PMC Administrative Officer | प्रशासन अधिकाऱ्याला सहायक आयुक्त पदाचा देण्यात आला पदभार! | लेखनिकी संवर्गाला न्याय मिळत असल्याची कर्मचाऱ्यांची भावना!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Administrative Officer | प्रशासन अधिकाऱ्याला सहायक आयुक्त पदाचा देण्यात आला पदभार!

| | लेखनिकी संवर्गाला न्याय मिळत असल्याची कर्मचाऱ्यांची भावना!

PMC Administrative Officer – (The Karbhari News Service) – महापालिका सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार लेखनिकी संवर्गातील प्रशासन अधिकाऱ्याला महापालिका सहायक आयुक्त (PMC Assistant Commissioner) या पदाचा पदभार देणे विधिग्राह्य असताना सरसकट उप अभियंता (Deputy Engineer) यांच्याकडे या पदाचा पदभार देण्यात येत होता.  त्यामुळे प्रशासन अधिकारी या पदावरील सेवकांवर अन्याय होत होता. मात्र प्रशासन अधिकाऱ्यांसाठी प्रशासनाने नुकताच एक सुखद धक्का दिला आहे. प्रशासन अधिकारी भास्कर महाडिक (Bhaskar Mahadik PMC) यांच्याकडे सहायक महापालिका आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला आहे. महापालिका सहायक आयुक्त इंद्रायणी करचे (Indrayani Karache PMC) यांच्या रजा कालावधीतील हा पदभार महाडिक यांच्याकडे देण्यात आला आहे.  या आदेशामुळे लेखनिकी संवर्गावर (Clerical Cadre) होत असलेला अन्याय मनपा प्रशासनाने  दूर करण्याची सकारात्मक भूमिका घेतली असून प्रशासन अधिकारी या पदावरील सेवकांना न्याय दिला आहे. त्याबद्दल मनपातील सर्व सेवकांकडून प्रशासनाचे आभार मानले जात आहेत. (Pune Municipal Corporation)

: लेखनिकी संवर्गावर वारंवार केला गेला अन्याय

महापालिकेच्या सहायक महापालिका (PMC Assistant commissioner) आयुक्त पदाच्या अर्हता आणि नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार बदल केला जात आहे. या पदाच्या 50% पदोन्नतीच्या (Promotion) पद्धतीत बदल केला गेला होता. प्रचलित पद्धतीनुसार सेवाज्येष्ठतेनुसार (Seniority) 50% पदोन्नती दिली जात होती. मात्र यात बदल करण्यात आला. त्यानुसार पदवी धारण करणारे अंतर्गत परीक्षेद्वारे वर्ग 1, 2 आणि 3 मधील कर्मचारी देखील सहायक आयुक्त होऊ शकतात. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महापालिकेच्या मुख्य सभेने (pmc pune General body) मान्यता दिली होती व हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. मात्र यात अजून एक बदल केला गेला आहे. आता फक्त पदवीच (Degree) नाही तर पदविका (Diploma) धारण करणारा कर्मचारी देखील परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकणार आहे. मात्र या माध्यमातून लेखनिकी संवर्गातून (clerical cadre) सहायक आयुक्त (Assistant Municipal commissioner, होण्याची मनीषा बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेदखल केले असल्याचे दिसून येत आहे. (PMC pune Assistant commissioner)
महापालिका सेवा नियमावली (PMC pune Service rules) नुसार सहायकमहापालिका आयुक्त पदासाठी अर्हता आणि नेमणुकीची पद्धत कशी करावी हे ठरवून दिले आहे. त्यानुसार त्याची साखळी देखील बनवण्यात आली होती. त्यामध्ये लेखनिकीसंवर्गासाठी अधीक्षक, प्रशासनअधिकारीसहायक आयुक्त, उपायुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अशी आहे. तर तांत्रिक पदासाठी शाखा अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि शहर अभियंता अशी आहे. (PMC pune news)

: पदोन्नती मध्ये बदल

त्यानुसार प्रशासकीय सेवाश्रेणी – १ मधील  सहाय्यक आयुक्त (क्रिडा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, स्थानिक संस्थाकर अधिक्षक, मालमत्ता व व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन) या पदाची नेमणुकीची प्रचलित  पद्धत ही 25% नामनिर्देशन, पदोन्नती-५०% आणि प्रतिनियुक्ती 25% अशी होती. 50% पदोन्नती ही महापालिका कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठेतेनुसार केली जात होती. मात्र आता यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फक्त पदवीच नाही तर पदविका धारण करणारा कुठल्याही संवर्गातील कर्मचारी परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकणार आहे. प्रशासनाने सेवा नियमावलीत हा बदल केला आहे. त्यामुळे लेखनिकी संवर्गात गेली 20-25 वर्ष काम करणारे, प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असणारे कर्मचारी मात्र या नियमामुळे बेदखल होत आहेत. प्रत्येक संवर्गाची एक साखळी ठरलेली आहे. मात्र बदल करताना लेखनिकी संवर्गातील साखळीतच बदल करण्यात आला आहे. 

 
असे असले तरी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सुखद धक्का देत प्रशासन अधिकाऱ्याला थोडा काळ का होईना सहायक महापालिका आयुक्त पद दिले आहे. यामुळे सध्या तरी लेखनिकी संवर्ग समाधानी दिसत आहे.