NCP Youth | फारुख मुसा पटेल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिव पदी नियुक्ती

Categories
Breaking News Political पुणे

Farooq Musa Patel | फारुख मुसा पटेल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिव पदी नियुक्ती

NCP Youth – (The Karbhai News Service) – पुणे येथील युवा उद्योजक फारुख मुसाभाई पटेल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Farooq Musa Patel)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित दादा पवार, देशाचे सचिव अविनाश आदिक, राष्ट्रवादी प्रदेशध्यक्ष खा.सुनिल तटकरे व उचतंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण व इतर सर्व नेत्यांनी केली आहे. यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून तसेच पुणे येथील आमदार चेतन तुपे , महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर, पुणे शहरातील विवध सामजिक संघटना व शहर राष्ट्रवादी काँगेस पार्टी यांचे कडून स्वागत करण्यात आले व कौतुक करण्यात आले ..

श्रीरामपुर तालुक्यातील  मूळ नाऊर गावी अभिंनदंचा वर्षाव करण्यात आला .फारुख पटेल यांचे वडील मुसा भाई पटेल हे मूळ गावी माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य ग्रामपंचायत होत.

MLA Sunil Kamble | NCP Pune | आमदार सुनिल कांबळे यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून पुण्यात आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

MLA Sunil Kamble | NCP Pune | आमदार सुनिल कांबळे यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून पुण्यात आंदोलन

MLA Sunil Kamble | NCP Pune | कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना मारहाण करणारे भाजपचे  आमदार सुनिल कांबळे ( BJP MLA Sunil Kamble) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Pune) वतीने  निषेध करण्यात आला.  शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap NCP) यांच्या नेतृत्वात पुण्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. कांबळे यांना पदमुक्त करण्याची मागणी राष्ट्रवादी कडून करण्यात आली. (Pune News)

 

ससून रुग्णालयातील एका समारंभाच्या वेळी कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना भाजपचे आमदार सुनिल कांबळे यांनी मारहाण केली. सदर घटनेची चित्रफीत माध्यमांवर उपलब्ध आहे. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ससून रुग्णालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

“नुकताच आपण पोलिस दलाचा ६३ वा वर्धापन दिन साजरा केला, आपल्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी मात्र पोलिसांच्या श्रीमुखात मारून संपूर्ण पोलिस दलाचा, त्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा अवमान केला. कायदा करणारेच कायदा मोडत असतील तर जगापुढे आपण आपली काय प्रतिमा तयार करत आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून किमान जनाची नाही तर मनाची लाज वाटून महाराष्ट्र सरकारने आमदार सुनिल कांबळे यांना तातडीने पदमुक्त करावे.” अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री आहेत. स्वपक्षाच्या आमदाराचा राजीनामा त्यांना घेता येत नसेल तर त्यांनी स्वतः गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

या आंदोलन प्रसंगी प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, कणव चव्हाण, शेखर धावडे, नितीन पाटोळे, मीनाताई पवार, अजिंक्य पालकर, सुवर्णाताई माने, मृनालताई वाणी, रूपालीताई शिंदे, गणेश नलावडे, नीताताई गलाडे, दीपक कामठे आदि मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्तिथ होते.

 

Kothrud Vidhansabha Constituency | कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नूतन कार्यकारिणीचा पद वाटप कार्यक्रम

Categories
Breaking News Political पुणे

Kothrud Vidhansabha Constituency | कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नूतन कार्यकारिणीचा पद वाटप कार्यक्रम

Kothrud Vidhansabha Constituency | पुणे :  शहर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील (Kothrud Vidhansabha Constituency) नूतन कार्यकारिणीचा पद वाटप कार्यक्रम काल संपन्न झाला. मा. खा. वंदनाताई चव्हाण, मा. पुणे शहराध्यक्ष श्री. प्रशांतदादा जगताप, मा. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अंकुश अण्णा काकडे, पुणे शहर महिला अध्यक्षा मा. मृणालिनी ताई वाणी, पुणे शहर युवक अध्यक्ष मा. किशोरजी कांबळे, पुणे शहर युवती अध्यक्षा मा. सुषमा ताई सातपुते आणि पुणे शहर विद्यार्थी शहराध्यक्ष मा. विक्रम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

शरद पवार यांच्या  पुरोगामी विचारांचा वसा एका पिढीकडून नव्या पिढीच्या नव्या शिलेदारांकडे हस्तांतरित करताना विशेष आनंद झाला. याप्रसंगी कोथरूड विधानसभेचे विविध सेलचे आम्ही सारे पदाधिकारी एका व्यासपीठावर एकत्र येऊन हा कार्यक्रम संपन्न झाल्याने नूतन कार्यकारिणीचा आत्मविश्वास वाढण्यास सहाय्य झाले. भविष्यात अशाच एकजुटीने आणि आत्मविश्वासाने आम्हा सर्वांना एकत्र येऊन आपल्या महाराष्ट्रासाठी आणि पर्यायाने आपल्या देशासाठी कार्य करायचे आहे.

यावेळी कोथरूड विधानसभेचे युवक अध्यक्ष मा. गिरीश गुरनानी, महिला अध्यक्षा ज्योतीताई सूर्यवंशी, विद्यार्थी अध्यक्ष आदिराज कसबे, युवती अध्यक्षा ऋतुजा गायकवाड, ओबीसी सेल अध्यक्ष संतोष चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद हणवते या सर्वांनी स्वतःची कार्यकारणी जाहीर करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पद वाटप करण्यात आले.

यावेळी आदरणीय शरद पवार साहेब, सुप्रियाताई, जयंतरावजी पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक जोमाने आम्हा सर्वांना काम करायचे असून त्या अनुषंगाने सर्वांनीच आपले अनुभव कथन करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारी व कर्तव्यांची जाणीव करून दिली. तसेच हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत, असा विश्वासही दर्शविण्यात आला.

NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी माजी आमदार जयदेवराव गायकवाड यांची नियुक्ती

Categories
Breaking News Political पुणे

NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी माजी आमदार जयदेवराव गायकवाड यांची नियुक्ती

 

NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  (NCP Supremo Sharad Pawar) यांच्या मान्यतेने माजी आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती सेलची जबाबदारीही ऍड. जयदेवराव गायकवाड यांच्याकडे आहे. त्यांच्या नियुक्तीने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्या प्रदीर्घ अनुभव व संघटन कौशल्याचा राष्ट्रीय स्तरावर नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त केले जात आहे.

Local Body Election | दम असेल तर सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्या

Categories
Breaking News PMC social पुणे

Local Body Election | दम असेल तर सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्या

| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रशांत जगताप यांचे खुले आवाहन

Local Body Election | काल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Panchayat Election) निकालानंतर आम्हीच राज्यात आघाडीवर आहोत असा दावा सत्तेतील सर्व पक्ष करत आहेत. जनतेची पसंती आम्हालाच आहे हा त्यांचा दावा खरा असेल आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खरोखर जनतेला सामोरे जाण्याची हिम्मत असेल तर पुढील दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक (Local Body Election) घ्याव्यात असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP pune) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिले आहे. (Municipal Election)
ग्रामपंचायत निवडणूक या कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आमचाच पक्ष एक नंबर हा सत्तेतील पक्षांचा दावा हास्यास्पद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडुकांच्या बाबतीत विरोधकांनी दाखल केलेल्या याचिकांवर उत्तर सादर करायला सत्ताधाऱ्यांना वेळ नाही, त्यामुळे जनता त्यांच्या लोकप्रतिनिधींपासून वंचित आहे. एका बाजूला जनतेला त्यांच्या हक्काचे प्रतिनिधित्व नाकारण्याचे पाप हे सरकार करत असताना दुसऱ्या बाजूला जनतेचा कौल आम्हालाच आहे असा दावा करत आहे. हा दावा खरा असेल तर सरकारने तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात असे खुले आवाहन प्रशांत जगताप यांनी दिले आहे.

Lalit Patil | Devendra Fadnavis | ड्रग माफिया ललित पाटीलला अभय देणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  राजीनामा द्या | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ससून रुग्णालयाबाहेर तीव्र आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Lalit Patil | Devendra Fadnavis | ड्रग माफिया ललित पाटीलला अभय देणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  राजीनामा द्या

| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ससून रुग्णालयाबाहेर तीव्र आंदोलन

 

Lalit Patil  | Devendra Fadnavis | ड्रग माफिया ललित पाटीलला (Drug Dealer lalit Patil) अभय देणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Home Minister Devendra Fadnavis) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP Pune) वतीने ससून रुग्णालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले.

 

याबाबत पुणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सांगितले कि, हजारो कोटी रुपयांचे ड्रग्स तयार करून विकणाऱ्या ललित पाटील या ड्रग माफियाने राज्यातील तरुण पिढीला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं आहे. अशा माणसाला जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्याचे सोडून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक बडे मंत्री व अधिकारी हे ललित पाटीलची गुलामी करण्यात, त्याला पाठीशी घालण्यात व्यस्त होते. अगदी पोलीसांच्या तावडीतून त्याला सहीसलामत पळवून लावण्याइतपत यांची मजल गेली. या प्रकरणाबाबत नागरिकांनी प्रश्न विचारायला सुरुवात करताच सरकारवरील दबाव वाढला. म्हणूनच ललित पाटीलला तात्पुरती अटक करून प्रकरण शांत करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न आहे.

हा अटकेचा खेळ करून नागरिकांना फसवण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांनी करू नये. ललित पाटील राज्यात ड्रग्जचे साम्राज्य उभारेपर्यंत राज्यातील कायदा व सुव्यवस्था झोपेत होती का ? याची चौकशी करावी. ललित पाटील अटकेत असताना त्याला ससून रुग्णालयात, पंचातारांकीत हॉटेलमध्ये सेवा कोण पुरवत होते ? याची चौकशी करावी, सरकारमधील कोणते मंत्री , अधिकारी ललित पाटीलचे बटीक म्हणून काम करत आहेत हे जनतेसमोर आणावे, तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास सक्षम नसल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, कणव चव्हाण,किशोर कांबळे, विक्रम जाधव, शेखर धावडे, मीनाताई पवार, आसिफ शेख, मनाली भिलारे, गणेस नलावडे, रोहन पायगुडे, नरेश पगाडालू, शिल्पा भोसले यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

PMC Shahari Garib Yojana  | शहरी गरीब योजनेची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवा | शहर राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Shahari Garib Yojana  | शहरी गरीब योजनेची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवा | शहर राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या  शहरी गरीब योजनेच्या (PMC Shahari Garib Yojana) उपचारांची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवण्यात यावी. तसेच दुर्धर आजारांसाठी अडीच लाखापर्यंत उपचार देण्यात यावेत. अशी राष्ट्रवादी काँग्रेस कडून (NCP Pune) शहर अध्यक्ष दीपक मानकर (Dipak Mankar) आणि प्रवक्ते भैयासाहेब जाधव (Bhaiyyasaheb Jadhav) यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे. (Pune Municipal Corporation)
आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार महापालिकेकडून (PMC Pune) शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेसाठीची उत्पन्न मर्यादा 1 लाखांवरून 1 लाख 60 हजार रूपये केली आहे. त्यामुळे शहरातील गरजू व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे. महापालिकेने 2011 मध्ये सुरू केलेल्या या योजनेत अद्यापही नागरिकांना 1 लाख रूपयां पर्यंतचे उपचार महापालिकेच्या पॅनेलवरील रूग्णालयात मिळतात. तर काही दुर्धर आजारांसाठी 2 लाखांचे उपचार मिळतात. मात्र, वैद्यकीय उपचाराचा वाढलेला खर्च तसच महागाई लक्षात घेऊन उपचाराच्या खर्चाची मर्यादाही वाढविणे आवश्‍यक असून या योजनेतील कार्डधारकांना सरासकट 2 लाखांचे उपचार मिळावेत तसेच दुर्धंर आजारासाठी अडीच लाखां पर्यंत उपचार केले जावेत. महापालिकेत लोकप्रतिनिधीं नसल्याने शहराचे प्रशासक म्हणून आपल्या पातळीवर हा निर्णय घेतल्यास सर्वसामान्य पुणेकरांना दिलासा मिळणार असून याबाबत आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी करणार आहोत. असे निवेदनात म्हटले आहे.
—-

Prashant Jagtap | NCP Pune | मुख्यमंत्र्यांनी निष्क्रिय आरोग्यमंत्र्यांचा व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा | प्रशांत जगताप

Categories
Breaking News Political आरोग्य पुणे महाराष्ट्र

Prashant Jagtap | NCP Pune | मुख्यमंत्र्यांनी निष्क्रिय आरोग्यमंत्र्यांचा व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा | प्रशांत जगताप

Prashant Jagtap | NCP Pune |  पुरेशा सुविधांच्या अभावी नांदेड (Nanded Hospital) व छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar Hospital) व आज नागपूर (Nagpur Hospital) येथे शासकीय रूग्णालयात मिळून जवळपास ७९ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष  प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Pune) वतीने राजीव गांधी हॉस्पिटल येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
स्वतःला ट्रीपल इंजिन म्हणवून घेणारे महायुती सरकार प्रत्यक्षात केवळ कंत्राटदारांच्या सेवेसाठी काम करत आहे. सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे राज्यातील आरोग्यव्यवस्था व्हेंटीलेटरवर आहे. मागच्याच महिन्यात ठाण्यातील शासकीय रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली होती. त्या घटनेतून बोध घेत राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन उपाययोजना करणे ही राज्याच्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची प्राथमिक जबाबदारी होती. परंतू मंत्री महोदयांना राजकीय कुरघोड्या, सभा – समारंभ यातून फुरसत मिळत नसल्याने राज्यातील आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. याचाच परिणाम म्हणून पुरेशा सुविधांच्या अभावी नांदेड व छत्रपती संभाजीनगर व आज नागपूर येथे शासकीय रूग्णालयात मिळून जवळपास ७९ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी हॉस्पिटल येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
सत्ताधाऱ्यांमध्ये नैतिकता शिल्लक नसल्याने त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची शक्यता नाही. तथापि राज्याचे प्रमुख म्हणून या घटनेची जबाबदारी निश्चित करून मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी निष्क्रिय आरोग्यमंत्र्यांचा व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही यावेळी प्रशांत जगताप यांनी केली.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह श्री. प्रकाशआप्पा म्हस्के, डॉ. सुनिल जगताप, डॉ. शशिकांत कदम, श्री. किशोर कांबळे, श्री. आशिष माने, श्री. शैलेश राजगुरू, मनाली भिलारे, फहीम शेख, श्री. सागर खांदवे, अश्विनी परेरा, श्री. गणेश नलावडे, श्री. अजिंक्य पालकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Bhaiyyasaheb Jadhav | Gopichand Padalkar | पडळकरांच्या अप्रगल्भ वक्तव्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही | राष्ट्रवादी प्रवक्ते भैयासाहेब जाधव

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

Bhaiyyasaheb Jadhav | Gopichand Padalkar | पडळकरांच्या अप्रगल्भ वक्तव्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही | राष्ट्रवादी प्रवक्ते भैयासाहेब जाधव

Bhaiyyasaheb Jadhav | Gopichand Padalkar | विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (MLC Gopichand Padalkar) यांनी नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. पडळकरांच्या अप्रगल्भ वक्तव्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. असे राष्ट्रवादी प्रवक्ते भैयासाहेब जाधव (Spokesperson Bhaiyyasaheb Jadhav) यांनी म्हटले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मा. अजित पवार यांच्या बाबत केल्याने वक्तव्याने राज्यात उलट सुलट राजकीय चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पडळकर यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. पुणे राष्ट्रवादीकडून काल पडळकर यांचा निषेध केला गेला. राष्ट्रवादी प्रवक्ते भैयासाहेब जाधव पडळकर यांच्या विधानाचा निषेध केला आहे. जाधव म्हणाले, अप्रगल्भ व्यक्तीच्या तोंडून अप्रगल्भ वक्तव्येच बाहेर पडणार. पडळकर यांची राजकीय परीपक्वता महाराष्ट्राला कधीही दिसून आली नाही. ते नेहमीच अशा प्रकारची विधाने करताना दिसून येतात. त्यामुळे पडळकरांच्या अप्रगल्भ वक्तव्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. पडळकर यांच्या विरोधात शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी निषेध करत इशारा दिला आहे. त्याप्रमाणे आमचे शहर अध्यक्ष जो बोलते है वो करते है . त्यामुळे पडळकर पुणे शहरात येताना आता विचार करून यावा. पडळकर यांनी आपल्या बुद्धीला झेपतील, अशीच वक्तव्ये करावीत. आपल्या विधानाने पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लागणार नाही, याची देखील काळजी पडळकर यांनी घ्यावी. पडळकर यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे .त्यांना लवकरात लवकर येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल. असे भैय्यासाहेब जाधव यांनी म्हटले आहे.


 

News Title | Bhaiyyasaheb Jadhav Gopichand Padalkar | There is no need to pay attention to Padalkar’s shallow statement Nationalist spokesperson Bhaiyasaheb Jadhav

Gopichand Padalkar Vs NCP Pune | गोपीचंद पडळकर च्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Gopichand Padalkar Vs NCP Pune | गोपीचंद पडळकर च्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

 

Gopichand Padalkar Vs NCP Pune| महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) व पवार कुटुंबीयावर (Pawar Family) आ.गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे (NCP Pune) शहराच्या वतीने बालगंधर्व चौक येथे पडळकर च्या फोटोस जोडे मारो आंदोलन करण्यात आले ,”चोरीचा छंद गोपिचंद “ , “पिसाळलेल कुत्र गोपिचंद “ , “गोप्याच्या बैलाला धो “ अशाप्रकारच्या धोषणा देण्यात आल्या .

सदर प्रसंगी बोलताना शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) म्हणाले पडळकरने अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे त्याला पुणे शहरांमध्ये आल्यावर त्याचे कपडे उतरून त्याला चोप देवू व त्याला त्याच प्रकारे उत्तरे देण्यात येईल. प्रसिध्दीच्या हव्यासापोटी त्याने हे वक्तव्यकरून वातावरण गढूळ करू नये.
याप्रसंगी बोलताना कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख म्हणाले की महाराष्ट्रच्या विकासाच्या मुद्द्यावरून आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत यात कोणतीच कटुता येवू नये यांचे सर्वांनीच भान ठेवायला हवे याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना देशमुख यांनी विनंती केली की गोपीचंद पडळकर हा पिसाळलेला श्वान आहे व याला आवरणे गरजेचे आहे पुणे शहरांमध्ये येरवडा येथे मनोरुग्ण रुग्णालय आहे आपण जर या ठिकाणी त्याला पाठवला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण खर्च करून याचा आजार बरा करण्याकरता आम्ही निश्चित प्रयत्न करू
याप्रंगी शहराघ्यक्ष दीपक मानकर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख , रूपाली ठोंबरे ,प्रिया गदादे, , सदानंद शेट्टी , आप्पा रेणुसे , समीर चांदेरे ,दत्ता सागरे , , शुभम माताळे , पूजा झोळ , हरेश लडकत, गुरूमित गिल , शांतीलाल मिसाळ , अभिषेक बोके , अजय दराडे व इतर पदाधिकारी मोठेया संख्येने उपस्थित होते