Pune Municipal Corporation (PMC) News | आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील विविध पदावरील अधिकारी आणि सेवकांची प्रारूप सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे
Spread the love

 Pune Municipal Corporation (PMC) News | आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील विविध पदावरील अधिकारी आणि सेवकांची प्रारूप सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द

Pune Municipal Corporation (PMC) News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या आरोग्य विभाग (PMC Health Department) व घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील (PMC Solid Waste Management Department) विविध पदावरील अधिकारी आणि सेवकांची प्रारूप सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यावर आगामी 15 दिवसांत हरकती नोंदवण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Pune PMC News)
प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील आरोग्य विभागाकडील पशुशल्य चिकित्सक अधिकारी, प्लास्टिक सर्जन, नेत्र शल्य चिकित्सक, पेडियाट्रिक सर्जन, दंतशल्य चिकित्सक, भौतिकोपचार तज्ञ, सहाय्यक आरोग्य अधिकारी, मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर, वैद्यकिय अधिकारी / निवासी वैद्यकिय अधिकारी, आयुर्वेदिक वैद्यकिय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, शहर क्षयरोग अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, विकृतिशास्त्र तज्ञ (क्लिनिकल पॅथोलॉजिस्ट), क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट), शल्यचिकित्सक / शल्य विशारद (सर्जन), मानसोपचार तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, वरिष्ठ औषध निर्माता, दंततंत्रज्ञ, एक्स-रे टेक्निशियन, अन्न निरीक्षक, व्यवस्थापक (वैद्यकीय सामग्री), सहाय्यक (दवाखाना)(विकासे), औषध निर्माता, परिसेविका (सिनिअर नर्स), स्टाफ नर्स ( ज्युनियर नर्स), प्रसविका/ परिचारिका (ऑक्झिलरी नर्स), वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, उप निबंधक (जन्म-मृत्यू) या पदांवर तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील उप आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक या पदांवर ३१/१२/२०२३ अखेर कार्यरत असणाऱ्या अधिकारी/सेवकांच्या प्रारूप सेवाजेष्ठता याद्या तयार करण्यात आल्या असून सदर याद्या पुणे महानगरपालिकेच्या
https://pmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
परिपत्रकात म्हटले आहे कि, यादीतील अधिकारी / कर्मचारी यांनी स्वत:चे नाव, जात, जातीचा गट,शैक्षणिक पात्रता, जन्मदिनांक, नेमणूकीचे दिनांक इ. सर्व बाबींची पाहणी करुन आपले नावासमोर स्वाक्षरी करावी. तसेच प्रारूप सेवाजेष्ठता यादीबाबत काही दुरुस्ती असल्यास कागदोपत्री लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवावेत.
प्रारूप सेवाजेष्ठता यादीमध्ये घेण्यात आलेल्या नोंदीबाबत काही आक्षेप / चूका असल्यास हे कार्यालय परिपत्रक प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून १५ दिवसांचे मुदतीत आपले आक्षेप लेखी स्वरूपात कागदपत्रांच्या
पुराव्यासहित आस्थापना विभाग कार्यालयास सादर करावेत. त्यानुसार पुढील १५ दिवसात सदरच्या नोंदी घेऊन अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करण्यात येईल. तसेच मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा किंवा अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द केल्यानंतर त्यामध्ये दुरूस्त्या सुचविण्यात आल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही. असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.