Khadakwasla Canal Advisory Committee | पुणे महानगरपालिकेने गळती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात | अजित पवार | 25 नोव्हेंबर पासून रब्बी आवर्तन

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र शेती

Khadakwasla Canal Advisory Committee | पुणे महानगरपालिकेने गळती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात | अजित पवार | 25 नोव्हेंबर पासून रब्बी आवर्तन

| खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Khadakwasla Canal Advisory Committee | खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्याचे रब्बीचे आवर्तन २५ नोव्हेंबरपासून सोडण्यात येईल, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) वितरणातील पाणीगळती रोखण्यासह आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, रवींद्र धंगेकर, संजय जगताप, भीमराव तापकीर, चेतन तुपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदींसह समितीचे निमंत्रित सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत पुणे महानगरपालिकेचा पाणीवापर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, शहरातील पाणीगळती आदींच्या अनुषंगाने चर्चा झाली. सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पाणीगळती रोखण्यासह आवश्यक उपाययोजना करुन काटकसर करावी, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.
यावेळी दौंड नगरपालिका व ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी, नवीन मुठा उजवा कालवा, सणसर जोड कालवा, जनाई शिरसाई उपसा सिंचना योजना, मुंढवा जॅकवेलद्वारे पुणे मनपाने उपलब्ध करुन दिलेल्या सांडपाण्याद्वारे जुना मुठा उजवा कालव्यातून शेतीसाठी देण्यात येणारे पाणी आदींच्या अनुषंगाने चर्चा झाली.
पवना व चासकमान प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या प्रकल्पांच्या सिंचन, बिगर सिंचन आदी पाणी नियोजनाबाबत कोणतीही अडचण नाही असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले. खडकवासला प्रकल्पात ९५  टक्के पाणीसाठा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पातील पाणीसाठा तसेच नियोजनाची माहिती दिली.
0000

Khadakwasla Dam | Pune Rain Update | खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता | नदी काठच्या लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे

Khadakwasla Dam | Pune Rain Update | खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता | नदी काठच्या लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Khadakwasla Dam | Pune Rain Update |    24 जुलै रोजी खडकवासला धरण (Khadakwasla Dam) 82% टक्के क्षमतेने भरले आहे. तरी धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे येत्या 24 ते 48 तासांमध्ये खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये (Mutha Riverfront) पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. (Khadakwasla Dam | Pune Rain Update)
   शाखाधिकारी, खडकवासला पाटबंधारे शाखा (Irrigation Department Pune) यांनी आवाहन केले आहे  की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.  सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. (Pune Rain)
   —–
News Title | Khadakwasla Dam | Pune Rain Update | Possibility of releasing water from Khadakwasla Dam into Mutha River People on the banks of the river are urged to be vigilant

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणे 50% भरली 

Categories
Breaking News social पुणे

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणे 50% भरली

| धरणांत सद्यस्थितीत 14.53 TMC पाणी

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर अशी चार धरणे 50% भरली आहेत. 4 धरणांत मिळून 14.53 TMC पाणी साठा झाला आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. (Khadakwasla Dam | Pune Rain Update)
मागील वर्षी याच दिवसांत चार धरणामध्ये 20 टीएमसी पाणी होते. यंदा मात्र  पाणी साडे पाच टीएमसी ने कमी आहे. दरम्यान पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात (Pune Water Cut) करण्यात आली आहे. काही भागांत दर गुरुवारी तर काही भागात वेगवेगळ्या दिवशी पाणी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पाण्याची बचत केली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी कमी होत चालले होते. मात्र आता पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. तरीही पाणीकपात हटणार नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  (Pune water cut update)
खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत 14.53 टीएमसी म्हणजे 49.86% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) 1.24 टीएमसी म्हणजे 62.92%,  पानशेत धरणांत (Panshet Dam) 5.62 टीएमसी म्हणजे 52.82, वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) 6.42 टीएमसी म्हणजे 50.11%, तर टेमघर धरणांत (Temghar Dam) 1.24 टीएमसी म्हणजे 33.49% इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत 20 टीएमसी म्हणजे 68.61% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
—-
News Title | Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | 4 dams in Khadakwasla project are 50% full | 14.53 TMC of water in dams at present

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 2 दिवसांत वाढले 1 टीएमसी पाणी

Categories
Breaking News social पुणे

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 2 दिवसांत वाढले 1 टीएमसी पाणी

| धरणांत सद्यस्थितीत 7.26 TMC पाणी

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसांत धरणामध्ये 1 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.  गुरुवारी हा साठा 6.24 टीएसमी होता. आज 5 वाजता हा साठा 7.26 टीएमसी झाला आहे. पुणेकरांना हा दिलासा मानला जात आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. (Khadakwasla Dam | Pune Rain Update)
मागील वर्षी याच दिवसांत चार धरणामध्ये 5.45 टीएमसी पाणी होते. यंदा मात्र  पाणी जास्त आहे. तसेच पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात (Pune Water Cut) करण्यात आली आहे. काही भागांत दर गुरुवारी तर काही भागात वेगवेगळ्या दिवशी पाणी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पाण्याची बचत केली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी कमी होत चालले होते. मात्र आता पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. (Pune water cut update)

4 धरणांत 24.89% इतके पाणी

खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत 7.26 टीएमसी म्हणजे 24.89% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) 0.99 टीएमसी म्हणजे 49.97%, पानशेत धरणांत (Panshet Dam) 2.64 टीएमसी म्हणजे 24.80%, वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) 3.19 टीएमसी म्हणजे 24.87% तर टेमघर धरणांत (Temghar Dam) 0.44 टीएमसी म्हणजे 11.88% इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत 5.45 टीएमसी म्हणजे 18.68% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
—-
News Title | Khadakwasla Dam Chain |  Pune Rain Update |  1 TMC water has increased in last 2 days in 4 dams of Khadakwasla project

Water cuts in Pune | येत्या गुरुवार पासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचे पाणी बंद राहणार | 20 ठिकाणी बसवले एअर वॉल 

Categories
Breaking News PMC social पुणे

Water cuts in Pune | येत्या गुरुवार पासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचे पाणी बंद राहणार | 20 ठिकाणी बसवले एअर वॉल

– पाणी जपून वापरण्याचे महापालिका प्रशासनाचे पुणेकरांना आवाहन

Water cuts in Pune | पुणेकरांना आगामी काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून (PMC Pune Water Department) करण्यात आले आहे. कारण अल निनो (El-Nino) वादळाच्या धर्तीवर पाणी बचत करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) घेण्यात आला आहे. त्यानुसार आता 18 मे पासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाचे नियोजन पूर्ण  झाले आहे. शुक्रवार आणि शनिवारी काही परिसरात कमी दाबाने पाणी येऊ शकते, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Pune Water cut)
अलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे (निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने आराखडा केला आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणीमिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत होणार होता. त्यानुसार ही बैठक झाली.  पाणीकपात करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)

20 ठिकाणी बसवण्यात आले एअर वॉल

दरम्यान शहरात असे काही भाग आहेत ज्या ठिकाणी एका दिवशी पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो. (Pune water cut) त्यामुळे नागरिक त्रासून जातात. अशा भागात प्रशासन कशा पद्धतीने नियोजन करणार, हा कळीचा मुद्दा आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी केली आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले कि शहरातील असे काही भाग आहेत ज्यांना टेल एन्ड (Tail End) म्हटले जाते. अशा ठिकाणी एक दिवस पाणी बंद ठेवले तर पुढील दोन दिवस पाणी कमी दाबाने येते. याबाबत तांत्रिक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. असे शहरात 20 परिसर आहेत. तिथे एअर वॉल (Air Wall) बसवण्यात आले आहेत. ज्यामुळे हवेचा दाब कमी होईल आणि पाण्याचा दाब वाढेल. तर काही ठिकाणी वेन्ट बसवण्यात आले आहेत.  वारजे, कर्वेनगर,  येरवडा, खराडी, तळजाई पठार, रास्ता पेठ, नाना पेठ अशा ठिकाणी हे वॉल बसवण्यात आले आहेत. (Pune pmc News)
—-
News Title | Water cuts in Pune | From next Thursday, water will be shut off in the entire Pune city every Thursday Air wall installed at 20 places

Industrial water usage | औद्योगिक पाणी वापर दाखवा आणि बिल घ्या  | जलसंपदा विभागाला पुणे महापालिकेचे ‘चॅलेंज’ 

Categories
Breaking News PMC पुणे

औद्योगिक पाणी वापर दाखवा आणि बिल घ्या

| जलसंपदा विभागाला पुणे महापालिकेचे ‘चॅलेंज’

पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC Pune)  पुणे मनपा क्षेत्रामध्ये येत असलेल्या विविध घरे, सदनिका, कार्यालये,शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था व अन्य संस्थांना घरगुती वापरासाठी (Domestic Use) म्हणजेचपिण्यासाठी, घरगुती कपडे, भांडी व अन्य स्वच्छता विषयक कामांसाठी पाणी पुरवठा करण्यात येतो. पुणे मनपामार्फत कुठल्याही औद्योगिक अथवा व्यापारी वापरासाठी (Industrial use) पाणी पुरविण्यात येत नाही. असा दावा पुणे महापालिकेने केला आहे. औद्योगिक पाणी वापर दाखवा आणि बिल घ्या, असे आव्हान महापालिकेने जलसंपदा विभागाला (water resources dept) केले आहे. तसेच औद्योगिक पाणी वापरापोटी बिलाची रक्कम आकारण्यात न येता केवळ घरगुती (Domestic) पाणी वापरासाठीचे बिल आकारण्यात यावे. असे देखील महापालिकेने जलसंपदा विभागाला म्हटले आहे.

पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाला हे आव्हान दिले आहे. यामुळे महापालिकेचे पैसे वाचणार आहेत. महापालिकेने याबाबत जलसंपदा विभागाला पत्र लिहिले आहे. त्यानुसार  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १९६ मुद्दा क्र. २ अन्वये धंदयाच्या किंवा विक्रीच्या प्रयोजनासाठी शहरातील कोणत्याही रहिवाश्यास पुणे मनपामार्फत पाणी पुरविता येत नाही. पुणे पाटबंधारे मंडळ मार्फत प्राप्त झालेल्या सन २०१२ ते आजतागायत पर्यंतच्या सर्व पाणी देयकांमध्ये औद्योगिक पाणी वापराकरिता पुणे मनपास बिल आकारणी करण्यात आलेली आहे. मात्र पुणे मनपामार्फत औद्योगिक वापराकरिता पाणी पुरविण्यात येतच नसल्याने औद्योगिक पाणी वापरापोटी आकारलेले बिल चुकीचे ठरते.  पुणे मनपामार्फत औद्योगिक संस्थांना केवळ पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी (Domestic Use) पाणी पुरविले जाते. त्यामुळे सदर पाणी वापरास औद्योगिक पाणी वापर संबोधणे चुकीचे आहे. (pune municipal corporation)
महापालिकेने पुढे म्हटले आहे तरी, पुणे महानगरपालिका बिगर सिंचन पाणी वापराच्या सन २०१२ ते आजतागायत पर्यंतच्या पाणी देयकांमधील औद्योगिक पाणी वापरापोटी आकारलेले पाणी दर ऐवजी घरगुती पाणी वापराचे दर आकारून फरकाची रक्कम पुणे मनपास परत करण्यात यावी व भविष्यात देण्यात येणाऱ्या पाणी देयकांमध्ये औद्योगिक पाणी वापरापोटी रक्कम आकारण्यात न येता केवळ घरगुती (Domestic) पाणी वापरासाठीचे बिल आकारण्यात यावे. यावर आता पाटबंधारे विभागाची भूमिका काय असेल. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
| पाटबंधारे आणि महापालिकेची पाहणी 
 पाण्याच्या वाढीव बिलावरून पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागात जुंपली आहे. जलसंपदा विभाग वाढीव बिले देते, अशी महापालिकेने भूमिका घेतली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर देखील याबाबत चर्चा झाली आहे. त्यावेळी दोघे मिळून याबाबत चर्चा करा. असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यावरून दोन्ही विभागामध्ये चर्चा सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून दोन्ही विभागानी आज एकत्र पाहणी करत बिलाबाबत चर्चा केली.

MWRRA | PMC Pune | पुणे महापालिकेला वाढीव जल दराबाबत दिलासा नाही!   | MWRRA कडून महापालिकेची मागणी अमान्य 

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिकेला वाढीव जल दराबाबत दिलासा नाही!

| MWRRA कडून महापालिकेची मागणी अमान्य

पुणे | धरणातून घेण्यात येणाऱ्या पाण्याचे महापालिकेला (PMC Pune) जलसंपदा विभागाला (Irrigation Dept) शुल्क अदा करावे लागते. मात्र २९ मार्च २०२२ च्या आदेशाद्वारे जलदरांमध्ये MWRRA यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे. साधारणपणे हे दर दुप्पट ते तिप्पट करण्यात आलेले आहेत. तसेच त्यामध्ये दर वर्षी मागच्या वर्षापेक्षा १०% ने वाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. यामुळे महापालिकेवर आर्थिक भार येणार आहे. त्यामुळे महापालिकेने दरवाढ रद्द करण्याची मागणी MWRRA कडे केली होती. मात्र प्राधिकरणाने ही मागणी अमान्य केली आहे. (Pune Municipal corporation)
काय होती महापालिकेची मागणी?
पुणे महानगरपालिकेला खडकवासला धरणामधून (Khadakwasla Dam) मंजूर असलेला ११.५ TMC हा पाणी कोटा सुमारे २० वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर मागील दोन दशकांमध्ये पुणे महानगरपालिकेची तीन वेळा हद्दे वाढ झाली असून लोकसंख्येमध्ये देखील झपाट्याने वाढ झालेली आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत वारंवार वाढीव पाणी कोटा मंजूर होणेसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. तसेच दरवर्षी जलसंपदा विभागाला सादर करण्यात येणाऱ्या ‘वॉटर बजेट’ (Water Budget) मध्ये देखील लोकसंख्येवर आधारित पाण्याची मागणी करण्यात येते परंतु, वाढीव पाणी कोट्याला अदयाप मंजुरी मिळालेली नाही. फक्त भामा आसखेड धरणातून २.६७ TMC कोट्याला मंजुरी मिळालेली आहे. मात्र हा पाणी कोटा देखील ११.५ TMC मध्येच धरला जात आहे जे चुकीचे आहे. वाढीव पाणी कोटा मंजूर होत नसल्याने मंजूर कोट्या पेक्षा अतिरिक्त पाणी वापर हा जास्त दाखवण्यात येत असून, नवीन प्रस्तावित दरामुळे मनपावर खूप मोठा बोजा येणार आहे.
– पुणे महानगरपालिकांच्या विविध खात्यामधील प्रकल्पांकरिता व बांधकाम व्यावसायिकांकडून बांधण्यात येणान्या खाजगी प्रकल्पाकरिता पुणे मनपाच्या अस्तित्वातील STP मधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात यावा असे आदेश निर्गमित करण्यात आले असून त्याला समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. दिनांक २९ मार्च २०२२ च्या आदेशाद्वारे जलदरांमध्ये मा. MWRRA यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे. साधारणपणे हे दर दुप्पट ते तिप्पट करण्यात आलेले आहेत तसेच त्यामध्ये दर वर्षी मागच्या वर्षापेक्षा १०% ने वाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. तसेच पाणी वापराचे यापूर्वीचे स्लॅब बदलण्यात येऊन नवीन स्लॅब ज्यादा दराने प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. मंजूर पाणी कोट्या पेक्षा जास्त पाणी वापराला दुप्पट दराने दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.

ही  दर वाढ विचारात घेता, पुणे महानगरपालिका नेहमीच्या रकमेपेक्षा दुप्पट ते तिप्पट रक्कम जलसंपदाला द्यावी लागणार असून त्यामुळे मनपाच्या तिजोरीवर मोठा भार येणार आहे. पुणे शहरामध्ये करण्यात येणाऱ्या विकास कामांना याचा मोठा फटका बसणार असून, अंतिमतः समान्य नागरिकांना या दरवाढीचा बोजा सहन करणे अपरिहार्य होणार आहे.  उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर करण्याचा महानगरपालिका सतत करत असून प्रस्तावित दरवाढ हि जाचक ठरणार आहे. तरी सदरची प्रस्तावित दरवाढ रद्द करण्यात यावी.
| MWRRA ने काय आदेश दिले?
 महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नियंत्रण कालावधी सन २०१७ ते सन २०२० या कालावधीकरिता ११ जानेवरी, २०१८ रोजी व नियंत्रण कालावधी सन २०२२ ते सन २०२५ या कालावधीकरिता २९ मार्च, २०२२ रोजी
ठोक जलप्रशुल्क निर्धारित केले. सदरचे ठोक जलप्रशुल्क करण्यापूर्वी अधिनियमातील कलम ११ (घ) मधील नमूद तरतुदींनुसार संबंधित पाणीवापर लाभार्थ्यांशी सल्लामसलत करुन त्यानंतरच ठोक जलप्रशुल्क निर्धारित केले होते. सबब आपली दरवाढ रद्द करण्याबाबतची मागणी मान्य
करता येत नाही.

Khadakwasla Dam Chain | खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे १००% भरली |चारही धरणातून एकाच वेळी विसर्ग

Categories
Breaking News पुणे

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे १००% भरली

|चारही धरणातून एकाच वेळी विसर्ग

पुणे शहरासह जिल्ह्याला पिण्यास व शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणात मिळून २९.१५ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ही धरणे १०० टक्के भरल्यामुळे त्या चारही धरणातून विसर्ग सुरू आहे.

धरण साखळीतील पाणीसाठ्याच्या दृष्टीने सर्वात मोठे धरण म्हणून वरसगाव धरण आहे. वेल्हे व मुळशी या दोन लगतच्या तालुक्यात याचे पाणलोट क्षेत्र आहे. मोसे नदीवरील या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता १२.८२ टीएमसी आहे. हे धरण यंदा १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. या धरणातून पाच हजार ७१० क्यूसेकने विसर्ग सुरु आहे.

धरण साखळीतील पाणीसाठ्याच्या दृष्टीने दुसरे मोठे धरण म्हणून पानशेत धरण आहे. या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता १०.६५ टीएमसी आहे. हे धरण यंदा १० ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. या धरणातून सध्या तीन हजार ९०८ क्यूसेकने विसर्ग सुरु आहे.

टेमघर धरणाची उपयुक्त साठवण क्षमता ३.७१ टीएमसी आहे. यंदा हे धरण १९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता १०० टक्के भरले. या धरणातून ३५० क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. वरसगाव, पानशेत व टेमघर या तिन्ही धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरणात जमा होते. या तिन्ही धरणातून मिळून खडकवासला धरणात पाणी जमा होत आहे. खडकवासला धरणातून सायंकाळी १० हजार २४६ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. अशा प्रकारे या धरणातून आत्तापर्यंत ११ टीएमसी पाणी नदीत सोडले आहे.

Pune Rain | पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली | पाणीपुरवठा करणारी धरणे ९७% भरली 

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली | पाणीपुरवठा करणारी धरणे ९७% भरली

| धरणामध्ये २८.२२ TMC पाणीसाठा

पुणे | शहर आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. धरणामध्ये २८.२२ TMC पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजेच धरणे सुमारे ९६.८२% भरली आहेत. त्यामुळे आता शहरवासीयांचा वर्षभराचा पाणी प्रश्न सुटला आहे.

खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. धरण क्षेत्रात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणातील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. धरणामध्ये २८.२२% पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजेच धरणे सुमारे ९६.८२% भरली आहेत. त्यामुळे  पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. मागील वर्षी याच दिवशी २७.९१ टीएमसी जमा झाले होते.

खडकवासला धरण १००% भरले आहे. धरणातून काळ २६ हजार कुसेक पाणी सोडण्यात आले होते. तर आज ते १३८९१ कुसेक आणि सोडण्यात आले. पानशेत धरण देखील ९९% भरले आहे. वरसगाव धरण ९८% तर टेमघर ८३% भरले आहे.

 

Discharge water from Khadakwasla Dam | खडकवासला धरणातून २५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग 

Categories
Breaking News social पुणे

खडकवासला धरणातून २५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग

| सकाळी ६वाजता विसर्ग वाढवला

पुणे | शहर आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील धरणामध्ये गेल्या ८ दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे खडकवासला धरण ९४% भरले आहे. खडकवासला धरणाची क्षमता कमी असल्याने पाटबंधारे विभागाने मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री १२ वाजले पासून विसर्ग करण्यात येत आहे. रात्री धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 856 क्युसेक विसर्ग वाढवून  सकाळी ६ वाजले पासून २५६८ क्युसेक करण्यात येत आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

चार धरणामध्ये १०.७९ टीएमसी पाणी जमा

गेल्या ८ दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची चांगलीच वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणामध्ये १०.७९ टीएमसी पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी याच दिवशी ८.६३ टीएमसी पाणी धरणामध्ये होते. पाऊस चांगला सुरु असल्याने ही वाढ होतच राहिल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान खडकवासला धरणाची क्षमता कमी असल्याने पाटबंधारे विभागाने मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री १२ वाजले पासून विसर्ग करण्यात येत आहे. रात्री धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 856 क्युसेक विसर्ग वाढवून ठीक सकाळी ६ वाज्लेपासून २५६८ क्युसेक करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी… असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.