MLA Ravindra Dhangekar Vs Dheeraj Ghate | आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा | धीरज घाटे यांची टीका 

Categories
Breaking News Political पुणे

MLA Ravindra Dhangekar Vs Dheeraj Ghate | आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा | धीरज घाटे यांची टीका

MLA Ravindra Dhangekar Vs Dheeraj Ghate | पुणे | काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar) आणि भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आमदार धंगेकर यांनी भाजप नेत्यावर टीका केल्यानंतर घाटे यांनी देखील धंगेकर यांच्यावर टीका केली आहे. घाटे  म्हणाले, कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टी वर टीका केली. आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या वर टीका केली. मुळामध्ये जे स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण करतात त्यांना आमच्या नेत्यावर बोलायचा नैतिक अधिकार नाही’ अशी प्रतिक्रिया भा ज पा चे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. (MLA Ravindra Dhangekar Vs Dheeraj Ghate)

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत घाटे बोलताना पुढे म्हणाले की ‘धंगेकर यांच्या कुठल्याही आरोपात तथ्य नाही. गुन्हेगारी मुक्त भयमुक्त वातावरण या साठी महायुतीचे सरकार वचनबद्ध आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना गुन्हेगारी मुक्त करण्याचे कठोर आदेश दिले आहेत. गृह खाते मोहोळ यांच्याविषयात योग्य ती कारवाई नक्कीच करेल. परंतु धंगेकर हे सवंग लोकप्रियतेसाठी अशी विधाने सातत्याने करत असतात. ते हवे ने भरलेला फुगा आहेत आणि हा फुगा लवकरच फुटेल त्यांना मुंगेरीलाल के हसीन सपने पडत आहेत. ज्यांनी आमच्या दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांचा १० कोटींच्या कामाचा विरोध केला दुर्दैवाने तो निधी इतर ठिकाणी वळविला गेला. ज्यांना स्वतःच्या मातदारसंघातल्या जनतेची काळजी नाही. त्यांनी कोथरूड ची काळजी करावी हे खरोखर हास्यास्पद आहे. स्वतःची उमेदवारी जाहीर करून मोकळे झाले असे असले तरी आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा फाजील आत्मविश्वास हा नडणार आहे. चंद्रकांत दादा हे गेल्या साडेचार वर्षात मोहोळ यांना भेटले देखील नाहीत असे असताना धंगेकर यांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही’

यावेळी सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, वर्षा तापकीर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते

Pune Entrepreneurs | PPP | आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी पुण्यातील उद्योजकांची पुणे महापालिका आयुक्तांशी चर्चा!

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

Pune Businessman | PPP | आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी पुण्यातील उद्योजकांची पुणे महापालिका आयुक्तांशी चर्चा!

| वासवानी उड्डाणपूल पाडण्याबाबत बैठकीत चर्चा

Pune Businessman | PPP | पुणे | वेगाने विस्तारलेल्या पुण्याला (Pune City) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची (International level Infrastructure) आवश्यकता असून पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (Public Private Partnership) सारख्या संकल्पनेतून हे उद्दिष्ट कसे गाठता येईल. याबाबत पुण्यातील कॉर्पोरेट तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची (Pune Businessman) पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar PMC IAS) यांच्यासमवेत सोमवारी अनौपचारिक बैठक पार पडली. पुणे शहरातील विविध प्रश्नांबाबत या बैठकीत चर्चा झाली.
 प्रसिद्ध उद्योगपती योहान पूनावाला (Businessman Yohan Poonawala) यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस मिशेल पूनावाला, उद्योगपती फिरोज पद्मजी, विशाल चोरडिया, डॉ. परवेझ  के. ग्रांट, जहांगीर जहांगीर ,भाजप प्रवक्ते अली दारूवाला,एड. श्रेयस आद्यन्तया  यांच्यासह विक्रम कुमार आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane PMC) आदी उपस्थित होते.
पुण्यातील वाहतूक, विमानतळाची क्षमता वाढवणे, पाणीपुरवठा, स्वच्छता, नदीकाठ सुधारणा अशा विविध विषयांवर चर्चा झाली. शहरासाठी मोठे विमानतळ नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यावर सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.कोरेगाव पार्क ते कॅम्प (नवीन सर्किट हाऊस) यांना जोडणारा साधू वासवानी उड्डाण पूल पाडल्यानंतरही या परिसरातील वाहतूक विस्कळित होऊ दिली जाणार नाही. त्यासाठी तात्पुरता एकेरी लोखंडी उड्डाण पूल उभारण्याबाबत विचार होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
उड्डाण पूल पाडल्यानंतर वाहतुकीवर काय परिणाम होणार यावरून कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत बैठकीत चर्चा झाली.विक्रम कुमार यांनी सांगितले, की हा पूल धोकादायक झाल्याने तो पाडणे आवश्यक आहे, पण त्यामुळे वाहतूक विस्कळित न होता विविध पर्यायी मार्गांवर विचार सुरू आहे. पुलाचे काम कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यावरही आमचा भर राहणार आहे. याशिवाय तात्पुरता लोखंडी उड्डाण पूल उभारण्याची सूचनाही पुढे आली असून त्यावरही आम्ही विचार करू.

| शहर विकासासाठी उद्योजकांचा फोरम | योहान पूनावाला

पुणे शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा. पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढावा, तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी शहरातील उद्योजक प्रशासनाला मदत करतील. ही मदत आर्थिक, सल्लागार अशा विविध स्वरूपात असेल. त्यासाठी उद्योजकांचा फोरम काम करेल. पुण्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविणे हा यामागील हेतू असल्याचे उद्योगपती योहान पूनावाला यांनी सांगितले.वाढत असलेल्या पुणे शहराचे योग्य नियोजन व्हायला हवे, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली. शहराच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर उद्योजकांच्या मदतीने मार्ग काढण्यासाठी या फोरमच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे अली दारूवाला यांनी सांगितले.
—————

Pune Zilha Sahkari Dudh Utpadak Sangh | Mahavikas Aghadi Pune | क्रीडांगण आरक्षणा वरून महाविकास आघाडी उद्या करणार आंदोलन 

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pune Zilha Sahkari Dudh Utpadak Sangh |Mahavikas Aghadi Pune | क्रीडांगण आरक्षणा वरून महाविकास आघाडी उद्या करणार आंदोलन

 

Pune Zilha Sahkari Dudh Utpadak Sangh | PMC Pune | कात्रज येथील स.नं. १३२ (पार्ट) ते १३३ (पार्ट) या  पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Pune Zilha Sahkari Dudh Utpadak Sangh)  संस्थेच्या लगतच्या सुमारे ३.५९ हेक्टर (साधारणत: ७ एकर) जागेवर विकास आराखड्यामध्ये खेळाच्या मैदानाचे आरक्षण (Play Ground Reservation) रद्द करून ती जागा दूध डेअरी व प्रक्रिया या कारणासाठी आरक्षित करण्याबाबतच्या प्रस्तावास महाविकास आघाडीने विरोध केला आहे. आरक्षण रद्दबातल न करता या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच खेळाच्या मैदानाचे आरक्षण कायम ठेवावे. या मागणी साठी महाविकास आघाडी कडून उद्या महापालिका भवनात आंदोलन करण्यात येणार आहे.  (Pune Municipal Corporation)

कात्रज येथील स.नं. १३२ (पार्ट) ते १३३ (पार्ट) या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संस्थेच्या लगतच्या सुमारे ३.५९ हेक्टर (साधारणत: ७ एकर) जागेवर विकास आराखड्यामध्ये खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे. हे आरक्षण काढून ती जागा दूध डेअरी व प्रक्रिया या कारणासाठी आरक्षित करण्याबाबत प्रस्ताव शासन व मनपा स्तरावर कार्यवाही सुरू आहे. तसेच सदर आरक्षणाकरिता पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला समुचित प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात यावे ही बाब देखील प्रस्तावात नमुद केली आहे. या प्रस्तावानुसार या आरक्षण बदलावर हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. या प्रस्तावास महाविकास आघाडीने विरोध केला आहे. मैदानाचे आरक्षण ठेवावे या मागणीसाठी महाविकास आघाडी कडून उद्या महापालिका भवनात आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे हे उपस्थित राहणार आहेत.