Ganeshkhind Road Shivajinagar | चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल दरम्यानच्या 45 मी डी.पी. रस्तारुंदीसाठी 52 मिळकती कायद्याद्वारे घेतल्या जाणार ताब्यात!
| महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर
Ganeshkhind Road Shivajinagar – (The Karbhari News Service) – शिवाजीनगर गणेशखिंड रस्ता येथील चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल दरम्यानच्या ४५ मी. डी.पी. रस्तारुंदीसाठी आरक्षित जागा, नविन भूसंपादन कायदा २०१३ नुसार संपादन केली जाणार आहे. यात 52 मिळकतीचा समावेश आहे. संबंधित मिळकत धारकांनी तडजोडीने जागा ताब्यात देण्यास नकार दिल्याने आता कायद्याचा वापर करून मिळकती ताब्यात घेतल्या जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
२. संचेती हॉस्पिटल ते चाफेकर पुतळा (उजवी बाजू) – बाधित क्षेत्र ७०६३.८५ चौ.मी. (एकूण मिळकती २७)-
प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि, बाधित क्षेत्राचे तडजोडीने
ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू असली तरी उपरोक्त नमूद बाधित क्षेत्राची भूसंपादन कायद्यान्वये भूसंपादन करण्याची प्रक्रिया देखील समांतर चालू करणेबाबत व भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील पाठविणेबाबत महापालिका आयुक्त यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार वरीलप्रमाणे नमूद एकूण ७०६७.७१ (डावी बाजू)+ ७०६३.८५ (उजवी बाजू) = १४१३१.५६ चौ.मी जागा भूसंपादन कायद्यान्वये संपादित करण्यासाठी सुमा १४४.७० कोटी इतकी तरतूद आवश्यक आहे.