Ganeshkhind Road Shivajinagar | चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल दरम्यानच्या 45 मी डी.पी. रस्तारुंदीसाठी 52 मिळकती कायद्याद्वारे घेतल्या जाणार ताब्यात! 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Ganeshkhind Road Shivajinagar | चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल दरम्यानच्या 45 मी डी.पी. रस्तारुंदीसाठी 52 मिळकती कायद्याद्वारे घेतल्या जाणार ताब्यात!

| महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर

Ganeshkhind Road Shivajinagar – (The Karbhari News Service) – शिवाजीनगर गणेशखिंड रस्ता येथील चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल दरम्यानच्या ४५ मी. डी.पी. रस्तारुंदीसाठी आरक्षित जागा, नविन भूसंपादन कायदा २०१३ नुसार संपादन केली जाणार आहे. यात 52 मिळकतीचा समावेश आहे. संबंधित मिळकत धारकांनी तडजोडीने जागा ताब्यात देण्यास नकार दिल्याने आता कायद्याचा वापर करून मिळकती ताब्यात घेतल्या जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

स्थायी समितीच्या प्रस्तावानुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. मंजूर विकास आराखडयानुसार ४५ मी.डी.पी रस्तारूंदीने जागा ताब्यात घेतली जाणार आहे.  चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्याची उजवी बाजू व डावी बाजूच्या बाधित मिळकतींचे भूसंपादन कायद्यान्वये भूसंपादन करणेबाबत आदेश देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने बाधित मिळकत धारकांना तडजोडीने बाधित मिळकती ताब्यात घेणेबाबत पत्र दिलेले आहेत. तथापि बाधित मिळकत धारकांनी तडजोडीने बाधित मिळकती ताब्यात देण्यास नकार दिल्याने मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने  नमूद मिळकती भूसंपादन कायद्याद्वारे संपादित करण्यात येणार आहेत.
१. संचेती हॉस्पिटल ते चाफेकर पुतळा (डावी बाजू ) – बाधित क्षेत्र ७०६७.७१ चौ.मी. (एकूण मिळकती २५)-

२. संचेती हॉस्पिटल ते चाफेकर पुतळा (उजवी बाजू) – बाधित क्षेत्र ७०६३.८५ चौ.मी. (एकूण मिळकती २७)-

प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि, बाधित क्षेत्राचे तडजोडीने
ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू असली तरी उपरोक्त नमूद बाधित क्षेत्राची भूसंपादन कायद्यान्वये भूसंपादन करण्याची प्रक्रिया देखील समांतर चालू करणेबाबत व भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील पाठविणेबाबत महापालिका आयुक्त यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार वरीलप्रमाणे नमूद एकूण ७०६७.७१ (डावी बाजू)+ ७०६३.८५ (उजवी बाजू) = १४१३१.५६ चौ.मी जागा भूसंपादन कायद्यान्वये संपादित करण्यासाठी सुमा १४४.७० कोटी इतकी तरतूद आवश्यक आहे.

भूसंपादन प्रस्ताव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२६ अन्वये करण्यात येत असल्याने व सदर कलमामध्ये नियोजन प्रधिकरणास, विकास प्राधिकरणास भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा अधिकार असल्याने सदर भूसंपादन प्रकरणी भूसंपादन प्रक्रिया सुरू करणेपूर्वी भूसंपादन प्रस्तावास स्थायी समिती मार्फत मुख्य सभेची मान्यता घेणे योग्य होईल अशी खात्याने शिफारस केली आहे.