Publication of work report : BJP : महापालिकेत जा आणि लोकांची कामे करा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिकेत जा आणि लोकांची कामे करा 

: माजी नगरसेवकांना चंद्रकांत पाटलांची सूचना 

 

पुणे : पुणे महापालिका बरखास्तीनंतर अनेक नगरसेवक महापालिकेत गेले नाहीत. हे योग्य नाही, प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी दिवस वाटून घेऊन रोज महापालिकेत जा. नगरसेवक असताना जशी कामे केली तशीच कामे आताही करा, जनसंपर्क ठेवा. महापालिका पुन्हा जिंकण्यासाठी आपण माजी नाही तर आजी नगरसेवक आहोत हेच डोक्यात ठेवा. निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरीही पूर्वीप्रमाणे कामे करा, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

पुणे महापालिकेत गेल्या पाच वर्षात कार्य अहवालाचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, दिलीप कांबळे, योगेश मुळीक, धीरज घाटे, सरस्वती शेंडगे, दीपक नागपुरे, गणेश घोष आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पाच वर्षात भाजपने केलेल्या कामांची यादी पाहून अभिमानाने फुलते. पूर्वी पाणी, गटार, कचरा अशा समस्या सोडविणारा नगरसेवक होता, पण आता ही कामे करतानाच वाहतूक कोंडीचा विचार करणारा, भूसंपादनासाठी प्रयत्न करणारा, मेट्रो, समान पाणी पुरवठा योजना करणारा अशी व्यापक व्याख्या नगरसेवकांची पुण्यात झाली आहे.त्यामुळेच सर्व सर्वेक्षणात भाजपला ८०च्या खाली जागा दाखवली जात नाही. भाजपला सत्ता दिल्याने त्याचे चीज झाले जाणीव लोकांमध्ये आहे. पुण्यात महापालिकेशिवाय भाजप माहिती नाही. देशात, राज्यात काय चालले आहे याची प्रतिक्रिया नसते. किरीट सोमय्यावर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आक्रमकपणे रस्त्यावर उतरलो तर भविष्यात पुढे कोणत्या नेत्यांवर हल्ला होण्याची वेळ येणार नाही. केवळ नगरसेवक म्हणून काम करायला जन्माला आला नाहीत. तर संघटनेची लढाई लढावीच लागेल. संघटना आहे तर आपण जिवंत आहोत, अशा शब्दात पाटील यांनी संघटनेसाठीही काम करा असा सल्ला दिला.
२०२४ ला कोल्हापूर गेले‘‘कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत भाजपला ७७ हजार मिळाल्याने अनेकांची झोप उडाली आहे. बंटी पाटलांसह अनेकजण याचा अभ्यास करत आहेत. कोल्हापूरच्या निकालानंतर वृत्तपत्र, सोशल मीडिया, वृत्त वाहिन्यांवरून मी कधी हिमालयात जाणार अशी टीका केली. पण तेव्हा भाषण करणारे अनेक जण २०२४ ला आपल्या हातातून कोल्हापूर गेले, असे मानत आहेत. आपण हे केळन संघटनेच्या जोरावर करू शकलो, अशा शब्दात पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली.