Ajit Pawar in PMC | अजित पवार यांनी पुणे महापालिकेत येऊन घेतला मदत कार्याचा आढावा!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Ajit Pawar in PMC | अजित पवार यांनी पुणे महापालिकेत येऊन घेतला मदत कार्याचा आढावा!

 

Ajit Pawar on Pune Rain – (The Karbhari News Service) – उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation (PMC) येथे अधिकाऱ्यांकडून मदत व बचत कार्याचा आढावा घेतला. नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन पवार यांनी केले. (Pune Rain Update)

अजित पवारांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणी साठ्याची माहिती घेतली व पावसाची स्थिती लक्षात घेऊन विसर्ग करण्याच्या सूचना केल्या.  पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी देण्याचे निर्देश दिले. ४८ तास धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी. पर्यटकांनी अशा ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन पवार यांनी केले.

 

ज्या गृहनिर्माण संस्थांच्या पाण्याच्या टाकीत पुराचे पाणी शिरले आहे तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

लवासा येथे दरड कोसळल्याने मदत कार्य सुरू. प्रशासन सतर्क राहून काम करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन. दुर्घटनेत जखमी झालेल्याचा खर्च महानगरपालिका व शासनातर्फे करण्याच्या सूचना. वेगवेगळ्या भागात एनडीआर एफच्या तुकड्या तैनात. आंबील ओढा भागातही खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Pune Rain News | पुणे महानगरपालिकेच्या ८ बोटी आणि बचाव पथक मदातकार्यासाठी नियुक्त

Categories
Breaking News social पुणे

Pune Rain News | पुणे महानगरपालिकेच्या ८ बोटी आणि बचाव पथक मदातकार्यासाठी नियुक्त

 

एनडीआरएफच्या पथकांना पाचारण, बोटीही बचाव कार्यात दाखल

*नागरिकांना घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

बोटीचे नियोजन : video : https://youtube.com/shorts/duUEZ7q3PHo?si=UdQ6gcE98bum7CrS

*मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा, मदत कार्याला गती देण्याचे निर्देश, नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश

*एकता नगर भागातील मदत कार्याचाही अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

https://x.com/thekarbharinews/status/1816331454978351560?s=46

 

*पाणी असलेल्या सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा सूचना.

*उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात, मदत कार्याला गती देण्याचे निर्देश

*पावसाचा जोर लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

*पुणे महानगरपालिकेच्या ८ बोटी आणि बचाव पथक मदातकार्यासाठी नियुक्त

*विद्युत धक्का लागल्याने नदीपात्रात स्टॉल्स काढण्यासाठी गेलेल्या तीन नागरिकांचा मृत्यू

*पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्य पदार्थ व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

PMC Engineers Transfer | अभियांत्रिकी संवर्गातील 110 अभियंत्यांच्या आणि 13 आरेखक यांच्या होणार नियतकालिक बदल्या! | कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता यांचा समावेश 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Engineers Transfer | अभियांत्रिकी संवर्गातील 110 अभियंत्यांच्या आणि 13 आरेखक यांच्या होणार नियतकालिक बदल्या! | कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता यांचा समावेश

PMC Engineer Transfer- (The Karbhari News Service) – अभियांत्रिकी संवर्गातील (PMC Engineer Cadre) 110 अभियंत्यांच्या आणि 13 आरेखक यांच्या नियतकालिक बदल्या केल्या जाणार आहेत. यामध्ये कनिष्ठ अभियंता (PMC Junior Engineer), उप अभियंता (PMC Deputy Engineer) , कार्यकारी अभियंता (PMC Executive Engineer) यांचा समावेश आहे. बदल्यांची कार्यवाही उद्या (शुक्रवारी) केली जाणार आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून (PMC General Administration Department) जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता या पदावरील सेवकांची बदली करण्याची कार्यवाही अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. त्यानुसार उद्या सकाळी 11 वाजलेपासून जुना जीबी हॉल येथे ही कार्यवाही होईल. सकाळी 11 वाजता कनिष्ठ अभियंता तर दुपारी 3:30 वाजता कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता यांच्या बदलीची प्रक्रिया होईल. असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. (Pune PMC News)

या अभियंत्यांच्या होणार बदल्या

– कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 67
– कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 9
– कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 7
– उप अभियंता (स्थापत्य) – 9
– उप अभियंता (विद्युत) – 3
– उप अभियंता (यांत्रिकी) – 1
– कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 10
– कार्यकारी अभियंता (विद्युत) – 2
– कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) – 2
– आरेखक – 13
– एकूण – 123.
– बदली केल्या जाणाऱ्या अभियंत्यांची यादी येथे पहा
– आरेखक यांची यादी येथे पहा

PMC Employees Union | सहाय्य्क महापालिका आयुक्तांचा पदभार लेखनिकी संवर्गाला! | कर्मचारी वर्गातून व्यक्त होतीय समाधानाची भावना  

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Union | सहाय्य्क महापालिका आयुक्तांचा पदभार लेखनिकी संवर्गाला! | कर्मचारी वर्गातून व्यक्त होतीय समाधानाची भावना

PMC Clerical Cadre- (The Karbhari News Service) – महापालिका सहाय्यक आयुक्त (PMC Assistant Commissioner) पदाचा पदभार हा लेखनिक संवर्गाला डावलून इतराना दिला जात होता.  त्यामुळे लेखनिक संवर्गावर अन्याय होत असल्याची भावना कर्मचारी वर्गात होती. मात्र आता प्रशासनाने नुकतेच दोन प्रशासन अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. याबाबत कर्मचारी वर्गातून समाधानाची भावना व्यक्त होत आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
याबाबत पीएमसी एम्प्लॉईज युनियन ने महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले व इतर अधिकारी यांची भेट घेतली. त्यामध्ये  पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे अद्यक्ष बजरंग पोखरकर (Bajrang Pokharkar PMC Employees Union) , उपाध्यक्ष विशाल ठोंबरे, दीपक घोडके, पूजा देशमुख, गिरीश बहिरट, गणेश मांजरे यांनी सातत्याने सेवकांवर होणाऱ्या अडचणी वरिष्ठांसमोर मांडल्या. त्याचेच फलित आज लेखनिक संवर्गाला मिळाली आहे. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचा सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी लक्ष्मण कादबाने यांना देण्यात आला आहे. तर कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी प्रकाश मोहिते यांना देण्यात आला आहे. त्याबद्दल आयुक्त राजेंद्र भोसले, अति आयुक्त पृथिराज बी पी, उपआयुक्त पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो. अशी भावना युनियनचे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी व्यक्त केली आहे.
लवकरच 3 वर्ष एकाच खात्यात झालेल्या सर्व सेवकांच्या बदल्या करण्यात याव्यात. सेवकांसाठी उपहारगृह उपलब्ध करून द्यावे. लेखनिक संवर्गातील पद्स्कीपचा प्रस्ताव शासनाकडे लवकर पाठवावा.  सर्व वर्गाच्या तात्काळ पदोन्नती करावी. अशी संघटनेची आयुक्त यांचे कडे मागणी आहे. ती आयुक्त लवकरच पूर्ण करतील अशी संघटनेला खात्री आहे.
बजरंग पोखरकर, अध्यक्ष,  पीएमसी एम्प्लॉईज युनियन पुणे महानगरपालिका

Dr Rajendra Bhosale IAS | पावसाळ्यात आकस्मिक परिस्थितीत आवश्यकता भासल्यास स्वच्छ संस्थेतील सेवकांना नियुक्त केले जाणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

Dr Rajendra Bhosale IAS | पावसाळ्यात आकस्मिक परिस्थितीत आवश्यकता भासल्यास स्वच्छ संस्थेतील सेवकांना नियुक्त केले जाणार

| महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे आदेश

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पावसाळ्यात आकस्मिक परिस्थितीत आवश्यकता भासल्यास स्वच्छ संस्थेतील सेवकांना पाण्याचा निचरा करण्यासाठी नियुक्त केले जाणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे शहरामध्ये पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टी तसेच कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने स्टॉर्म वॉटर व ड्रेनेज यावरील जाळ्यांमध्ये कचरा, राडारोडा व पालापाचोळा येतो. त्यामुळे पावसाळी जाळ्या व ड्रेनेज ब्लॉक होतात. सदर ठिकाणी कचरा, राडारोडा व पालापाचोळा तात्काळ काढल्यास पाण्याचा निचरा होऊ शकतो. याकरीता पावसामुळे पाणी साठणारी ठिकाणे यांची माहिती क्षेत्रिय स्तरावर उपलब्ध आहे.
या ठिकाणी मनपाचे सेवक तसेच मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांचेमार्फत निविदा प्रक्रियेद्वारे नेमण्यात आलेले निविदाधारकाचे मनुष्यबळ देखील उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त आकस्मिक परिस्थितीत या मनुष्यबळा व्यतिरिक्त अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासल्यास स्वच्छ संस्थेकडील मनुष्यबळ देखील उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी या कामाची आवश्यकता असेल त्यावेळेस सेवा उपलब्ध करण्यास इच्छुक असलेल्या स्वच्छ सेवकांची माहिती, संपर्क क्रमांक क्षेत्रीय कार्यालयाने संकलित करावे. असे आदेशात म्हटले आहे. तसेच सेवक नेमण्यासाठी आयुक्तांनी एक कार्यपद्धती ठरवून दिली आहे.

| अशी असणार कार्यपद्धती

स्वच्छ संस्थेच्या सेवकांकडून आवश्यकता भासल्यास ज्या दिवशी काम करून घेण्यात येईल त्यावेळचे वेतन क्षेत्रीय स्तरावरून आदा करण्यात यावे. सदर वेतन क्षेत्रीय स्तरावर ठेकेदारामार्फत नेमण्यात आलेल्या कंत्राटी सफाई सेवकांना ज्या दराने आदा केले जाते त्याच दराने आदा करण्यात यावे.
सदर कामावर क्षेत्रिय स्तरावरील उप अभियंता व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांचे नियंत्रण असेल. तसेच संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी सदर सेवकांचे उपस्थितीची नोंद ठेवणे आवश्यक आहे.
सदर कामी आवश्यक असणारी स्वच्छ सेवक संख्या, स्वच्छ सेवकांचे वेतनाचे दर इत्यादीबाबची आवश्यक ती प्रशासकीय मान्यता क्षेत्रिय स्तरावरून घेण्यात येऊन त्यांची बिले क्षेत्रिय स्तरावरून आदा करण्यात यावी.

Baner Pashan Link Road | बाणेर- पाषाण लिंकरोडचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन पूर्ण करा-चंद्रकांतदादा पाटील

Categories
Breaking News PMC Political पुणे

Baner Pashan Link Road | बाणेर- पाषाण लिंकरोडचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन पूर्ण करा-चंद्रकांतदादा पाटील

 

Chandrakant Patil – (The Karbhari News Service) –  पुणे महानरपालिकेने (Pune Municipal Corporation -PMC) बाणेर- पाषाण येथील ३६ मीटर लिंकरोडचे (Baner Pashan Link Road) काम स्थानिकांना विश्वासात घेऊन प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच नागरी समस्यांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले.

मंत्री श्री. पाटील यांनी सोमेश्वरवाडी येथील आयवरी इस्टेट रोड, बाणेर कळमकर नाल्यावर एसटीपी प्लांट बसवणे, बालेवाडी हाय स्ट्रीट आणि वाकड पूल जोड रस्ता आदी भागात महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी पुणे महानरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त महेश पाटील, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अमर शिंदे, परिमंडळ क्रमांक २ चे उपआयुक्त गणेश सोनुने आदी उपस्थित होते.

आयवरी इस्टेट- सोमेश्वरवाडी रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून याठिकाणी पदपथ, पथदिवे आदी कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच पुढील टप्प्याच्या कामाची भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावीत. बाणेर येथील ३६ मीटर लिंकरोडचे काम लांबल्याने स्थानिक लोकांची गैरसोय होत आहे. महानगरपालिकेने स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन लवकर लिंकरोडचे काम सुरू करावे. रस्त्यासाठी जागेचे अधिग्रहण, गृहनिर्माण संस्थांची संरक्षक भिंत मागे घेणे इत्यादी कामे तातडीने करावी. अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. निधीची आवश्यकता भासल्यास प्रस्ताव सादर करावा.

बाणेर येथील गणराज चौकातील कळमकर नाल्यावर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची मंत्री श्री.पाटील यांनी पाहणी केली. नाल्यातून प्रवाहित होणाऱ्या पाण्यामुळे जवळच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून एसटीपीसाठी निविदा प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी व काम सुरू करावे.

यावेळी लिंक रोडवरील स्थानिक नागरिकांशी श्री. पाटील यांनी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, कचरा, नादुरुस्त मलनि:स्सारण वाहिन्या आदींबाबत नागरिकांच्या समस्या तातडीने दूर कराव्यात. दर आठवड्याला महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात अशा कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात यावी, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

बालेवाडी येथील हाय स्ट्रीट रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे. महानगरपालिका आयुक्तांनी जागा मालकांसोबत बैठक घेवून त्यांच्या समस्या दूर कराव्यात आणि जमीन संपादन करुन रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

PMC Gunthewari Régularisation | गुंठेवारी करण्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येतील अशा प्रकारचे दर लावावेत

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Gunthewari Régularisation | गुंठेवारी करण्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येतील अशा प्रकारचे दर लावावेत

| नागरी हक्क संस्थेची महापालिका, पीएमआरडीए आणि राज्य सरकारकडे मागणी

PMC Gunthewari Régularisation- (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) नवीन आदेशाप्रमाणे गुंठेवारी करण्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येतील अशा प्रकारचे दर लवकरात लवकर ठरवून ते जाहीर करावेत.  तसेच प्रत्येक सदनिकाधारकांची सुध्दा गुंठेवारी चालू करण्याचे योग्य ते आदेश मनपा, पी.एम.आर.डी.ए. व त्या त्या स्थनिक स्वराज्य संस्था,नगरपरिषदा व अन्य जिल्हा परिषद, आदी संस्थाना योग्य आदेश जारी करावेत. निवडणूकीचे पूर्वी हे आदेश जारी करावेत. अशी मागणी नागरी हक्क संस्थेचे संस्थापक सुधीर कुलकर्णी यांनी पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि राज्य सरकारकडे केली आहे.
कुलकर्णी यांच्या निवेदनांनुसार महाराष्ट्र शासनाने जे नवीन आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे गुंठेवारी नियमित करण्यासाठी जो रेट दिला होता तो कमाल मर्यादा फायनल केलेली होती. त्याप्रमाणे २१ सालच्या आदेशामध्ये कमालदाराच्या पेक्षा जास्तीचे दर लावू नये असे स्पेसिफिक मेन्शन केले होते. त्यामुळे आता महानगरपालिकेने नवीन आदेशाप्रमाणे गुंठेवारी करण्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येतील अशा प्रकारचे दर लवकरात लवकर ठरवून ते जाहीर करावेत. आमची अशी मागणी आहे की २००१ साली गुंठेवारी नियमितीकरणाचा करण्याचा कायदा आला. त्यावेळी जे दर ठरवण्यात आले होते ते ६० रुपये चौरस मीटर इतके होते. आता कमाल मर्यादा महाराष्ट्र शासनाने नवीन आदेशाप्रमाणे जी ठरवली आहे ती १०० चौरस मीटर करता २६० च्या पुढे जात आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आपल्याला या आदेशामध्ये ते दर ठरवण्याचा अधिकार आयुक्त यांना दिलेला असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या त्या प्राधिकरणाने स्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि नगरपरिषदा व अन्य काही संस्था असतील त्यांनी नव्याने कमीत कमी दर प्रस्तावित करून त्याप्रमाणे ते जाहीर प्रगटनाद्वारे जाहीर करून प्रगटन करून प्रसिद्ध करून ताबडतोब चालू करण्यासाठी अंमलबजावणी करावी.
कुलकर्णी यांनी पुढे म्हटले आहे कि, आम्ही याआधी महाराष्ट्र शासनामध्ये मागील पंधरा दिवसापूर्वी जे पत्र पाठवलेले होते त्या पत्राच्या अनुषंगाने काल हे नवीन आदेश जारी झालेले आहे त्यामुळे आता जर ठरवण्याचा अधिकार हा  आयुक्तांनी २००१ च्या दराच्या दुप्पट दराने म्हणजेच १२० रुपये चौरस मीटर प्रमाणे सरसकट सदनीकाधारकांची मोकळ्या जागांची व अन्य जागांची दराचे आकारणी ताबडतोब ठरवून अंमलबजावणीसाठी तात्काळ कार्यवाही करावी व योग्य ते आदेश काढून प्रसिद्धीच्या माध्यमातून जाहीर करून सामान्य नागरिकांना न्याय द्यावा. तसेच गुंठेवारीही फक्त बंगलो प्लॉट वरील बांधकाम व वैयक्तिक फ्लॅट ची सुद्धा व्हावी आणि त्याचे रेट सर्वसामान्य लोकांना परवडतील असे करून गुंठेवारी व्हावी.
उदा. धायरी येथील मिळकती वरील १०० चौ.मी. प्लॉट मध्ये १७० चौ.मी. बांधकाम होते तरी त्याचे चलन ४,७५,०००/- इतके भरले असून म्हणजे जवळपास २६०/- पर चौ. फूट भरले. म्हणजे सर्वसामान्य लोकांना हे परवडणार नाही. अटी मध्ये सवलत मिळावी म्हणून २००१ च्या गुंठेवारी च्या नियमानुसार शुल्क भरून घेतले तर गुंठवारी खूप प्रमाणात होतील त्यामुळे शासनाला निधी मिळेल.

तसेच सरसकट फ्लॅट गुंठेवारी तांत्रिक अडचण मुळे शक्य नसेल तर किमान मान्य बिल्डिंग वर एक किंवा २ मजले चढवले असतील तर किमान या फ्लॅट ची गुंठेवारी व्हावी. कारण ती बिल्डिंग रहिवासी झोन मध्ये असतेच तसेच रोड मध्ये बाधित नसते शिवाय सामासिक अंतरे सुद्धा मान्य बिल्डिंग नकाशा प्रमाणे असतात .त्यामुळे काही फ्लॅट ची तरी गुंठेवारी होऊ शकते. या मुद्यांचा विचार व्हावा. अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.

PMC Ward no 2 | पावसाळी समस्येतून प्रभाग दोन मधील नागरिकांची होणार सुटका | तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Ward no 2 | पावसाळी समस्येतून प्रभाग दोन मधील नागरिकांची होणार सुटका  | तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

 

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पत्रानंतर आयुक्तांचा प्रभाग दोन मध्ये पाहणी दौरा

 

Pune Rain – (The Karbhari News Service) – दरवर्षी होणाऱ्या पावसातील समस्येच्या कोंडीतून पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांची सुटका होणार आहे. पावसाळी लाईन स्वतंत्र करण्याबरोबर या भागातील समस्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाहण्याचा शिरकाव होतो. याबाबत उपाययोजना करण्यासाठी पाहणी दौरा करण्याचे पत्र माझी उपमहापौर सिद्धार्थ धेडे (Dr Siddharth Dhende) यांनी  आयुक्तांना दिले होते. त्या पत्राची दखल घेत आयुक्त भोसले यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना उपाययोजनाबाबत सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यात पुणे महापालिकेच्या उपायुक्त किशोरी शिंदे, येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त चंद्रसेन नागटिळक, नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर, ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र जाधव, पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आदींसह पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी बाळासाहेब जानराव , विशाल बोर्डे , प्रभाग दोन मधील भाजपा प्रवक्ते मंगेश गोळे, आंबेडकर कॉलनीतील ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश शिंदे, अहिल्या सोसायटी, पर्णकुटी सोसायटी, राम सोसायटी, हरीगंगा सोसायटीचे सभासद, नागपूर चाळ, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, त्रिदलनगर, शांतीरक्षक, हम्स सोसायटीचे सभासद पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

पावसाळ्यात प्रभाग दोन मधील निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांनी पत्र दिले होते. या मध्ये धेंडे यांनी नमूद केले होते की, प्रभाग दोन मधील विकसित आराखड्‌यामधील रस्ते ताब्यात घ्या. पावसाळ्यामध्ये ई-कॉमर्स झोन चौक, आंबेडकर चौक, आळंदी रोडवरीलल स्वांमी वाल्मिकि चौक व प्रभाग क्र. २ मधील नाला यावरील झालेली अतिक्रमणे हटवा आदी मागणी करण्यात आली होई. पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाण्याचा शिरकाव होतो. इंदिरानगर, शांतीनगर, पंचशील नगर, चंद्रमाननगर, मोझेनगर, जाधवनगर, टिंगरेनगरचा काही भाग या परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी जाण्याचा त्रास होतो. तसेच नाल्याच्या परिसरात असलेल्या घरांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यावर उपाययोजना करण्याचे पत्र डॉ. धेंडे यांनी आयुक्तांना दिले होते.

यापत्राची दखल घेत आयुक्त भोसले यांनी पाहणी केली. या वेळी तत्काळ उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिल्या. या मध्ये महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील ड्रेनेजची लाईन पावसाळी लाईनपासून स्वतंत्र करण्याची सूचना त्यांनी दिली. तसेच आंबेडकर चौकातील दुर्गंधीयुक्त पाण्यापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हरिगंगा सोसायटीमधील गोठ्यातून ६०० एमएल पावसाळी लाईन मंजूर करण्यात आली. संरक्षण विभागाकडून ज्या ठिकाणी नाले अडविण्यात आले आहेत. त्या बाबत मंगळवारी (दि. १८) बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. हम्स सोसायटीकडे जाणार शांतीरक्षक सोसायटीचा नैसर्गिक नाला खुला करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. नगररोड वरील असणाऱ्या नाल्याचे पाणी खुले करणे. अग्रेसन ते ई कॉमेरझोन दरम्यानचा रस्ता ताब्यात घेऊन या ठिकाणी स्वतंत्र पावसाळी लाईन मंजूर करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त भोसले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. या सह पावसाळ्यात प्रभाग दोन मध्ये आपत्कालीन यंत्रणा देण्याबाबत देखील आयुक्तांनी सकारात्मकता दाखवली आहे.

—-
पावसाळ्यात नागरिकांना समस्या भेडसावत होत्या. अनेकांच्या घरात पाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. या बाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी दिल्या होत्या. लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतःही हे पाहत होतो. त्यानुसार आयुक्तांना पत्र दिले होते. त्यांनी पाहणी करून सकरात्मक मार्ग काढले आहेत. या बाबत प्रभागातील नागरिकही समाधान व्यक्त करत आहेत.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.
—————————————

Dr Rajendra Bhosale IAS | पावसाळी कामाची टेंडर प्रक्रिया करताना ठेकेदार क्षेत्रीय कार्यालय जवळचाच असावा | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे प्रशासनाला आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

Dr Rajendra Bhosale IAS | पावसाळी कामाची टेंडर प्रक्रिया करताना ठेकेदार क्षेत्रीय कार्यालय जवळचाच असावा | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे प्रशासनाला आदेश

Pune Municipal Corporation- PMC -(The Karbhari News Service) – पुणे महापालिकेकडून (PMC Pune Municipal Corporation) पावसाळी कामाची टेंडर प्रक्रिया केली जाते. काही वेळेस महापालिकेला अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामुग्रीची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे टेंडर प्रक्रिया करताना ठेकेदार हा संबंधित क्षेत्रीय कार्यालय जवळचाच असावा. असे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी प्रशासनाला दिले आहेत. (Pune PMC News) 
आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रात पावसाळी वाहिन्यांची सफाई करणे, मलवाहिन्यांची सफाई करणे, चेंबर सफाई करणे या कामासाठी पुणे महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या मुख्य खात्याकडून निविदा प्रक्रिया राबविली जाते. यात सदर कामासाठी पावसाळी कालावधीत मनुष्यबळ व साधन सामुग्री पुरविणे याचा देखील समावेश आहे. तथापि आकस्मिक प्रसंगी अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामुग्रीची आवश्यकता भासू शकते.
यासाठी मुख्य अभियंता पथ/ प्रकल्प विभाग, मलनिस्सारण विभाग यांनी आवश्यकतेनुसार तातडीने मनुष्यबळ उपलब्ध व्हावे.  यासाठी मुख्य खात्यांनी त्यांचेमार्फत सुरू असलेले कामांचे निविदाधारकांकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ व यंत्रसामुग्री याची माहिती त्या-त्या क्षेत्रिय कार्यालयाला उपलब्ध करून द्यावी. अशी निश्चिती करताना तातडीने उपलब्धता व्हावी याकरिता शक्यतो असा निविदाधारक त्या क्षेत्रिय कार्यालय किंवा जवळचा परिसरातील असेल असे पहावे. असे आदेशात म्हटले आहे.

Pune Congress on Pune Rain | मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केल्या या मागण्या! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pune Congress on Pune Rain | मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केल्या या मागण्या!

 

Pune Congres – PMC Pune – (The Karbhari News Service) – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये पुणे शहरात पावसाळी परिस्थितीमुळे उद्‌भवलेला हाहाकार व नागरिकांची होणारी प्रचंड गैरसोय या बबातची जाणीव मा. आयुक्त यांना करून देण्यात आली. निवेदन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

नाल्याच्या कडेला व पात्रात झालेली गुंठेवारीतील बांधकामे, पुराच्या पाण्याचा लोंढा जाण्यासाठी नाल्याचे अपुरे पात्र, मैलापाणी वाहून आणणारे नाल्यातील चेंबर्स, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले ‘कल्व्हर्ट्स’ यामुळे शहरात एकजरी जोरदार पावूस झाल्यास पूरस्थिती निर्माण होतें हा गेल्या तीन चार वर्षांपासून पुणे शहराच्या अवस्थेचा अनुभव असतानाही पुणेकरांच्या नशिबी मान्सून काळात वारंवार
पूरस्थिती, वाहतूक कोंडी व वित्तीय हानी यांना हतबलतेणे सामोरे जायचे एव्हढेच राहिले आहे. असा आरोप कॉंग्रेस कडून करण्यात आला.

पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने खालील मागण्या आयुक्त पुणे मनपा यांच्याकडे करण्यात  आल्या 

१) मान्सूनपूर्व व मान्सून कालावधीतील सर्व कामे आयुक्त स्तरावरून दक्षता विभागाच्या निगराणीखाली करण्यात यावी.
२) चुकीच्या पद्धतीने नाले वळवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात पाणी जाण्याचे प्रकार घडत असल्यामुळे आयुक्तांच्या अधिकारात नाला वळवण्यास दिलेल्या सर्व परवानग्या रद्दबातल करून नाल्यांचा प्रवाह नैसर्गिक परिस्थिती प्रमाणे पूर्ववत करण्यात यावा.
३) पुणे शहरातील नाल्यातील चौकातील फुटपात वरील अतिक्रमणे तातडीने काढून टाकण्यात यावे.
४) पुणे शहरातील साईड मार्जिन फ्रंट मार्जिन नालापात्र इमारतीच्या टेरेसवर निकषाशी विसंगत असलेल्या सर्व जाहिरात फलकांवर युद्ध स्तरावर कारवाई करण्यात यावी.
५) शहरात जागोजागी रस्त्यांवर खड्डे पाडायचे प्रमाण वाढले असल्याने रस्त्यावर खड्डे पडल्यास रातोरात सदर खड्डे बुजवण्याची यंत्रणा उभी करून रस्ते खड्डे मुक्त ठेवण्यात यावेत.

 

     यावेळी माजी आमदार रमेश बागवे, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्‍यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, सुजात शेट्टी, महिला अध्यक्षा पुजा आनंद, समीर शेख, संतोष आरडे, सुनिल शिंदे, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, मेहबुब नदाफ, सुजित यादव, हेमंत राजभोज, रमेश सकट, अक्षय माने, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, द. स. पोळेकर, बाळासाहेब अमराळे, सतिश पवार, प्रदिप परदेशी, रवि ननावरे, राजेंद्र शिरसाट, जयसिंग भोसले, शिवराज भोकरे, आशितोष शिंदे, सुंदर ओव्‍हाळ, प्रकाश पवार, सुनिल घाडगे, रवि पाटोळे, ऋषिकेश बालगुडे, महेश हराळे, नारायण पाटोळे, रवि आरडे आदींसह काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.