Pune BJP Booth Chalo Abhiyan | लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर भाजपच्या वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान

Categories
Breaking News Political पुणे

Pune BJP Booth Chalo Abhiyan | लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर भाजपच्या वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान

 

Pune BJP Booth Chalo Abhiyan | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune lok sabha Election 2024)  तयारीसाठी शहर भाजपच्या (Pune City BJP) वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate BJP) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (BJP Pune Booth Chalo Abhiyan)

घाटे म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सुचनेनुसार पुणे लोकसभा मतदारसंघातील दोन हजार दहा बूथवर हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक बूथसाठी एक प्रवासी कार्यकर्त्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणुकीपर्यंत दर पंधरा दिवसांनी हा कार्यकर्ता बूथवर भेट देणार आहे. केंद्र शासन आणि राज्य सरकारची विकासकामे आणि योजना या अभियानाअंतर्गत मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. शहर सरचिटणीस रवी साळेगावकर आणि सुभाष जंगले यांची या अभियानाच्या संयोजक म्हणून नियक्ती करण्यात आली आहे.

घाटे म्हणाले, बूथ समितीची बैठक घेणे, बूथ समिती आणि पन्ना प्रमुख यांना त्यांच्यावरील जबाबदाऱ्या सोपवणे, नवीन मतदार नोफ्लदणी, मतदार यादीचा आढावा, व्हॉटसॲप ग्रुप तयार करणे, विकसित भारतसाठी ब्रँड ॲबँसिडर बनविणे, प्रचार मोहिमेचा आढावा घेणे, प्रत्येक बूथवर 51 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविण्याचे नियोजन करणे, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे, प्रभावशाली व्यक्तिंची भेट घेणे, लाभार्थ्यांशी संवाद साधणे, विविध समाज घटकांच्या बैठका घेणे अशाप्रकारची कामे या अभियानातून करण्यात येणार आहेत.या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर,महेश पुंडे, संजय मयेकर,पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते

घाटे पुढे म्हणाले, पुणे लोकसभेची बूथ समितीची रचना पूर्ण झाली असून 2010 बूथ प्रमुख, 731 सुपर वॉरियर्स, 472 शक्ती केंद्र प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे

लोकसभा चुनाव प्रबंधन समिती
*लोकसभा क्षेत्र – पुणे

प्रभारी – श्रीनाथ भिमाले
सहप्रभारी – राजेश येनपुरे
संयोजक – मुरलीधर मोहोळ
सहसंयोजक – दिपक पोटे
विस्तारक – शैलेन्द्र ठकार
चुनाव अभिकर्ता – राजेश पांडे
चुनाव कार्यालय – संजयमामा देशमुख
कॉल सेंटर – नीलेश कोंढाळकर
वाहन व्यवस्था – महेश पुंडे, प्रवीण जाधव
प्रचार सामग्री – आनंद पाटील, अमोल डांगे
प्रचार अभियान – पुनीत जोशी , प्रतीक देसरडा
सोशल मिडिया एवं हायटेक अभियान – निखिल पंचभाई, चंद्रभूषण जोशी
यात्रा एवं प्रवास – गणेश बिडकर, रघुनाथ गौडा
मिडिया प्रबंधन – संजय मयेकर, पुष्कर तुळजापुरकर
बूथ स्तर का कार्य – कुलदीप सावळेकर, हरिष परदेशी
संसाधन जुटाना एवं प्रबंधन – रविंद्र साळेगावकर, गणेश घोष
लेखा- जोखा – हेमंत लेले, बाळासाहेब अत्रे
न्यायिक प्रक्रिया संबंधी एवं चुनाव आयोग से समन्वय – वर्षाताई डहाळे, माधवीताई निगडे
मतगणना – गोपाल चिंतल
आंकडे – सुहास कुलकर्णी
प्रलेखीकरण / दस्ताएवजीकरण – योगेश बाचल
घोषणापत्र प्रभारी – सिद्धार्थ शिरोळे, संजय मयेकर
आरोपपत्र – राणीताई कांबळे, समीर जोरी –
विडियो व्हान – नामदेव माळवदे, ऋषिकेश मळेकर
प्रवासी कार्यकर्ता – महेंद्र गलांडे, सुनील पांडे
लाभार्थी संपर्क – अजय खेडेकर, प्रल्हाद सायकर
सामाजिक संपर्क – दत्ताभाऊ खाडे, प्रशांत हरसुले
युवा संपर्क – राघवेंद्र मानकर, अमोल बालवडकर
महिला संपर्क – रूपालीताई धाडवे, हर्षदाताई फरांदे
एससी संपर्क – अतुल साळवे, सुखदेव अडागळे
एसटी संपर्क – राजश्री काळे
झुग्गी- झोपडी अभियान – विशाल पवार, गणेश शेरला
विशेष संपर्क (व्यावसायिक एवं सामाजिक) – दिपक नागपूरे, सौरभ पटवर्धन
साहित्य निर्माण, विज्ञापन बनाना एवं मुद्रण – दुष्यंत मोहोळ, राजू परदेशी
प्रचार सामग्री एवं साहित्य वितरण – आनंद पाटील

Manoj Jarange Patil | RPI Pune | मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा 

Categories
Breaking News Political social पुणे

Manoj Jarange Patil | RPI Pune | मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

Manoj Jarange Patil | आज पुण्यात मराठा आरक्षण संघर्ष यात्रेचे (Maratha Aarakshan Sangharsh Yatra) प्रमुख मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) (RPI Pune) यांच्या वतीने पुणे शहराचे माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट देऊन स्वागत केले आणि या आंदोलनास पाठिंबा दिला. (Manoj Jarange Patil)
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत आंदोलनातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पाणी आणि अल्पउपहार वाटप करण्यात आला .
           यावेळी डॉ सिद्धार्थ धेंडे माजी उपमहापौर पुणे, बाळासाहेब जानराव प्रदेश सचिव आर.पी.आय, संजय सोनवणे, अध्यक्ष पुणे आरपीआय
निलेश आल्हाट, शाम सदाफुले, रज्जाक शेख, मुश्ताक शेख,सुशील सर्वगोड, विजय कांबळे, गजानन जगडे,चंद्रकांत चव्हाण, संजय वायकर, विनोद मोरे, प्रताप धुमाळ, अन्वर देसाई, मंगला गमरे, मीना पांडे, संगिता फ्रान्सिस यासह पुणे शहरातील रिपब्लिकन पक्षाचे कायकर्ते, अविनाश सात्रस, विनायक महाडीक, आण्णा मोहिते, संजय सात्रस, अनिल कांबळे, गणेश पारखे, प्रेरणा जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सभासद तसेच नागपूरचाळ – महाराष्ट्र हौसिंग बोर्ड मधील सर्व मंडळांचे पदाधिकारी व सभासद व पथारी व्यावसायिक उपस्थित होते.

Pune Municipal Corporation Budget | 25 फेब्रुवारी पर्यंत कामे पूर्ण करा | तरतूद लॅप्स झाल्यास खात्याची जबाबदारी!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation Budget | 25 फेब्रुवारी पर्यंत कामे पूर्ण करा | तरतूद लॅप्स झाल्यास खात्याची जबाबदारी!

| महापालिका आयुक्तांचे विभाग प्रमुखांना आदेश

Pune Municipal Corporation Budget | लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता (Loksabha Election 2024 Code of Conduct) कधीही लागू शकते. यात शहरातील कामे अडकू नयेत, यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pune Municipal Corporation Commissioner IAS Vikram Kumar) यांनी २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान अंदाजपत्रकातील कामांच्या (Pune Municipal Corporation Budget 2023) निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर देण्याचे आदेश सर्व विभागांना दिले आहेत. तरतूद लॅप्स झाल्यास किंवा काम वेळेवर नाही झाल्यास त्याची जबाबदारी विभागाची असेल, असा इशारा देखील आयुक्तांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation Budget)

 आगामी लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लवकरच लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने अंतिम मतदार याद्या आज जाहीर केल्या आहेत. तर महापालिका आयुक्तांनी देखिल महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद असलेल्या कामांच्या निविदा व वर्कऑर्डर २० ते २५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या कालावधीमध्ये वर्क ऑर्डर न दिल्यास तरतूद लॅप्स झाल्यास किंवा काम पूर्ण न झाल्यास त्याची जबाबदारी विभागाची राहील, असा सूचनावजा इशारा पालिकेच्या सर्वच विभागाना दिला आहे.

PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदोन्नती : शारीरिक तपासणी आवश्यक | गुरुवारी होणार तपासणी

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदोन्नती : शारीरिक तपासणी आवश्यक | गुरुवारी होणार तपासणी

PMC Security Officer Promotion | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडील सुरक्षा विभागाकडील सुरक्षा अधिकारी (PMC Security Department) – (वर्ग-२), सहायक सुरक्षा अधिकारी (वर्ग 3) या पदाच्या एकूण संख्येच्या ७५% जागा कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी 23 लोकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 13 पात्र तर 10 अपात्र ठरले आहेत. त्याची यादी महापालिका वेबसाईट (PMC Website) वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार आता या उमेदवारांची शारीरिक तपासणी केली जाणार आहे. गुरुवारी ही तपासणी होणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील सुरक्षा विभागाकडील सुरक्षा अधिकारी-(वर्ग-२) व सहाय्यक सुरक्षा अधिकारी – (वर्ग-३) या पदाकरिता पुणे महानगरपालिकेमधील (PMC Pune) कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  त्यानुसार सुरक्षा अधिकारी व सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदाकरिता सेवकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरतुदीनुसार सुरक्षा अधिकारी व सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदाकरिता शारीरिक तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार सुरक्षा अधिकारी व सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदाकरिता अर्ज केलेल्या सेवकांसाठी शारीरिक तपासणी, गुरुवार, दि. 25 जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता जुना जी.बी. हॉल, ३ रा मजला, मुख्य मनपा भवन (Pune PMC Bhavan) येथे आयोजित केले आहे. (Pune Municipal Corporation News)

तसेच यासाठी “ चांगली दृष्टी असणे आवश्यक” या बाबत पुणे मनपाच्या कमला नेहरू रुग्णालय येथून अर्जदार उमेदवारांनी दृष्टीबाबत प्रमाणपत्र घेऊन त्याची प्रत आस्थापना विभागात सादर करावे. असे आदेशात म्हटले आहे.  तरी, सर्व खातेप्रमुख यांनी या कार्यालय परिपत्रकाची नोंद घेऊन त्याबाबत त्यांचे नियंत्रणाखालील अधिकारी / कर्मचारी यांना माहिती द्यावी. असे आदेश देण्यात आले आहेत.  जे संबंधित कर्मचारी विहित केलेल्या वेळेवर शारीरिक तपासणी करिता उपस्थित राहणार नाही त्यांचे नावे सुरक्षा अधिकारी व सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदाकरिता राबविण्यात येणाऱ्या पदोन्नतीच्या प्रक्रियेत विचारात घेण्यात येणार नाही. असा इशारा देखील देण्यात आला आहे.
—–

Rights of Rivers Campaign | मुळा, मुठा सहित पुणे जिल्ह्यातील 7 नद्यांसाठी राईट्स ऑफ रिव्हर्स मोहीम

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Rights of Rivers Campaign | मुळा, मुठा सहित पुणे जिल्ह्यातील 7 नद्यांसाठी राईट्स ऑफ रिव्हर्स मोहीम

Rights of Rivers Campaign | नद्यांचे हक्क, माझी जबाबदारी याची जाणीव ठेवत पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील 7 नद्यांसाठी राईट्स ऑफ रिव्हर्स मोहीम (Rights of Rivers Campaign) राबवण्यात येणार आहे. यामध्ये  भारताचे वॉटरमॅन राजेंद्र सिंग (Waterman Rajendra Singh), आंतरराष्ट्रीय नदी तज्ज्ञ परिणीता दांडेकर (Parinita Dandekar) सहभागी होणार आहेत. अशी माहिती पुणे नदी पुनरुज्जीवन (Pune River Revival) संस्थेच्या वतीने देण्यात आली. (Rights of Rivers campaign)

याबाबत संस्थेच्या वतीने सांगण्यात आले कि, 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. भारतीय राज्यघटना साजरी करण्याचा दिवस. आपण जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक आहोत जिथे संविधानाने हे मान्य केले आहे की स्वच्छ आणि सुरक्षित नैसर्गिक वातावरण हे नागरिकांच्या जीवनाच्या अधिकाराचा एक भाग आहे आणि ते राखणे हे देखील नागरिकांचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊन, पुण्यातील नद्यांच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी एकत्र आलेल्या 60 हून अधिक संस्था आणि व्यक्तींची संघटना पुणे नदी पुनरुज्जीवन (पीआरआर) भीमा खोऱ्यातील मुळा, मुठा, रामनदी, पवना, इंद्रायणी, भामा आणि भीमा या 7 नद्यांसाठी ‘राईट्स ऑफ रिव्हर्स मोहीम सुरू करणार आहे. ही मोहीम 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2024 पर्यंत 3 दिवसांसाठी आहे.
जीवितनदी, एन. ए. पी. एम., जलबिरादरी, जलदिंडी प्रतिष्ठान, नमामी इंद्रायणी प्रतिष्ठान, श्री आळंदी धाम सेवा समिती, मनहर्ष फाऊंडेशन, रंजाई, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, निसर्गसेवक, सजग नागरिक मंच आणि इतर अनेक संस्थांद्वारे ही मोहीम एकत्रितपणे राबवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय नदी तज्ज्ञ . परिणीता दांडेकर 26 जानेवारी रोजी या मोहिमेचे उद्घाटन करणार आहेत. 28 जानेवारी रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून वॉटरमॅन ऑफ इंडिया राजेंद्र सिंग उपस्थित राहणार आहेत. आर. जे. संग्राम हे सन्माननीय अतिथी असतील आणि तीनही दिवशी तरुणांशी संवाद साधतील.
सांडपाणी आणि प्रदूषणमुक्त अशा नैसर्गिक मुक्तपणे वाहणाऱ्या स्वच्छ नद्या निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये तसेच सरकारी संस्थांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे या मोहिमेचे अंतिम उद्दिष्ट आहे. ज्या 7 नद्यांवर ही मोहीम राबवली जाणार आहे, त्या सर्व ठिकाणी पाण्याचे नमुने गोळा केले जातील. आगामी दशकांमध्ये हवामान बदल आणि पर्यावरणीय -हासाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ आणि जिवंत जलसाठे ही अन्न सुरक्षेची तसेच शहरी शाश्वततेची गुरुकिल्ली असल्याने, युवकांना त्यांच्या स्वतःच्या भविष्याचे रक्षण करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध शाळा आणि महाविद्यालयांशी संपर्क साधला जात आहे. असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Rahalkar Ram Mandir Pune | Pune Congress Mahaaarti |सदाशिव पेठेतील रहाळकर राममंदिरात पुणे काँग्रेस कार्यकर्ते करणार महाआरती

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Rahalkar Ram Mandir Pune | Pune Congress Mahaaarti |सदाशिव पेठेतील रहाळकर राममंदिरात पुणे काँग्रेस कार्यकर्ते करणार महाआरती

|  माजी आमदार मोहन जोशी

 

Rahalkar Ram Mandir Pune | Pune Congress Mahaaarti |पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त (Shri Ram Lalla Pran Pratistha) २२ जानेवारीला दुपारी १२ वाजता सदाशिव पेठेतील रहाळकर श्रीराम मंदिरात (Rahalkar Ram Mandir Sadashiv Peth Pune) कॉंग्रेस कार्यकर्ते महाआरती करणार आहेत, अशी माहिती माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. (Rahalkar Ram Mandir Pune | Pune Congress Mahaaarti)

या महाआरती सोहळ्यात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. सदाशिव पेठेत नागनाथ पाराजवळील (Nagnath Paar Sadashiv Peth) रहाळकर श्रीराम मंदिर (Rahalkar Shriram Mandir) सुमारे २०० वर्ष जुने असून तिथे पट्टाभिशक्त श्रीरामाची मूर्ती आहे. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या श्रीराम मंदिरात महाआरती आयोजित केल्याचे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

श्रीरामाविषयी सर्व भारतीयांच्या मनात श्रद्धा आहे. श्रीराम हे दैवत प्रत्येक भारतीयाचे आहे, कोणा विशिष्ट व्यक्ती अथवा समूहाचे नाही व कोणा पक्षाचे अथवा संघटनेचेही नाही, या दैवताला पक्षीय, राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न कोणी केला, तरी ते भारतीयांना मान्य होणार नाही.

प्रभू रामचंद्रांविषयी सर्वांच्या मनात आस्था आहे. आपल्या सहज बोलण्यातही श्रीरामाचे नाव घेतले जाते हे त्याचेच ऊदाहरण आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत असताना याच श्रद्धायुक्त भावनेने आम्ही प्रभू श्रीरामाची महाआरती करीत आहोत. श्रीरामाचा पक्षीय, राजकीय वापर करणार्यांना रामरायानेच सदबुद्धी द्यावी अशी आमची प्रार्थना असेल. कॉंग्रेसचे नेते, पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचा शिलान्यास झालेला आहे, पण त्याचा कधीही राजकीय वापर करण्यात आला नाही याचेही स्मरण यानिमित्ताने होईल असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Shivajinagar Bus Station Pune | अडीच वर्षात शिवाजीनगर येथील बसस्थानाकाचे काम पूर्ण होणार!

Categories
Breaking News Political social पुणे

Shivajinagar Bus Station Pune | अडीच वर्षात शिवाजीनगर येथील बसस्थानाकाचे काम पूर्ण होणार!

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शिवाजीनगर बसस्थानकाच्या कामांचा आढावा

 

Shivajinagar Bus Station Pune | पुणे | उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत शिवाजीनगर बसस्थानक (Shivajinagar Bus Station) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील उड्डाणपूल कामांचा आढावा घेतला. (Shivajinagar Bus Station Pune)

बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बप्पा बहिर आदी उपस्थित होते.

महामेट्रोने त्यांच्या खर्चातून करावयाची कामे त्वरित सुरू करावी. उर्वरित इमारतीच्या कामासाठी राज्य शासनातर्फे निधी देण्यात येईल. राज्य परिवहन महामंडळाने इमारतीतील त्यांना आवश्यक जागेची माहिती द्यावी, इतर जागेत शासकीय कार्यालयासाठी जागा देण्याबाबत प्रशासनाने माहिती घ्यावी, असे श्री.पवार यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्याबाबत विचार व्हावा. ब्रेमेन चौकातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे पुणे महानगरपालिकेने तातडीने करावे. कृषी महाविद्यालय ते सिंचन नगर मैदानाकडून जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी आणि कारची वाहतूक वळविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बसस्थानक कामाचा आराखडा प्राप्त झाला असून पुढील अडीच वर्षात शिवाजीनगर येथील बसस्थानाकाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे श्री.हर्डीकर यांनी सांगितले.

यशदाला देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था करा

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यशदाच्या मास्टर प्लॅनचा आढावा घेतला. यशदाला भारतातील सर्वोत्तम संस्था करण्यासाठी आराखडा तयार करावा, त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. आदर्श आराखड्यासाठी स्पर्धा घेण्यात यावी आणि त्यातून उत्तम कल्पनांचा समावेश अंतिम आराखड्यात करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीला यशदाचे अतिरिक्त महासंचालक सचिंद्र प्रताप सिंह आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांसमोर सहकार भवनचेही सादरीकरण करण्यात आले. यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे उपस्थित होते. आराखड्यात सभागृहाची क्षमता वाढविण्याबाबत विचार करावा, साखर संकुल आणि पणन विभागाची गरजही लक्षात घ्यावी,अशी सूचना श्री.पवार यांनी केली.

Pune Sex Ratio | सावित्रीबाईंच्या पुण्यात 1 हजार मुलांमागे फक्त 890 मुली! 

Categories
Breaking News cultural PMC social आरोग्य पुणे

Pune Sex Ratio | सावित्रीबाईंच्या पुण्यात 1 हजार मुलांमागे फक्त 890 मुली! 

 
 

Pune Sex Ratio | स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी पुण्यातून सुरु केलं. मुली शिकल्या. सवरल्या. स्वतंत्र झाल्या. पुण्यामुळे देशात मुली सुरक्षित झाल्या. मात्र तेच पुणे शहर (Pune City) मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात मागेच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुढारलेल्या पुण्यात ही स्थिती व्हावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या (PMC Health Department) माहितीनुसार पुणे शहरात मुलींचे जन्माचे प्रमाण 2023 साली घटून 890 वर आले आहे. 2020 साली हे प्रमाण 946 होते. मागील काही वर्षात महापालिकेने चांगले काम करत हे प्रमाण 879 वरून 946 पर्यंत आणले होते. मात्र आता पुणे शहरातील मुलींच्या जन्माच्या प्रमाणात चांगलीच घसरण होत चालली आहे. सावित्रीबाईंचे स्मारक जिथे होणार आहे अशा पुण्यात ही स्थिती का यावी?  पुणे शहर फिरून १० वर्ष का मागे जावे? याबाबत पुणे महापालिका आरोग्य विभाग आणि राज्य सरकार काही आत्मपरीक्षण करणार आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.  (Pune Sex Ratio)

 

: अधिकारी बदलामुळे होतोय परिणाम 

 
एक हजार मुलांच्या जन्मामागेच मुलींच्या जन्माचे प्रमाण काढण्यात येते. पुणे महापालिकेकडून (PMC Pune) अथवा कोणत्याही शहर, जिल्ह्यातून मुलींच्या जन्माची आकडेवारी उपलब्ध झाल्यास त्यावरून लिंग गुणोत्तर निश्चित केले जाते. जन्म विभागाकडे दैनंदिन मुला मुलींच्या जन्माची नोंदणी केली जाते. त्यातून संकलित माहितीच्या आधारे हे प्रमाण काढले जाते. लिंग गुणोत्तराच्या बाबतीत पुणे शहर आणि महापालिका राज्यात वरच्या स्थानावर होती. याबाबत महापालिकेचे राज्य सरकार कडून कौतुक देखील केले जायचे. महापालिकेकडून वेगवेगळ्या उपाय योजना राबवून आणि जनजागृती करून हे प्रमाण वाढवले गेले होते. मात्र 2021पासून हे प्रमाण चांगलेच घसरले आहे. मुलींचे स्वागत करण्यात पुढारलेले पुणे उणे का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. दरम्यान महापालिका जनजागृती करण्यात आणि लिंग तपासणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात कमी पडली असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण आरोग्य खात्याकडून अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या गेल्या. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्या कडून याबाबतचे काम काढून घेण्यात आले. नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना कामाचे स्वरूप समजून घेण्यातच वेळ गेला. त्यामुळे कारवाई होऊ शकली नाही.  (Pune Municipal Corporation Health Department)
 

: 2020 ला सेक्स रेशो 946 

दरम्यान, ‘ 2010 साली पुणे शहरातील मुलींच्या जन्माचे प्रमाण 879 होते. 2011 मध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण 884 एवढे होते. 2012 व 2013 मध्ये अनुक्रमे 934 व 933 एवढे प्रमाण होते. 2014 मध्ये त्यात थोडीशी वाढ होऊन ते 937 पर्यंत गेले, तर 2015 मध्ये  हे प्रमाण घसरून 925 पर्यंत खाली आले होते. त्यानंतर 2019 ला 922 तर 2020 ला हे प्रमाण 946 पर्यंत आले होते. मात्र 2021 मध्ये यात खूपच घसरण झाली. 1000 मुलांच्या मागे मुलींचे प्रमाण फक्त 900 असे होते. तर 2022 साली यात थोडीशी सुधारणा होऊन हे प्रमाण 910 इतके झाले. त्यानंतर आता 2023 सालात देखील संख्या कमीच असल्याचे दिसून येत आहे.  910 वरून हे प्रमाण 890 इतके असल्याचे दिसून आले आहे. म्हणजे फिरून आपण २०१० सालासारखे मागे गेलो आहोत.

: लिंग गुणोत्तर (sex Ratio) प्रमाण 

 
वर्ष             रेशो 
 
2010     879
2011     884
2012     934
2013     933
2014      937
2019       922
2020.      946
2021.       900
2022.       910
2023.       890

Deep Cleaning Drive | PMC Pune | पुणे महापालिकेची विशेष सूक्ष्म स्वच्छता मोहीम | 22 जानेवारी पर्यंत शहरातील सर्व प्रभागातील मंदिरे स्वच्छ करण्याचे नियोजन

Categories
Breaking News PMC social पुणे

Deep Cleaning Drive | PMC Pune | पुणे महापालिकेची विशेष सूक्ष्म स्वच्छता मोहीम

| 22 जानेवारी पर्यंत शहरातील सर्व प्रभागातील मंदिरे स्वच्छ करण्याचे नियोजन

Deep Cleaning Drive | PMC Pune | स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Abhiyan), स्वच्छ सर्वेक्षण २०२४ (Swachh Survey 2024) अंतर्गत पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) संपूर्ण शहरात विशेष सूक्ष्म/खोलवर स्वच्छता मोहीमेचे (deep cleaning drive) आयोजन करण्यात येत आहे. हे स्वच्छता अभियान १५ क्षेत्रिय कार्यालयाकडील एकूण ४२ प्रभागांमध्ये दिनांक १७  ते २२ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात स्वच्छता करण्यात येत आहे. अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली. (Deep Cleaning Drive | PMC Pune)
२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत असून थोडेच दिवस बाकी आहेत. येत्या २२ जानेवारी रोजी संपूर्ण हिंदुस्थानात सर्वात मोठी दीपावली साजरी होत आहे. या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभर मंदिर व सर्व पुजास्थळांची स्वच्छता करण्यात येत आहे. काल डहाणूकर कॉलनी प्रभू श्रीराम मंदिर स्वच्छ करणे आले यावेळी स्वच्छतेचे ब्रॅन्ड अँबेसिडर व जेष्ठ गायक, संगीतकार, दिग्दर्शक व कवी डॉ. सलील कुलकर्णी (Dr Saleel Kulkarni) आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.केतकी घाटगे यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त श्री विक्रम कुमार ,अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार व उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन श्री.संदीप कदम यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व अधिकारी / कर्मचारी (आरोग्य विभाग) नवचैतन्य हास्य क्लब, कमिन्स इंडिया लिमिटेड, जनवानी, स्वच्छ संस्था, हर्षदीप फाउंडेशन,
सेवासयोग,नागरिक यांच्या सोबत मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. माजी आमदार मेधा कुलकर्णी, मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. शाम देशपांडे यांच्या हस्ते मंदिरातील आतील परिसराची जेटींग मशिनच्या सहाय्याने पाण्याच्या फवाऱ्याने साफ करण्यात आले. शिवाय पुजा पार्क व प्रभागातील गणपती, म्हसोबा, मारुती, भवानी माता, दुर्गामाता, महादेव, विठ्ठल या विविध देवतांचे मंदीर, तसेच मंदीराच्या बाहेरील परिसर सर्व क्षेत्रातील सन्माननीय लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्वच्छता केली.

Pune Metro Security Guard  | मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत दोन जीव वाचवले

Categories
Breaking News social पुणे

Pune Metro Security Guard  | मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत दोन जीव वाचवले

 

Pune Metro Security Guard  |पुणे मेट्रो (Pune Metro) सुरक्षा रक्षक विकास बांगर (Security Guard Vikas Bangar) याने प्रसंगावधान राखत ३ वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. आज  १९ जानेवारी  रोजी दुपारी २:२२ मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक (Civil Court Metro Station) येथे फलाट क्रमांक २ वरून एक 3 वर्षाचा मुलगा खेळतांना रुळावर पडला. त्यावेळी कामावर असणाऱ्या सुरक्षारक्षकाने मुलाला ट्रॅक वर पडताना पहिले. पडणाऱ्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाची आई देखील रुळांवर पडली. त्यावेळी प्रसंगावधान राखत सुरक्षारक्षक विकास बांगर याने फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर (ई.एस.पी) बटन वेळीच दाबले. (Pune Metro Security Guard)

त्यामुळे स्थानकाच्या दोन्ही दिशांनी वेगाने येणाऱ्या मेट्रो ट्रेन त्वरित थांबल्या यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ ३० मीटर इतके होते. मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा व त्याच्या आईला सुखरूप रित्या रुळांवरून बाहेर काढण्यात आले व परिवाराशी त्याची भेट करून देण्यात आली.

सुरक्षारक्षक  विकास बांगर यांच्या समयसूचकतेबद्दल आणि धाडसी कार्याबद्दल पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे (प्रशासन व जनसंपर्क), महाव्यवस्थापक सोमेश शर्मा (वित्त) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी स्थानक नियंत्रक व पुणे मेट्रोचे कर्मचारी उपस्थित होते.