Tag: pune rain news
Heavy rain forecast for the next 5 days in Pune District
Regional Meteorological Department forecast
Heavy Rain in Pune | पुणे आणि परिसरात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता!
| प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज
पुणे | पुणे शहर (Pune City) आणि जिल्ह्यात (Pune District) पुढील ५ दिवस म्हणजे २३ ते २७ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाकडून (Regional Meteorological center Mumbai) वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Heavy Rain in Pune)
गेल्या आठवड्यापासून राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाउस कोसळतो आहे. नुकतेच नागपूर शहरात पावसाने दाणादाण उडवून दिले. दरम्पुयान पुणे शहर आणि परिसरातही गेल्या दोन दिवसापासून पाउस पडतो आहे. पुण्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. दरम्यान मुंबई हवामान विभागाने पुणे आणि पुणे जिल्ह्यात पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील ५ दिवस म्हणजे २३ ते २७ सप्टेंबर पर्यंत म्हणजेच आजपासून येत्या बुधवार पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
News Title|Heavy Rain in Pune | Chance of heavy rain for the next 5 days in Pune and the surrounding area! | Regional Meteorological Department forecast
Khadakwasla Water Discharge | खडकवासला धरणातून आज 5 वाजता 1 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार
Khadakwasla Dam | Pune Rain | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 5 दिवसांत वाढले 1 टीएमसी पाणी
| धरणांत सद्यस्थितीत 5.10 TMC पाणी
एक दिवसाआड पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता कमी
4 धरणांत 17.50% इतके पाणी
Pune Rain Update | Heavy rain forecast in Pune tomorrow and the day after
| Forecasted by Pune Meteorological Department
Pune Rain Update | उद्या आणि परवा पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज
| हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला
पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली | पाणीपुरवठा करणारी धरणे ९७% भरली
| धरणामध्ये २८.२२ TMC पाणीसाठा
पुणे | शहर आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. धरणामध्ये २८.२२ TMC पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजेच धरणे सुमारे ९६.८२% भरली आहेत. त्यामुळे आता शहरवासीयांचा वर्षभराचा पाणी प्रश्न सुटला आहे.
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. धरण क्षेत्रात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणातील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. धरणामध्ये २८.२२% पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजेच धरणे सुमारे ९६.८२% भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. मागील वर्षी याच दिवशी २७.९१ टीएमसी जमा झाले होते.
खडकवासला धरण १००% भरले आहे. धरणातून काळ २६ हजार कुसेक पाणी सोडण्यात आले होते. तर आज ते १३८९१ कुसेक आणि सोडण्यात आले. पानशेत धरण देखील ९९% भरले आहे. वरसगाव धरण ९८% तर टेमघर ८३% भरले आहे.