Dilip Vede patil | दिलीप वेडेपाटील यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी! 

Categories
Breaking News Political पुणे

Dilip Vede patil | दिलीप वेडेपाटील यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी!

Dilip Vede Patil | बावधन नगरीचे (Bavdhan Pune) आदर्श नगरसेवक दिलीप वेडेपाटील (Dilip Vede Patil) यांच्या आजवरच्या समाजाभिमुख राजकिय कामगिरीची दखल घेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य या पदावर नियुक्ती केली. (Dilip Vede Patil)

या पदाचे नियुक्तीपत्र बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी दिलीप वेडेपाटील यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी आणि कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
वेडेपाटील यांच्याकडून प्रभागात वेळोवेळी नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवले जातात. तसेच महापालिकेत देखील त्यांची कामगिरी महत्वपूर्ण राहिली आहे. त्यांच्या कामाची प्रदेश भाजपकडून दखल घेण्यात आली आहे.
The karbhari - Dilip vede patil appointment
नियुक्तीपत्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Veer Savarkar | Dilip Vede Patil |  सावरकर सर्वांनी आत्मसात करून अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारावे | शरद पोंक्षे

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Veer Savarkar | Dilip Vede Patil |  सावरकर सर्वांनी आत्मसात करून अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारावे | शरद पोंक्षे

Veer Savarkar | Dilip Vede Patil | स्वा.सावरकरांनी १३ डिसेंबर १९५३ रोजी पुण्याच्या रमणबाग (Ramanbaugh Pune) आवारात धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर या विषयावरच्या प्रसिद्ध व प्रभावी भाषणास ७० वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधून दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन, बावधन आणि स्वा.सावरकर प्रेमी मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १३ डिसेंबर रोजी सायं. ६:०० वा अभिनेते शरद पोंक्षे यांचा “हिंदुहृदयसम्राट स्वा.सावरकरांचा द्रष्टेपणा” या विषयावरील व्याख्यानाचा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, स्वामी विवेकानंद ई लर्निंग स्कूल, एलएमडी चौक, बावधन खुर्द, पुणे २१ येथे आयोजित करण्यात आला होता. (Pune News)
 या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धीरज घाटे शहराध्यक्ष, पुणे – भारतीय जनता पार्टी, मा.डॉ.श्रद्धाताई प्रभुणे, नगरसेविका – पुणे मनपा,  मा.श्री. संजयजी चोरडिया, अध्यक्ष – सूर्यादत्ता एज्युकेशन फाऊंडेशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाग संचालक मा.श्री.अनिलजी व्यास, मा.श्री.सहस्रबुद्धे तसेच स्वा.सावरकर प्रेमी मंडळ, पुणे यांचे पदाधिकारी व सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वक्ते आणि सावरकर प्रेमी श्री.शरद पोंक्षे यांनी त्यांच्या व्याख्यानात – सावरकरांचा द्रष्टेपणा या विषयाची मांडणी केली. या मध्ये अखंड हिंदुस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेविषयीचा पुरोगामी दृष्टीकोन, अंदमान मध्ये स्वतंत्र भारताचे सामरिक युद्ध केंद्र उभारणी, जातिवाद निर्मुलनाबाबातचे त्यांचे अनेक प्रयत्न – पतितपावन मंदिराची उभारणी, सहभोजनाचे कार्यक्रम, दीनदलितांच्या मुंजी करून त्यांना वेदांचे अध्ययन – पठण करण्याचा अधिकार बहाल करणे. अश्या गोष्टी घडवून आणल्या त्याबाबतचे ज्वलंत अनुभव सांगितले. सावरकरांचे हिंदुत्व आणि हिंदू धर्म म्हणजे सर्व मानवजातीचा मनुष्य म्हणून स्वीकार करून प्रत्येकाशी माणुसकीने वागणे होय. देशाच्या सुरक्षा तुकडीत काम करणारा प्रत्येक जण हा आर्थिक दृष्ट्या सर्वांत सक्षम असला पाहिजे मग तो सैनिक असो वा पोलीस. एकूणच सावरकरांचे प्रत्येक बाबतीतले विचार हे अतिशय आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोनाची कास धरून देशाची एकात्मता आणि एकसंधता टिकून राहून विकास साधणे असे आहेत. असे सावरकर सर्वांनी आत्मसात करून अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारावे असे विचार त्यांनी व्याख्यानातून मांडले.

Dilip Vede Patil | एनडीए चौकात (चांदणी चौक) उभारण्यात आलेल्या अग्निशमन व प्रशिक्षण केंद्राला स्व. खासदार गिरीशभाऊ बापट यांचे नाव देण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Dilip Vede Patil | एनडीए चौकात (चांदणी चौक) उभारण्यात आलेल्या अग्निशमन व प्रशिक्षण केंद्राला स्व. खासदार गिरीशभाऊ बापट यांचे नाव देण्याची मागणी

| दिलीप वेडे पाटील यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

Dilip Vede Patil | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation l) वतीने एनडीए चौक (चांदणी चौक) स. नं ७७/१ येथे उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्र व प्रशिक्षण केंद्राची उभारणी अखेरच्या टप्प्यात आहे. या प्रकल्पाची पायाभरणी व शुभारंभ २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालक मंत्री स्व. गिरीशजी बापट (Girish Bapat) यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. तरी या प्रकल्पाचे नामकरण स्व. खासदार गिरीशभाऊ बापट अग्निशमन केंद्र व प्रशिक्षण केंद्र असे करण्यात यावे यासाठी पुणेकर आग्रही असून या मागणीचे निवेदन मा. नगरसेवक दिलीप वेडेपाटील (Dilip Vede Patil) यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांना दिले.
          यावेळी हा प्रकल्प होण्यामध्ये स्व. खासदार गिरीशभाऊ बापट यांचे मोलाचे असे योगदान असून त्यांचे नाव देणे अधिक योग्य ठरेल यावर आयुक्त साहेब यांच्याशी चर्चा झाली. तसेच अन्य महत्त्वाच्या मुद्यांवर निवेदन व धोरणात्मक चर्चा करण्यात आली यामध्ये पुढील मुद्यांचा समावेश होता: –
१. बावधन खुर्द येथे पुणे महानगरपालिकेतर्फे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणे बाबत.
२. पुणे महानगरपालिका शाळा क्र. १५३ बी व ८२ बी मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुदान त्वरित मिळावे यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात याव्या.
३. पुणे महानगरपालिका शाळा क्र. १५३ बी व ८२ बी या दोन्ही शाळा एकाच सत्रात भरविणे.
४. पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७३ बी कोकाटे वस्ती येथील शाळा बंद करून सदर शाळेचे समायोजन उपरोक्त नमूद शाळा क्र. १५३ बी व ८२ बी करणे
५. पुणे महानगरपालिका शाळा क्र. १५३ बी व ८२ बी या दोन्ही शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करणे व मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे.
६. पुणे महानगरपालिका शाळा क्र. १५३ बी व ८२ बी या दोन्ही शाळांमध्ये वर्ग खोल्यांत आवश्यक असणारे फर्निचर उपलब्ध होणे.
आयुक्त यांनी उपरोक्त सर्व विषयांच्या अनुषंगाने सकारात्मक प्रतिसाद देऊन शक्य ती सर्व कामे लवकरात लवकर करून घेतली जातील असे आश्वासन दिले व संबंधित सर्व विभागांना तश्या सूचना दिल्या. अशी माहिती दिलीप वेडे पाटील यांनी दिली.
——

Dilip Vede Patil | मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या मागणीला हिरवा कंदील

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Dilip Vede Patil | मा. नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या मागणीला हिरवा कंदील

Dilip Vede Patil | चांदणी चौक उड्डाणपूल (Chandni Chowk Flyover) प्रकल्पा अंतर्गत नवीन पादचारी मार्ग विकसित करणे या  मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील (Ex Corporator Dilip Vede Patil) यांच्या मागणीला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
पुणे शहराची शान वाढविणाऱ्या बहुचर्चित चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पाचे १२ ऑगस्ट २०२३ रोजी मा. नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. चांदणी चौक उड्डाणपूल झाल्यानंतर या परिसरात असणाऱ्या अन्य रस्ते आणि रहिवासी सोसायट्यांचे अनेक प्रश्न व समस्या प्रलंबित राहिले आहेत. यामध्ये बावधन मुख्य रस्त्याचा प्रश्न, दिशादर्शक फलकांचा प्रश्न, सर्व्हिस रोडचा प्रश्न, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासंबंधी समस्या, रस्ते आणि सोसायटी एंट्रन्स लेव्हल मध्ये तफावत असणे अश्या अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. प्रशांत वाघमारे यांसी सर्व विभागीय अधिकाऱ्यां समवेत प्रत्यक्ष पाहणीचे निवेदन दिले होते.
१. एनडीए चौक(चांदणी चौक) ते बावधन पादचारी पूल – चांदणी चौक उड्डाणपूल तसेच विस्तारित महामार्ग ओलांडण्यासाठी सध्या कोणतीही सुविधा नसल्याने पादचारी मार्ग करणे.
२. चांदणी चौक प्रकल्पामध्ये येणारे  सर्व एकूण ६ बस स्टॉप सर्व सोयी-सुविधांसह विकसित करणे.
३. बावधन सर्कल व एनडीए सर्कल च्या बाजूने अरुंद झालेला रस्ता रुंद करणे
४. चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पालगत असणाऱ्या पुणे मनपा मालकीच्या आरक्षित जागांवर वाहनतळ विकसित करणे.
५. नियोजित शिवस्मारका शेजारील जागेवर नागरिकांकरिता पर्यटन स्थळ निर्माण करण्यात यावे.
६. चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पाअंतर्गत महिला व ज्येष्ठ नागरिक यांकरिता सुलभ शौचालय बांधणे.
अश्या विविध मागण्या नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या निवेदनातून करण्यात आल्या होत्या. तात्काळ प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी मा. शहर अभियंता श्री. प्रशांत वाघमारे यांच्या वतीने सर्वात मुख्य असलेली पादचारी मार्गाची मागणी व अन्य मागण्यादेखील मान्य करण्यात आल्या असून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी श्री. प्रशांत वाघमारे – शहर अभियंता, श्री. संजय कदम – उपमहाव्यवस्थापक NHAI,  श्री. युवराज देशमुख – अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग, श्रीम. हर्षदा शिंदे – अधीक्षक अभियंता, भवन रचना विभाग, श्री. भारत तोडकरी – महामार्ग अभियंता NHAI, श्री. निवृत्ती उथळे, उप अभियंता, बांधकाम विभाग, श्री. वीरेंद्र केळकर, कार्यकारी अभियंता, भवन रचना विभाग, श्री. अभिजित डोंबे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, श्रीम. प्रियांका बांते – कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, श्री. महेश शेळके – कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, श्री. निखील मिझार – वाहतूक नियोजय, पथ विभाग, श्री.सतीश कांबळे – स्थापत्य अभियंता, पुणे महानगरपालिका, पुणे, श्री.किशोर बरेकर – कंत्राटदार NCC, या पदाधिकाऱ्यांसह बावधन सिटीझन फोरम चे श्री.दुष्यंत भाटीया, श्री.मनीष देव, श्री.अजित साने, श्रीम.दीपा प्रभू, श्रीम. प्रग्या गुप्ता, बापू मोहोळ व स्वतः     मा. नगरसेवक दिलीप वेडेपाटील आणि परिसरातील नागरिक पाहणीच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित होते.

Devendra Fadnavis Birthday | विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पोषक वातावरण मिळावे यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न | मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील 

Categories
Breaking News Political पुणे

Devendra Fadnavis Birthday | विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पोषक वातावरण मिळावे यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न | मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील

Devendra Fadnavis Birthday | २२ जुलै  रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस  (DCM Devendra Fadnavis) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बावधन खुर्द येथील स्वामी विवेकानंद ई लर्निंग स्कूल मध्ये पुणे महानगरपालिका प्रभाग १० चे आदर्श मा. नगरसेवक दिलीप वेडेपाटील (Ex Corporator Dilip Vedepatil) यांनी शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. (Devendra Fadnavis Birthday)

त्याप्रसंगी खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मा.सचिनजी मोरे तसेच प्रभाग १० चे नगरसेवक श्री.किरण दगडे पाटील, सौ.अल्पनाताई वरपे, डॉ.श्रद्धा प्रभुणे तसेच मा.बाळासाहेब टेमकर, मा.वैभव मुरकुटे, मा. राजाभाऊ जोरी, मा.राजेश मनगीरे, मा.सुरेंद्र कंधारे, मा.सचिन मोरे, मा.अमर कोकाटे, मा.अमित तोडकर, मा.निगडीकर,मा.मीनल भरते आणि अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते तसेच शाळा क्र. १५३ बी आणि ८२ बी चे मुख्याध्यापक श्री. लोंढे सर, पंडित मॅडम,सईद सर आणि अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी अतिशय मेहनतीने पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पोषक वातावरण मिळावे यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो असेही सांगितले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस  यांच्या वाढदिवशी शैक्षणिक साहित्य वाटल्याने त्यांना आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांसोबत मुलांकडून मिळणाऱ्या दुवा खूप मोठ्या ठरतील आणि ते राष्ट्रीय पातळीवर मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडतील असे विचार व्यक्त केले.

यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष .सचिनजी मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना मानानीय उपमुख्यमंत्री .देवेन्द्रजी फडणवीस  यांच्या वाढदिवशी प्रभाग १० च्या आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अश्या समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन केले आणि पोषक वातावरण ज्ञानार्जनासाठी अत्यंत महत्त्वाचे असते याविषयी त्यांनी विचार व्यक्त केले. यानंतर त्यांनी शालेय वस्तूंचे वाटप केले यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.


News Title |Devendra Fadnavis Birthday | Continuous efforts to provide educational material and nurturing environment to the students Hon.Corporator Dilip Wedepatil

23 Villeges Water Supply : समाविष्ट 23 गावांच्या पाण्याबाबत उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

समाविष्ट 23 गावांच्या पाण्याबाबत उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

: टँकर ने पाणीपुरवठा करा

पुणे – महापालिकेत (Pune Municipal) समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील (Villages) पाणी पुरवठ्याची योजना (Water Supply Scheme) पूर्ण होत नाही, तो पर्यंत पुणे महापालिकेने या भागात टँकरने पाणी पुरवठा करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत.

माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी २३ गावातील पाणी पुरवठ्यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी बनविण्यात आले आहे. जुलै २०२१ मध्ये राज्य सरकारने पुणे शहराच्या हद्दी लगतची २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या गावांना प्रचंड मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

२३ गावे महापालिकेत येण्यापूर्वी तेथे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) बांधकाम परवानगी दिली जात होती. त्यावेळी त्यांनी बिल्डरांकडून भोगवटा प्रमाणपत्र देताना नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करून घेतला जाईल असे लिहून घेतले आहे. दरम्यान ही गावे महापालिकेत आल्यानंतर तेथील नागरिकांनी पुणे महापालिकेकडे पाणी पुरवठ्याची मागणी केली. पण ती अमान्य करत महापालिकेची पाणी पुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत संबंधित बिल्डरने पाणी द्यावे अशी सूचना केली. यावादात या भागात राहणाऱ्या नागरिकांनी स्वतः पैसे खर्च करून टँकरने पाणी घ्यावे लागत आहे.

प्रशासकीय वादात नागरिकांचे हाल होत असल्याने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये न्यायालयात सुनावणी झाली. ४ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे, त्यावेळी राज्याच्या महाधिवकत्यांना उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुणे महापालिकेची पाणी पुरवठ्याची योजना जो पर्यंत पूर्ण होत नाही, तो पर्यंत २३ गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा असेही आदेश न्यायमूर्ती अभय अहुजा आणि ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने दिले आहेत. यासंदर्भात आमदार भीमराव तापीकर व याचिकाकर्ते दिलीप वेडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.