PMC Ward Offices | सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार खलाटे यांच्याकडे तर औंध बाणेर चा पदभार दापकेकर यांच्याकडे

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Ward Offices | सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार खलाटे यांच्याकडे तर औंध बाणेर चा पदभार दापकेकर यांच्याकडे

PMC Ward Offices | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडून क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे (Ward Officer) तथा सहायक आयुक्तांचे (PMC Assistant Commissioner) पदभार बदलण्यात आले आहेत. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचा (Sinhagad Road Ward Office) पदभार संदीप खलाटे (Sandip Khalate) यांच्याकडे तर औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचा (Aundh Baner Ward Office) चा पदभार गिरीश दापकेकर (Girish Dapkekar) यांच्याकडे देण्यात आला आहे. (PMC Ward Offices)
महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. राज्य सरकार मधील मुख्याधिकारी (गट ब) गिरीश दापकेकर (CEO Girish DapakekR) यांची पुणे महापालिकेच्या रिक्त सहायक आयुक्त पदावर नुकतीच प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. दापकेकर यांना सुरुवातीला सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला होता. मात्र आता काही पदभार बदलण्यात आले आहेत. क्षेत्रीय अधिकारी संदीप खलाटे यांच्याकडे औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार होता. आता महापालिका आयुक्तांकडून सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार खलाटे यांच्याकडे तर औंध बाणेर चा पदभार दापकेकर यांच्याकडे देण्यात आला आहे. (PMC Pune News)
——
News Title | PMC Divisional Offices | Khalate is in charge of Sinhagad Road Regional Office and Dapkekar is in charge of Aundh Baner ward office

Mahalunge | Heavy Rain | मुसळधार पावसाने म्हाळुंगे गावातील घरे पाण्याखाली  | औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून केली गेली मदत 

Categories
Breaking News PMC पुणे

मुसळधार पावसाने म्हाळुंगे गावातील घरे पाण्याखाली

| औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून केली गेली मदत

पुणे | महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट म्हाळुंगे गाव येथे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे सुमारे २० ते २५ घरे पाणी शिरल्यामुळे बाधित झाली होती.  त्यामुळे औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून त्वरित ३ जेसिबी व दोन पंपाच्या साह्याने पाण्याचा निचरा करून सदर घरे सुरक्षित केली गेली.

या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, .उपायुक्त नितीन उदास यांनी केली.  सदर काम  महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, उपअभियंता संजय आदीवंत  यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुरेंद्र जावळे, प्रकाश सोवळे, आकाश शिंदे, भाऊ जाधव व सर्व महापालिका औंध येथील अधिकारी व कर्मचारी यांनी कमीतकमी वेळात काम पूर्ण केले.