Jayant Patil : NCP Pune parisanvad : खडकवासला व पर्वती विधानसभा मतदासंघांत आपण तयारीत कमी पडलो

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

खडकवासला व पर्वती विधानसभा मतदासंघांत आपण तयारीत कमी पडलो

: राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील

पुणे : गेल्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये वडगावशेरी व हडपसर या विधानसभा मतदारसंघात आपण सर्वांनी पक्ष संघटना बूथ कमिटी यावर एकसंधपणे काम केले. त्याचा परिणाम म्हणून आमदार सुनील टिंगरे व  चेतन तुपे यांना आपण विधानसभेत पाठवले. खडकवासला व पर्वती या दोन विधानसभा मतदासंघांत आपण तयारीत कमी पडलो. तिथे थोड्याफार फरकाने आपल्या सहकार्‍यांना अपयश आले. अशी कबुली राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवारातील सर्व सदस्यांसोबत संवाद साधण्यासाठी “संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी” या संकल्पनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या संवाद यात्रेचे आज पुणे शहरात आगमन झाले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे,खासदार वंदनाताई चव्हाण, महिला प्रदेशध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे वडगावशेरी, हडपसर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट या चारही विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली.

या अंतर्गत सर्व फ्रंटल सेलच्या अध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांचे विशेष कौतुक केले. “त्यांनी पुढाकार घेत नवे पक्ष कार्यालय सुरू केले , या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गेल्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये वडगावशेरी व हडपसर या विधानसभा मतदारसंघात आपण सर्वांनी पक्ष संघटना बूथ कमिटी यावर एकसंधपणे काम केले. त्याचा परिणाम म्हणून आमदार श्री.सुनील टिंगरे व श्री. चेतन तुपे यांना आपण विधानसभेत पाठवले खडकवासला व पर्वती या दोन विधानसभा मतदासंघांत आपण तयारीत कमी पडलो तिथे थोड्याफार फरकाने आपल्या सहकार्‍यांना अपयश आले. मतदार यादी व बूथ कमिटी हे या सर्व संघटनात्मक बांधणीचा पाया असून, संपूर्ण पक्ष संघटना ही या पायावर मजबूतपणे उभी आहे. हा पाया अधिकाधिक भक्कमपणे मजबूत केल्यास येत्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर होणार याबाबत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

ज्येष्ठ नेत्यांसोबत थेट संवाद होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिवार संवाद यात्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप,आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, .कमल ढोले पाटील,सर्व आजी-माजी नगरसेवक,सर्व सेल अध्यक्ष,कार्यकारणी सदस्य व मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

PM Modi Pune Tour : ६ मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे “मोदी गो बॅक आंदोलन” 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

६ मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे “मोदी गो बॅक आंदोलन”

: पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस “मोदी गो बॅक आंदोलन” ६ मार्चला संपूर्ण पुणे शहरात करणार आहे. या महाराष्ट्रद्रोही भाजप सरकारने दुटप्पीपणाने आजतागायत आपल्या भूमीला आणि जनतेला कमी लेखले आहे. अशा पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ सर्वांनी काळे कपडे घालून, फ्लेक्स, बॅनर लावत मोदी गो बॅक निषेध आंदोलन छेडले जाणार आहे. अशी माहिती पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. क्स, बॅनर लावत मोदी गो बॅक निषेध आंदोलन छेडले जाणार आहे.

मागील काही दिवसांपासून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच त्यांच्या स्वराज्य भूमी असणाऱ्या महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जात आहे. अगदी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोना काळाचा संदर्भ देत स्वराज्य भूमी महाराष्ट्राचा अपमान केला.त्याच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेमधील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा घाट पुणे भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी घातला आहे.

याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे “मोदी गो बॅक आंदोलन” ६ मार्चला संपूर्ण पुणे शहरात करणार आहे. या महाराष्ट्रद्रोही भाजप सरकारने दुटप्पीपणाने आजतागायत आपल्या भूमीला आणि जनतेला कमी लेखले आहे. अशा पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ सर्वांनी काळे कपडे घालून, फ्लेक्स, बॅनर लावत मोदी गो बॅक निषेध आंदोलन छेडले जाणार आहे.

Pune : NCP : Nawab Malik : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून भाजपचा निषेध 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून भाजपचा निषेध

पुणे : केंद्र सरकारमधील सत्ताधारी भाजप वारंवार विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता निर्भीडपणे आपली भूमिका मांडणाऱ्या नवाब मलिक साहेबांना काल पासून सातत्याने त्रास देण्याची भूमिका ईडी ने घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या या वृत्तीचा निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सकाळी पहाटे पाच वाजता कुठलाही समन्स न बजावता अचानकपणे त्यांच्या घरावर धाड टाकने असो किंवा समन्स न बजावतात केलेली अटक असो अशा विविध माध्यमातून वारंवार नवाब मलिक साहेबांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच मलिक साहेबांना पाठिंबा देण्यासाठी तसेच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या या घाणेरड्या वृत्तीचा निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख व युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर ,शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अलका टॉकीज चौक येथे एकवटले. यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित राहत भाजपच्या या वृत्तीचा निषेध केला. समवेत युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक बोके, राकेश कामठे, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, शहर कार्याध्यक्ष मनोज पाचपुते अजिंक्य पालकर,विशाल वाकडकर आदींसह मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Agitation By NCP Pune : आधी नरेंद्र मोदींचा राजीनामा मागावा :  प्रशांत जगताप 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

आधी नरेंद्र मोदींचा राजीनामा मागावा :  प्रशांत जगताप

: नवाब मलिकांच्या समर्थनार्थ पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत सुरू केलेल्या खोट्या चौकशी व दडपशाहीच्या विरोधात तसेच महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  यांच्यावर ईडीद्वारे सूड बुद्धीने केलेल्या कारवाईच्या विरोधात भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राला विनयशील राजकारणाचा संमृद्ध वारसा दिला. आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासह सर्व नेत्यांनी तो वारसा जपला आणि वाढवला. भारतीय जनता पार्टीने मात्र या परंपरेला हरताळ फासत सुडाचे राजकारण सुरु केले. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडू लागताच भाजपच्या वतीने केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी याचा तीर्व आंदोलन करत भारतीय जनता पार्टीचा निषेध केला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा मागितला यावर प्रतिक्रिया देताना “नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील ६३% मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, म्हणून राजीनामा मागायचा असेल तर आधी नरेंद्र मोदींचा राजीनामा मागावा” असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले.

या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपालीताई धुमाळ,प्रदीप देशमुख, मृणालिनीताई वाणी,रुपाली ठोंबरे पाटील, किशोर कांबळे, सुषमा सातपुते, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NCP Pune : ACB : पुणे महापालिकेत विविध प्रकल्पात भाजपकडून भ्रष्टाचार :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिकेत विविध प्रकल्पात भाजपकडून भ्रष्टाचार :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल

 

पुणे : शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे यांची भेट घेतली. सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत प्रसारमाध्यमे व अनेक सामाजिक संस्था यांनी देखील वारंवार लाचलुचपत विभागाकडे व मा.आयुक्त पुणे महानगरपालिका यांच्याकडे तक्रार केलेले आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या भ्रष्टाचाराच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. अशी माहिती शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

तक्रारीत नमूद विषय खालीलप्रमाणे –

विषय क्र.१)
पुणे महानगरपालिकेच्या २४/७ समान पाणीपुरवठा योजना मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व यामध्ये खासगी ठेकेदाराच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने अनेक ठिकाणी बदल करून सदर योजनेची किंमत आणि अनियमितपणे वाढवण्यात आली आहे.

विषय क्र.२)
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बाणेर व वारजे येथे महानगरपालिकेच्या प्रचलित नियमाप्रमाणे प्रक्रिया न करता अनियमित पद्धतीने काही व्यक्ती व संस्था यांच्या आर्थिक हिताचा विचार करून बाणेर व वारजे येथे एक हजार कोटी रुपये कर्ज घेऊन हॉस्पिटल उभे करण्याची प्रक्रिया करण्याचे प्रयत्न चालू आहे. यामध्ये देखील मोठे आर्थिक हितसंबंध असल्याची शक्यता आहे.याचीही सखोल चौकशी करण्यात यावी.

विषय क्र.३)
पुणे शहरातील पुणेकरांच्या हक्काच्या 350 अँमिनिटी स्पेसेस या खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक फायद्यासाठी देण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे याची देखील आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

विषय क्र.४)
‘जायका’ प्रकल्पांतर्गत उभारण्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता दिसून आले आहे काही खाजगी ठेकेदार कंपनीच्या विशेष विचार करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास येते यामुळे पुणेकरांचे आर्थिक नुकसान झाले आहे याची आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

विषय क्र.५)
१६ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण समिती या बैठकीमध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिक व सत्ताधारी यांच्या हितासाठी नियमबाह्य पद्धतीने आरक्षित असलेल्या प्राथमिक शाळा उभारणीचा प्रस्ताव नियम डावलून मान्य करण्यात आला या प्रस्तावामध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिकाचा पुरेपूर आर्थिक हितसंबंध आहे असे प्रथमदर्शनी दिसून येते यामुळे या प्रकरणाची आपले विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

विषय क्र.६)
समाविष्ट गावांचा ड्रेनेज लाईन टाकणे या ३९३ कोटीचे निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते या निविदेबाबत अनेक व्यक्ती व संस्था यांनी न्यायालयाने देखील दाद मागितली आहे व तक्रार दाखल केलेली आहे या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार व आर्थिक हितसंबंध असल्यामुळे भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनास येते याची आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

तरी वरील सर्व नमूद केलेल्या १ ते ६ विषयांची निविदा किंमत सुमारे सहा हजार कोटी रुपये आहे. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याने त्या संबंधित प्रकरणाची पुणेकरांच्या व महानगरपालिकेच्या आर्थिक हितासाठी ताबडतोब चौकशी करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी माजी आ. जयदेवराव गायकवाड, माजी महापौर अंकुश आण्णा काकडे, माजी शहराध्यक्ष रविंद्र आण्णा माळवदकर, नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेवक बाबुराव चांदेरे, प्रदेश प्रतिनिधी . प्रदीप देशमुख, समन्वयक महेश हांडे उपस्थित होते.

PMC Election 2022 : पुणे महानगरपालिका जिंकण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न उध्वस्त होईल!

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणे महानगरपालिका जिंकण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न उध्वस्त होईल

: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

पुणे : महानगरपालिका भारतीय जनता पार्टीकडून ताब्यात घेण्याचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस पाहत असली तरी त्या पक्षाच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल आणि भाजपा पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवेल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्याजवळ मांजरी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना  चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा वापर करून महानगरपालिकेत नव्याने काही गावांचा समावेश केला. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ झालेले मतदार गावांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे भाजपालाच मते मिळतील. तसेच पुण्यात प्रभाग रचना करताना मोठ्या प्रमाणात मोडतोड केली असली तरी भाजपाचा मतदार सर्वत्र कायमच आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक भाजपा पूर्ण बहुमताने जिंकेल आणि पुणे महानगरपालिका ताब्यात घेण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल.

ते म्हणाले की, भाजपाने पाच वर्षांच्या सत्तेच्या काळात पुणे महानगरपालिका क्षेत्रात भरघोस कामगिरी केली आहे. मेट्रो, रुग्णालय, रस्ते, बस वाहतूक अशा विविध क्षेत्रात भाजपाने प्रभावी काम केले आहे. आगामी काळात पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविद्यालयही होईल. भाजपा आपल्या कामांची यादी घेऊन मतदारांसमोर जाईल आणि त्यापूर्वी पन्नास वर्षांच्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराशी तुलना करण्याचे आवाहन करेल.

NCP: BJP: भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला सुरु

Categories
Breaking News PMC Political पुणे

भाजपचे नेते राष्ट्रवादीत येणे झाले सुरु

: नगरसेविका शीतल सावंत यांचे पतिंचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे – महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा केला जात होता. या चर्चा सुरू असतानाच भाजपच्या नगरसेविका शीतल सावंत यांचे पती अजय सावंत राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. “गेल्या पाच वर्षांत भाजपकडून निधी मिळाला नाही. तसेच कोणताही सन्मान मिळाला नाही. त्यामुळे आपण पक्ष सोडत आहोत,’ असे सावंत यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत सावंत यांनी हा प्रवेश केला. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या पुढाकाराने हा प्रवेश करून घेण्यात आला. “भाजपचे 16 नव्हे, तर 25 जण राष्ट्रवादीत येतील’ असा दावा आमदार टिंगरे यांनी केला आहे. राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांचे समर्थक म्हणून सावंत यांची ओळख आहे. गेल्या निवडणुकीत सावंत यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. त्यानंतर आता नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाची सुरूवात सावंत यांच्या प्रवेशाने झाल्याची राजकीय चर्चा आहे.

Human Chain : 7th Pay Commission : PMPML : ७ दिवसांत PMPML कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करा  : मानवी साखळीद्वारे PMPML कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेस घेराव

Categories
Breaking News PMC Political पुणे

७ दिवसांत PMPML कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करा

: मानवी साखळीद्वारे PMPML कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेस घेराव

: राष्ट्रवादी काँग्रेसचे  शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे नेतृत्व

 

पुणे :  पुणे महानगरपालिकेला मानवी साखळीद्वारे घेराव घालण्यात आला. PMPML कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेस मानवी साखळीद्वारे घेराव करून आंदोलन करण्यात आले.

 

याबाबत प्रशांत जगताप यांनी सांगितले कि  महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून PMPML कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय करण्याचं धोरण सत्ताधाऱ्यांनी अवलंबले आहे. वर्षानुवर्षे पुणेकरांची सेवा करणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांची पदोन्नती सत्ताधारी भाजपने केली नाही. सभागृहात चर्चा करूनही PMPML कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रुजू करणे याकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. संपूर्ण शहर कोरोनाच्या संकटाशी लढा देत असताना PMPML कामगारांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली मात्र या कोरोना काळातील सेवेचे वेतनही महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिले नाही. यावर कळस म्हणजे PMPML च्या खासगीकरणाची चाचपणी सुरू केली. पुणे शहराच्या विकासात PMPML कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे, असे असतानाही कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. कोरोनाच्या काळात बसेस बंद असतानाही ठेकेदारांना तब्बल १६० कोटी रुपये देणारे सत्ताधारी भाजप कर्मचाऱ्यांच्या वेतानाच्यावेळी मात्र हात आखडता घेतात. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी द्वारे संपूर्ण महापालिकेस घेराव घातला होता. एक खासदार, सहा आमदार, महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, PMPML वरील संचालक भाजपचे असतानाही कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय याचा अर्थ भाजपला कर्मचाऱ्यांच्या हिताची पर्वा नाही, त्यांना फक्त ठेकेदाराचे कल्याण करायचे आहे. असे यावेळी प्रशांत जगताप यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहराध्यक्ष व सभागृहातील सदस्य या नात्याने प्रशांत जगताप यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला की येत्या ७ दिवसांत PMPML कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू न झाल्यास पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर, कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या या अक्रोशाने भाजप नेत्यांचे रस्त्यावर फिरणेही अशक्य होईल. यासोबतच पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आल्यास पहिल्याच बैठकीत PMPML कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे अश्वासन त्यांनी कामगार बांधवांना दिले.

महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,विरोधी पक्षनेता दिपाली  धुमाळ, कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, .रवींद्रआण्णा माळवदकर, प्रदीप देशमुख,सोमनाथ शिंदे,किरण थेऊरकर,सुनील नलावडे,राजेंद्र कोंडे,हरीश ओहोळ,कैलास पासलकर आदींसह PMPML युनियन चे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

NCP Vs BJP : PMC election : राष्ट्रवादीचे 26 नगरसेवक भाजपात येताहेत… पण …! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

राष्ट्रवादीचे 26 नगरसेवक भाजपात येताहेत… पण …!

पुणे : भाजपचे 16 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा दावा प्रभाग रचना जाहीर झाल्याबरोबर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला होता. त्यावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे २६ नगरसेवक भाजपात येताहेत असा दावा मी पण करू शकतो. पण खोटे दावे करण्याची मला सवय नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने कितीही दावा केला तरी घोडा मैदान जवळ आहे, काय होतंय ते पाहू. असा टोला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

: राष्ट्रवादी शहर अध्यक्षांनी केला होता दावा

प्रभाग रचनेची फोडाफोडी आणि तोडफोड ही भाजपने महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. प्रशासनाने दिलेली प्रभागरचना स्वीकारणे हे आमचे पूर्वीपासूनच धोरण आहे. भाजपचे शहराध्यक्ष 100 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. मात्र, त्यांनी त्यांच्या आसपासचे लोक टिकवून ठेवावेत. सध्या आमच्याकडे त्यांच्या १६ नगरसेवकांची यादी आहे. त्यांचे प्रवेश केव्हा घ्यायचे हे वरीष्ठांशी चर्चा करून ठरवले जाईल असा खुलासा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला होता. प्रशासनाने जाहीर केलेली प्रभाग रचना पाहता निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 122 जागा स्वबळावर जिंकू शकते. त्यामुळे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली होती. त्यावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे २६ नगरसेवक भाजपात येताहेत असा दावा मी पण करू शकतो. पण खोटे दावे करण्याची मला सवय नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने कितीही दावा केला तरी घोडा मैदान जवळ आहे, काय होतंय ते पाहू. असा टोला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.