PMC Sanitary Napkins Purchase | पुणे महापालिका आता 5 2 (2) नुसार खरेदी करणार 24 लाख सॅनिटरी नॅपकिन्स!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Sanitary Napkins Purchase | पुणे महापालिका आता 5 2 (2) नुसार खरेदी करणार 24 लाख सॅनिटरी नॅपकिन्स!

| 93 लाख 53 हजाराचा खर्चाला स्थायी समितीची मान्यता

Pune – (The Karbhari News Service) – PMC Sanitary Napkins Purchasing) : पुणे महापालिकेच्या शाळांतील (PMC Schools) मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स देण्यात येतात. मात्र याबाबतची यंदाची नॅपकिन खरेदी ची टेंडर प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्यामुळे प्रक्रिया रद्द  करण्यात आली होती.  त्यामुळे महापालिका अधिनियम 5 2 (2) नुसार आता महापालिका 24 लाख सॅनिटरी नॅपकिन्स ची खरेदी करणार आहे. यासाठी जवळपास 94 लाख इतका खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने (PMC Standing Committee) नुकतीच मान्यता दिली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) शाळांतील विद्यार्थिनींना महापालिके कडून सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यात येते. दरवर्षी लाखो नॅपकिन दिले जातात. यासाठी टेंडर प्रकिया राबवली जाते. कोविड काळापासून ही टेंडर प्रक्रिया बंद करण्यात आली होती. दरम्यान मागील वर्षी महापालिका प्रशासनाकडून नॅपकिन खरेदी ची टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र याविषयी तक्रारी करण्यात आल्याने महापालिकेने ही निविदा प्रक्रिया रद्द केली. मात्र यामुळे मुलींना नॅपकिन मिळण्यास उशीर होत होता. त्यामुळे महापालिकेने सीएसआर फंडातून नॅपकिन्स घेतल्या होत्या. तसेच काही सामाजिक संस्थांनी पालिकेला नॅपकिन्स दिले होते. (Pune PMC News)

दरम्यान सीएसआर फंडातून मिळणाऱ्या नॅपकिन्स वजा जाता बाकी 24 लाख नॅपकिन्स महापालिका अधिनियम 5 2 (2) नुसार वैद्य व्ही अँड आय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा लि नागपूर यांच्याकडून खरेदी करणार आहे. त्यासाठी प्रति नग 3.90 रु इतका दर आहे. महापालिकेने राबवलेल्या टेंडरचा दर हा 4.85 रु इतका होता. त्यामुळे संबंधित कंपनी कडून दोन वर्षासाठी नॅपकिन्स घेण्यात येणार आहेत. यात आर्थिक वर्ष 2023-24 साठी 3 लाख 42 हजार 600 नॅपकिन्स खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी 13 लाख 36 हजाराचा खर्च आहे. तर आर्थिक वर्ष 2024-25 साठी 20 लाख 55 हजार 600 नॅपकिन्स ची खरेदी केली जाईल. यासाठी 80 लाख 17 हजाराचा खर्च येणार आहे. असा एकूण 93 लाख 52 हजार 980 इतका खर्च या प्रक्रियेसाठी येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

Sanitary Napkins in PM Schools | पुणे शहर शिवसेना व एकनाथ शिंदे फाउंडेशन कडून पुणे महापालिका शाळेत विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन वाटप 

Categories
Breaking News Education Political social पुणे

Sanitary Napkins in PM Schools | पुणे शहर शिवसेना व एकनाथ शिंदे फाउंडेशन कडून पुणे महापालिका शाळेत विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन वाटप

| प्रथम कर्तव्य समजून पुण्यातील महापालिकेच्या शाळेतील सर्व विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन वाटणार- प्रमोद नाना भानगिरे

 

Sanitary Napkins in PMC Schools | पुणे शहरातील महापालिकेच्या शाळेतील (PMC Pune Schools) विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकिन चा पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे विद्यार्थिनींची होणारी गैरसोय, आरोग्याची अडचण टाळण्याकरित पुणे शहर शिवसेना (Pune Shivsena) व एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या (Eknath Shinde Foundation) वतीने सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले. अशी माहिती शहर शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire Pune Shivsena) यांनी दिली.

प्रमोद नाना भानगिरे पुढे म्हणाले की पुणे महानगरपालिकेत गेल्या तीन वर्षापासून सॅनिटरी नॅपकिन चे वाटप झालेले नाही. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची गैरसोय होऊ नये व आर्थिक अडचण लक्षात घेता आम्ही हे अभियान संपूर्ण पुण्यात राबविणार आहोत. शहरातील महापालिकेच्या शाळेतील किशोरवयीन 25 हजार 695 विद्यार्थिनींना या अभियानाच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन पुरवले जाणार आहेत. पालिकेच्या यंत्रणेला वेळ लागतोय आणि यामुळे मुलींची गैरसोय होता कामा नये हा या मागचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

the karbhari - pmc schools
पुणे शहर शिवसेना व एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले

पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना सॅनिटरी नॅपकिन चा पुरवठा शिवसेनेतर्फे करण्यात येणार असल्याचे भानगिरे यांनी जाहीर केले. पुणे महानगरपालिकेने गेल्या चार वर्षापासून मुलींच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले सॅनिटरी नॅपकिन दिलेले नाहीत. मागील दोन वर्षात ठेकेदाराच्या वादात निविदा रद्द करण्यात आल्या. तसेच दरवर्षी 26000 नॅपकिन पालिकेकडून पुरवल्या जातात. मात्र दोन वर्षापासून हा पुरवठा झालेला नसल्या कारणाने विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते.

the karbhari - pramod nana bhangire

यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, महिला शहर प्रमुख पूजा रावेतकर, शहर प्रवक्ते अभिजित बोराटे, माजी नगरसेविका सोनालीताई लांडगे, शहर समन्वयक शंकर संगम, महिला उपशहर प्रमुख श्रद्धा शिंदे,श्रुती नाझिरकर, विधानसभा प्रमुख संतोष लांडगे, सुनीता उकिरडे,नेहा शिंदे,आकाश शिंदे, आकाश रेणुसे व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Kunbi-Maratha Reservation | PMC | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुणबी नोंदीची माहिती घेण्यास सुरुवात

Categories
Breaking News PMC social पुणे

Kunbi-Maratha Reservation | PMC | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुणबी नोंदीची माहिती घेण्यास सुरुवात

 

Kunbi-Maratha Reservation | PMC | राज्यभरात मराठा-कुणबी नोंदी (Maratha-kunbi Registration) घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांच्या कुणबी नोंदी ची देखील माहिती घेतली जाणार आहे. १९६७ पूर्वीचे महापालिका अधिकारी / कर्मचारी यांचे सेवापुस्तक / सेवा अभिलेख तपासणी करून त्याआधारे प्राप्त नोंदी कळविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी दिले आहेत. दरम्यान महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या नोंदीची देखील माहिती घेतली जात आहे. (Kunbi-Maratha Reservation | PMC)

शासन निर्णयान्वये मराठा-कुणबी, कुणबी- मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देणेबाबत मा.न्यायमूर्ती श्री. संदिप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करणेत आलेली आहे.
या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. दरम्यान या नोंदी  बाबत  तपासणीची कार्यवाही सुरु करणेचे अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्त/सर्व जिल्हाधिकारी यांचे स्तरावर समन्वय कक्ष/विशेष कक्ष स्थापन करणेत आलेला आहे. त्यानुसार कार्यवाही करून त्याबाबत अहवाल सादर करणेबाबत सरकारने आदेश दिले आहेत. त्यानुसार  पुणे महानगरपालिकेमधील अधिकारी / कर्मचारी यांचे सेवापुस्ताकांची अभिलेख तपासून त्याआधारे नोंदीबाबतची माहिती सादर करणेबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत कार्यवाही करणेबाबत एक समन्वय अधिकारी नेमण्यात आला आहे. संजयकुमार राठोड, प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग यांची याकामी नेमणूक करण्यात आली आहे.  राठोड यांनी  ज्योती कदम, निवासी उप जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधून कामकाज पहावयाचे आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. (PMC Pune News)

तर दुसरीकडे महापालिका शाळांतील (PMC Pune Schools) विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. हे काम देखील प्रशासकीय अधिकारी राठोड यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

PMC Primary  Éducation Department | वारजे माळवाडीतील बराटे शाळेतील शिक्षक प्रश्नाबाबत महापालिका सकारात्मक | प्रशासन आणि पालकांची उद्या एकत्रित बैठक

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

PMC Primary  Éducation Department | वारजे माळवाडीतील बराटे शाळेतील शिक्षक प्रश्नाबाबत महापालिका सकारात्मक | प्रशासन आणि पालकांची उद्या एकत्रित बैठक

PMC Primary Education Department | पुणे | वारजे माळवाडी मधील पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाची (PMC Primary Education Department) कै. शामराव श्रीपती बराटे मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. इंग्रजी माध्यमातील शाळेत 6 शिक्षकांची कमी आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले होते. त्याबाबत शाळेत अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप बाबा धुमाळ यांनी केली होती. याबाबत The Karbhari ने वृत्त प्रसारित केले होते. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिक्षण विभागाने या प्रश्नाबाबत प्रशासन व पालकांची एकत्रित बैठक बोलावली आहे.  (Pune Municipal Corporation)

प्र.क्र. ३२ वारजे माळवाडी मधील पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाची कै. शामराव श्रीपती बराटे मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. सदर शाळेत गेले अनेक दिवसांपासून इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळेत 6 शिक्षक कमी आहे. उपलब्ध असलेल्या शिक्षकांना
२ ते ३ वर्ग घ्यावे लागतात . त्याचप्रमाणे काही वर्गांना शाळेतील शिपाई तसेच बालवाडी शिक्षिका, मावशी व काही वेळेला पालक सुद्धा वर्गांना शिकवीत आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळेची गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा अत्यंत चांगला असुन या वर्षी झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेत १७ विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये आलेले आहेत. मात्र शिक्षक कमी असल्याने दर्जा खालावत आहे. (PMC School)

याबाबत परिसरातील पालकांनी दीपाली धुमाळ आणि प्रदीप बाबा धुमाळ यांच्याकडे समस्या मांडली होती. धुमाळ यांनी याबाबत पाठपुरावा करत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी पालक आणि प्रशासन यांची एकत्रित बैठक उद्या बोलावण्यात आली आहे. उपायुक्त राजीव नंदकर, शिक्षण प्रमुख श्री राठोड, उप शिक्षण प्रमुख शुभांगी चव्हाण, सहायक प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षिका व दोन्ही शाळांचे मुख्याध्यापिका यांच्या समवेत ही बैठक होणार आहे.
 (Pune Municipal Corporation school)
बराटे इंग्रजी शाळेत 6 शिक्षकांची कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत आम्ही शिक्षण विभाग आणि पालकांची एकत्रित बैठक बोलावली आहे. हा प्रश्न तात्काळ सोडवला जाईल. नुकतीच काही इंग्रजी माध्यमासाठी शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. त्यातील काही शिक्षक या शाळेत देण्यात येतील.
राजीव नंदकर, उपायुक्त, पुणे मनपा 
——-

PMC School Audit | पुणे मनपाच्या शाळांमधील विना वापरांच्या वस्तूंचे ऑडिट करा | पृथ्वीराज सुतार यांची आयुक्ताकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC School Audit | पुणे मनपाच्या शाळांमधील विना वापरांच्या वस्तूंचे ऑडिट करा | पृथ्वीराज सुतार यांची आयुक्ताकडे मागणी

PMC School Audit | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation School) शाळांमधील विद्यार्थी व कर्मचारी, शिक्षक यांच्या जिवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार मनपाला नाही. भविष्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही शिवसेना पक्षाच्या (Shivsena Party) वतीने आपणास मागणी करत आहोत कि सर्व मनपा शाळाचे फायर ऑडीट, इलेक्ट्रिकल ऑडीट व स्ट्रक्चरल ऑडीट त्वरीत करण्यात यावे, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. अशा इशारा शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (PMC School Audit)
सुतार यांच्या निवेदनानुसार गुरुवार रोजी पुणे मनपाच्या कै हबीरराव मोझे या शाळेमध्ये आगीची दुदैवी घटना घडली. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी सारखी गंभीर घटना घडली नाही. सदरची आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असे समजले. आगीची तीव्रता वाढण्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी असलेले अडगळीचे सामान, टाकाऊ साहित्य, विना वापराच्या खराब झालेल्या वस्तू. (Pune Municipal Corporation)
निवेदनात पुढे म्हटले आहे कि, मनपाच्या शेकडो शाळांमध्ये सुस्थितीतील व विना वापराचे टाकाऊ, खराब झालेल्या वस्तू व साहित्य आहे. जे शाळाच्या विविध मजल्यावर, विना वापरांच्या खोल्यांमध्ये, टेसेवर पडून आहे कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही. नुकत्याच झालेल्या दुदैवी घटनेवरून आपण बोध घेऊन भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडून येऊ नयेत म्हणून मनपाच्या शाळांमधील असे सर्व प्रकारचे विना वापरांचे साहित्य त्वरीत काढून घेण्यात यावे. (PMC Pune)
तसेच या शाळामध्ये मनपाने करोडो रूपये खर्च करून अग्निशमन यंत्रणा जी बसविली होती, त्या यंत्रणांचे सद्यपरिस्थिती काय ? त्यातील किती चालू आहेत व बंद आहेत त्याची माहिती काय ? या यंत्रणा चालविण्याबाबत शाळामधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे का ? अनेक शाळांमध्ये जुनीच विद्युत व्यवस्था आहे. शाळांमधील विद्यार्थी व कर्मचारी, शिक्षक यांच्या जिवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार मनपाला नाही. भविष्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने आपणास मागणी करत आहोत कि सर्व मनपा शाळाचे फायर ऑडीट, इलेक्ट्रिकल ऑडीट व स्ट्रक्चरल ऑडीट त्वरीत करण्यात यावे, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. असा इशारा सुतार यांनी दिला आहे.
—-

DBT | Maharashtra Navnirman Vidyarthi Sena | डीबीटी रकमेवरुन विद्यार्थी सेनेच्या वतीने मनपा शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन

Categories
Breaking News Education PMC Political social पुणे

DBT | Maharashtra Navnirman Vidyarthi Sena | डीबीटी रकमेवरुन विद्यार्थी सेनेच्या वतीने मनपा शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन

DBT | Maharashtra Navnirman Vidyarthi Sena |  महापालिका विद्यार्थ्यांच्या शाळा (PMC Schools) सुरू होऊन तीन महिने उलटून देखील शालेय साहित्य खरेदी साठी डी.बी.टी ची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा न केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहरा च्या वतीने  आंदोलन करण्यात आले. तसेच 48 तासांत विषय निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सेनेने दिला आहे. (DBT | Maharashtra Navnirman Vidyarthi Sena)
सेनेच्या निवेदनानुसार  नऊ हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडणारी श्रीमंत महापालिका असं बिरूद मिरवणारी पुणे मनपा शाळा सुरू होऊन तीन महिने उलटून देखील अजुन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दप्तरे, गणवेश इत्यादी देऊ शकलेली नाही. आजवर पुणे शहरातील मनपा शाळेतील सुमारे लाखभर विद्यार्थी या शैक्षणिक साहित्यापासून वंचित आहेत.  वास्तविकता जून महिन्यातच ही प्रक्रिया सुरू करणे गरजेचे होते परंतु प्रशासनाची उदासीनता आणि ठराविक लोकांच्या आर्थिक हितासाठी मनपा प्रशासन विद्यार्थांच्या भविष्याशी खेळत आहे. (Pune Municipal Corporation School)
अधिकाऱ्यांच्या पंचतारांकित ऑफिसेस साठी, नेत्यांच्या दौऱ्यासाठी , स्वतःच्या किमती गाड्यांच्या हौशेसाठी अशा इतर अनेक वायफळ खर्चासाठी प्रशासनाकडे बजेट आहे पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी च पालिकेची कंगाल अवस्था का आहे?
तरी सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम पुढील ४८ तासांत जमा करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहरा च्या वतीने निवेदनाने  प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग यांकडे केली. ४८ तासांत हा विषय निकाली न काढल्यास पुढील आंदोलन हे मनसे पद्धतीने होईल व याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असेल असा इशारा यावेळी देण्यात आला. (PMC Pune)
अमित ठाकरे यांच्या आदेशाने व महा राज्य संघटक- मा. प्रशांत कनोजिया आणि महा. राज्य सचिव आशिष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात अभिषेक थिटे ( महा. राज्य कार्यकारिणी सदस्य) , अमोल शिंदे (अध्यक्ष, पुणे) , शहर संघटक – ॲड. अमेय बलकवडे , महेश भोईबर उप शहराध्यक्ष – सचिन ननावरे, परिक्षीत शिरोळे, विक्रांत भिलारे , विभाग अध्यक्ष – आशुतोष माने, संतोष वरे, कुलदीप घोडके, शशांक अमराळे,केतन डोंगरे, अशोक पवार, निलेश जोरी, हेमंत बोळगे , विभाग सचिव – मयुर शेवाळे, सूरज पंडित व विशाल कांबळे , सागर गाडेकर, अथर्व साने, रोहित बिराजदार , अक्षय भोसले, ऋषभ थोरात इत्यादी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाचे नेतृत्व उपाध्यक्ष – पुणे शहर धनंजय विजय दळवी यांनी केले

Devendra Fadnavis Birthday | विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पोषक वातावरण मिळावे यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न | मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील 

Categories
Breaking News Political पुणे

Devendra Fadnavis Birthday | विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पोषक वातावरण मिळावे यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न | मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील

Devendra Fadnavis Birthday | २२ जुलै  रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस  (DCM Devendra Fadnavis) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बावधन खुर्द येथील स्वामी विवेकानंद ई लर्निंग स्कूल मध्ये पुणे महानगरपालिका प्रभाग १० चे आदर्श मा. नगरसेवक दिलीप वेडेपाटील (Ex Corporator Dilip Vedepatil) यांनी शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. (Devendra Fadnavis Birthday)

त्याप्रसंगी खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मा.सचिनजी मोरे तसेच प्रभाग १० चे नगरसेवक श्री.किरण दगडे पाटील, सौ.अल्पनाताई वरपे, डॉ.श्रद्धा प्रभुणे तसेच मा.बाळासाहेब टेमकर, मा.वैभव मुरकुटे, मा. राजाभाऊ जोरी, मा.राजेश मनगीरे, मा.सुरेंद्र कंधारे, मा.सचिन मोरे, मा.अमर कोकाटे, मा.अमित तोडकर, मा.निगडीकर,मा.मीनल भरते आणि अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते तसेच शाळा क्र. १५३ बी आणि ८२ बी चे मुख्याध्यापक श्री. लोंढे सर, पंडित मॅडम,सईद सर आणि अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी अतिशय मेहनतीने पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पोषक वातावरण मिळावे यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो असेही सांगितले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस  यांच्या वाढदिवशी शैक्षणिक साहित्य वाटल्याने त्यांना आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांसोबत मुलांकडून मिळणाऱ्या दुवा खूप मोठ्या ठरतील आणि ते राष्ट्रीय पातळीवर मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडतील असे विचार व्यक्त केले.

यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष .सचिनजी मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना मानानीय उपमुख्यमंत्री .देवेन्द्रजी फडणवीस  यांच्या वाढदिवशी प्रभाग १० च्या आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अश्या समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन केले आणि पोषक वातावरण ज्ञानार्जनासाठी अत्यंत महत्त्वाचे असते याविषयी त्यांनी विचार व्यक्त केले. यानंतर त्यांनी शालेय वस्तूंचे वाटप केले यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.


News Title |Devendra Fadnavis Birthday | Continuous efforts to provide educational material and nurturing environment to the students Hon.Corporator Dilip Wedepatil

ISO Rating | PMC schools | महापालिकेच्या ८ शाळांना ISO मानांकन

Categories
Breaking News Education PMC पुणे

महापालिकेच्या ८ शाळांना ISO मानांकन

|

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेला पुणे मनपा शिक्षण विभागाच्या ८ शाळांना ISO मानांकन प्रमाणपत्र महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त श्री रविद्र बिनवडे साहेब यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. यावेळी शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ.मिनाक्षी राऊत, डॉ. मनोरमा आवारे, प्रकल्प अधिकारी, समग्र शिक्षा, पुणे मनपा हे उपस्थित होते.

प्रशासकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी राऊत यांनी पुणे मनपा च्या किमान २५ शाळा ISO करण्याचा संकल्प निश्चित केला असून त्यापैकी ८ शाळा ISO झाल्या असून उर्वरित १७ शाळांचे काम प्रगतीपथावर आहे. या साठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार , महापालिका अतिरिक्त आयुक्त( जन.) मा. रविंद्र बिनवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

ISO मानांकन मिळविणाऱ्या शाळा

१) मनपा शाळा क्र.१०५ मुलांची , संदेशनगर
२) मनपा शाळा क्र.१०५ इंग्रजी , संदेशनगर
३)मनपा शाळा क्र.६६ मुलींची , संदेशनगर
४) मनपा शाळा क्र.८४ मुलींची , विश्रांतवाडी
५) मनपा शाळा क्र.१६४मुलांची , धानोरी
६) मनपा शाळा क्र.२५ मुलींची , घोरपडेपेठ
७) मनपा शाळा क्र.१६२ मुलांची , चंद्रभागानगर
८) मनपा विद्या निकेतन क्र.१९ चंद्रभागानगर


पुणे मनपा च्या किमान २५ शाळा ISO करण्याचा संकल्प निश्चित केला असून त्यापैकी ८ शाळा ISO झाल्या असून उर्वरित १७ शाळांचे काम प्रगतीपथावर आहे.

मीनाक्षी राऊत, प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, पुणे मनपा 

PMC Schools : Personality Devlopment : महापालिकेच्या शाळांमध्ये आता व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा!

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

महापालिकेच्या शाळांमध्ये आता व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

: राजीव गांधी ई लर्निंग स्कूल व शामराव श्रीपत बराटे शाळा यामधून होणार सुरुवात

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये (PMC schools) कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत विदयार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा (Personality Devlopment Training) सुरू करण्यात येणार आहे. याची सुरूवात प्रायोगिक तत्वावर (Pilot project)  राजीव गांधी ई लर्निंग स्कूल व शामराव श्रीपत बराटे शाळा, दिगंबरवाडी येथून करण्यात येईल. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महिला बाल कल्याण समितीने (women and child welfare committe) मान्यता दिली आहे. अशी माहिती समितीच्या अध्यक्ष रुपाली धाडवे (Rupali Dhadave) यांनी दिली.

: महिला बाल कल्याण समितीची मान्यता

याबाबतचा प्रस्ताव विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) आणि काँग्रेस गटनेते आबा बागूल (Aba Bagul) यांनी महिला बाल कल्याण समिती समोर दिला होता. त्यानुसार पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विदयार्थी शिक्षण घेतात. अशा कुटुंबातील विदयार्थ्यांना इतर खाजगी शाळांप्रमाणे सेवा सुविधा व शिक्षणाचा दर्जा देण्याबाबत प्रामाणिक प्रयत्न महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून नेहमीच केला जातो. विदयार्थ्यांच्या दृष्टीने त्यांच्या भविष्यातील यशस्वी कारकीर्दीसाठी शालांत / माध्यमिक म्हणजेच इयत्ता १० वीच्या परीक्षेच्या टप्पा महत्वाचा असतो, किंबहुना यशस्वी कारकीर्द घडण्यासाठी महत्वाचा मानला जातो. इयत्ता ७ वी ते १० वी या शैक्षणिक टप्प्यात विदयार्थ्यांच्या शारिरिक वाढीसोबत मानसिक व वैचारिक धारणांमध्ये दिर्घ परिणाम करणारे बदल होत असतात. खाजगी शाळांमध्ये जाणारे बहुतांशी विदयार्थी हे समाजाच्या मध्यम / उच्च मध्यम वर्गाचे प्रतिनिधीत्व करतात. अशा विदयार्थ्यांना खाजगी शाळांमधून तसेच त्यांच्या कुटुंबामधून अथवा विविध उपलब्ध साधनांद्वारे व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन उपलब्ध होते. पुणे मनपाच्या विविध शाळांमधील इयत्ता ७ वी ते १० वी या इयत्तांमधील विदयार्थ्यांना त्यांचे व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षणेतर उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून राबविणे हे अतिशय हितावह व दूरगामी सामाजिक परिणाम करणारे ठरेल. गेली अदमासे २ वर्षे कोविड प्रादुर्भावामुळे विदयार्थ्यांचे शालेय शिक्षण प्रत्यक्ष तासिकांद्वारे होवू शकलेले नाही. याचा थेट परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर देखील झालेला आहे हे नाकारता येणार नाही. सबब पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत विदयार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा सुरू करावी. याची सुरूवात प्रायोगिक तत्वावर राजीव गांधी ई लर्निंग स्कूल व शामराव श्रीपत बराटे शाळा, दिगंबरवाडी येथून करण्यात यावी. या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे.

PMC Schools : Rupali Dhadve : महापालिकेचे 10 वी चे विद्यार्थी करणार “आयडियल स्टडी”!  : ऍप खरेदी करण्याचा प्रस्ताव 

Categories
Breaking News Education PMC पुणे

महापालिकेचे 10 वी चे विद्यार्थी करणार “आयडियल स्टडी”!

: ऍप खरेदी करण्याचा प्रस्ताव

पुणे :  कोरोना महामारीच्या काळात सर्व शाळा बंद होत्या. सद्यस्थितीत इयत्ता ७ वी पासून पुढील इयत्तेचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे खंड जरी पडला नसला तरी शिक्षणाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. इयत्ता १० वी हे माध्यमिक शिक्षणातील महत्वपूर्ण वर्ग असून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे महत्वपूर्ण वर्ष आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी अॅप हे वरदान ठरणारे आहे. या अॅपमुळे पुणे महानगरपालिकेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची गुणवत्ता वाढविण्यास मोलाची मदत होईल. त्यामुळे हे ऍप खरेदी करण्याचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षां रुपाली धाडवे यांनी समिती समोर ठेवला आहे. यावर पुढील बैठकीत चर्चा होईल.

: महिला बाल कल्याण समितीसमोर प्रस्ताव

प्रस्तावानुसार सध्याचे जग हे ऑनलाईन पद्धतीचे असल्याने पुणे महानगरपालिकेतील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यअभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून शिकवला तर त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अधिक आवड निर्माण होईल. व ते ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून घरीसुद्धा स्व-अध्ययनाच्या मार्गातून ज्ञानार्जन करू शकतील. त्यामुळे कोणत्याही महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. आयडिल स्टडी या अॅपमध्ये पाठ्यपुस्तकातील सर्वच गोष्टी सदर अॅप मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी, उजळणीसाठी नोट्स, प्रत्येक पाठाचे मुद्दे, प्रश्नोत्तरे, सुत्रे, एम.सी.क्यू., भाषा विषयांसाठी खास मूळ व्याकरण, सरावासाठी प्रत्येक पाठाच्या प्रश्नपत्रिका,आदर्श उत्तरपत्रिका, विद्यार्थ्यांना सोपे जाईल असे प्रत्येक पाठाचे अॅनिमेटेड व्हिडिओ इ. या अॅपमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे हे अॅप पुणे महानगरपालिकेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यास पुणे महानगरपालिकेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी अॅप हे वरदान ठरणारे आहे. या अॅपमुळे पुणे महानगरपालिकेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची गुणवत्ता वाढविण्यास मोलाची मदत होईल. तरी पुणे महानगरपालिकेच्या शाळेत शिकणा-या इयत्ता दहावी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आयडिल स्टडी हे अॅप खरेदी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागामार्फत तरतूद उपलब्ध करून खरेदी करण्यास मान्यता देण्यात यावी व सदर अॅप विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. असे प्रस्तावात म्हटले आहे.