Khadakwasla Water Discharge | खडकवासला धरणातून आज 5 वाजता 1 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार

Categories
Breaking News social पुणे

Khadakwasla Water Discharge | खडकवासला धरणातून आज 5 वाजता 1 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार 

Khadakwasla Water Discharge | खडकवासला धरण (Khadakwasla Dam) परिसरात होणाऱ्या पावसामुळे धरण १०० टक्के म्हणजे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. आज संध्याकाळी ५.०० वाजता खडकवासला धरणातून १ हजार क्युसेक्स पाण्याचा नदीपात्रात (Riverfront) विसर्ग करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.  (Khadakwasla Water Discharge)
नागरिकांनी नदीपात्रात  उतरु नये. नदीपात्रात तत्सम साहित्य किंवा जनावरे असल्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी. असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.
—-
News Title | Khadakwasla Water Discharge | 1 thousand cusecs of water will be released from Khadakwasla Dam today at 5 o’clock

Khadakwasla Dam | Pune Rain Update | खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता | नदी काठच्या लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे

Khadakwasla Dam | Pune Rain Update | खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता | नदी काठच्या लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Khadakwasla Dam | Pune Rain Update |    24 जुलै रोजी खडकवासला धरण (Khadakwasla Dam) 82% टक्के क्षमतेने भरले आहे. तरी धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे येत्या 24 ते 48 तासांमध्ये खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये (Mutha Riverfront) पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. (Khadakwasla Dam | Pune Rain Update)
   शाखाधिकारी, खडकवासला पाटबंधारे शाखा (Irrigation Department Pune) यांनी आवाहन केले आहे  की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.  सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. (Pune Rain)
   —–
News Title | Khadakwasla Dam | Pune Rain Update | Possibility of releasing water from Khadakwasla Dam into Mutha River People on the banks of the river are urged to be vigilant