NCP Youth | फारुख मुसा पटेल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिव पदी नियुक्ती

Categories
Breaking News Political पुणे

Farooq Musa Patel | फारुख मुसा पटेल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिव पदी नियुक्ती

NCP Youth – (The Karbhai News Service) – पुणे येथील युवा उद्योजक फारुख मुसाभाई पटेल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Farooq Musa Patel)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित दादा पवार, देशाचे सचिव अविनाश आदिक, राष्ट्रवादी प्रदेशध्यक्ष खा.सुनिल तटकरे व उचतंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण व इतर सर्व नेत्यांनी केली आहे. यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून तसेच पुणे येथील आमदार चेतन तुपे , महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर, पुणे शहरातील विवध सामजिक संघटना व शहर राष्ट्रवादी काँगेस पार्टी यांचे कडून स्वागत करण्यात आले व कौतुक करण्यात आले ..

श्रीरामपुर तालुक्यातील  मूळ नाऊर गावी अभिंनदंचा वर्षाव करण्यात आला .फारुख पटेल यांचे वडील मुसा भाई पटेल हे मूळ गावी माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य ग्रामपंचायत होत.

Loksabha election 2024 Mahayuti | लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार! | चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार

Categories
Breaking News Political पुणे

Loksabha election 2024 Mahayuti | लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार!

|  चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार

Pune – (The Karbhari News Service) – लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह महायुती एकदिलाने आणि पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधव भांडारी, आ. माधुरीताई मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, समन्वय समितीचे प्रमुख तथा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय माशेलकर, शहर प्रमुख प्रमोदनाना भागगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या सह मित्र पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे निवडणूक काळात महायुतीमध्ये योग्य समन्वय रहावा. प्रचारामध्ये कोणते मुद्दे असावेत, त्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये स्पष्टता असावी यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांची बारामती, शिरुर, आणि पुणे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक झाली. या बैठकीत माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला.

ते पुढे म्हणाले की, लोकसभेमध्ये एनडीएला ४०० पार करुन माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं, यावर सर्वांचच एकमत आहे. आजच्या लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकीनंतर प्रत्येक पक्षाचे नेते विधानसभा मतदारसंघ आणि बूथ स्तरापर्यंत जाऊन संपर्क करणार आहेत.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलम हटविण्यात आलं. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात बूथवर मिळणाऱ्या मतांमध्ये ३७० मते अधिक मिळाली पाहिजेत, अशी सूचना पक्ष श्रेष्ठींनी केली आहे. त्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांची मतांची संख्या काढली, ती देखील ४०० पार करतील, आणि लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीला राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री तथा शिवसेना नेते विजयबापू शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, यांच्या सह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम शेतकरी संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील हे लवकरच बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचा तालुकानिहाय दौरा करणार असून, याद्वारे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Sharad Pawar NCP | आमचं नाव आमचं चिन्ह म्हणजे शरद पवार | निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी | प्रशांत जगताप 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Sharad Pawar NCP | आमचं नाव आमचं चिन्ह म्हणजे शरद पवार | निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी | प्रशांत जगताप

Sharad Pawar NCP | मूळ पक्षातून फुटून बाजूला गेलेल्या एका गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह आंदण देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे.  हा निर्णय क्लेशदायक असून देशातील हुकूमशाही कोणत्या स्तराला गेली आहे, याचं हे समर्पक उदाहरण आहे. प्रत्यक्ष जनतेत जाऊन मोत्यासारखा एक एक मोहरा निवडून त्यातून आदरणीय पवार साहेबांनी नेते घडवले, संपूर्ण राज्य अनेकदा पिंजून पक्षाची संघटना विणली आणि आज निवडणूक आयोगाने कष्टाने उभारलेला पक्ष सत्तेसाठी विचारांशी प्रतारणा करणाऱ्या एका गटाच्या हातात दिला. अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली आहे. (Prashant Jagtap Pune)

जगताप पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी कोणीच अस्तित्वात राहू नये या हीन मानसिकतेतून भारतीय जनता पक्षाने देशभरातील पक्ष फोडण्याचा, ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून पक्ष व चिन्ह हिसकावून घेण्याचा किळसवाण धोरण राबवलं आहे, भाजपच्या हातातील बाहुलं असलेल्या निवडणूक आयोगाचं सहकार्य त्यांना नेहमीच लाभलं, भारतातील लोकशाही संपवण्याचा हा प्रयत्न असून भाजपचा हा प्रयत्न आम्ही नक्कीच हाणून पाडू.
अस्तित्वाचा हा लढा आम्ही न्यायालयीन मार्गाने तर लढूच, परंतु देशातील सर्वात मोठे न्यायालय असलेल्या जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही आता न्याय मागू. राज्यात घडलेल्या सर्व घटना जनतेने अनुभवल्या आहेत, म्हणूनच भारतीय जनता पार्टीला व त्यांच्या आहारी जाऊन आपल्या मूळ पक्षाशी गद्दारी करणाऱ्या सर्वांनाच जनता कायमचा धडा शिकवेल हा आम्हाला विश्वास आहे. असे देखील जगताप म्हणाले.

—–

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे केवळ चिन्ह नव्हे, तर लोकनेते  शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. चिन्ह आणि नाव गेलं तरी आदरणीय पवार साहेब आमच्याकडे आहेत, साहेबांचा विचार आमच्याकडे आहे. म्हणूनच, यापुढे साहेब हेच आमचं चिन्ह आणि साहेब हाच आमचा पक्ष मानून आम्ही ही लढाई लढणार आहोत.

प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष 


NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी माजी आमदार जयदेवराव गायकवाड यांची नियुक्ती

Categories
Breaking News Political पुणे

NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी माजी आमदार जयदेवराव गायकवाड यांची नियुक्ती

 

NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  (NCP Supremo Sharad Pawar) यांच्या मान्यतेने माजी आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती सेलची जबाबदारीही ऍड. जयदेवराव गायकवाड यांच्याकडे आहे. त्यांच्या नियुक्तीने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्या प्रदीर्घ अनुभव व संघटन कौशल्याचा राष्ट्रीय स्तरावर नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त केले जात आहे.

Jayant Patil | Kothrud | राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे कोथरूड मध्ये जल्लोषात स्वागत 

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

Jayant Patil | Kothrud | राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे कोथरूड मध्ये जल्लोषात स्वागत

 

Jayant Patil | Kothrud | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील  (Jayant Patil) यांनी कोथरूड मधील प्रमुख गणेश मंडळांना भेट दिली. रात्री ९ वाजता एरंडवने मित्र मंडळाची गणपतीची आरती करून त्यांनी कोथरूड मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी कोथरूड मतदारसंघच्यावतीने (NCP Kothrud)  भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

पौड फाटा ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक,आझाद नगर,गुजरात कॉलनी, वनाज कॉर्नर,जय भवानी नगर,या भागातील अनेक मंडळांना प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भेट दिल्या .राष्ट्रवादी काँग्रेस चे कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने व युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांनी रॅली चे व कोथरूड मंडळ भेटीचे नियोजन केले होते.

कोथरूड मध्ये सर्व भागात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.अनेख नागरिकांनी फोटो काढले.लहान मुलां-मुलींनी सेल्फी घेतल्या.

या वेळी सिध्दार्थ मित्र मंडळाच्या वतीने जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते शिव सन्मान पुरस्कार डॉ मेजर विपुल पाटील यांना देण्यात आला.

या वेळी शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप ,सचिन भाऊ तावरे,किशोर भाऊ कांबळे,ज्योती ताई सूर्यवंशी,नंदिनी पाणेकर,स्वप्नील खवले,ऋषिकेश शिंदे,अमोल गायकवाड,प्रमित गोरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते….

Sachin Tawre | NCP | सचिन तावरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे

Sachin Tawre | NCP | सचिन तावरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

 

Sachin Tawre | NCP |माजी मंत्री श्री. वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव कणव चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन तावरे (Sachin Tawre) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (शरद पवार गट) जाहीर प्रवेश झाला आहे. अशी माहिती पुणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री  वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव  कणव चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष  सचिनजी तावरे यांनी आज  शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.  पवार यांच्या  हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निशाण देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. राजकीय, सामाजिक व संघटनात्मक कार्यातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निश्चितच फायदा होईल व संघटनेच्या बांधणीसाठी ते अखंड कार्यरत राहतील असा विश्वास यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री. अंकुशआण्णा काकडे, माजी शहराध्यक्ष श्री. रविंद्र माळवदकर, प्रकाशअप्पा म्हसके आदी मान्यवर उपस्थित होते.

Mi Sharad Mitra | NCP Youth | मी शरद मित्र मोहिमेची कोथरूड मधून सुरुवात

Categories
Breaking News Political पुणे

Mi Sharad Mitra | NCP Youth | मी शरद मित्र मोहिमेची कोथरूड मधून सुरुवात

Mi Sharad Mitra | NCP Youth |  कोथरूड विधानसभा (Kothrud Constituency) मधे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पुढाकाराने आज “मी शरद मित्र” (Mi Sharad Mitra) या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.  ही संकल्पना कोथरूड राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे आणि युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांनी राबविली आहे. आज या अभियानाची सुरुवात होत असताना पुढील चार दिवस कोथरूड मतदार संघातील विविध प्रभागातील जवळपास ९ ठिकाणी ही सदस्य नोंदणी अभियान होनार आहे. (Mi Sharad Mitra | NCP Youth)
मध्यंतरी झालेल्या राजकीय उलथापालथी च्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी असलेल्या मतदारांमध्ये समन्वय साधण्याची मुहूर्तमेढ या माध्यमातून होईल तसेच पवार साहेबांचे पुरोगामी विचार मतदार संघातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या सदस्य नोंदणी अभिनंदन होणार आहे असे कोथरूड राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे यांनी सांगितले. (Pune News)
महाराष्ट्रात प्रथमच ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचे युवक राष्ट्रवादीच्या गिरीश गुरनानी यांनी सांगितले. तसेच या मोहिमेतून लोकांची पवार साहेबांप्रती असलेले प्रेम व आदर भावना व्यक्त होण्यास माध्यम मिळेल असेही ते म्हणाले. (NCP Campaign)
या प्रसंगी प्रशांत जगताप तसेच अंकुश काकडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी माध्यमांशी बोलत असताना प्रशांत जगताप यांनी स्वप्नील दुधाणे व गिरीश गुरनानी यांची प्रशंसा केली व म्हणाले की ही अभिनव कल्पना जी या दोघांच्या इच्छाशक्ती आणि सहेबांप्रतीच्या प्रेमातून जन्मली आहे ती संपूर्ण पुण्यात 100 ठिकाणी राबविण्यात येणार असून या माध्यमातून ५ लाख शरद मित्र जोडले जाण्याची संकल्पना आहे.
अंकुश काकडे यांनीही या मोहिमेचे कौतुक करत असताना वडीलधाऱ्या व्यक्तीला त्यांच्या या वयात सोडून जाने योग्य नाही असे सांगीतले.  मी शरद मित्र कल्पनेतून साहेबांचे नवीन योद्धे तयार होतील व याचा प्रभाव येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच दिसेल असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रम प्रसंगी पक्षाचे मा.नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, अजिंक्य पालकर,दीपक कामठे,ज्योती सूर्यवंशी,सिताराम तोंडे पाटील, प्रमोद शिंदे, अमोल गायकवाड, ऋतुजा देशमुख , किशोर शेडगे, नंदिनी पानेकर व आदी पदधिकारी/ मान्यवर उपस्थित होते.
———
News Title | Mi Sharad Mitra | NCP Youth | Me Sharad Mitra campaign started from Kothrud

NCP Pune | Sharad Pawar | पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या सोबत | कार्यकारिणी बैठकीत केला ठराव

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune | Sharad Pawar | पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या सोबत | कार्यकारिणी बैठकीत केला ठराव

NCP Pune | Sharad Pawar | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (NCP Pune) २३ वी मासिक कार्यकारणी बैठक आज नेहरू आर्ट गॅलरी, घोले रोड शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाली. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) हेच पक्षाचे नेतृत्व असल्याचा ठराव पुणे शहर कार्यकारिणीने एकमताने संमत केला. (NCP Pune | Sharad Pawar)

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap) यांनी सांगितले कि,  या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ३ महत्वपूर्ण ठराव संमत केले. यात प्रामुख्याने  खासदार शरद पवार हेच पक्षाचे नेतृत्व असल्याचा ठराव पुणे शहर कार्यकारिणीने एकमताने संमत केला. तसेच उद्या होणाऱ्या कार्यकारणीच्या बैठकीसाठी हजारोंच्या संख्येने पदाधिकारी पुणे शहरातून मुंबई येथे जाणार आहेत. प्रदेश कार्यकारणीने पाठवलेल्या आराखड्यानुसार लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयाला पाठवणार आहे. (NCP Pune News)


या या बैठकी प्रसंगी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशाचे लोकनेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आजवर महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी व औद्योगिक या सर्व क्षेत्रांमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपले भरीव योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आणि या पक्षाचे आम्ही सर्व सामान्य कार्यकर्ते  पवार साहेबांच्या छत्रछायेखाली कायम सामाजिक प्रश्नांसाठी लढत आलो आहोत. आज काही मत-भिन्नता असल्याने पक्षातील काही सन्माननीय सदस्यांनी वेगळी वाट निवडली असली तरी ८३ वर्षाच्या या योध्याला सोडून कुठलाही दुसरा विचार करणे आम्हाला शक्य नाही. कालांतराने पक्षातील हे समज-गैरसमज दूर होतील. परंतु आज मात्र आम्ही सर्व  पवार साहेबांच्या सोबत आहोत आणि कायम स्वरूपी राहणार आहोत. (Sharad Pawar News)

राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार राज्यातील प्रश्न सोडवण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकरी, नोकरदार, अल्पभूधारक, अल्प उत्पन्न गटातील नागरिक व सर्वसामान्य जनता अनेक अडचणींना सामोरे जात असताना विरोधीपक्ष म्हणून सर्वसामान्य नागरिकांची बाजू मांडण्याची काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे.राज्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विविध आंदोलने करून सातत्याने आवाज उठवत आहे व या पुढेही उठवत राहील. असेही जगताप यावेळी म्हणाले.

या बैठकीला खासदार वंदनाताई चव्हाण,ज्येष्ठ नेते माजी आमदार  जगन्नाथ बापू शेवाळे, जयदेवराव गायकवाड, कमल ढोले पाटील, अंकुशआण्णा काकडे, माजी महापौर .शांतीलाल सुरतवाला, प्रकाशआप्पा म्हस्के, भगवानराव साळुंखे, रवींद्रआण्णा माळवदकर, माजी उपमहापौर निलेश मगर, निलेश निकम, दिपालीताई धुमाळ, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.सुनील जगताप, मा.नगरसेवक सतीश म्हस्के,काकासाहेब चव्हाण,प्रदीप गायकवाड,बाळासाहेब धनकवडे,श्रीकांत पाटील, वनराज आंदेकर,संतोष फरांदे, युवक अध्यक्ष किशोर कांबळे,युवती अध्यक्ष सुषमा सातपुते,महिला अध्यक्षा मृणालिनीताई वाणी , मा.जि.सदस्य सौ.अनिताताई इंगळे, यांच्यासह सर्व सेलचे शहराध्यक्ष , कार्याध्यक्ष व कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune News)


News Title | NCP Pune | Sharad Pawar Pune Nationalist Congress with Sharad Pawar Resolution passed in executive meeting

Maharashtra Politics | विरोधी पक्षांनाच सत्ताधाऱ्यांबरोबर बसण्याची हाव असेल तर लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? आणि मग युवकांचा राजकारणातला रोल मॉडेल कोण असणार?

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र संपादकीय

Maharashtra Politics | विरोधी पक्षांनाच सत्ताधाऱ्यांबरोबर बसण्याची हाव असेल तर लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? आणि मग युवकांचा राजकारणातला रोल मॉडेल कोण असणार?

Maharashtra Politics | (Author: Ganesh Mule) | लोकशाहीचे (Democracy) जसे चार महत्वाचे स्तंभ आहेत, अगदी त्याचप्रमाणे आणि किंबहुना त्याहूनही महत्वाचा लोकशाहीचा आधार हा विरोधी पक्ष (Opposition Party) असतो. मात्र विकासाचे कारण देत तोच विरोधी पक्ष जर सत्ताधाऱ्या (Ruling Party) सोबत हातमिळवणी करून सत्तेत बसू लागला तर हा लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने अशाच गोष्टी घडत चालल्या आहेत. त्यामुळे युवकांचा (Youth) राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे आम्ही राजकारणात रोल मॉडेल (Roll Model) म्हणून कुणाकडे पाहायचे, असा संभ्रम राजकारणात येऊ पाहणाऱ्या आणि सर्वसामान्य युवकांना पडला आहे. (Maharashtra Politics)
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. जे काही घडतं त्यामुळे लोक फक्त सुन्न होतात. सुरुवातीला भाजप (BJP) हा मोठा पक्ष असून देखील भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. मुख्यमंत्री कुणाचा असणार, या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपचा हात सोडला. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेवर आली. यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा सगळ्यात मोठा हात होता. काँग्रेस (INC), शिवसेना (Shivsena)आणि राष्ट्रवादीने (NCP) सत्ता स्थापन केली. मात्र हे सहन न झाल्याने आणि विरोधी पक्षात बसण्याची वेळ आलेल्या भाजपने कुरघोड्या करायला सुरुवात केली. यात सगळ्यात आघाडीवर होते ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis). फडणवीस हे पवारांना शह देतात म्हणून त्यांची लोकप्रियता वाढू लागली होतीच. शिवाय त्यांना केंद्राकडून देखील साथ मिळत असल्याने त्यांचे महाराष्ट्रात वर्चस्व वाढत चालले होते. (Maharashtra Political Crisis)
मग फडणवीस यांनी आपले बुद्धिचातुर्य चालवत आणि गनिमी कावे करत शिवसेनेत उभी फूट पाडली. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सेना एकाकी पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडाने शिवसेना तर फुटलीच मात्र महाविकास आघाडीला देखील आपली सत्ता राखता आली नाही. मग भाजप आणि शिंदे यांनी ठाकरेंचं उरलं सुरलं देखील सगळं हिरावून घेतलं. बंडखोरी केलेली सगळी लोकं ही ED आणि तत्सम यंत्रणांना घाबरलेली होती. फक्त हेच लोक नाही तर काँग्रेस, उद्धव यांची सेना आणि राष्ट्रवादीतील लोकांच्या मागे देखील यंत्रणा लावल्या जात होत्या. कुठल्याही पद्धतीने दबाव आणून विरोधी पक्ष कमकुवत करायचा हा चंग बांधून भाजपने कुरघोड्या सुरु ठेवल्या.
याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी (Ajit Pawar) नुकतेच बंड केले. विरोधी पक्षात असणारा राष्ट्रवादी मग  लगेच सत्ताधारी झाला. शरद पवारांना हे माहित होते कि नाही, हे पुढे उघड होईलच. मात्र या सगळ्या घटनांमुळे मात्र सर्वसामान्य लोक, युवक यांचा मात्र राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. शिवाय सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष जर सत्तेच्या दावणीला बांधला जात असेल तर लोकशाहीचा गाडा कसा टिकणार? लोकांच्या आशेचा किरण कोण असेल? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडू लागले आहेत.
जे चाललंय ते सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं आहे, हे याचमुळे. कारण काँग्रेस ला कंटाळून लोकांनी भाजपला मोठा पक्ष बनवलं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आपल्या आशेचा किरण मानलं. मात्र भाजपने लोकांच्या हिताची भूमिका घेतली असं दिसून येत नाही. भ्रष्टाचारी लोकांच्या मागे यंत्रणा लावल्या म्हणून लोकांना भाजपविषयी आदर वाटू लागला. पण कालांतराने भाजपने त्याच लोकांना आपल्या पक्षाचा आश्रय देत त्यांना मंत्री केलं. त्यामुळे लोकांना यातला नेमका बोध कळेना. तसेच शरद पवार यांचं महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मक्तेदारी मोडून काढणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. मात्र त्यांच्या कुरघोड्या पाहता ते लोकांसाठी कमी आणि सत्तेसाठी चिटकून राहण्यासाठी सर्व गोष्टी करतात, हे लक्षात येऊ लागलं. शरद पवारांच्या नेहमीच्या बदलत्या भूमिकेमुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास उरला नाही. कालच्या प्रकरणात आपला हात नाही, असं शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी लोकं आता त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
सत्ताधाऱ्यांनी लोकांचं, लोक काय बोलतात यावर फार लक्ष द्यायचं नसतं आणि आपला अजेन्डा चालवायचा असतो, अशी एक रीत पडून गेली आहे. मात्र  विरोधी पक्षानं लोकांची बाजू घेऊन लोकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून द्यायचा असतो, हे देखील सोयीस्कर रित्या विसरले जात आहे. अशा परिस्थितीत उत्साहाने राजकारणात येऊ पाहणाऱ्या नवख्या युवकांनी नेमकं कुणाला आदर्श मानायचं? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
यात लोकांनाच अग्रणी भूमिका घ्यायला हवीय. राजकारणातून आपला फार विकास होत नसतो, हे आता तरी लोकांनी लक्षात घ्यायला हवंय. आपला विकास आपल्यालाच करावा लागतो. आपल्याशिवाय आपल्याला कुणी वाचवू शकत नाही, हे सूत्र लक्षात घेऊन आणि राजकारणाकडे दुर्लक्ष करून लोकांनी स्वविकास करून घ्यायला हवाय.

सर्वच राजकीय पक्ष म्हणतात, तरुणांनी राजकारणात आले पाहिजे पण युवा वर्गाने कोणाचा आदर्श घ्यावा हाच मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे. ज्यांचा आदर्श घ्यावा अशी व्यक्तिमत्वे कधी एका पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात हे वास्तव सद्यस्थितीत आहे आणि  पक्षाची ध्येयधोरणे काय ? या मुद्द्याला तिलांजली दिली जात असल्याचे वास्तवही आहे.त्यामुळे युवा वर्गाने राजकारणात यावे ही साद एकीकडे घातली जात आहे आणि दुसरीकडे जनहितासाठी आवश्यक असणारा विरोधी पक्ष कायमचा हद्दपार करण्याचे डावपेच सुरू आहेत त्यासाठी राजकारणात फोडाफोडीचे राजकारण तर खुलेआम होत आहे मात्र विकासाच्या नावाखाली स्वार्थ साधला जात असेल तर लोकहिताचा विचार कुणीच करत नाही असेच म्हणावे लागेल.

– हेमंत बागुल, काँग्रेस कार्यकर्ता.
——
Article Title | Maharashtra Politics |  If only the opposition parties want to sit with the rulers, how can the car of democracy survive?  And then who will be the role model of the youth in politics?

Sharad Pawar | Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यासाठी आता माझा एककलमी कार्यक्रम | शरद पवार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Sharad Pawar | Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यासाठी आता माझा एककलमी कार्यक्रम | शरद पवार

Sharad Pawar | Maharashtra Political Crisis | अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण कुठल्याही प्रकारे व्यथित झाले नसल्याचे सांगत पुन्हा काम करण्याचा हुरूप आला आहे, असं स्पष्ट केलं. तसेच पक्षाचा आश्वासक चेहरा देखील शरद पवार असतील, असं पवार यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे आगामी काळात पक्षबांधणीसाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यासाठी आता माझा एककलमी कार्यक्रम असेल, असे पवार यांनी सांगितले आहे. (Sharad Pawar | Maharashtra Political Crisis)
 पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न राहीला तर आजचा प्रकार इतरांना नवीन असेल मात्र मला नवीन नाही. १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते त्यापैकी महिन्याभराने सहा आमदारांच्या व्यतिरीक्त सगळे आमदार सोडून गेले. माझ्यासहीत पाच आमदारांना सोबत घेऊन मी पुन्हा पक्षाची बांधणी केली. पुढच्या निवडणूकीत जे आम्हाला सोडून गेले त्यापैकी दोन-तीन जण सोडल्यास सगळे पराभूत झाले. १९८० साली जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हा माझा एककलमी कार्यक्रम राहील. माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषत: तरूण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. (Maharashtra News)
देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी होतं. त्या वक्तव्यात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन विभागात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. यामध्ये प्रधानमंत्र्यांनी जो आरोप केला, त्यानंतर आज राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. त्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त करण्यात आले त्यासाठी मी प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे. असा टोला शरद पवार यांनी लगावला. (Maharashtra Politics)
पवार पुढे म्हणाले, आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. पक्षाच्या संघटनात्मक बदलाचा विचार करण्यासाठी ६ जुलै रोजी पक्ष कार्यालात मी बैठक आयोजित केली होती. त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली आहे. तसेच आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका मांडली. विधीमंडळातील काही सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. याचे कारण यापैकी काही सदस्यांनी आम्ही सही केली असली तरी आमची वेगळी भूमिका कायम आहे असे मला सांगितले. याबाबत माझ्याशी संपर्क केलेल्या सहकाऱ्यांनी जनतेपुढे हे चित्र मांडले तर त्यांच्याबद्दल माझा विश्वास बसेल जर त्यांनी मांडले नाही तर त्यांची वेगळी भूमिका आहे, असा निष्कर्ष मी काढेल.
चार वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभेतदेखील हेच चित्र होते. पण राज्यात जिथे जाता येईल तिथे जाणे, आपली भूमिका मांडणे हे केले त्याचा परिणाम आमची संख्या वाढली आणि आम्ही संयुक्त सरकार स्थापन केले. आज पुन्हा ती स्थिती आहे. या सर्व स्थितीत अनेकजण संपर्क करून आपण सर्व एक आहोत, आमची तुम्हाला साथ आहे, अशी मत मांडत आहेत.
आजचा दिवस संपल्यावर उद्या सकाळी कऱ्हाडला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजातील घटकांचा पहिला मेळावा घेणार. त्यानंतर राज्यात आणि देशात जावून लोकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, ही माझी नीती राहील. असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
News Title | Sharad Pawar Maharashtra Political Crisis | Now for the support of the people of Maharashtra, my Ekkalami program | Sharad Pawar