Archana Patil | स्पायडरमशिन टेंडर प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा  | माजी नगरसेविका अर्चना पाटील यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

स्पायडरमशिन टेंडर प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

| माजी नगरसेविका अर्चना पाटील यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

पुणे | महापालिकेच्या (PMC Pune) स्पायडरमशिन टेंडर (spider machine tender) प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप माजी नगरसेविका तथा भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना पाटील (Former corporator Archana patil) यांनी केला आहे. राजकीय दबाव दाखवत जवळच्या ५ ठेकेदारांच्यात ५ निविदा वाटून देण्याचा भ्रष्ट घाट मलनिस्सारण विभाग घालत आहे. असे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हा प्रकार हाणून पाडावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी पाटील यांनी महापालिका आयुक्त विक्रम (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे.

अर्चना पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार  ड्रेनेज विभागाचे अधीक्षक अभियंता यांची  निविदा प्रक्रियेतील भूमिका वादग्रस्त, भ्रष्ट आहे. मर्जीतील ठेकेदारास काम न मिळाल्याने त्या बाबत अख्खी निविदा प्रक्रिया रद्दबातल करण्याचा पॅकेज ४ पथ विभाग प्रमाणे भूमिका खाते प्रमुख, मलः निसारण विभाग बजावत आहेत.  शुद्धीपत्रक काढून जिल्ह्यात अवघ्या ५ लोकांकडे उपलब्ध मॉडेल बंधनकारक करून नवीन निविदा प्रक्रिया राबवित आहेत. राजकीय दबाव दाखवत जवळच्या ५ ठेकेदारांच्यात ५ निविदा वाटून देण्याचा भ्रष्ट घाट मलनिस्सारण विभाग घालत आहे. प्रशासनाने तात्काळ हा प्रकार हाणून पाडावा … असे पाटील यांनी म्हटले आहे. (PMC pune)

याबाबत खालील मागण्या पाटील यांनी केल्या आहेत 
१) स्पायडरमशीन निविदा व कामे दक्षता विभागाच्या
वतीने करण्यात यावीत
२) सदर कामे तास पद्धतीने मागविण्या ऐवजी मापन पद्धतीने मागवावी
३) स्पायडर मशीनचा DSR दर पोकलेन पेक्षा जास्त कसा याची चौकशी करून सुधारणा करावी
(४) मनपाने स्वतःची स्पायडर विकत घ्यावी
५) अधीक्षक अभियंता यांची भ्रष्ट कार्य पद्धती बद्दल चौकशी करून अहवाल येई पर्यंत त्यांचे आर्थिक अधिकार गोठवण्यात यावेत.
पाटील यांनी पुढे म्हटले आहे कि, मनपाची यथेच्छ  बदनामी प्रसार माध्यमे व सोशल मीडियातून स्पायडर कामांमुळे होत असते. अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट
आचरणामुळे नगरसेवकांना जनतेच्या रोषास पात्र व्हावे लागते. स्पायडरमशीन कामातील अनियमितता, भ्रष्टाचार रोखण्यासाठी या पत्रात मागणी केलेल्या मुद्द्यांचा गांभीर्याने  विचार करावा. तसेच विषयांकित प्रकरणाची अँटी करप्शन ब्यूरो कडे तक्रार दाखल करण्यात येत आहे. असा इशारा ही पाटील यांनी दिला आहे. (Pune Municipal corporation)