Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणे 50% भरली 

Categories
Breaking News social पुणे

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणे 50% भरली

| धरणांत सद्यस्थितीत 14.53 TMC पाणी

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर अशी चार धरणे 50% भरली आहेत. 4 धरणांत मिळून 14.53 TMC पाणी साठा झाला आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. (Khadakwasla Dam | Pune Rain Update)
मागील वर्षी याच दिवसांत चार धरणामध्ये 20 टीएमसी पाणी होते. यंदा मात्र  पाणी साडे पाच टीएमसी ने कमी आहे. दरम्यान पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात (Pune Water Cut) करण्यात आली आहे. काही भागांत दर गुरुवारी तर काही भागात वेगवेगळ्या दिवशी पाणी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पाण्याची बचत केली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी कमी होत चालले होते. मात्र आता पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. तरीही पाणीकपात हटणार नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  (Pune water cut update)
खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत 14.53 टीएमसी म्हणजे 49.86% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) 1.24 टीएमसी म्हणजे 62.92%,  पानशेत धरणांत (Panshet Dam) 5.62 टीएमसी म्हणजे 52.82, वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) 6.42 टीएमसी म्हणजे 50.11%, तर टेमघर धरणांत (Temghar Dam) 1.24 टीएमसी म्हणजे 33.49% इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत 20 टीएमसी म्हणजे 68.61% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
—-
News Title | Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | 4 dams in Khadakwasla project are 50% full | 14.53 TMC of water in dams at present

Khadakwasla Dam Chain | खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे १००% भरली |चारही धरणातून एकाच वेळी विसर्ग

Categories
Breaking News पुणे

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे १००% भरली

|चारही धरणातून एकाच वेळी विसर्ग

पुणे शहरासह जिल्ह्याला पिण्यास व शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणात मिळून २९.१५ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ही धरणे १०० टक्के भरल्यामुळे त्या चारही धरणातून विसर्ग सुरू आहे.

धरण साखळीतील पाणीसाठ्याच्या दृष्टीने सर्वात मोठे धरण म्हणून वरसगाव धरण आहे. वेल्हे व मुळशी या दोन लगतच्या तालुक्यात याचे पाणलोट क्षेत्र आहे. मोसे नदीवरील या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता १२.८२ टीएमसी आहे. हे धरण यंदा १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. या धरणातून पाच हजार ७१० क्यूसेकने विसर्ग सुरु आहे.

धरण साखळीतील पाणीसाठ्याच्या दृष्टीने दुसरे मोठे धरण म्हणून पानशेत धरण आहे. या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता १०.६५ टीएमसी आहे. हे धरण यंदा १० ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. या धरणातून सध्या तीन हजार ९०८ क्यूसेकने विसर्ग सुरु आहे.

टेमघर धरणाची उपयुक्त साठवण क्षमता ३.७१ टीएमसी आहे. यंदा हे धरण १९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता १०० टक्के भरले. या धरणातून ३५० क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. वरसगाव, पानशेत व टेमघर या तिन्ही धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरणात जमा होते. या तिन्ही धरणातून मिळून खडकवासला धरणात पाणी जमा होत आहे. खडकवासला धरणातून सायंकाळी १० हजार २४६ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. अशा प्रकारे या धरणातून आत्तापर्यंत ११ टीएमसी पाणी नदीत सोडले आहे.

Dams Water | चार धरणातील पाणीसाठा  पोहोचला ५ टीएमसी वर | धरण क्षेत्रात संततधार सुरूच 

Categories
Breaking News PMC social पुणे

चार धरणातील पाणीसाठा  पोहोचला ५ टीएमसी वर

| धरण क्षेत्रात संततधार सुरूच

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या तीन दिवसापासून  जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ४.९३ टीएमसी  झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ८.६६ टीएमसी इतका होता.

हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती.  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने आता ३ महिन्यांचे पाणी वाढले आहे.

 

सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला  तर बुधवारी सकाळी हा पाणी साठा ३.६७ टीएमसी झाला. गुरुवारी सायंकाळी हा पाणी साठा ४.९३ टीएमसी झला आहे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला १० मिमी, पानशेत ४०  मिमी, वरसगाव ३३  मिमी तर टेमघर धरणात ३६  मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.