Pune Loksabha Election 2024 | निवडणूक निरीक्षकांकडून पुणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election 2024 | निवडणूक निरीक्षकांकडून पुणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

 

Pune Loksabha Election 2024 – (The Karbhari News Service) – पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह शुक्रवारी सायंकाळी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. (Pune District Administration)

यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदीती राजशेखर, निवडणूक पोलीस निरीक्षक विवेकानंद सिंग, निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय, पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, निवडणूक पोलीस निरीक्षक ज्योती नारायण, खर्च निरीक्षक कमलेश मकवाना, बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक पोलीस निरीक्षक जॉएस लालरेम्मावी, खर्च निरीक्षक विजय कुमार, शिरुर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, निवडणूक पोलीस निरीक्षक जया गौरी, खर्च निरीक्षक बी. मोहन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामती मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. निवडणूक कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. उमेदवारांचा निवडणूक खर्च योग्य पद्धतीने नोंदविला जाईल यावर लक्ष देण्यासह निवडणूक खर्चाची पडताळणी करावी. नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे. मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणीदेखील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने वेळोवेळी आढावा घेऊन पूर्वतयारी करावी, आदी सूचना योवळी निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.

निवडणुकीत रोकड, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील आमिषांचा वापर होऊ नये यासाठी तपासणी नाक्यांवर तसेच भरारी पथकांद्वारे जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करावी. अवैध मद्य वाहतूक व विक्री प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्तीसह कठोर कारवाई करावी, अशाही सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा सादरीकरणाद्वारे देताना सांगितले, जिल्ह्यातील विशेषत: शहरी भागातील मतदाराची टक्केवारी वाढविण्यासाठी गेल्या तीन वर्षात युवा मतदार, उद्योगांमध्ये काम करणारे मतदार, महिला मतदार यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात ८३ लाख ३८ हजार ७४७ इतकी मतदार संख्या असून मतदान जागृती उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या १८ ते १९ वयोगटातील युवा मतदारांची संख्या १ लाख १ हजार ४४४ तर २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या १३ लाख ८० हजार ४३१ असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ८ हजार ३८२ मतदान केंद्रे असून १९ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्र एकही नसून शॅडो भागातील ३८ मतदान केंद्रे आहेत. येथे संपर्कासाठी हॅम रेडिओसह अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदारसंघांसाठी मिळून १० हजार ३१ क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी तसेच ८५९ सेक्टर पोलीस अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. टपाल, ईमेल आदीद्वारे तसेच सी-व्हिजीलद्वारे आचारसंहिता मोठ्या ७८२ तक्रारी प्राप्त झाल्या असून कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती द्विवेदी यांनी सांगितले, बारामती लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार असून मतदारसंघासाठी आवश्यक अतिरिक्त बॅलेट युनिट प्राप्त झाले त्यांच्या पुरवणी सरमिसळसह दुसरी सरमिसळ झाली आहे. मतदान कर्मचाऱ्यांचे तीन प्रशिक्षण झाले असून मतदान केंद्रांवरील तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्था तसेच निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्ताबाबत माहिती देतानाच परवानाप्राप्त शस्त्र जमा करण्याची कार्यवाही, मद्य, रोकड जप्तीची कारवाई आदी माहिती दिली.

बैठकीस सर्व विधानसभा मतदार संघांचे सहायक निवडणूक निरीक्षक, सर्व निवडणूकविषयक जबाबदाऱ्यांचे समन्वयक अधिकारी आदी उपस्थित होते.
0000

Freedom of Speech | भारतामध्ये‌ माध्यम स्वातंत्र्याची अवस्था बिकट : ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले

Categories
Breaking News Political पुणे

Freedom of Speech | भारतामध्ये‌ माध्यम स्वातंत्र्याची अवस्था बिकट : निरंजन टकले

 

Freedom of Speech – (The Karbhari news service) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील लोकांप्रती आपले काय‌ दायित्व आहेहे माहितच नाहीत्यामुळे त्यांनी दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. उलट त्यांनी वृत्त वाहिन्या असोत‌ किंवा मुद्रुत माध्यमं असोतसर्वांचे स्वातंत्र हिरावून घेतले आहे. यामुळे भारतामध्ये‌ माध्यम स्वातंत्र्याची अवस्था बिकट झाली आहेअशी टिका ज्येष्ठ पत्रकार व प्रदेश काँग्रेसचे स्टार प्रचारक निरंजन टकले यांनी केली.

 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीइंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टकले बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, सरचिटणीसवीरेंद्र किराडराज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, राज अंबिके,  इत्यादी उपस्थित होते. प्रारंभी राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

 

टकले म्हणालेनरेंद्र मोदी यांनी ज्या – ज्या ठिकाणी डोकं टेकवलेते सर्व संपवण्याचे काम केले आहे. मग ती संसद असोतलालकृष्ण आडवाणी असोत किंवा इतर नेते असोत. मोदी धार्मिक भावनेला आवाहन देण्याचे काम करतात. काँग्रेसने या‌ देशाला संविधान दिलेत्याच संविधानानुसार देश‌ चालतो. देश मनुस्मृतीनुसार नक्कीच चालणार नाही. मात्र भाजपला देश मनुस्मृतीनुसार चालवायचा आहे. त्यासाठी त्यांना देशातील संविधान हद्दापार करायचे आहे. संविधान बदलण्याची भाषा भाजपचेच नेते बोलत आहेत. त्यानंतर टिका होऊ लागल्याने मोदींनी संविधान बदलणार नाहीअशी गॅरंटी दिली.

 

काँग्रेसच्या‌ जाहीरनाम्यात हिंदू मुस्लिम उल्लेख कुठेच नाहीमात्र भाजप व मोदींकडून धादांत खोटा प्रचार केला जात आहे. देशातील  ४८ लाख लोकांनी काँग्रेसचा जाहीरनामा डाऊनलोड‌ केला. राहुल गांधीप्रियंका गांधी यांच्या प्रत्येक सभेकडे भाजपचे बारीक लक्ष आहेते लगेच त्यावर बोलतात. काँग्रेसचा जाहीरनामा लोकांच्या हिताचा आहेलोक‌तो‌ पसंत करत आहेतम्हणून भाजपकडून जाहीरनाम्यावर टिका केली जात आहे. मंगळसुत्राचा वाद निर्माण केला जात आहे.

 

उलट भाजपच्या जाहीरनाम्यात ५३ वेळा मोदींचा फोटो आहेयात बेकारी व बेरोजगारीचा उल्लेखही नाही. भाजपचा जाहीरनामा अत्यंत पोकळ आहे.  मोदी जितके खोटे बोलतील तितका काँग्रेसचा पाठिंबा वाढेल. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आणखी भाजपच्या पायाखालची वाळू घसरणार आहे.

अग्निवीर योजना मोदींनी राजकारणात आणली. महाराष्ट्रात अग्निवीर योजना देवेंद्र फडणवीस‌ यांनी आणली. शिंदे व पवार भाजपचे अग्निवीर आहेत. या दोघांना दोघे मिळून चार वर्षे मिळणार आहेत.

 

दहा वर्षात मोदी‌ सरकारने नागरिकांची आतोनात हानी केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात मोदी व भाजपबद्दल प्रचंड रोष आहे. दक्षिणेतल्या राज्यात भाजपचा एकही खासदार निवडून येणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ४० जागा निवडून येतीलअसा विश्वासही टकले यांनी व्यक्त केला.

 

Muralidhar Mohol Pune Loksabha | शक्तिप्रदर्शन करत मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल

Categories
Breaking News Political पुणे

Muralidhar Mohol Pune Loksabha | शक्तिप्रदर्शन करत मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल

Muralidhar Mohol Pune Loksabha – (The Karbhari News Service) – कोथरुड येथील छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे स्मारक ते डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे स्मारक अशी महर्षी कर्वे रस्त्यावर पदयात्रा काढून पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी (ता. 25) शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. (Pune Loksabha Election 2024)

कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला सकाळी साडेनऊ वाजता पुष्पहार अर्पण करून मोहोळ यांच्या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुणे शहराच्या विविध भागांतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय आणि महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या सह शहरातील महायुतीचे सर्व आमदार आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले होते. सुमारे चार तास पदयात्रा सुरू होती. महर्षी धोफ्लडो केशव कर्वे पुतळा, श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, श्री दशभुजा गणपती मंदिर, नळस्टॉप मेट्रो स्टेशन, गरवारे महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर स्मारक या मार्गे खंडोजीबाबा चौकात पदयात्रेचा जाहीर सभेने समारोप झाला.

प्रचारसभा सुरू असताना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसे नेते बाबू वागस्कर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे, मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे शहर अध्यक्ष संजय सोनावणे या वेळी उपस्थित होते. त्या दरम्यान खंडोजीबाबा चौकातील जाहीर सभेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची भाषणे झाली. छत्रपती श्री. संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून सांगता सभेचा समारोप झाला.

Pune Loksabha Election 2024 | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election 2024 | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

 

Pune Loksabha Election 2024 – (The karbhari News Service) –  जिल्ह्यातील ३४- पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून प्रसाद लोलयेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०६ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९३०९३५४९२४ आणि इमेल आयडी loksabhaelectionpune@gmail.com असा आहे.

निवडणूक निरीक्षक, पुणे लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे मंगळवार व गुरुवार रोजी १०.३० वाजेपासून सायं १२.३० वाजेपर्यंत भेटता येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही पुणे लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

Dhiraj Ghate on MIM – एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा काँग्रेसचा दावा पोकळ – धीरज घाटे

Categories
Breaking News Political पुणे

Dhiraj Ghate on MIM – एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा काँग्रेसचा दावा पोकळ – धीरज घाटे

Dhiraj Ghate on MIM – (The Karbhari News Service) – एमआयएम पक्षाची पुण्यात अनिस सुंडके (Anis Sundke MIM Pune Loksabha) यांना उमेदवारी मिळणे हे पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड (Abhay Chajed Pune Congress) यांनी पत्रकाव्दारे केला आहे. त्या आरोपांचा समाचार पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate Pune BJP) यांनी सुस्पष्ट शब्दात घेतला. (Pune Loksabha Election)

घाटे म्हणाले, एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा दावा, तो दावा किती पोकळ आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. निवडणूक आयोगाने हैद्राबादमधील ५ लाख ४० हजार बोगस मतदारांची नावे काढून टाकली आहेत. तसेच हैद्राबादमध्ये मोठ्या संख्येने बोगसमतदार असल्याचा आरोपच तेथील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी जाहीरपणे केला होता. जर एमआयएम ही भाजपची बी टीम असती तर भाजपचे त्यांचे नुकसान ऐन निवडणुकीत केले असते का’

भारतीय जनता पक्ष हा दोन खासदारांपासून, ३०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा पक्ष आहे. हे साध्य करण्यासाठी भाजपने कधीही कोणतेही षडयंत्र केले नाही केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि मतदारांचा विश्वास मिळवत हे साध्य करून दाखवले आहे, हा इतिहास फार जुना नाही. देशातील मतदारच भाजपला तिसऱ्यांदा विजयी करत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पाहण्यासाठी उत्सुक आहे. सर्वच गोष्टी जर भाजपच्या बाजूने असतील, तर विजयासाठी पुण्यात भाजपला षडयंत्र करण्याची गरज नाही हे सामान्य मतदाराही समजते. उलट काहीही करा पण निवडणूक जिंकून सत्ता काबीज करा, हे अलिखित आणि अघोषिक धोरण गेली ६०-७० वर्षे देशात राबवणाऱ्या काँग्रेसचे चरित्र षडयंत्र रचण्याचेच आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी केला आहे.

ते म्हणाले, ‘गेली दहा वर्षे काँग्रेस सत्तेच्या बाहेर असल्याने त्यांना येनकेनप्रकारे त्यांना सत्ता हवी असल्याने त्यासाठी ते षडयंत्र रचण्याची शक्यता नाकारती येत नाही. पुण्यातील मतदारांनी सन २०१४ आणि २०१९ साली मोदीजींसाठी कसे मतदान केले याचा इतिहास ताजा आहे. यावेळीही मतदारांनी त्यांचे मन बनवले असून आता पुण्यातील नाही तर देशातील मतदार मोदीजींना पुन्हा तिस-यांचा पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.

घाटे यांनी सांगितले की, ‘अन्य पक्षातून काँग्रेसमध्ये केवळ तिकीटासाठी आलेल्या रविंद्र धंगेकरांना काँग्रेसने काही महिन्यापूर्वी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. आता पुन्हा त्यांनाच लोकसभेसाठी उमेदवारी दिली असल्याने धंगेकरांना उमेदवारीवरुन कार्यकर्त्यांच्यातील मोठा वर्ग नाराज आहे. ही नाराजी व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून भाजपसारख्या पक्षावर षडयंत्राचे आरोप केले जात आहेत.

ज्या काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात शपथेवर श्रीराम काल्पनिक असल्याचे सांगितले होते, त्याच काँग्रेसच्या सर्व नेत्यांवर रामनवमीच्या शुभेच्या देऊन पत्रकार परिषद सुरू करण्याची वेळ का आली ? आमची सत्ता राज्यात १९९५ साली आली पण नंतर पंधरा वर्षे नाही आली. जेव्हा काँग्रेसच्या कारभाराला लोक कंटाळले आणि त्यांनी २०१४ साली भाजपला सत्तेवर बसवले. जे राज्यात तेच केंद्रात, स्व. अटलजींचे सरकार २००४ साली गेल्यानंतर काँग्रेसची सत्ता देशात आली, पण अवघ्या दहाच वर्षात देशातील जनतेने बहुमताने भाजपला केंद्रात सत्ता दिली. त्यासाठी कोणतेही षडयंत्र करावे लागले नाही, कारण ते भाजपचे चरित्रच नाही, असेही घाटे यांनी स्पष्ट केले.

Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

Categories
Breaking News social पुणे

Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

 

Pune Lok Sabha Election 2024 : (The Karbhari News Service) –  जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ८ हजार ३८२ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रकिया करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरवले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ११ हजार ८९८ बॅलेट युनिट, ११ हजार ८९८ कंट्रोल युनिट आणि १२ हजार ७४९ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.

सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत. या यंत्रांपैकी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या १४१ टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १५२ टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूममध्ये आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठीची यंत्रे भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्या-त्या विधानसभा मतदारसंघात देखील मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे डॉ.दिवसे यांनी सांगितले.

सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे योगेश बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे गणेश नलावडे, भारतीय जनता पार्टीचे राजाभाऊ शेडगे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अशोक कांबळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रमेश सकट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित गव्हाणे, शिवसेनेचे राजू गवळी आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Pune Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांच्या मदतीसाठी कक्ष स्थापन

Categories
Breaking News social पुणे

Pune Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांच्या मदतीसाठी कक्ष स्थापन

Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बी विंगमधील चौथ्या मजल्यावर तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.

या कक्षात मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि तक्रारी स्विकारण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले असून कक्षाकडे १८००२३३०१०२ आणि १९५० या टोल फ्री क्रमांक किंवा cvigilldccelection2024@gmail.com या ई-मेल पत्त्यावर तक्रार करता येईल. प्राप्त झालेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित सहायक निवडणूक अधिकारी यांना कळविण्यात येते.

कक्षाकडे दूरध्वनीद्वारे नवीन मतदान ओळखपत्र, ओळखपत्रात दुरुस्ती, मतदान यादीत नाव नोंदणी, ऑनलाइन पद्धतीने ओळखपत्र काढताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात येते, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

000

Pune BJP Booth Chalo Abhiyan | लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर भाजपच्या वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान

Categories
Breaking News Political पुणे

Pune BJP Booth Chalo Abhiyan | लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर भाजपच्या वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान

 

Pune BJP Booth Chalo Abhiyan | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune lok sabha Election 2024)  तयारीसाठी शहर भाजपच्या (Pune City BJP) वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate BJP) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (BJP Pune Booth Chalo Abhiyan)

घाटे म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सुचनेनुसार पुणे लोकसभा मतदारसंघातील दोन हजार दहा बूथवर हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक बूथसाठी एक प्रवासी कार्यकर्त्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणुकीपर्यंत दर पंधरा दिवसांनी हा कार्यकर्ता बूथवर भेट देणार आहे. केंद्र शासन आणि राज्य सरकारची विकासकामे आणि योजना या अभियानाअंतर्गत मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. शहर सरचिटणीस रवी साळेगावकर आणि सुभाष जंगले यांची या अभियानाच्या संयोजक म्हणून नियक्ती करण्यात आली आहे.

घाटे म्हणाले, बूथ समितीची बैठक घेणे, बूथ समिती आणि पन्ना प्रमुख यांना त्यांच्यावरील जबाबदाऱ्या सोपवणे, नवीन मतदार नोफ्लदणी, मतदार यादीचा आढावा, व्हॉटसॲप ग्रुप तयार करणे, विकसित भारतसाठी ब्रँड ॲबँसिडर बनविणे, प्रचार मोहिमेचा आढावा घेणे, प्रत्येक बूथवर 51 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविण्याचे नियोजन करणे, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे, प्रभावशाली व्यक्तिंची भेट घेणे, लाभार्थ्यांशी संवाद साधणे, विविध समाज घटकांच्या बैठका घेणे अशाप्रकारची कामे या अभियानातून करण्यात येणार आहेत.या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर,महेश पुंडे, संजय मयेकर,पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते

घाटे पुढे म्हणाले, पुणे लोकसभेची बूथ समितीची रचना पूर्ण झाली असून 2010 बूथ प्रमुख, 731 सुपर वॉरियर्स, 472 शक्ती केंद्र प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे

लोकसभा चुनाव प्रबंधन समिती
*लोकसभा क्षेत्र – पुणे

प्रभारी – श्रीनाथ भिमाले
सहप्रभारी – राजेश येनपुरे
संयोजक – मुरलीधर मोहोळ
सहसंयोजक – दिपक पोटे
विस्तारक – शैलेन्द्र ठकार
चुनाव अभिकर्ता – राजेश पांडे
चुनाव कार्यालय – संजयमामा देशमुख
कॉल सेंटर – नीलेश कोंढाळकर
वाहन व्यवस्था – महेश पुंडे, प्रवीण जाधव
प्रचार सामग्री – आनंद पाटील, अमोल डांगे
प्रचार अभियान – पुनीत जोशी , प्रतीक देसरडा
सोशल मिडिया एवं हायटेक अभियान – निखिल पंचभाई, चंद्रभूषण जोशी
यात्रा एवं प्रवास – गणेश बिडकर, रघुनाथ गौडा
मिडिया प्रबंधन – संजय मयेकर, पुष्कर तुळजापुरकर
बूथ स्तर का कार्य – कुलदीप सावळेकर, हरिष परदेशी
संसाधन जुटाना एवं प्रबंधन – रविंद्र साळेगावकर, गणेश घोष
लेखा- जोखा – हेमंत लेले, बाळासाहेब अत्रे
न्यायिक प्रक्रिया संबंधी एवं चुनाव आयोग से समन्वय – वर्षाताई डहाळे, माधवीताई निगडे
मतगणना – गोपाल चिंतल
आंकडे – सुहास कुलकर्णी
प्रलेखीकरण / दस्ताएवजीकरण – योगेश बाचल
घोषणापत्र प्रभारी – सिद्धार्थ शिरोळे, संजय मयेकर
आरोपपत्र – राणीताई कांबळे, समीर जोरी –
विडियो व्हान – नामदेव माळवदे, ऋषिकेश मळेकर
प्रवासी कार्यकर्ता – महेंद्र गलांडे, सुनील पांडे
लाभार्थी संपर्क – अजय खेडेकर, प्रल्हाद सायकर
सामाजिक संपर्क – दत्ताभाऊ खाडे, प्रशांत हरसुले
युवा संपर्क – राघवेंद्र मानकर, अमोल बालवडकर
महिला संपर्क – रूपालीताई धाडवे, हर्षदाताई फरांदे
एससी संपर्क – अतुल साळवे, सुखदेव अडागळे
एसटी संपर्क – राजश्री काळे
झुग्गी- झोपडी अभियान – विशाल पवार, गणेश शेरला
विशेष संपर्क (व्यावसायिक एवं सामाजिक) – दिपक नागपूरे, सौरभ पटवर्धन
साहित्य निर्माण, विज्ञापन बनाना एवं मुद्रण – दुष्यंत मोहोळ, राजू परदेशी
प्रचार सामग्री एवं साहित्य वितरण – आनंद पाटील