Pune Entrepreneurs | PPP | आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी पुण्यातील उद्योजकांची पुणे महापालिका आयुक्तांशी चर्चा!

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे
Spread the love

Pune Businessman | PPP | आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी पुण्यातील उद्योजकांची पुणे महापालिका आयुक्तांशी चर्चा!

| वासवानी उड्डाणपूल पाडण्याबाबत बैठकीत चर्चा

Pune Businessman | PPP | पुणे | वेगाने विस्तारलेल्या पुण्याला (Pune City) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची (International level Infrastructure) आवश्यकता असून पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (Public Private Partnership) सारख्या संकल्पनेतून हे उद्दिष्ट कसे गाठता येईल. याबाबत पुण्यातील कॉर्पोरेट तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची (Pune Businessman) पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar PMC IAS) यांच्यासमवेत सोमवारी अनौपचारिक बैठक पार पडली. पुणे शहरातील विविध प्रश्नांबाबत या बैठकीत चर्चा झाली.
 प्रसिद्ध उद्योगपती योहान पूनावाला (Businessman Yohan Poonawala) यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस मिशेल पूनावाला, उद्योगपती फिरोज पद्मजी, विशाल चोरडिया, डॉ. परवेझ  के. ग्रांट, जहांगीर जहांगीर ,भाजप प्रवक्ते अली दारूवाला,एड. श्रेयस आद्यन्तया  यांच्यासह विक्रम कुमार आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane PMC) आदी उपस्थित होते.
पुण्यातील वाहतूक, विमानतळाची क्षमता वाढवणे, पाणीपुरवठा, स्वच्छता, नदीकाठ सुधारणा अशा विविध विषयांवर चर्चा झाली. शहरासाठी मोठे विमानतळ नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यावर सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.कोरेगाव पार्क ते कॅम्प (नवीन सर्किट हाऊस) यांना जोडणारा साधू वासवानी उड्डाण पूल पाडल्यानंतरही या परिसरातील वाहतूक विस्कळित होऊ दिली जाणार नाही. त्यासाठी तात्पुरता एकेरी लोखंडी उड्डाण पूल उभारण्याबाबत विचार होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
उड्डाण पूल पाडल्यानंतर वाहतुकीवर काय परिणाम होणार यावरून कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत बैठकीत चर्चा झाली.विक्रम कुमार यांनी सांगितले, की हा पूल धोकादायक झाल्याने तो पाडणे आवश्यक आहे, पण त्यामुळे वाहतूक विस्कळित न होता विविध पर्यायी मार्गांवर विचार सुरू आहे. पुलाचे काम कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यावरही आमचा भर राहणार आहे. याशिवाय तात्पुरता लोखंडी उड्डाण पूल उभारण्याची सूचनाही पुढे आली असून त्यावरही आम्ही विचार करू.

| शहर विकासासाठी उद्योजकांचा फोरम | योहान पूनावाला

पुणे शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा. पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढावा, तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी शहरातील उद्योजक प्रशासनाला मदत करतील. ही मदत आर्थिक, सल्लागार अशा विविध स्वरूपात असेल. त्यासाठी उद्योजकांचा फोरम काम करेल. पुण्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविणे हा यामागील हेतू असल्याचे उद्योगपती योहान पूनावाला यांनी सांगितले.वाढत असलेल्या पुणे शहराचे योग्य नियोजन व्हायला हवे, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली. शहराच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर उद्योजकांच्या मदतीने मार्ग काढण्यासाठी या फोरमच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे अली दारूवाला यांनी सांगितले.
—————