दिले असून, त्यामुळे अल्पसंख्यांकांची मते देखील काँग्रेस पक्षाला पडतील आणि भाजपाचे एमआयएम चा उमेदवार पुण्यात उभा करण्याचे षडयंत्र अयशस्वी होईल व महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील अशा विश्वास ॲड अभय छाजेड यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पास्खला रोखण्यासाठी भाजपाने एमआयएमचे अनेक उमेदवार तिथल्या काँग्रेस विरोधी उभे करण्याचे षडयंत्र रचले होते एमआयएम हा पक्ष भाजपचा “B टीम” म्हणून ओळखला जातो. देशामध्ये भाजपाने याच B टीमचा वापर केला आहे, मात्र देशात आणि तेलंगणा मध्ये देखील त्याचा फायदा भाजपाला झाला नाही. तेलंगणा मध्ये एमआयएमचे अनेक उमेदवार उभे करायला लाऊनाही काँग्रेस पक्ष सगळीकडे विजयी झाला व भाजपाचे मनसुबे धुळीस मिळाले, पुण्यातही असेच घडेल अशा विश्वास ॲड अभय छाजेड यांनी व्यक्त केला.