Ramdas Athavale | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्या आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या दरबारात! | मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार! 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Ramdas Athavale | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्या आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या दरबारात! | मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार!

PMC Employees- (The Karbhari News Service) – पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही या समस्या तशाच प्रलंबित राहतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या समस्या आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athvale) यांच्या दरबारा समोर ठेवण्यात आल्या आहेत. महापालिकेतील मागासवर्गीय कर्मचारी यांच्यावर अन्याय होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. (Pune PMC News
पुणे महानगरपालिका सेवकांच्या सर्व समावेशक प्रश्नांबाबत आज पुणे महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेमार्फत  केंद्रीय सामाजिक राज्य न्याय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन देण्यात आले. याबाबत व्ही. व्ही. आय. पी. सर्किट हाऊस, पुणे येथे प्रशासकीय मिटिंग मध्ये सर्व मुद्दे यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे व उपअध्यक्ष  विष्णू कदम व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या आहेत समस्या

१. पुणे महानगरपालिका सेवा ( सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ नुसार प्रशासकीय संवर्गातील “वरिष्ठ लिपिक” हे पद १०० % पदोन्नतीने आहे. ग्रामपंचायत कडील कर्मचारी यांच्या आकृतिबंधामध्ये वरिष्ठ लिपिक’ हे पद अस्तित्वात नसताना ग्रामपंचायत कडील ३४ सेवकांचे पुणे महानगरपालिकेच्या मूळ सेवकांकरिता असलेल्या ४८६ जागांमध्ये ‘वरिष्ठ लिपिक’ म्हणून चुकीचे समावेशन करण्यात आलेले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या मूळ सेवकांवर अन्याय होऊन मूळ सेवक पदोन्नतीपासून वंचित राहिलेले आहेत.
२. सामान्य प्रशासन विभाग, पुणे महानगरपालिका यांचेकडून ०२/०९/२०२२ रोजी लिपिक टंकलेखक” व “वरिष्ठ लिपिक” या पुणे महानगरपालिकेतील मूळ सेवकांचे गोपनीय अहवाल मागविण्यात येऊन सुद्धा अद्याप प्रमोशन करण्यात आलेले नाहीत. ३४ ग्रामपंचायतकडील सेवकांचा आकृतीबंध मान्य नसताना व वाढीव जागांची निर्मिती करण्यात आलेली नसताना सुद्धा पुणे महानगरपालिका सेवकांच्या सेवाजेष्ठता यादीमध्ये ग्रामपंचायत सेवकांचे समावेशन केलेले आहे. त्यामुळे मूळ सेवकांवर अन्याय होत आहे. जोपर्यंत आकृतीबंध मान्य होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत सेवकांचे सेवाजेष्ठता यादी मध्ये समावेशन न करता मुळ सेवकांची सेवा जेष्ठता यादी अंतिम करून पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. आकृतीबंध मान्य होत नाही तोपर्यंत सदर सेवकांची पदे ही अधिसंख्या पद म्हणून दर्शविण्यात यावीत.
३. प्रशासकीय संवर्गातील महापालिका सहाय्यक आयुक्त, प्रशासन अधिकारी या पदांवर अभियांत्रिकी संवर्गातील सेवकांचे समावेशन करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग, आस्थापना विभागाकडील ०६/०६/२०२२ रोजीचा मे. राज्य शासन यांचेकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावास स्थगिती देण्यात यावी. प्रशासकीय संवर्गात इतर संवर्ग समाविष्ठ केल्यास प्रशासकीय संवर्ग पदोन्नतीपासून वंचित राहणार आहे.
४. उपअधीक्षक हे पद स्वीप करून अधीक्षक या पदांमध्ये मर्ज करणे बाबत निर्णय घेण्यात आलेला होता. त्यासंदर्भात राज्यशासन यांचेकडे प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा.
५. पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र ज्या प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणांत सेवकांची संख्या पण वाढलेली आहे. सेवकांना आपल्या प्रश्नांना व अडचणींना मा. उच्च न्यायालयात वारंवार धाव घ्यावी लागते. जर पुणे महानगरपालिका ९० % राज्य शासनाचे नियम व कायदे अंगीकृत करत आहे तर राज्य शासन सेवकांप्रमाणे MAT प्रणाली मनपा सेवकांना लागू करावी. जेणेकरून सेवकांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.
६. विविध पदांच्या सेवा जेष्ठता याद्या १९८२ च्या शासन निर्णयानुसार अध्ययावत करून त्वरित रिक्त पदांवर सेवकांना पदोन्नती देण्यात यावी.
७. नगरसचिव कार्यालयातील नगर सचिव, उपनगर सचिव, स्वीय सहाय्यक, स्थायी समिती इतर रिक्त पदे पदोन्नतीने त्वरित भरण्यात यावीत.
८. शासन निर्णय २००५ प्रमाणे सेवकांना जुनी पेन्शन लागू करणे.
९. मागासवर्गीय सेवकांच्या रिक्त जागा सरळ सेवेने त्वरित भरण्यात याव्यात.
१०. रोहिणी पवार, श्री. कानिफनाथ ठवरे, श्री. चंद्रकांत फोंडे या सेवकांना उपअधीक्षक पदाच्या संदर्भात सेवाजेष्ठता डावलण्यात आलेली आहे. सेवाजेष्ठतेच्या चुकीच्या प्राधान्य क्रमांक मुळे होणारा अन्याय दूर
करण्यासाठी सेवकांना मानवी दिनांक देण्यात येऊन सदर सेवकांच्या सेवाजेष्ठता यादीत दुरुस्ती करून न्याय देण्यात यावा.
११. सेवा निवृत्त सेवकांना पेन्शन व इतर तदअनुषंगिक लाभ लवकर मिळण्यासाठी सेवा पुस्तकं तपासणी करिता स्वतंत्र कक्ष स्थापन करून पेन्शन काम करणारे सेवक, चिफ ऑडिटर व इतर संबंधित काम करणारे सेवक यांच्या कामात सुसूत्रता आणणे.
१२. पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र विस्तार पाहता आता आवश्यक कर्मचारी व आता उपलब्ध असलेली कर्मचारी संख्या याबाबत अंदाज घेऊन त्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन आकृतीबंध मान्यता घेऊन सेवक संख्या वाढवता येतील का ते पाहणे.
१३. सुरक्षा अधिकारी व सहायक सुरक्षा अधिकारी ही पदे अनेक दिवस रिक्त आहेत तरी सदर पदे पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावीत.
१४. आरेखक( ड्राफ्ट्समन) व अनुरेखक (ट्रेसर) ही पदे अनेक दिवस रिक्त आहेत तरी सदर पदे तात्काळ भरण्यात यावीत.
१५. चतुर्थ श्रेणी सेवकांमधील निवृत्त झालेल्या सेवकांची १००२०-३० च्या कालबद्ध पदोन्नतीसाठी जात पडताळणीची अट रद्द करण्यात यावी.
१६. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यातील झाडूवाला व शिपाई तसेच इतर सेवकांचे व्यसनाधीन प्रमाण अधिक असल्याने त्यांचे व्यसन सोडण्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्ग घेण्यात यावे.

PMC Birth and Death Certificates | जन्म मृत्यूचे दाखले हे केवळ संबंधित क्षेत्रिय कार्यालयातच मिळणार | महापालिका आरोग्य विभागाची माहिती 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Birth and Death Certificates | जन्म मृत्यूचे दाखले हे केवळ संबंधित क्षेत्रिय कार्यालयातच मिळणार | महापालिका आरोग्य विभागाची माहिती

PMC Birth and Death Registration – (The Karbhari News Service) – संगणक प्रणालीनुसार सद्यास्थितीत जन्म मृत्यूचे दाखले हे केवळ संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडील उपनिबंधक तथा क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडूनच वितरीत करण्यात येतील. अशी माहिती प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत (Dr Kalpana Baliwant PMC) यांनी दिली आहे. (PMC Health Department)
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालयाकडील जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयामार्फत जन्म मृत्यू नोंदणीचे कामकाज हे 1 मार्च 2019 पासून केंद्र शासनाने विकसित केलेल्या CRS नागरी नोंदणी पद्धतीने 15 क्षेत्रिय कार्यालय स्तरावर उपनिबंधक तथा क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येते. केंद्र शासनाने विकसित केलेल्या सुधारित CRS नागरी नोंदणी पद्धती 24 जून 2024 पासून अद्यावत करण्यात आले असून सदर संगणक प्रणालीनुसार सद्यास्थितीत जन्म मृत्यूचे दाखले हे केवळ संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडील उपनिबंधक तथा क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडूनच वितरीत करण्यात येतील. याबाबत केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार केला असून पुढील सुचना प्राप्त झाल्यास कळविण्यांत येईल. असे डॉ बळिवंत यांनी म्हटले आहे.

| सुधारित संगणक प्रणालीमधून सद्यस्थितीत जन्म-मृत्यूचे दाखले वितरणाबाबत नियमावली

१)मार्च २०१९ नंतरचे जन्म-मृत्यूचे दाखले केवळ संबंधित उपनिबंधक तथा क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी जन्म-मृत्यू विभाग यांच्या कार्यालयामध्ये प्राप्त होतील.
२)अॅप्रुव्हल क्लार्क यांनी जन्म/मृत्यू दाखले बाबत नागरिकांकडून अर्ज घेऊन त्याच्यावरती संबंधित दाखल्याचा नोंदणी क्रमांक लिहावा.
३)सदर अर्ज नागरिकाने नागरी सुविधामध्ये सादर करून आवश्यक शुल्क भरावे
४)आवश्यक शुल्क भरलेली पावती प्राप्त झाल्यानंतर अॅप्रुव्हल क्लार्क यांनी जन्म-मृत्यूचे दाखले वितरीत करावे.
५)जन्म-मृत्यू दाखले वितरणासाठी लागणारी स्टेशनरी नागरी सुविधा केंद्रामार्फत उपलब्ध करून घ्यावी.
६)वितरीत करण्यात येणाऱ्या जन्म मृत्यू दाखल्यांचा अहवाल दररोज नोंदवहीत अद्यावत करून त्याचा मासिक अहवाल या कार्यालयास सादर करावा.
७)याबाबत केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार केला असून पुढील सुचना प्राप्त झाल्यास याबाबत कळविण्यात येईल.
८) मार्च २०१९ पूर्वीचे व समाविष्ट गावांतील २०२१ पूर्वीचे जन्म- मृत्यूचे दाखले हे पूर्वीप्रमाणेच नागरी सुविधा केंद्रामार्फत वितरीत करण्यात येतील.

PMC Kothrud Bavdhan Ward Office | कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने साजरा केला जागतिक पर्यावरण दिन!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Kothrud Bavdhan Ward Office | कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने साजरा केला जागतिक पर्यावरण दिन!

 

World Environment Day 2024 – (The karbhari News Service) – कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय व क्षेत्रिय आयुर्वेदीक अनुसंधान संस्था यांच्या वतीने “जागतिक पर्यावरण दिन” निमित्त २०० वृक्षाचे रोपण व जनजागृती प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.  (Pune Municipal Corporation (PMC)

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय व क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्था तसेच जनवानी सहकारी संस्थान कमिन्स इंडिया लिमिटेड,स्वच्छ सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून ” जागतिक पर्यावरण दिन” व “स्वच्छ भारत अभियान मिशन २०२४” या निमित्ताने प्रभाग क्रमांक १०,११,१२ या तिन्ही प्रभागात विशेषतः श्रमिक वसाहत, मोरे विद्यालय, राऊतवाडी, केळेवाडी, हनुमान नगर, राजीव गांधी नगर,किष्किंधा नगर, लक्ष्मीनगर या परिसरारात झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा. तसेच नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी पर्यावरण पुरक प्रचार फेरी काढण्यात आली. सदर प्रभातफेरी मध्ये स्थानिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते.

विशेषतः झोपडपट्टीच्या गल्लोगल्ली ओला व सुका कचरा वेगळा करा, नदी नाल्यामध्ये कचरा टाकू नका, ए आर ए आय टेकडीवरती कचरा टाकून पर्यावरण दूषित करू नका, रिकाम्या जागेत कचरा टाकू नका, ड्रेनेज लाईन मध्ये घाण करू नका, प्लॅस्टिकचा वापर टाळा कापडी पिशव्यांचा वापर करा, प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासमोर एक तरी झाड लावा व त्याचे व्यवस्थित संगोपन करा जेणेकरून आपल्याला नैसर्गिक ऑक्सिजन मिळेल असे वातावरण तयार करा, आपले पुणे शहर स्वच्छ ठेवा व आपल्या आरोग्याचे रक्षण करा, जर कचऱ्याचे विभाजन केले नाही किंवा कचरा इतरत्र टाकून आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण केली तर महानगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही संबंधित नागरिकांना देण्यात आल्या. श्रमिक वसाहती जवळ २० वर्षापासून क्रॉनिक स्पॉटवर कचरा पडत होता त्याठिकाणी नागरिकांना सोबत घेऊन तो बंद करण्यात आला. त्याठिकाणी सफाई करू रोज सडा रांगोळी काढली जाते. तसेच क्षेत्रिय आयुर्वेदीक अनुसंधान संस्थानच्या सहकार्याने कमिन्स कंपनीच्या मागील परिसरात अग्नीमंथा,सीता अशोक, अशोक, सुपारी, शतावरी, अर्जून, गंबारी, निरगुंडी, कन्हेरी, मेंहदी, बिबला, शौनक, आवळा, करंज, जांभूळ ईत्यादी वनस्पतीचे २०० झाडे लावण्याचा उपक्रम करण्यात आला. सदर वृक्षारोपन कार्यक्रम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त, संदीप कदम गणेश सोनुणे महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आला. वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे, आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, रूपाली शेंडगे, सुरज पवार, गणेश चोंधे, जया सांगळे मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे तसेच अनुसंधान प्रभारी डॉ. अरूण गुरव, संस्थानचे अधिकारी डॉ. मनिष वंजारी, डॉ. पल्लवी जमदग्नी, डॉ. श्रीरंग जमदग्नी, डॉ. रशिका कोल्हे, डॉ. गजानन पवार व इतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. सदर पर्यावरण पुरक रॅलीचे आयोजन जनवाणीच्या जयश्री पाटील, समिर आजगेकर, विवेक जाधव, अतिश भाडळे, शेखर काकडे, हेमंतकुमार नाईक, मंगेश क्षीरसागर, कोमल दहिभाते, करूना सोनवणे, हनुमंत जाधव, सुप्रिया वाघमारे, मोहिनी गायकवाड व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Environment Day 2024 | केंद्रीय संचार ब्युरो आणि पुणे महापालिकेच्या वतीने कर्वेनगर येथील आयएमईआरटी महाविद्यालयात वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम

Categories
Breaking News PMC social पुणे

Environment Day 2024 | केंद्रीय संचार ब्युरो आणि पुणे महापालिकेच्या वतीने कर्वेनगर येथील आयएमईआरटी महाविद्यालयात वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम

 

Environment Day Theme 2024 – (The Karbhari News Service) –  भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो, पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation (PMC) आणि मराठवाडा मित्र मंडळ संचलित आयएमईआरटी महाविद्यालय यांच्या वतीने आज कर्वे नगर येथील आयएमईआरटी महाविद्लायात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या कार्यक्रमास नेहरू युवा केंद्र, कावेरी इंटरनॅशनल स्कूल आणि वर्शिप अर्थ फाऊंडेशन यांचेही सहकार्य लाभले. (Pune PMC News)

याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संजय शिंदे, सहायक आयुक्त विजय नायकळ, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी आशिष शेटे, आयएमईआरटी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी रामस्वामी, वर्शिप अर्थ फाऊंडेशनच्या सह-संस्थापिका आम्रपाली चव्हाण, कावेरी इंटरनॅशनल स्कूलच्या समन्वयक गौतमी पांडेय, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रसिद्धी अधिकारी हर्षल आकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर महाविद्यालयातील उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक यांनी संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहिम राबवली. पुढील सत्रात कावेरी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणसंदर्भात जनजागृतीपर गीत सादर केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुणे महापालिका उपायुक्त संजय शिंदे म्हणाले की पर्यावरणाचे रक्षण करणे ही कोणत्याही एका व्यक्तीची जबाबदारी नसून प्रत्येकाला त्यासाठी हातभार लावावा लागणार आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे, पाणी जपून वापरणे, स्वच्छता राखणे, ओला-सुका कचरा विलगीकरण यांच्यासारख्या लहान-लहान गोष्टींमधून पर्यावरणाचा समतोल राखण्यास आपल्याला मदत होऊ शकते.

आयएमईआरटी महाविद्यालयाच्या संचालिका शुभांगी रामस्वामी म्हणाल्या की संयुक्त राष्ट्राने 1973 पासून पर्यावरण दिन हा दिवस 5 जून रोजी साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र आपण मनात आणल्यास प्रत्येक व्यक्ती वर्षातील प्रत्येक दिवस पर्यावरणासाठी साजरा करू शकते. त्यासाठी कोणतीही एक पर्यावरणपूरक कृती दररोज करण्याचा संकल्प आपण करू शकतो.

कार्यक्रमाच्या अखेरीस, सर्व उपस्थितांनी पर्यावरण रक्षण आणि स्वच्छता राखण्यासंदर्भात प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अपर्णा शास्त्री यांनी केले, तर आभार प्रसिद्धी सहायक पी. फणीकुमार यांनी मानले.

PMC Aviation Gallery | विमानाचा पुरातन काळापासून इतिहास आणि विविध प्रतिकृती पाहायच्या असतील तर  पुणे महापालिकेच्या एव्हिएशन गॅलरीला भेट द्या!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Aviation Gallery | विमानाचा पुरातन काळापासून इतिहास आणि विविध प्रतिकृती पाहायच्या असतील तर  पुणे महापालिकेच्या एव्हिएशन गॅलरीला भेट द्या!

| 25 रुपयांत पाहू शकाल पुणे महापालिकेची एव्हिएशन गॅलरी | लहान मुलांसाठी 10 रुपये तिकीट

Pune Municipal Corporation Aviation Gallery- (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक केंद्रे विभाग संचलित पुणे महानगरपालिका शाळा क्र. १४ लालबहादूर शास्त्री शाळेच्या आवारातील सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी नुकतीच चालू करण्यात आली आहे. ही गॅलरी पाहण्यासाठी प्रौढ नागरिकांना 25 रुपये तर लहान मुलांना 10 रुपये तिकीट ठेवण्यात आले आहे. अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune Municipal Corporation)

ही एव्हिएशन गॅलरी हि भारतातील एकमेव आणि पहिली गॅलरी असून गॅलरीचा मुख्य उद्देश एव्हिएशनं क्षेत्राविषयी नागरिकांना जिज्ञासा निर्माण होणे हा आहे. एव्हिएशन सेक्टर हे एक खूप चांगले करिअर आहे. त्यातून युवकांना वैमानिक, एरोनॉटिकल इंजिनिअर सारखे विविध प्रकारचे जॉब्सच्या संधी मिळू शकतात.
या गॅलरीमध्ये विमानांचा पुरातन काळापासूनचा इतिहास, विमानाच्या विविध प्रकारच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन ठेवण्यात आलेले आहे. नागरिकांना व विद्यार्थ्यांना विमानतळावरील नियमांची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे सांगण्यात येते. गॅलरीच्या पहिल्या मजल्यावर सदरील बाबींचे दर्शन होते. गॅलरीच्या दुसऱ्या मजल्यावर वायुसेनेच्या विविध विमानांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन, प्रत्यक्ष विमानतळाची रचना, पुण्याचा एरियल व्ह्यू ड्रोनच्या सहाय्याने कसा घेतला घेतला आहे, हे पहावयास मिळते. गॅलरीच्या तिसऱ्या मजल्यावर एरोमॉडेलिंग, पॅरामोटरिंगचे आणि एरोस्पेसचे प्रदर्शन पहावयास मिळते.
एव्हिएशन गॅलरी चे तिकिटाचे दर पुढीलप्रमाणे आहेत.
प्रौढ नागरिक – २५/- रुपये
लहान मुले – १०/- रुपये
परदेशी नागरिक – ३००/- रुपये
सदर गॅलरीची माहिती सांगण्यासाठी गाईड म्हणून डोन  कर्मचारी काम करतात.

सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचा संपर्क पत्ता खालीलप्रमाणे आहे.

पत्ता :- पुणे पेठ शिवाजीनगर पुणे महानगरपालिका शाळा क्र. १४ लालबहादूर शास्त्री शाळेजवळ, .
पुणे – ४११०११

Pune Municipal Corporation Latest News | महापालिका कर्मचाऱ्यांनी मालमत्ता विवरणपत्र सादर करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचे नवीन आदेश | जाणून घ्या 

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation Latest News | महापालिका कर्मचाऱ्यांनी मालमत्ता विवरणपत्र सादर करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचे नवीन आदेश | जाणून घ्या

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका कायद्यानुसार पालिकेच्या १ ते ३ ऱ्या गटातील सर्व कामगार व अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दरवर्षी ३१ मे पूर्वी ही माहिती द्यावी लागते. त्यानुसार  वर्ग १ ते ३ मधील अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचे मालमत्ता व दायित्वाबाबतचे विवरण पत्र  सादर करणेबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यानुसार सर्व खातेप्रमुखांनी कार्यवाही करावयाची आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)

– महापालिका कायद्यानुसार तपशील देणे बंधनकारक आहे

 महानगरपालिकेच्या इमारतीत आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 20 हजारांहून अधिक कामगार काम करतात.  श्रेणी 1 ते श्रेणी 4 कर्मचारी यामध्ये काम करतात.  राज्य सरकारच्या सूचनेनुसार श्रेणी 4 वगळता सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे.  त्याअंतर्गत महापालिका त्यावर अमल करत आहे.  या तपशिलाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेच्या प्रत्येक विभागाला देण्यात आल्या आहेत.  तरीही त्यांच्या मालमत्तेचा तपशील महापालिका कर्मचारी व अधिकारी मांडत नाहीत.

– काय म्हटले आहे आदेशात?

प्रशासन विभागाने वर्ग-१ मधील सर्व अधिका-यांनी त्यांची मत्ता व दायित्वाबाबतची विवरणपत्रे त्यांचे नियंत्रक असलेल्या अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे मार्फत महापालिका आयुक्त यांचेकडे सादर करणे बाबत सूचित करण्यात आले आहे. तरी सर्व वर्ग-१ मधील अधिकाऱ्यांनी त्यांची मत्ता व दायित्वाबाबतची विवरणपत्रे वेळेत सादर करावी. सादर केलेले वर्ग १ मधील अधिकाऱ्यांचे विवरणपत्र जतन करण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडील आस्थापना विभागाने करावी.

प्रत्येक मनपा अधिकारी / कर्मचा-यांनी (वर्ग ४ मधील कर्मचारी वगळता) मनपा सेवेतील कोणत्याही पदांवरील नियुक्तीद्वारे त्याच्या प्रथम सेवा प्रवेशाच्या वेळी, अशा नियुक्तीच्या दिनांकापासून २ महिन्याच्या कालावधीत मत्ता व दायित्वे याबाबतची विवरणपत्र विहित  सादर करावे.
वर्ग २ व ३ मधील अधिकारी / कर्मचा-यांनी त्यांची मत्ता व दायित्वाबाबतची विवरणपत्रे ते सध्या कार्यरत असलेल्या खात्यांच्या खातेप्रमुखांकडे सादर करावे.

Maratha Reservation Survey | PMC Officers and Enumerators Payment | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांचे मानधन तिजोरीत तसेच पडून!   | मानधन वितरण बाबत निवडणूक विभागाची उदासीनता 

Categories
Breaking News PMC social पुणे

Maratha Reservation Survey | PMC Officers and Enumerators Payment | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांचे मानधन तिजोरीत तसेच पडून! 

 | मानधन वितरण बाबत निवडणूक विभागाची उदासीनता 

 

Maratha Reservation Survey Pune | PMC Officers and Enumerators Payment | पुण्यात पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC)) प्रगणकाद्वारे मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले.  14 लाख 30 हजार घरांचा सर्वे झाला. मात्र हे काम करणाऱ्या प्रगणक आणि अधिकाऱ्यांना अजून देखील मानधन देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाकडून हे मानधन अदा करण्यात आले आहे. ते महापालिका तिजोरीत गेली 15 दिवस झाले तसेच पडून आहे. महापालिका निवडणूक विभागाकडून निधी वितरण बाबत उदासीनता का दाखवली जात आहे, याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांकडून विचारणा केली जात आहे. (Maratha Reservation News)

महाराष्ट्र  शासनाने महाराष्ट्र  राज्य मागासवर्ग  आयोगाकडे (Maharashtra State Commission for Backward Classes) मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे  काम सोपवले होते. त्यानुसार पुणे शहरामध्ये  देखील मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण झाले.  सर्वेक्षण 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी  या कालावधीत पुणे मनपा (Pune Municipal Corporation) मार्फत नियुक्त केलेल्या 3 हजाराहून प्रगणकामार्फत (Enumerators) पूर्ण करण्यात  आले.   सर्वेक्षण  मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप MSBCC वर livedata entry मार्फत  करण्यात आले. (Pune PMC News)

सर्वेक्षणाचे काम करणारे पर्यवेक्षक (Supervisor) आणि प्रगणक (Enumerator) यांना प्रत्येकी 10 हजार रुपये आणि प्रशिक्षणाकरिता प्रवास भत्ता 500 रुपये अदा करण्यात येणार आहे. हा निधी राज्य मागासवर्ग आयोगाकडून महापालिकेला देण्यात आला आहे. हा निधी वितरित करण्याचे आदेश आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तसेच हा निधी नाही वापरला तर 90 दिवसाच्या आता जमा करावा. असे देखील आयोगाने म्हटले आहे.

सर्वेक्षणाच्या कामासाठी कर्मचारी लवकर घराच्या बाहेर पडत होते तर खूप उशिरा घरी परतत होते. असे असताना देखील कर्मचाऱ्यांना अजून पर्यंत मानधन मिळालेले नाही. विशेष हे आहे कि निधी आलेला असून देखील महापालिका निवडणूक विभागाकडून निधी वितरण बाबत उदासीनता दाखवली जात आहे.

दरम्यान याबाबत निवडणूक विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दिवसभरात त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

34 Villages Committee | समाविष्ट गावासाठीची समिती म्हणजे कार्यकर्ते संभाळण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न | शिवसेना (UBT) ची टीका 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

34 Villages Committee | समाविष्ट गावासाठीची समिती म्हणजे कार्यकर्ते संभाळण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न | शिवसेना (UBT) ची टीका

34 Villages Committee – (The Karbhari News Service) – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 34 गावांच्या मूलभूत सुविधांच्या साठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून यामध्ये राजकीय पुढाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुका लागण्याआधी महायुती सरकारने आपले कार्यकर्ते संभाळण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. अशी टीका शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी केली आहे.
थरकुडे म्हणाले कि, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय व पालिकेतील माजी नगरसेवकांना या समाविष्ट गावातील समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.  ही समिती पालिका निवडणूक होत नसल्यामुळे राजकीय पदाधिकारी व मंत्र्यांच्या संपर्कात असलेल्या नेतृत्वांचे विकासाच्या नावाखाली पुनर्वसन करण्यात आले आहे. समाविष्ट गावातील लोकप्रतिनिधी व निवडून आलेले सरपंच यांना या याद्यांमध्ये स्थान नाही तर पुणे महानगरपालिकेत माजी नगरसेवक असलेल्या तसेच राजकीय पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना या पदांवर घेण्यात आल्याने राजकीय फायद्यासाठी केलेला हा प्रयत्न हा गावांच्या विकासासाठी दिसून येत नाही.
थरकुडे पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुका लागण्याआधी महायुती सरकारने आपले कार्यकर्ते संभाळण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. हे पुणेकर व पुण्यात समाविष्ट झालेल्या गावांच्या नागरिकांच्या लक्षात आला आहे. यामुळे याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर होणार नाही.
पुण्यामध्ये भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी यांची होत असलेली पीछेहाट व नागरिकांची कामे झाल्यामुळे निर्माण झालेले उदासीनता यावर उपाय म्हणून हा विकास समितीचा शासनाने केविलवाना प्रयत्न केला आहे. असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी सांगितले.

783 crores water bill of Pune Municipal Corporation due on Pune residents!

Categories
Breaking News PMC social पुणे

 783 crores water bill of Pune Municipal Corporation due on Pune residents!

| 1% interest per month from 1st April if outstanding!

 

Pune – (The Karbhari News Service) – MC Water Supply Department owes a total of 783 crores to the citizens of Pune. The municipal corporation has tightened its belt to recover this. Pune residents will now have to pay interest if they keep their water bills in arrears. It will be started from April 1. Meanwhile, a deadline of 60 days has been given to pay the arrears till January 31. This information was given by Nandkishore Jagtap PMC, Chief Engineer of Water Supply Department. (Pune Municipal Corporation)

According to Jagtap, the arrears of 783 crores are from the year 1990. It also includes included villages. 112 crores has been recovered by the water supply department in the current financial year. 212 crores has been set as a recovery target. Meanwhile, the department had recovered 150 crores in the previous financial year. Jagtap also said.

– Appeal of PMC Water Supply Department

According to the public appeal of Pune Municipal Corporation (PMC Pune), all commercial and some residential customers within the limits of Pune Municipal Corporation are already being billed through meters. Also Khadki Cantonment Board and
Water is being supplied to all the customers in Pune Cantonment Board areas by charging the bill through meter according to water consumption. As no interest is charged on the overdue water bills, it has been noticed by the Pune Municipal Corporation that the arrears of the bill are increasing on a large scale. (Pune PMC News)

Therefore, if the bill is not paid within 60 days from the date of the meter bill, the provisions of the Maharashtra Municipal Corporation Act, 1949, Chapter VIII, Taxation Rules
Pune Municipal Corporation has decided to levy penal interest at the rate of 1% per month on the outstanding amount as per 41. Since the decision has been taken afresh, a deadline of 60 days is being given to the end of March 31, 2025 to pay the arrears due on January 31, 2025. All customers should note that a penalty interest of 1% per month will be levied on the outstanding amount from 1st April and any overdue amount thereafter. It is said in the appeal.
Arrangements have been made to pay the bills to all customers who are supplied with water through meters by the Pune Municipal Corporation. However, if the customers do not receive the bills, they should obtain their water meter bills up to 31st January 2024 from Lashkar Water Supply Department/Swargate Water Supply Department/SNDT-Chatushrungi Water Supply Department and pay the outstanding amount before 31st March. Jagtap has made such an appeal.

– Review meeting tomorrow regarding recovery

Meanwhile, Municipal Additional Commissioner Ravindra Binwade has called a meeting of water supply officers to review the pending water bill. In this, what measures should be planned for maximum recovery. This will be discussed. This was said by the administration.

PMC Water Supply Department | पुणेकरांवर पुणे महापालिकेची 783 कोटींची पाणीपट्टी थकीत!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Water Supply Department | पुणेकरांवर पुणे महापालिकेची 783 कोटींची पाणीपट्टी थकीत!

| थकबाकी ठेवल्यास 1 एप्रिल पासून दरमहा 1% व्याज!

Pune – (The Karbhari News Service) – PMC Water Supply Department | पुणेकरांवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची एकूण 783 कोटींची थकबाकी आहे. ही वसुली करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. पुणेकरांना आता पाणीपट्टी (Water Bill) थकीत ठेवल्यास व्याज भरावे लागणार आहे. त्याची सुरुवात 1 एप्रिल पासून करण्यात येणार आहे. दरम्यान 31 जानेवारी पर्यंतची थकबाकी भरण्यासाठी 60 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation) 

जगताप यांच्या माहितीनुसार 783 कोटींची थकबाकी ही 1990 सालापासूनची आहे. यात समाविष्ट गावांचा देखील समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात पाणीपुरवठा विभागाने 112 कोटींची वसूली केली आहे. तर 212 कोटी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान मागील आर्थिक वर्षात विभागाने 150 कोटी वसूल केले होते. असेही जगताप यांनी सांगितले.

– पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

पुणे मनपाच्या (PMC Pune) जाहीर आवाहनानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व व्यावसायिक व काही निवासी ग्राहकांना यापूर्वीपासून मीटरद्वारे बिलाची आकारणी होत आहे. तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रांमधील सर्व ग्राहकांना पाण्याच्या वापरानुसार मीटरद्वारे बिल आकारणी करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याच्या थकित बिलावर कोणतीही व्याजाची आकारणी करण्यात येत नसल्याने मोठ्या प्रमाणावर बिलाच्या रकमेची थकबाकी वाढत असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे. (Pune PMC News)

यास्तव मीटर बिलाच्या दिनांकापासून ६० दिवसांत बिल न भरल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे प्रकरण आठ, कराधान नियम यातील नियम
४१ नुसार थकबाकी रकमेवर प्रतिमहा १% दराने दंडात्मक व्याज आकारण्याचा पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे.  निर्णय हा नव्याने घेण्यात आला असल्याने दिनांक ३१ जानेवारी 2025 रोजीची थकबाकी भरणेस दिनांक ३१ मार्च अखेर ६० दिवसांची मुदत देण्यात येत आहे. 1 एप्रिल पासून थकबाकी रकमेवर व त्यानंतरच्या कोणत्याही थकित रकमेवर १% प्रतिमहा दंडात्मक व्याज आकारण्यात येणार आहे याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी. असे आवाहनात म्हटले आहे.
मीटरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व ग्राहकांना बिले पुणे मनपाकडून देण्याची व्यवस्था केली आहे. तथापि, ग्राहकांना बिले न मिळाल्यास त्यांचे 31 जानेवारी 2024 पर्यंतचे पाण्याचे मीटर बिल लष्कर पाणीपुरवठा विभाग/स्वारगेट पाणीपुरवठा विभाग/एसएनडीटी-चतुश्रुंगी पाणीपुरवठा विभाग येथून प्राप्त करुन घ्यावे व 31 मार्च पूर्वी थकबाकी रकमेचा भरणा करावा. असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

– वसुली बाबत उद्या आढावा बैठक

दरम्यान थकीत पाणीपट्टी बाबत आढावा घेण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी काय उपाय योजना करायला हव्यात. याबाबत चर्चा होईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.