Tag: Rain News
Monsoon 2023 | Good News | Monsoon has entered the entire Maharashtra state
| Announcement of Meteorological Department
Heavy rain forecast for two days in Pune
Monsoon 2023 | आनंदाची बातमी | मान्सून संपूर्ण राज्यात दाखल
| हवामान विभागाची घोषणा
Monsoon 2023 | सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनने (Monsoon) आज संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) व्यापला आहे. भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) याबाबतची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. यामुळे मात्र शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना चांगला दिलासा मिळाला आहे. (Monsoon 2023)
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरात पुढील दोन दिवसात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. सध्या राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. अद्याप काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम आहे. (Maharashtra Rain)
पुण्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पुण्यात 24 जून ला जोरदार पाऊस झाला. 25 आणि 26 ला देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार रविवार सकाळपासूनच पुण्यात पाऊस कोसळत आहे. (Pune Rain)
—-
News Title | Monsoon 2023 | Good News | Monsoon has entered the entire state | Announcement of Meteorological Department
खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे १००% भरली
|चारही धरणातून एकाच वेळी विसर्ग
पुणे शहरासह जिल्ह्याला पिण्यास व शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणात मिळून २९.१५ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ही धरणे १०० टक्के भरल्यामुळे त्या चारही धरणातून विसर्ग सुरू आहे.
धरण साखळीतील पाणीसाठ्याच्या दृष्टीने सर्वात मोठे धरण म्हणून वरसगाव धरण आहे. वेल्हे व मुळशी या दोन लगतच्या तालुक्यात याचे पाणलोट क्षेत्र आहे. मोसे नदीवरील या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता १२.८२ टीएमसी आहे. हे धरण यंदा १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. या धरणातून पाच हजार ७१० क्यूसेकने विसर्ग सुरु आहे.
धरण साखळीतील पाणीसाठ्याच्या दृष्टीने दुसरे मोठे धरण म्हणून पानशेत धरण आहे. या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता १०.६५ टीएमसी आहे. हे धरण यंदा १० ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. या धरणातून सध्या तीन हजार ९०८ क्यूसेकने विसर्ग सुरु आहे.
टेमघर धरणाची उपयुक्त साठवण क्षमता ३.७१ टीएमसी आहे. यंदा हे धरण १९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता १०० टक्के भरले. या धरणातून ३५० क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. वरसगाव, पानशेत व टेमघर या तिन्ही धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरणात जमा होते. या तिन्ही धरणातून मिळून खडकवासला धरणात पाणी जमा होत आहे. खडकवासला धरणातून सायंकाळी १० हजार २४६ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. अशा प्रकारे या धरणातून आत्तापर्यंत ११ टीएमसी पाणी नदीत सोडले आहे.
मुसळधार पावसाने म्हाळुंगे गावातील घरे पाण्याखाली
| औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून केली गेली मदत
पुणे | महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट म्हाळुंगे गाव येथे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे सुमारे २० ते २५ घरे पाणी शिरल्यामुळे बाधित झाली होती. त्यामुळे औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून त्वरित ३ जेसिबी व दोन पंपाच्या साह्याने पाण्याचा निचरा करून सदर घरे सुरक्षित केली गेली.
या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, .उपायुक्त नितीन उदास यांनी केली. सदर काम महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, उपअभियंता संजय आदीवंत यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुरेंद्र जावळे, प्रकाश सोवळे, आकाश शिंदे, भाऊ जाधव व सर्व महापालिका औंध येथील अधिकारी व कर्मचारी यांनी कमीतकमी वेळात काम पूर्ण केले.
पुढील 2 दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ साठी प्रोत्साहन द्या
खाजगी व आयटी कंपन्यांना महापालिकेचे आवाहन
पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी | शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार
| महापालिका शिक्षण विभागाचा निर्णय
| असे आहेत आदेश
पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपा खाजगी शाळांना अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इ.शाळांना दिनांक १४/०७/२०२२ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
तथापि पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषगांने शाळेत उपस्थित राहतील.
खडकवासला धरणातून २५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग
| सकाळी ६वाजता विसर्ग वाढवला
पुणे | शहर आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील धरणामध्ये गेल्या ८ दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे खडकवासला धरण ९४% भरले आहे. खडकवासला धरणाची क्षमता कमी असल्याने पाटबंधारे विभागाने मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री १२ वाजले पासून विसर्ग करण्यात येत आहे. रात्री धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 856 क्युसेक विसर्ग वाढवून सकाळी ६ वाजले पासून २५६८ क्युसेक करण्यात येत आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
चार धरणामध्ये १०.७९ टीएमसी पाणी जमा
गेल्या ८ दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची चांगलीच वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणामध्ये १०.७९ टीएमसी पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी याच दिवशी ८.६३ टीएमसी पाणी धरणामध्ये होते. पाऊस चांगला सुरु असल्याने ही वाढ होतच राहिल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान खडकवासला धरणाची क्षमता कमी असल्याने पाटबंधारे विभागाने मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री १२ वाजले पासून विसर्ग करण्यात येत आहे. रात्री धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 856 क्युसेक विसर्ग वाढवून ठीक सकाळी ६ वाज्लेपासून २५६८ क्युसेक करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी… असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
महापालिकेकडून गेल्या आठवड्याभरात फक्त १०० खड्ड्यांची डागडुजी
| तर आदर पुनावाला फाउंडेशनने ४०० खड्डे बुजवले
चार धरणात जमा झाले मागील वर्षीपेक्षा अधिक पाणी!
| धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु
पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ९.४७ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी ८.६३ टीएमसी पाणी होते. आता हे पाणी आगामी ७-८ महिने पुरेल इतके आहे. दरम्यान महापालिकेकडून हा पाणी साठा पाहता पाणी कपात देखील रद्द केली आहे.
खडकवासला धरण साखळीतील ४ धरणातील पाणी खूप कमी झाले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात एक दिवसाआड पाणी सुरु केले होते. मात्र ईद आणि आषाढी एकादशी मुळे तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता धरण क्षेत्रात वाढणारा पाण्याचा साठा पाहून पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. हा पुणेकरांसाठी दिलासाच आहे.
धरणातील पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने आता७-८ महिन्यांचे पाणी वाढले आहे. सोमवारी सायंकाळी हा साठा ९.४७ टीएमसी इतका झाला आहे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला २२ मिमी, पानशेत ८४ मिमी, वरसगाव ७५ मिमी तर टेमघर धरणात ६० मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.