PMC Employees Transfers | 8 उप अधीक्षक आणि 100 वरिष्ठ लिपिकांच्या होणार नियतकालिक बदल्या 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Transfers | 8 उप अधीक्षक आणि 100 वरिष्ठ लिपिकांच्या होणार नियतकालिक बदल्या

| येत्या मंगळवारी केली जाणार कार्यवाही

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील (PMC Pune) प्रशासकीय संवर्गातील वरिष्ठ लिपिक  पदावरील 100 कर्मचाऱ्यांच्या आणि 8 उप अधीक्षक नियतकालिक बदल्या केल्या जाणार आहेत. याबाबतचे आदेश उपायुक्त प्रतिभा पाटील (Pratibha Patil PMC)  यांनी जारी केले आहेत. (Pune PMC News)
महापालिका कर्मचाऱ्यांना एका खात्यात तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यानुसार प्रशासकीय संवर्गातील 8 उप अधीक्षक आणि 100 वरिष्ठ लिपिक  यांच्या नियतकालिक बदल्या केल्या जाणार आहेत. या बदल्या अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्या अध्यक्षते खाली होणार आहेत. यासाठी महापालिका आयुक्तांची देखील मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार येत्या मंगळवारी या बदल्यावर कार्यवाही केली जाणार आहे. जुना जीबी हॉल येथे कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता उप अधीक्षक पदाच्या बदल्याचे कामकाज तर 11:30 वाजता वरिष्ठ लिपिकांच्या बदल्यांचे कामकाज होणार आहे.

कर्मचाऱ्यांची यादी येथे पहा :

PMC Contract Employees | पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Contract Employees | पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी!

| कंत्राटी कामगारांना पुणे मनपाचा अपघात विमा

PMC Contract Employees Accident Insurance Scheme – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिकेत काम करणाऱ्या जवळपास 8 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचा सुमारे 15 लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवला जाणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अवघे 265 रुपये 50 पैसे घेतले जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे (Nitin Kenjale PMC) यांनी दिली. (Pune PMC News)
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने कायम कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना (PMC Group Accident Insurance Scheme) चालवली जाते. पूर्वी कर्मचाऱ्याकडून 136 रुपये घेऊन 10 लाखाचा विमा उतरवला जायचा. मात्र मागील वर्षीपासून रक्कम वाढवली आहे. वर्ग-1 साठी 25 लाख, वर्ग- 2 साठी 20 लाख, वर्ग- 3 व 4 साठी 15 लाख इतका विमा उतरवला जात आहे. मात्र ही योजना कंत्राटी कामगारांसाठी नव्हती. याबाबत मुख्य कामगार अधिकारी नितिन केंजळे यांनी पुढाकार घेऊन कंत्राटी कामगारांसाठी देखील ही योजना आता चालवली जाणार आहे.
 
याबाबत नितीन केंजळे यांनी सांगितले कि, कंत्राटी कामगारांचा विमा उतरवण्यासाठी New India Assurance कंपनीने तयारी दाखवली. त्यानुसार महापालिकेतील ठेकेदार देखील यासाठी तयार झाले आहेत. त्यानुसार विमा उतरवण्यास सुरुवात झाली आहे. ठेकेदारांच्या मार्फत विमा उतरवण्यात येत आहेत. 
 
पुणे महापालिकेत जवळपास 8 हजाराहून अधिक कंत्राटी कमर्चारी आहेत. हे सगळे वर्ग 4 मधील कर्मचारी आहेत. या लोकांना जोखमीची कामे करावी लागतात. यात काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील होतो. परिणामी या लोकांचे कुटुंब उघड्यावर पडते. असे होऊ नये यासाठी 15 लाखाचा विमा उतरवण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे केंजळे यांनी सांगितले. 
 
केंजळे यांनी पुढे सांगितले कि, अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंग झाल्यास त्या त्या प्रमाणात ही रक्कम मिळेल. त्यासाठी कर्मचाऱ्यांना फक्त 265 रुपये 50 पैसे द्यावे लागणार आहेत. हे काम ठेकेदारा मार्फतच केले जाणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा उतरवण्याबाबत ठेकेदारांना सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार ठेकेदारांनी सुरुवात केली आहे. कामगारांना याचा चांगला लाभ होऊ शकतो. ठेकेदारानी आणि कर्मचाऱ्यांनी याची गंभीरतेने दखल घेऊन याचा लाभ घ्यावा.
नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी, पुणे मनपा. 

PMC Action on Illegal Hotels | हडपसर हांडेवाडी रोड, पुणे सोलापूर रोड परिसरात अनधिकृत हॉटेल्स वर कारवाई

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Action on Illegal Hotels | हडपसर हांडेवाडी रोड, पुणे सोलापूर रोड परिसरात अनधिकृत हॉटेल्स वर कारवाई

 

PMC Building Devlopment Department – (The Karbhari News Service) – हडपसर हांडेवाडी रोड, पुणे सोलापूर रोड, साडे सतरा नळी येथील अनाधिकृत रूप टॉप हॉटेल व बार व रेस्टॉरंट तसेच अनाधिकृत बांधकाम यावर पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. (Pune Municipal Corporation)

पुणे महापालिकेकडून एम आर टी पी १९६६ अनन्वे कलम ५३ नुसार संबंधित sr no 45,46,67 हडपसर, पुणे सोलापूर रस्ता तसेच साडे सतरा नळी हडपसर येथे एकूण 11 अनधिकृत बार व रेस्टॉरंट व रूट टॉप व अनधिकृत आरसीसी बांधकाम यांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती.  तथापि संबंधितांनी स्वतःहून कोणतेही अनधिकृत बांधकाम काढून न घेतल्याने आज जी सदरचे बांधकामांचे क्षेत्रफळ 18700 चौरस फुट अनाधिकृत बाधकाम पाडण्यात आले. (Pune PMC News)

सदर चे बाधकाम पाडण्यासाठी महापालिकेकडून 4 ब्रेकर, 4 जेसीबी,5 ग्रॅस कटर,20 बिगारी , पोलिस वर्ग,समवेत कारवाई करण्यात आली,

कारवाई बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक 1 मार्फत करण्यात आली.

PMC Employees Union | सहाय्य्क महापालिका आयुक्तांचा पदभार लेखनिकी संवर्गाला! | कर्मचारी वर्गातून व्यक्त होतीय समाधानाची भावना  

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Union | सहाय्य्क महापालिका आयुक्तांचा पदभार लेखनिकी संवर्गाला! | कर्मचारी वर्गातून व्यक्त होतीय समाधानाची भावना

PMC Clerical Cadre- (The Karbhari News Service) – महापालिका सहाय्यक आयुक्त (PMC Assistant Commissioner) पदाचा पदभार हा लेखनिक संवर्गाला डावलून इतराना दिला जात होता.  त्यामुळे लेखनिक संवर्गावर अन्याय होत असल्याची भावना कर्मचारी वर्गात होती. मात्र आता प्रशासनाने नुकतेच दोन प्रशासन अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. याबाबत कर्मचारी वर्गातून समाधानाची भावना व्यक्त होत आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
याबाबत पीएमसी एम्प्लॉईज युनियन ने महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले व इतर अधिकारी यांची भेट घेतली. त्यामध्ये  पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे अद्यक्ष बजरंग पोखरकर (Bajrang Pokharkar PMC Employees Union) , उपाध्यक्ष विशाल ठोंबरे, दीपक घोडके, पूजा देशमुख, गिरीश बहिरट, गणेश मांजरे यांनी सातत्याने सेवकांवर होणाऱ्या अडचणी वरिष्ठांसमोर मांडल्या. त्याचेच फलित आज लेखनिक संवर्गाला मिळाली आहे. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचा सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी लक्ष्मण कादबाने यांना देण्यात आला आहे. तर कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी प्रकाश मोहिते यांना देण्यात आला आहे. त्याबद्दल आयुक्त राजेंद्र भोसले, अति आयुक्त पृथिराज बी पी, उपआयुक्त पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो. अशी भावना युनियनचे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी व्यक्त केली आहे.
लवकरच 3 वर्ष एकाच खात्यात झालेल्या सर्व सेवकांच्या बदल्या करण्यात याव्यात. सेवकांसाठी उपहारगृह उपलब्ध करून द्यावे. लेखनिक संवर्गातील पद्स्कीपचा प्रस्ताव शासनाकडे लवकर पाठवावा.  सर्व वर्गाच्या तात्काळ पदोन्नती करावी. अशी संघटनेची आयुक्त यांचे कडे मागणी आहे. ती आयुक्त लवकरच पूर्ण करतील अशी संघटनेला खात्री आहे.
बजरंग पोखरकर, अध्यक्ष,  पीएमसी एम्प्लॉईज युनियन पुणे महानगरपालिका

PMC Chief Auditor | मुख्य लेखा परीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार जितेंद्र कोळंबे यांच्याकडे! | महापालिका आयुक्तांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Auditor | मुख्य लेखा परीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार जितेंद्र कोळंबे यांच्याकडे! | महापालिका आयुक्तांचे आदेश

PMC Chief Auditor – (The Karbhari News Service) – महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक तथा सह महापालिका आयुक्त अंबरीष गालिंदे (Ambrish Galinde PMC) हे सेवानिवृत्त झाले आहेत. हे पद रिक्त झाल्याने या पदाचा अतिरिक्त पदभार हा पुणे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (PMC Chief Finance Officer) जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe PMC? यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी (PMC Chief Finance and Account Officer) राज्य सरकारकडून जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेले हे पद भरण्यात आले आहे. दरम्यान यामुळे मात्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांच्याकडील पदभार कमी केला आहे. कळसकर यांच्याकडे फक्त खर्च ची जबाबदारी आहे तर कोळंबे यांच्याकडे महसूल ची जबाबदारी  आहे. (PMC Chief Finance and Account Office)
कोळंबे हे महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीने आले आहेत. याआधी कोळंबे महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे इथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. वित्त व लेखा संचालक संवर्गात त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना सुधारित पदस्थापना देण्यात आली आहे.
दरम्यान कोळंबे यांच्याकडे आता मुख्य लेखा परीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार असणार आहे. 1 जुलै पासून हे प्रभारी कामकाज त्यांच्याकडे असणार आहे.

| मुख्य लेखा परीक्षक पदी शासनाचाच अधिकारी बसणार का?

दरम्यान अंबरीष गालिंदे यांच्या सेवानिवृत्तीने मुख्य लेखा परीक्षक तथा सह महापालिका आयुक्त हे पद रिक्त झाले आहे. या पदावर महापालिकेचा कुणी अधिकारी बसणार कि राज्य सरकारचा अधिकारी इथे येणार, याबाबत आता उत्सुकता लागून राहिली आहे.

Encroachment action on DP Road | डीपी रस्त्यावरील निळ्या पूर रेषा मध्ये येणारी बांधकामे महापालिकेने पाडली | 90 हजार चौरस फुट क्षेत्र मोकळे केले

Categories
Breaking News PMC social पुणे

Encroachment action on DP Road | डीपी रस्त्यावरील निळ्या पूर रेषा मध्ये येणारी बांधकामे महापालिकेने पाडली | 90 हजार  चौरस फुट क्षेत्र मोकळे केले

PMC Building Development Department- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) बांधकाम विकास विभागाच्या वतीने डीपी रोड राजाराम पुला जवळ विनापरवाना शेड वर कारवाई करण्यात आली. निळ्या पूर रेषा मध्ये येणारी विनापरवाना बांधकामे आज जमीनदोस्त करण्यात आली. अशी माहिती बांधकाम विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune PMC News)
उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश उठवल्या नंतर 24 तासाचे आत तातडीने ही कारवाई करण्यात आली . यावेळी 15 मिळकतीवर कारवाई करून सुमारे 90 हजार चौरस फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. 5 jcb , 2 gas कटर, 10 कामगार यांचे मदतीने ही कारवाई करण्यात आली.
यासाठी स्थानिक आणि अतिक्रमण विभागाचे पोलीस बंदोबस्त होता.  या ठिकाणी अग्निशमन विभागाची गाडी तयार ठेवण्यात आली होती. कारवाई उद्याही सुरू  राहणार आहे. असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

PMC Superintendent Promotion | पदोन्नती मिळालेल्या 48 अधीक्षकांना अखेर दिली जाणार पदस्थापना | पदस्थापनेची कार्यवाही उद्या केली जाणार

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Superintendent Promotion | पदोन्नती मिळालेल्या 48 अधीक्षकांना अखेर दिली जाणार पदस्थापना

| पदस्थापनेची कार्यवाही उद्या केली जाणार


PMC Employees Promotion – (The Karbhari News Service)
– पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) प्रशासन अधिकारी (Administration Officer), अधीक्षक(Superintendent) यांना बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर समाधानाची बातमी मिळाली होती. या पदांवर पदोन्नतीदेण्यासाठी  पदोन्नती समितीची बैठक (DPC) होऊन देखील या कर्मचाऱ्यांची पदोन्नती च्या पदावर नियुक्ती दिली जात नव्हती. अखेर 50 अधिक्षक आणि 13 प्रशासन अधिकारी यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली होती. मात्र यातील 48 अधीक्षकांची पदस्थापना करण्यात आली नव्हती. मात्र आता पदस्थापना केली जाणार आहे. याबाबतची कार्यवाही उद्या म्हणजे गुरुवारी केली जाणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नतीदेण्याबाबतच्या महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने हा विषय लावून धरला होता. त्यानुसार प्रशासनाने  पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली होती. त्यानुसार पदोन्नती समितीची बैठक आयोजित करून प्रशासन अधिकारी आणि अधिक्षक सह विविध पदांवर पदोन्नत्या देण्यात आल्या होत्या. मात्र बरेच महिने उलटून देखील या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे दिली जात नव्हती. अखेर 50 अधिक्षक आणि 13 प्रशासन अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती.

मात्र यातील 48 अधीक्षकांची पदस्थापना करण्यात आली नव्हती. मात्र आता पदस्थापना केली जाणार आहे. याबाबतची कार्यवाही उद्या म्हणजे गुरुवारी केली जाणार आहे.  जुन्या जी बी हॉल मध्ये सकाळी 11:30 पासून याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. यामुळे महापालिका कर्मचारी समाधान व्यक्त करत आहेत.

– बदली झालेल्या सेवकांना त्याच खात्यात पदस्थापना दिली जाणार का?

दरम्यान मिळकतकर विभागातून किंवा इतर महत्वाच्या बदली झालेले काही सेवक पुन्हा त्याच खात्यात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याबाबत पदस्थापना देताना प्रशासन उद्या काय निर्णय घेणार, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

You are Prize | महापालिका कर्मचाऱ्यांनो आणि अधिकाऱ्यांनो तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या! | तुमच्यापेक्षा कुणीही आणि काहीही महत्वाचे नाही! 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

You are Prize | महापालिका कर्मचाऱ्यांनो आणि अधिकाऱ्यांनो तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या! | तुमच्यापेक्षा कुणीही आणि काहीही महत्वाचे नाही!

PMC Employees – PMC Officers – (The Karbhari News Service) – गेल्या काही दिवसांपासून आणि वर्षांपासून पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अकाली निधनाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यातील बरेचसे मृत्यू हे हृदय रोगांशी (Heart Attack) संबंधित होते. कमी वयात आणि नोकरीचा चांगला काळ सुरु असताना एखाद्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याचे असे अचानक निघून जाणे, हे नक्कीच वेदनादायक आहे. मात्र या गोष्टीला काही अंशी आपली जीवनशैली (Lifestyle) देखील कारणीभूत आहे. (Pune Municipal Corporation Employees and Officers)
काही आजारांचा अपवाद वगळता बरेचसे आजार हे चुकीच्या खाण्याने होतात. यात मधुमेह (Type 2 Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension), अल्सर (Ulcer), पोटाचे विकार, यात तुमचाही दोष नाही. कारण तुम्हांला नेहमी चुकीचं मार्गदर्शन केलं जातं. तुमचा डॉक्टर तुम्हांला नीट मार्गदर्शन करू शकत नाही. तुम्ही बघितले असेल तुम्हांला मेडिसिन देणारे डॉक्टरांचेच पोट पुढे आलेले असते. त्यालाच चांगल्या आहाराबाबत माहित नसते. तो तुम्हांला काय सल्ले देणार? तो फक्त मेडिसिन देऊन तात्पुरती मलमपट्टी करणार.
याचाच अर्थ काय तर तुमच्या आरोग्याची काळजी कुणीही घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी आधी तुम्हाला तुम्ही स्वतः किती महत्वाचे आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. हे फक्त तुमच्या कुटुंबा पुरते मर्यादित नाही. हे तुमच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. तुम्ही या जगात अस्तित्वात असणे, हे सगळ्यात मोठं prize आहे. त्या गोष्टीचा आदर करा. स्वतःचा सन्मान करा. वेळ निघून जाण्याआधी हे तुम्हांला लक्षात घ्यावे लागेल. तुमची नोकरी आणि पैसा देखील तुमच्यापेक्षा मोठा नाही. या गोष्टी महत्वाच्या आहेतच. पण सगळ्यात महत्वाचे तुम्ही आहात. स्वतःच्या असण्याचा आदर करा आणि एक चांगली जीवनशैली जागा.

त्यासाठी या गोष्टींवर आजपासूनच अंमल करायला सुरुवात करा.

1. साखर, कर्बोदके टाळा (Stay Away from Sugar, Carbohydrates) 
तुमची जीवनशैली ही तुमच्या आहारापासून सुरु होते. तुमच्या पोटात पोषणयुक्त अन्न जाते कि नाही, यावर तुम्हांला बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. कारण आज तुमच्यापैकी बरेच लोक जे खातात, त्या सगळ्यात साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. परिणामी इन्सुलिन लेव्हल वाढते. त्याचाच अर्थ रक्तातील साखर वाढत जाते. त्यामुळेच पुढे लठ्ठपणा, डायबेटीस, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, अशा आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे याचे जे मूळ आहे साखर आणि कर्बोदके, ते तुम्हांला आहारातून कमी करावे लागेल. पोषणयुक्त अन्न खायला तुम्हाला सुरुवात करावी लागेल. त्यासाठी प्रोटीन आणि आरोग्यदायी फॅट यांना आहारात महत्वाचे स्थान द्यावे लागेल. यामध्ये अंडी, मटण, मासे, सगळ्या पालेभाज्या यांचा समावेश आहे. तसेच पनीर, बटर, चीज, दही यांचे आहारात प्रमाण वाढवावे लागेल.
2. तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी तेल कुठले वापरता? (Stay Away from Seed Oil) 
तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील, आम्ही बाहेरचे अन्न टाळतो. घरीच शिजवून खातो. तरीही आमचे पोट वाढते. याला प्रमुख दोन कारणे. एक म्हणजे आहारात असलेले पिष्टमय पदार्थ आणि साखरेचे प्रमाण आणि दुसरे म्हणजे तुमचे तेल. तुम्ही जर स्वयंपाकासाठी सोयाबीन, सूर्यफूल, अशी seed oil वापरत असाल तर तुमचा लठ्ठपणा हा वाढतच राहणार आहे. हे मूळच तुम्ही घरातून हद्दपार करा. त्यासाठी तुमचे अन्न तुम्ही coconut oil, तूप, बटर यात शिजवा. तुम्हांला घाण्याचे शेंगदाणा तेल मिळत असेल तर उत्तमच आहे.
3. ब्रेकफास्ट टाळाच (Skip Breakfast) 
तुमच्या शरीरासाठी ब्रेकफास्ट गरजेचा नसतोच. हे विज्ञान देखील सांगतं. मात्र आपण पाश्चिमात्य जीवनशैली अंगिकारली आहे. आपण त्यांचेच अनुकरण करतो आणि मग सकाळ पासूनच रक्तातील साखर वाढवत राहतो. तुमच्या रक्तातील साखर ही सकाळी आधीच high असते. रिकाम्या पोटीच तुम्ही व्यायाम करायला हवाय. भारतीय संस्कृतीत  किंवा पूर्वीच्या काळी लोक बघा दिवसातून दोनच वेळा जेवण करायचे. दुपारी आणि सायंकाळी. आणि याच जेवणाच्या प्रमाणवेळा आहेत. ब्रेकफास्ट वर खर्च करू नका. तुम्हांला सकाळी भूक लागत नाही. सवय लागली म्हणून तुम्ही खाता. ज्या लोकांना शेतात जाऊन नांगर चालवायचा असतो त्यांना ब्रेकफास्ट ची गरज असते. तुम्हांला बिलकुल नाही. आजपासूनच यावर अंमल करायला सुरुवात करा.
4. उपवास करा (Fasting/ Intermittent fasting) 
उपवास करा, याचा चुकीचा अर्थ लावू नका. उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी आणि फराळाचे पदार्थावर ताव मारणे नव्हे. आपल्याला हेच सांगितलं जाते. मात्र उपवासा मागचे विज्ञान समजून घ्या. उपवासाचा अर्थ आहे कि तुम्ही जाणूनबुजून काही काळासाठी पोट रिकामे ठेवणे. यात 14 तासांपासून ते 24 तास, 72 तास, 120 तासांचा समावेश आहे. तर तुम्ही 14 तासांपासून आजपासूनच सुरुवात करा. हळूहळू तास वाढवा. या काळात काही खायचं नाही. फक्त प्यायचं. ते ही पाणी, मीठ पाणी, ब्लॅक कॉफी (Without Sugar), ब्लॅक टी (Without Sugar), ग्रीन टि आणि ऍपल सीडार व्हिनेगार. असं केलं तरच उपवास फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही 24 तास 48 तास उपवास केला तर तुमचे वजन तर कमी होणारच आहे. शिवाय तुमचे पोटाचे विकार दूर होतील. एकूणच आरोग्य सुधारेल, फोकस वाढेल, आयुष्यमान वाढेल. ही गोष्ट गंभीरपणे घ्या. त्यासाठी तुम्हांला जेवणाच्या वेळा ठरवाव्या लागतील. संध्याकाळी तुम्हांला 7 च्या आत जेवण संपवावे लागेल. फार तर 8 वाजता. त्यापुढे नाही. सकाळी ब्रेकफास्ट नाही. सरळ जेवण. तेही दुपारी. समजा रात्री 8 ला तुमचे जेवण झाले असेल आणि दुपारी 12 वाजता तुम्ही जेवण केले तर मधला 16 तासाचा काळ ही तुमचा झाला फास्टिंग. 16 तास नसेल जमत तर 14 तास करा. पण हळूहळू वाढवत न्या. 24 तास,  48 तासाचे ध्येय ठेवा. आजपासून सुरुवात करा आणि बघा पुढील तीन महिन्यात फरक पडतो की नाही ते.
5. व्यायाम करा पण जिम ला जाऊनच (Gym Exercises)
तुमच्या शरीराला व्यायाम ही गरज आहे. कारण जसे तुमचे वय वाढत जाते, तसे स्नायू ठिसूळ होत जातात. त्यात तुमच्यातील बऱ्याच लोकांना बैठे कामच असते. स्नायूंना मजबूत करण्यासाठी तुम्ही व्यायाम करणे महत्वाचे आहे. आणि व्यायाम हा वजन उचलण्याचाच असायला हवाय. त्यासाठी जिम गरजेची असते. वय जसे वाढत जाते, तसे हा वजन उचलण्याचा व्यायाम महत्वाचा असतो. असे केले तरच तुम्ही फिट राहू शकता. चालणे तर महत्वाचे आहेच. पण सोबत आठवड्या तुन तीन वेळा तुम्ही जिम ला जाऊन वजन उचलायला हवंय. वेळेची कारणे देऊ नका. जिम परवडत नसेल तर Push up, squats, Wall sits, किमान असे व्यायाम करा. पण काहींना काही हालचाल करा.
6. पुस्तके वाचा, जर्नल लिहा (Read Books, Journal) 
वरील सगळ्या गोष्टी या तुमच्या शारीरिक आरोग्याशी निगडित आहेत. त्या सोबतच तुमच्या मनाचे आरोग्य देखील महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही पुस्तक वाचण्यापासून सुरुवात करा. हा सगळ्यात फायदेशीर मानसिक व्यायाम आहे. तुम्हांला आवडत नसेल तर पुस्तक वाचनाची आवड लावून घ्या. तुम्ही काहीही वाचू शकता. कादंबरी, कथा संग्रह, कविता, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिमत्व विकास, आर्थिक विषयक, विज्ञान विषयक असे सगळे साहित्य वाचा. एक वेळ ठरवून घ्या. किमान अर्धा तास ते एक तास तुम्ही दररोज पुस्तक वाचायलाच हवं. लिहिण्याची आवड जोपासा. साहित्यपर लिहिणं गरजेचं नाही. तुमचे विचार लिहून काढा. एखादी समस्या सतावत असेल तर ती लिहून काढा. बघा तुम्हांला उत्तर मिळते का नाही? ध्यान करा. तुमच्या अंतर्मनाचा अभ्यास करा. त्याला कामाला लावा.
7. बचत करा, गुंतवणूक करा (Save and Invest) 
तुम्हांला बचतीची सवय असायला हवीय. अनावश्यक गोष्टीवर तुम्ही खर्च हा टाळायलाच हवा. त्याचसोबत तुम्ही गुंतवणूक करायला हवीय. फंड काय असतात, स्टॉक मार्केट काय आहे. हे शिकून घ्या. त्याचा अभ्यास करा. तुम्ही तुमच्या गावी जमीन विकत घ्या. दुसरं घर घ्या. काहीही करा पण पैसे उधळू नका. पैसे कमी असतील तर बचत करा. जास्त असतील तर गुंतवणूक करा.
8. पैशाचे स्रोत वाढवा (Raise your income streams) 
तुम्हांला तुमच्या नोकरीतून पैसे मिळतात. ही चांगलीच गोष्ट आहे. पण फक्त त्याच पैशावर अवलंबून राहू नका. नवीन स्रोत वाढवा. याचा अर्थ असा नाही कि तुम्ही अनैतिक मार्गाने पैसे मिळवा. तुमच्या नोकरीचा गैरफायदा घ्या. तसे करू नका. कर्माची फळे, ही संकल्पना लक्षात ठेवा. चांगल्या मार्गाने पैसे मिळवा. आजकाल खूप चांगले ऑनलाईन मार्ग आहेत. ते शोधा. त्याचा अभ्यास करा. ऑनलाईन कोर्स करा. नवीन कौशल्य शिकून घ्या.
9. वरिष्ठांचा सन्मान करा (Honor the seniors)
तुम्ही कुठल्याही खात्यात कामाला असा, जुनियर असा, सिनियर असा, तुम्हांला कुणीतरी वरिष्ठ असणारच. तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा सन्मान करायला हवाय. तुम्ही वरिष्ठाना आव्हान देऊ नका. त्याने तुमचेच मानसिक नुकसान होते. वरिष्ठ कसा का असेना तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करा. बाकी सूड उगवण्याचं काम नियतीवर सोपवून द्या. मात्र नसते ताण घेऊन आजारांना निमंत्रण देऊ नका. सहकाऱ्यांशी प्रेमाने वागा. एकूणच तुमच्या व्यक्तिमत्वासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत.
10. जमिनीवर या! (Grounding, Earthing)
जमिनीवर या, याचा अर्थ इथे वेगळा आहे. म्हणजे तुम्ही जमिनीशी, निसर्गाशी नाते जोडा.  दर रविवारी किमान अर्धा तास ते 1 तास अनवाणी चाला. वाळू, माती किंवा गवत कशावरही चाला. याने तुमच्य. पायाचे Biomechanics सुधारेल. जमिनीवर झोपा. बेडवर नाही. हे दररोज करा. डोक्याखाली उशी सुद्धा घेऊ नका. बघा तुमची पाठदुखी कशी पळून जाईल.
या सगळ्या गोष्टी वाचायला तशा सोप्या आहेत. मात्र प्रत्यक्षात अंमल करताना कळेल किती अवघड आहे ते. पण हीच आपली जीवनशैली असायला हवीय. यावरच तुम्ही अभ्यास करायला हवाय.

PMC Assistant Commissioner | सहाय्यक आयुक्तांचे अधिकार वाढवले | मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयात समन्वय राखण्यासाठी महापालिका आयुक्तांचा निर्णय!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Assistant Commissioner | सहाय्यक आयुक्तांचे अधिकार वाढवले | मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयात समन्वय राखण्यासाठी महापालिका आयुक्तांचा निर्णय!

Dr Rajendra Bhosale IAS – (The Karbhari’s News Service) – पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation-PMC) अंतर्गत असलेल्या विविध कार्यालयामध्ये असमन्वय असल्याचे चित्र तयार होत आहे. तसेच समस्यांचे निराकरण न झाल्याने नागरिक व लोकप्रतिनिधी यांचा महानगरपालिका प्रशासनाबद्दल रोष वाढताना दिसत आहे. ही बाब महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी गंभीरपणे घेतली आहे.  मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयात समन्वय राखण्यासाठी सहाय्यक आयुक्तांना ज्यादा अधिकार देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. (Pune PMC News)

 

पुणे महानगरपालिकेचे भौगोलिक कार्यक्षेत्र हे ५ परिमंडळ उप आयुक्त कार्यालय व १५ महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये विभागले गेलेले आहे. महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी राबविण्यात येणारी विविध विकास कामे महानगरपालिकेच्या मुख्य खाते जमे पथ विभाग, मलनिस्सारण विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग इत्यादी तसेच क्षेत्रिय कार्यालयाकडून विभागांमार्फत राबविली जातात. सदर कामांची अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक अधिकारांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली असून त्यानुसार सर्वसाधारणपणे रक्कम रु. १० लक्ष पर्यंतची कामे क्षेत्रिय कार्यालय, रक्कम रु.२५ लक्ष पर्यंतची कामे उप आयुक्त, परिमंडळ कार्यालय व त्यापेक्षा जास्त किंमतीची कामे मुख्य खात्याकडून राबविली जातात.
यामुळे क्षेत्रिय स्तरावर एकाच वेळेस मुख्य खात्याकडील तसेच क्षेत्रिय कार्यालयाकडील मनुष्यबळ कार्यरत असते. ही बाब प्रशासकीय स्वरुपाची असली तरी प्रभागातील विविध नागरी समस्यांबाबत लोकप्रतिनिधी, नागरिक यांचेकडून क्षेत्रिय कार्यालयात प्रथमत संपर्क साधला जातो. किंबहुना क्षेत्रिय कार्यालय हे महानगरपालिकेच्या सर्वच विभागांचे प्रतिनिधित्व क्षेत्रिय स्तरावर करीत असते. क्षेत्रिय कार्यालय हे महानगरपालिका प्रशासनाचा प्रथम प्रतिसाद केंद्रबिंदू आहे.
वस्तुतः कामे करणारा विभाग कोणताही असला तरी महानगरपालिका हा मुख्य प्रशासकीय घटक असून त्या अंतर्गत सर्व विभाग व क्षेत्रिय कार्यालये कार्यरत आहेत.
नागरिकांच्या समस्यांचे निराकरण हे कोणत्याही विभागांशी संबंधित असले तरी त्याचे क्षेत्रिय स्तरावर निराकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिक अथवा लोकप्रतिनिधी यांना महानगरपालिका मुख्यालयात येणे अपेक्षित नाही. तथापि, प्रत्यक्षात मात्र क्षेत्रिय कार्यालयाकडून ज्या कामांची अंमलबजावणी मुख्य खात्यांकडून केली जाते अशा कामांबाबत मुख्य खात्याकडे संपर्क साधावा असे सांगितले जाते.
मुख्य खात्याकडून करण्यात येणाऱ्या कामांचे पर्यवेक्षण करणारे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, निविदादार, ठेकेदार हे क्षेत्रिय कार्यालयाच्या सुचनांना प्रतिसाद देत नाही व सूचनांची दखल घेत नाहीत अशी तक्रार क्षेत्रिय कार्यालयाकडून केली जाते. यामुळे महानगरपालिके अंतर्गत असलेल्या विविध कार्यालयामध्ये असमन्वय असल्याचे चित्र तयार होते व समस्यांचे निराकरण न झाल्याने नागरिक व लोकप्रतिनिधी यांचा महानगरपालिका प्रशासनाबद्दल रोष देखील  वाढतो.
याशिवाय नैसर्गिक आपत्ती, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विविध कामांचे प्रभावी पर्यवेक्षण यात
समन्वय राहत नाही. यास्तव एकंदरीतच महानगरपालिका प्रशासनाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. ही वस्तूस्थिती विचारात घेता महानगरपालिकेची क्षेत्रिय कार्यालये तसेच मुख्य खाते याकडून राबविण्यात येणारी कामे, योजना यात समन्वय आणण्याकरिता खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
१. महापालिका सहाय्यक आयुक्त यांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी नोडल अधिकारी” (समन्वय अधिकारी) म्हणून घोषित करण्यात येत आहे.
२. महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अंमलबजावणी होत असलेल्या सर्वच विभागांच्या कामांचे पर्यवेक्षण करावे.
३. महापालिका सहाय्यक आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात विविध विभागांकडून अंमलबजावणी करण्यात येत असलेली कामे, योजना इत्यादीच्या सनियंत्रणाची
जबाबदारी महापालिका सहाय्यक आयुक्त यांची राहील व या सर्व कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ते जबाबदार राहतील.
४. महानगरपालिकेच्या क्षेत्रिय स्तरावर कार्यरत असणाऱ्या सर्वच विभागांच्या सर्व संवर्गातील अधिकारी/ सेवक यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त यांचेशी समन्वयसाधणे व त्यांच्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक आहे. यासाठी महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी दर पंधरवड्याला सर्व संबंधितांची बैठक घेऊन समन्वयाच्या मुद्यांचा आढावा घ्यावा.
५. ज्या विभागांचे क्षेत्रिय स्तरावर अधिकारी कर्मचारी महापालिका सहाय्यक आयुक्तयांच्या सूचनांना प्रतिसाद देणार नाहीत अथवा त्यांचे पालन करण्यास कसूर करतील अशा सेवक / अधिकारी यांचा दरमहा अहवाल महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी संबंधित अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचेमार्फत महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणावा.

Hawkers Biometric Survey | पथारी विक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याची मागणी

Categories
Breaking News PMC social पुणे

Hawkers Biometric Survey | पथारी विक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याची मागणी

 

Hawkers Biometri Survey – (The Karbhari News Service) – प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत ‘स्वनिधी से समृध्दी’ (विस्तारीत टप्पा ५) कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation – PMC) पथारी विक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करावे. तसेच हे सर्वेक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवावी,अशी मागणी जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचे वतीने पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

या मागणीचे पत्र आज(२१ जून २०२४)रोजी आयुक्त कार्यालयात देण्यात आले.अध्यक्ष संजय आल्हाट,सरचिटणीस रणजीत सोनवळे,रोहित जसवंते,उपाध्यक्ष बंडू वाघमारे यांनी पत्रकाद्वारे या संबंधी माहिती दिली.

पथ विक्रेता राष्ट्रीय धोरण अस्तित्वात आल्यावर पुणे पालिकेने दहा वर्ष अंमलबजावणी केलेली नाही.गेली दहा वर्ष पथविक्रेता योजनेच्या कुटुंबियांचे सर्वेक्षण प्रलंबित आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा पथ विक्रेत्यांना लाभ मिळवून देणेकामी व जोपर्यंत पथारी विक्रेत्यांचे बायोमॅट्रिक सर्वेक्षण २०२४ पर्यंत होत नाही तोपर्यंत पथारी विक्रेत्यावरील कारवाई थांबवावी, असे पत्र यासंदर्भात जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाने २६ फेब्रुवारी २०२४ रोजीदिले होते.त्यावर आयुक्तांकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही ,दुसरीकडे पथारी विक्रेत्यांवर अन्यायकारक कारवाई केली जात आहे. पथारी विक्रेत्यांना एकत्रितपणे या योजनेची माहिती देऊन मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परंतू पालिका कर्मचारी करवाईच्या नावाखाली त्यांचा माल उचलून घेवून अवास्तव दंडाच्या रक्कमेची मागणी करतात.पैसे न दिल्यास माल घेवून निघून जात आहेत. हे प्रकार तात्काळ थांबवावे अन्यथा आयुक्त कार्यालयासमोर जनआदोलन करण्यात येईल,असा इशारा या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.