Dilip Vede patil | दिलीप वेडेपाटील यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी! 

Categories
Breaking News Political पुणे

Dilip Vede patil | दिलीप वेडेपाटील यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी!

Dilip Vede Patil | बावधन नगरीचे (Bavdhan Pune) आदर्श नगरसेवक दिलीप वेडेपाटील (Dilip Vede Patil) यांच्या आजवरच्या समाजाभिमुख राजकिय कामगिरीची दखल घेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य या पदावर नियुक्ती केली. (Dilip Vede Patil)

या पदाचे नियुक्तीपत्र बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी दिलीप वेडेपाटील यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी आणि कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
वेडेपाटील यांच्याकडून प्रभागात वेळोवेळी नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवले जातात. तसेच महापालिकेत देखील त्यांची कामगिरी महत्वपूर्ण राहिली आहे. त्यांच्या कामाची प्रदेश भाजपकडून दखल घेण्यात आली आहे.
The karbhari - Dilip vede patil appointment
नियुक्तीपत्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत | भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत | भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

 

Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray | पुणे| उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म (Hindu Sanatan Dharma) संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत असल्याची टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule BJP) यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘हर मंदिर स्वच्छता’ या देशव्यापी अभियानाचा राज्यातील शुभारंभ शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा मंदिर परिसरात केल्यानंतर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील प्रत्येक मंदिरात हे अभियान राबविण्याचा संकल्प त्यांनी या वेळी बोलून दाखवला.

आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष आणि राममंदिर अभियानाचे राज्याचे संयोजक राजेश पांडे, सुनील देवधर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

बावनकुळे म्हणाले, काँग्रेस पक्षाने नेहमी देशातील हिंदू समाजाचा अपमान केला आहे. अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावर त्यांनी बहिष्कार टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडताना काँग्रेसने रामाचा जन्म काल्पनिक असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. एनडीए सत्तेत आल्यास हिंदुस्थानातील सनातन धर्म संपविण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिन यांनी केली आहे. या एनडीए आघाडीचे उद्धव ठाकरे घटक आहेत. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंना मत म्हणजेच हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत असा होतो. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि इटालियन शक्तिसमोर लोटांगण घातले आहे.

‘हर मंदिर स्वच्छता अभियाना’ला देशातील जनता उत्स्फूर्तपणे सहयोग देत आहे. 21 जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. या कालावधीत सर्व समाजातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी असे उपक्रम राबविले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना हा कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले असून, सर्व राजकीय पक्षांनी त्यात सहभागी होणे अपेक्षित आहे.

राज्यात जिल्हानिहाय महायुतीचे मेळावे आजपासून सुरू झाले असून पुढच्या काळात बूथ आणि विभागीय स्तरावर या मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या घटक पक्षांमध्ये विरोधी पक्षातील नेते प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. आगामी काळात महाराष्ट्राला मोठे राजकीय हादरे बसतील. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत ही जगातील तिसरी महासत्ता म्हणून उदयास येत असून चीन सारख्या शत्रू राष्ट्राने ही ते कबूल केले आहे. मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी आणि आमचा विचार स्वीकारणाऱ्यांसाठी भाजपचे दरवाजे खुले आहेत.

Pune BJP New Office |  शहर भाजपचे नवीन कार्यालय सुरू | देवेंद्र फडणवीस यांच्यासहित विविध नेत्यांकडून शुभेच्छा 

Categories
Breaking News Political पुणे

Pune BJP New Office |  शहर भाजपचे नवीन कार्यालय सुरू | देवेंद्र फडणवीस यांच्यासहित विविध नेत्यांकडून शुभेच्छा

 

Pune BJP New Office | विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज शहर भाजपच्या एरंडवण्यातील डीपी रस्त्यावरील (DP Road Pune) नूतन कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. अत्यंत उत्साही वातावरणात जय श्रीरामच्या जयघोषात नूतन कार्यालय कार्यान्वित झाले. शहर भाजपचे पुणे महानगरपालिका (PMC Pune)  परिसरातील मध्यवर्ती कार्यालय नवीन वास्तुत स्थलांतरित करण्याच्या निमित्ताने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. (Pune BJP New Office)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale), प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (girish Mahajan) यांनी कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate BJP Pune) यांनी स्वागत केले.

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पुणे शहराचा गतिमान पारदर्शक विकास करण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून अविरत प्रयत्न केले जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी संपर्क साधण्याबरोबर माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांपर्यंत पोहोचून संघटनात्मक कार्य बळकट करण्यावर भर दिला जाईल.

आगामी काळातील निवडणुकांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा विचार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्ते नियोजन करतील असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

लोकसभा विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त केला होता. हा विश्वास शहर भाजपने सार्थ ठरविला असून, आगामी काळात तो दृढ करण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्न करतील असे मत शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले.

जनसंघापासून भाजपच्या आजवरच्या ज्येष्ठ आणि नव्या कार्यकर्त्यांनी आठवणींना उजाळा देत गप्पा रंगवल्या.

प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा मतदार संघ संयोजक श्रीनाथ भिमाले यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार वंदना चव्हाण , श्रीकांत शिरोळे, प्रदीप गारटकर, मनसेचे अजय शिंदे यांच्या सह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते

Mandar Balkawade | Kothrud MNS | BJP | मनसेला कोथरूडमध्ये खिंडार! | मंदार बलकवडे यांचा भाजपात प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे

Mandar Balkawade | Kothrud MNS | BJP | मनसेला कोथरूडमध्ये खिंडार! | मंदार बलकवडे यांचा भाजपात प्रवेश

| मंदार च्या प्रवेशाने कोथरूडमध्ये पक्षाची ताकद वाढण्यास मदत – चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील

Mandar Balkawade | Kothrud MNS | BJP |  मनसे चे नेते व प्रमुख पदाधिकारी मंदार बलकवडे  (Mandar Balkawade) यांचा प्रवेश ही तर सुरुवात असून येणाऱ्या काळात अनेक मोठे नेते भाजप मधे प्रवेश करतील असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. तर मंदार बलकवडे यांच्या प्रवेशामुळे कोथरूड मतदारसंघात भाजप (Kothrud Constituency BJP) ची ताकद वाढण्यास मदत होईल आणि मंदार सोबतच्या तरुणांच्या फळीमुळे युवा वर्गात चैतन्य निर्माण होईल असे ना. चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil BJP) म्हणाले. (Mandar Balkawade | Kothrud MNS | BJP)
मनसे च्या मंदार बलकवडे यांचा आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,शहराध्यक्ष धीरज घाटे,प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर,महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक व इतर मान्यवर उपस्थित होते.
मंदार सह पक्षात येणाऱ्या सर्वांचे स्वागत करताना प्रत्येकाला योग्य मान दिला जाईल असे भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावित होऊन मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून येणाऱ्या काळात पक्ष संघटना बळकटी व पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कार्यक्रम राबविणार असल्याचे मंदार बलकवडे म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी देखील पक्षात प्रवेश केला व भाजप चा जयघोष केला.

Rohit Pawar | Chandrashekhar Bawankule | रोहित पवारांना वाटते मीच वारसदार! | चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Rohit Pawar | Chandrashekhar Bawankule | रोहित पवारांना वाटते मीच वारसदार! | चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

Rohit Pawar | Chandrashekhar Bawankule | अजित पवार (Ajit Pawar) आमच्याकडे आल्यावर रोहित पवार (Rohit Pawar) यांना संधी दिसू लागली असून शरद पवारांचा (Sharad Pawar) वारसदार आहे, असे वाटू लागले असावे. असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला आहे. अर्थहिन गोष्टी शोधून काढण्यात ते व्यस्त आहेत. भरती प्रक्रियेत येत आरक्षणाच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी वेळ लागतो, त्यावेळेपुरते काम थांबू नये म्हणून कंत्राटी भरती केली जाते, यात वेगळे असे काहीही नाही. असेही बावनकुळे म्हणाले.

 

ते पुणे येथे माध्यमांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले, राजकीय मतभेद असतील पण मनभेद तयार करून व्यक्तिगत व मर्यादाबाह्य टीकाटिप्पणी करणे, हे अशोभनीय राज्याच्या संस्कृतीला सोडून तसेच भाजपाच्या संस्कृतीत बसणारे विधान नाही, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, आमदार गोपीनाथ पडळकर यांनी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाची दखल घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. आपण पडळकर यांच्याशी चर्चा केली आहे असे सांगून पडळकर यांच्या विधानाबद्दल पवार यांची दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले.

प्रत्येकाला समाज महत्वाचा असून त्याबाबतच्या समस्या मांडाव्याच लागतात, न्याय मिळवून द्यावा लागतो. धनगर समाजात आजही मागासलेपणा असून मुख्य प्रवाहापासून दूर आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार पडळकर यांची भूमिका महत्वाची आहे. धनगर समाजाला न्याय मिळावी ही भाजपाची भूमिका आहे. मराठा आरक्षणाला सर्वांचे समर्थन मिळाले असून उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायलयात योग्य भूमिका न मांडल्यानेच आरक्षण टिकले नाही. असे बावनकुळे म्हणाले.

संसदेच्या कायद्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे काम सुरू आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने प्रभावशाली व्यक्ती राष्ट्रपती म्हणून मिळाल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच त्यांना सन्मान दिला आहे. विरोधकांच्या इन्डी आघाडीच्या लोक राजकारण करून संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यांचे घटक पक्षातील नेते उदयनिधी स्टॅलीन यांना हिंदू धर्माचा अपमान केला, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ते नवे रान उठवित आहेत.

• प्लॅन बी कशाला?

विरोधकांना काहीच सूचत नसल्याने हा प्लॅन बी नावाचा फुसकी बॉम्ब सोडला आहे. भाजपाकडे कोणताच प्लॅन बी नसून त्याबद्दल मला काहीही माहिती नाही. महायुतीचे लक्ष्य ४५ हून अधिक लोकसभा जागा जिंकण्याचे आहे. मोदीजींच्या कामांमुळे सर्व त्यांच्याकडे पाहूनच मते देणार आहे. असे हि बावनकुळे म्हणाले.

 

Mahayuti | Sandeep Khardekar | महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Mahayuti | Sandeep Khardekar | महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती

 

Mahayuti | Sandeep Khardekar | आगामी काळात महायुतीतील सर्व घटक पक्षांशी योग्य समन्वय राखण्यासाठी भाजप चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांची पुणे शहर महायुतीच्या समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.

आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, यांच्या हस्ते श्री. खर्डेकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आ. माधुरी मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे,पुणे शहर प्रभारी अमर साबळे,माजी अध्यक्ष जगदीश मुळीक,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महायुती चे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष,लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम संघटना, पतीत पावन संघटना यासह विविध समविचारी पक्ष,संघटना, स्वयंसेवी संस्था, यांच्याशी योग्य समन्वय साधून, सर्वांच्या सहकार्याने आगामी लोकसभा,विधानसभा व महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवू असा विश्वास संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.

Dheeraj Ghate | BJP Pune | पुणे भाजप शहर अध्यक्ष पदी धीरज घाटे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Dheeraj Ghate | BJP Pune | पुणे भाजप शहर अध्यक्ष पदी धीरज घाटे

Dheeraj Ghate | BJP Pune | पुणे भाजपच्या शहर अध्यक्ष पदी (BJP Pune President) पुणे महापालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ही घोषणा केली आहे. (Dheeraj Ghate | BJP Pune)
प्रदेश भाजप कडून शहर आणि जिल्हा अध्यक्ष यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे शहर अध्यक्ष पदी घाटे यांची वर्णी लागली आहे. याआधी शहर अध्यक्ष म्हणून जगदीश मुळीक हे काम पाहत होते.  घाटे हे महापालिकेत माजी सभागृह नेते देखील होते. तसेच पार्टी मध्ये विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. (Pune News)
——
News Title | Dheeraj Ghate | BJP Pune | Pune BJP City President Dheeraj Ghate

PMC Election | BJP | भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरु 

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Election | BJP | भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरु

| महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून राजेश पांडे यांची नियुक्ती

PMC Election | BJP | पुणे महापालिका निवडणूक (Pune Municipal Corporation Election) कधी होणार याची उत्सुकता सर्वानाच आहे. मात्र निवडणूक कधी होणार, हे खात्रीशीरपणे कुणीच सांगू शकत नाही. पण दुसरीकडे भाजपने (BJP) मात्र निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुणे महापालिका निवडणूक प्रमुख (PMC Pune election) म्हणून राजेश पांडे (Rajesh Pande) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (PMC Election | BJP)
पांडे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State president Chandrashekhar Bawankule) यांनी नुकतेच तसे पत्र दिले आहे. पत्रात बावनकुळे यांनी म्हटले आहे कि पुणे महापालिकेत पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणण्यासाठी आपण प्रयत्न कराल.
प्रदेश भाजपने पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शिफारशीनुसार ही निवड झाली आहे. पक्ष नेतृत्वाने टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन. अशा भावना पांडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. (PMC election news)
महापालिकेच्या माध्यमातून भाजपने शहरात मोठी विकासकामे केली आहेत. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही मागील यशाची पुनरावृत्ती करू. त्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करीन. बूथ रचनेचे सक्षमीकरण, नियोजनबद्ध निवडणूक व्यवस्थापन आणि विकासकामे व योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.
राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप, महाराष्ट्र
पुणे महापालिका निवडणूक प्रमुख, भाजपा
—–
News Title |PMC Election | BJP | Preparations for Pune Municipal Elections have started from BJP | Appointment of Rajesh Pandey as Chief Municipal Election Officer

Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP | राष्ट्रवादी न्यायालयात गेल्याने महापालिका निवडणुकांना होतोय उशीर 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP | राष्ट्रवादी न्यायालयात गेल्याने महापालिका निवडणुकांना होतोय उशीर 

 

: चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका 

Municipal Elections | Chandrashekhar Bawankule  | NCP | महापालिका निवडणुका घेण्यास भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) आजही तयार आहे. ‘महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) प्रभागरचनेसंदर्भात (Ward Structure) घेतलेला चुकीचा निर्णय आम्ही रद्द केला. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) न्यायालयात गेली आहे. म्हणून निवडणुकांना उशीर होत आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. (Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP)

: पुणे लोकसभेबाबत कुठलाही निर्णय नाही

 
पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात (Pune Loksabha By election) बावनकुळे यांना विचारले असता यावर निर्णय झालेला नाही, त्यामुळे आता त्यावर बोलण्यावर काही अर्थ नाही, असे सांगून बावनकुळे यांनी प्रश्नाला बगल दिली. 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP National presidetn J P Nadda) यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, ते म्हणाले, ‘‘किंचित सेनेतील नेतेमंडळी सोडून जातील या भीतीनेच मुंबईत कोणी भाजपचे नेते आले की राऊत टीका करतात.’’ ‘‘मुंबईत महापौर (Mumbai Mayor) आमचाच होणार,’’ असेही त्यांनी सांगितले. तसेच जेव्हा केव्हा निवडणुका होतील, तेव्हा नड्डा यांचा प्रवास किती महत्त्वाचा होता हे संजय राऊत यांना कळेलच.’’
कुरुलकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संबंधाबाबत बावनकुळे म्हणाले, ‘‘पक्षाने त्यावर भूमिका का मांडावी? त्यांची चौकशी सरकारमार्फत केली जात आहे. कोणत्या एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर त्यामुळे संस्थेला अथवा संघटनेला दोष देता येणार नाही. जर त्या व्यक्तीने गुन्हा केला असेल, तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे. तो कोणत्या धर्माचा आहे किंवा जातीचा आहे, हे बघून भाजप कोणालाही टार्गेट करत नाही.’’
—–
News Title | Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP | Municipal elections are delayed due to NCP going to court: Criticism of Chandrasekhar Bawankule

Kasba By election | Mahayuti | कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.

आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, शिवसंग्रामचे अध्यक्ष भारत लगड, शहर भाजप प्रभारी धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट, डॉ. सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, किरण साळी, बाळासाहेब जानराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी ग्रामदैवत कसबा गणपतीची महाआरती करून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत महायुतीचे हजारो कार्यकर्ते, गणपती मंडळ, संस्था-संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आली. त्यापुर्वी रासने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन केले. रासने यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नेहा कितवे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
———-
विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ! | हेमंत रासने यांचा विश्वास

गेल्या वीस वर्षांत कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेली विविध विकासकामे, सेवा कार्याच्या माध्यमातून प्रस्थापित केलेला जनसंपर्क, महायुतीच्या कार्यकर्त्यांची भक्कम संघटनात्मक फळी, गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पाठींबा आणि कसब्यातील मतदारांचा दृढ विश्वास या बळावर विक्रमी मताधिक्याने ही निवडणूक जिंकू असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला.

रासने म्हणाले, मी भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे. गेल्या तीस वर्षांपासून मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आजपर्यंत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यामुळे पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना आणि गणेश मंडळाच्या पूर्ण ताकदीसह ही निवडणूक मोठ्या मताधिक्क्याने जिंकू.