NCP – Sharadchandra Pawar Pune | महापुरुषांच्या स्मारकांना पोलिस संरक्षण द्यावे | सामाजिक सलोखा राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मनपा आयुक्तांना निवेदन

Categories
Breaking News PMC Political पुणे

NCP – Sharadchandra Pawar Pune | महापुरुषांच्या स्मारकांना पोलिस संरक्षण द्यावे

| सामाजिक सलोखा राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मनपा आयुक्तांना निवेदन

 

Pune News – (The Karbhari News Service) – महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना झाली म्हणून समाजात तणाव निर्माण झाल्याच्या, जातीय दंगली झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी महाराष्ट्रात घडल्या आहेत. १३ जून २०२४ रोजी हडपसर येथे एका मनोरुग्णाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दगड फेकून मारल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. सुदैवाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, परंतू भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पक्षाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त  यांना निवेदन सादर करण्यात आले.

शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारके, सामाजिक, राजकीय नेत्यांचे पुतळे अशा ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात यावे, तसेच प्रत्येक ठिकाणी २४ तास पोलिस कर्मचारी तैनात करण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

MP Supriya Sule | पुणे शहरातील ड्रेनेज व्यवस्थेची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी

Categories
Breaking News PMC social पुणे

MP Supriya Sule | पुणे शहरातील ड्रेनेज व्यवस्थेची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी

 

Supriya Sule on Pune Rain – (The Karbhari News Service) – पुणे शहराची पावसाने केलेल्या दुर्दशेची खासदार सुप्रिया ताई सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पाहणी केली. शिवाजीनगर, पर्वती, खडकवासला, हडपसर या मतदारसंघात परिस्थिती अत्यंत बिकट असून विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा संताप पुणेकरांकडून व्यक्त केला जात आहे.

अगदी १५ मिनिटांच्या पावसानेही पुणे शहर अक्षरशः पाण्यात बुडताना आपण गेल्या १० दिवसांत अनेकदा पाहिलं. असंख्य नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, कोट्यावधींची मालमत्ता अक्षरशः पाण्यात गेली. गेली जवळपास १० वर्षे गल्ली ते दिल्ली एकच पक्षाचा एकछत्री अंमल असताना महाराष्ट्रातील महत्वाच्या शहराची अशी अवस्था का झाली हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांच्या मनात आहे.

खा. सुप्रिया सुळे यांच्या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी पावसाळी कामे पूर्णच झाली नाहीत, तर अनेक ठिकाणी ऐन पावसाळ्यात खड्डे खोदून ठेवलेले आहेत हे निदर्शनास आले. ड्रेनेजसाठी टाकलेल्या पाईप मधून काही ठेकेदारांनी केबल टाकल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला. हा सगळा गैरप्रकार सुरू असताना शहरातील महायुतीचे आमदार झोपले होते का हा प्रश्न नागरिक विचारात आहेत.

The karbhari - MP Supriya sule met to IAS Rajendra Bhosale
नागरिकांच्या याच संतप्त भावना घेऊन खा. सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महानगरपालिका प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला.

या प्रसंगी उदय महाले, निलेश निकम, श्रीकांत पाटील, विशाल तांबे, सचीन दोडके, काकासाहेब चव्हाण, नमेश बाबर, अमृताताई बाबर, अश्विनीताई कदम, नितीन कदम , किशोर कांबळे उपस्तिथ होते.

NCP – Sharadchandra Pawar Pune | भयमुक्त पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष मैदानात | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

NCP – Sharadchandra Pawar Pune | भयमुक्त पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष मैदानात | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन

 

Pune Porsche Car Accident – (The Karbhari News Service) – पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेची झालेली दुरवस्था, पोलिस प्रशासनात अवास्तव राजकीय हस्तक्षेप यामुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. याविरोधात पुणेकरांच्या भावना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap Pune) यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, नुकत्याच झालेल्या “हिट अँड रन” प्रकरणामुळे आणि हे प्रकरण हाताळत असताना झालेल्या अक्षम्य चुकांमुळे पुणे शहराची संपूर्ण देशात नाचक्की झाली आहे. कधीकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, हिट अँड रन सिटी अशी ओळख असलेले आपले पुणे शहर आता ड्रगचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होत आहे.

यावेळी कोयता गँगची दहशत, शहरात नेहमीच घडणाऱ्या गोळीबाराच्या घटना, अमली पदार्थांचा सुळसुळाट, अनधिकृत पब आणि बारवर असलेला प्रशासनाचा वरदहस्त अशा अनेक बाबींचा तीव्र निषेध करण्यात आला.
“गृहमंत्री जागे व्हा, तिघाडी सरकार जागे व्हा” अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करत पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, शेखर धावडे, नितिन रोकडे, नीता गलांडे, वंदना मोडक, सारिका पारेख, फहीम शेख, आसिफ़ शेख, रोहन पायगुड़े, मदन कोठुळे, विक्रम जाधव, अजिंक्य पालकर, पायल चव्हाण, तनया साळुंखे, निलेश वरे आदी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Mahavikas Aghadi Vs BJP | भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली |  महाविका‌स आघाडीचा आरोप

Categories
Breaking News Political पुणे

Mahavikas Aghadi Vs BJP | भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली |  महाविका‌स आघाडीचा आरोप

 

 

Mahavikas Aghadi Vs BJP – (The karbhari News Service) – मागील दहा वर्षाच्या सत्ता काळात भाजप सरकारने इलेक्ट्रोल बॉन्डनोटबंदी या माधमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र त्या पूर्ण केल्या नाहीत. घोषणा करून जनतेला फसवणाऱ्या भाजपच्या पायाखालची वाळू आता घसरू लागली आहेत्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघाच्या बाहेरील उमेदवार एमआयएम व वंचितच्या माध्यमातून उभे करण्यात आलेअसा आरोप महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांनी केला.

 

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गजानन थरकुडेमाजी महापौर कमल व्यवहारेमाजी नगरसेवक रफीक शेखअजित दरेकर उपस्थित होते.

 

अरविंद शिंदे म्हणालेभाजपने इलेक्ट्रोल बॉन्ड आणि नोटबंदीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. विरोधकांवर बोलणारे भाजप नेते या दोन विषयांवर शब्द काढत नाहीत. जे पंतप्रधान दहा वर्षात‌ पत्रकारांना उत्तर देवू शकले नाहीतमग‌ ते जनतेला काय खरे बोलणार. दहा वर्ष जनतेला फसवणारे भाजप आज विकासाच्या नाही तर प्रभू श्रीरामाच्या नावाने मते मागत आहे. पुण्याचे उमेदवारही रामाचे नाव घेवून मते मागत आहेत. मात्र पुणेकर व देशातील सर्व मतदार या निवडणुकीत राम मंदिरावर नाही तर विकासावर मतदान करतील. भाजपच्या पायाखालची वाळू घसरत आहे. त्यामुळे भाजपने वंचित व एमआयएमला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ते‌ कसे उभे‌ केले हे त्यांनात माहित. यांना पुणे मतदार‌संघात उमेदवार मिळाला नाहीम्हणून दोन्ही उमेदवार शिरुर मतदार संघातून आयात केले. या दोन पक्षाला मत म्हणजे भाजपला मतहे दलित आणि मुस्लिम समाजाला कळून चुकले आहे‌. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करताना पुणेकर महागाईबेरोजगारी व शहरातील ढासळलेला कायदा‌ व सुव्यवस्थेचा डोळ्यासमोर ठेवून धंगेकर यांना निवडून देतीलअशा विश्वास‌ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

 

प्रशांत जगताप म्हणालेभाजपचे जे उमेदवार आहेत ते महापालिकेत स्थायी‌ समिती अध्यक्ष होतेमहापौर होते. या काळात त्यांनी पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा वेगवेगळ्या टेंडरमध्येच लक्ष घातले.   भाजपने समान पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून डोळ्यात धुळफेक‌ केली आहे. विविध योजनेच्या नावाखाली पुणेकरांना फसवण्याचे काम केले आहे. आता निवडणुकीच्या काळात महायुतीला शहरात मुळशी पॅटर्न आणायचा आहेअसेही‌ते म्हणाले.

 

गजानन थरकुडे म्हणालेभाजपने कोथरुडमधून पालकमंत्रीखासदार दिले. कोथरूडला सत्ताकेंद्र केले. तरीही कोथरुडचा विकास झाला नाही. कोथरुडचा जो विकास‌ झाला तो माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्याच काळात झाला. चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना काय कामे केली त्यातील केवळ चार कामे त्यांनी सांगावीत. विकासाचे गाजर दाखवून निवडणुक लढवली जात आहे. सुनेला पाठवा दिल्लीत लेकीला ठेवा गल्लीत अशी डॉ. निलम गोऱ्हे यांच्या टिकेचा समाचार घेताना थरकुडे म्हणालेगोऱ्हे यांना स्वत:ला नगरसेवक म्हणून निवडून येता‌येत नाहीना त्या एक नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत. तरीही शिवसेनेने त्यांना गेल्या २० ते २२ वर्षे विधान परिषदेच्या आमदार केले.

Mahavikas Aghadi Pune agitation | वीज दरवाढ विरोधात महाविकास आघाडीचे तीव्र निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

Mahavikas Aghadi Pune agitation | वीज दरवाढ विरोधात महाविकास आघाडीचे तीव्र निषेध आंदोलन

| दरवाढ मागे न घेतल्यास धरणे आंदोलन करण्याचा खा.सुप्रिया सुळेंचा इशारा

 

Mahavikas Aghadi Pune agitation – (The Karbhari News Service) – सरकारने केलेल्या वीज दरवाढीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टी, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी यांच्या वतीने पॉवर हाऊस चौक, रास्ता पेठ येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

याबाबत महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले कि, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील सामान्य जनता आजपर्यंतच्या सर्वाधिक महागाईचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत जनतेला महागाईच्या संकटातून दिलासा देण्यासाठी धोरण आखणे हे सरकारचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्रातील फडणवीस – पवार – शिंदे सरकारने मात्र आधीच महागाईच्या चटक्यांनी पोळलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. विजेचा किमान स्थिर आकार तसेच प्रति युनिट वीज दर यात वाढ करून फडणवीस – पवार – शिंदे सरकारने एकूण वीज दरात सरासरी १५% वाढ केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे, आमदार रविंद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष श्री.शेखर धावडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष श्री. धनंजय बेनकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अभय छाजेड, मुकुंद किर्दत, अशोक हरणावळ, विशाल धनावड़े, कणव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राज्यातील महायुती सरकारचा धिक्कार व्यक्त केला. “तिघाडी सरकारची मजा जनतेला दरवाढीची सजा, तिघाडी सरकारचा धिक्कार असो, महागाई जोमात जनता कोमात, जनतेच्या खिशाला कात्री हीच मोदींची गॅरंटी” अशा घोषणांनी संपूर्ण रास्ता पेठ परिसर दुमदुमला होता.

——

 देशातील जनता अभूतपूर्व अशा महागाईचा सामना करत आहे. देशातील गरीब, मध्यमवर्गीय वर्गाचं जीवन कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत आपल्या राज्यातील जनतेला महागाईतून दिलासा देणं राज्य सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. परंतू जनता खड्ड्यात गेली तरी चालेल, परंतू वीज उत्पादन करणाऱ्या अडाणी, अंबानी यांचे खिसे भरले पाहिजेत हेच फडणवीस – शिंदे – पवार सरकारचं धोरण आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनता या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल.

प्रशांत सुदामराव जगताप

Electricity Price Hike | वीज दरवाढीचा निषेध करण्यासाठी उद्या पुण्यातील रास्ता पेठेत सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन!

Categories
Breaking News Political social पुणे

Electricity Price Hike | वीज दरवाढीचा निषेध करण्यासाठी उद्या पुण्यातील रास्ता पेठेत सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन!

Electricity Price Hike – (The Karbhari News Service) – राज्य सरकारने नुकतेच विजेच्या दरात वाढ केली आहे. याचा निषेध करण्यासाठी उद्या पुण्यातील रास्ता पेठेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

जगताप यांनी सांगितले कि, आर्थिक आघाडीवर सपशेल अयशस्वी ठरलेल्या, महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करणाऱ्या सरकारने आता स्वतःची तिजोरी भरण्यासाठी सामान्य जनतेच्या घरावर दरोडा टाकण्याची तयारी केली आहे. याचंच लक्षण म्हणजे नुकतीच झालेली वीज दरवाढ. जवळपास १५% दरवाढ करून सरकारने महागाईचे चटके सोसत असलेल्या सामान्य जनतेला शॉक दिला आहे. सरकारच्या या अन्यायकारक धोरणाच्या निषेधार्थ खा. सुप्रियाताई सुळे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

 

Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar | शरद पवारांच्या नेतृत्वात  मातब्बरांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे

Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar | शरद पवारांच्या नेतृत्वात  मातब्बरांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश

Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar  – (The Karbhari News Service) – आज शरद पवारांच्या (Sharad Pawar) पुणे येथील निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक  राहुल तूपेरे, शेतकरी कामगार संघटनेचे प्रवक्ते  भगवान जाधव, माजी नगरसेवक आरिफभाई बागवान, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनिल खेडेकर, स्व. खासदार गिरीशभाऊ बापट यांचे स्विय्य सहाय्यक  सुनिल माने यांनी जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap Pune NCP) यांनी यात महत्वाची भूमिका बजावली.

The Karbhari - NCP Sharadchandra Pawar

प्रशांत जगताप म्हणाले, मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर “आता शरद पवारांच्या नेतृत्वाचं काय होणार ?” असा प्रश्न सर्वांना पडला होता. अनेकांनी तर “शरद पवार की राजनीती का इरा खतम हुआ” असं म्हणत शरद पवारांचे नेतृत्व इतिहासजमा झाले अशा वल्गनाही केल्या. परंतु या लोकांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे हेच पुन्हा सिद्ध झाले.

शरद पवारांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली, जेव्हा जेव्हा राजकीय संकट आले तेव्हा तेव्हा शरद पवारांनी जनतेत जाऊन न्याय मागितला, प्रत्येक वेळी जनतेच्या पाठिंब्यावर शून्यातून विश्व निर्माण करत शरद पवारांनी आपले नेतृत्व अधिक भक्कम केले. यावेळीही सगळे मातब्बर सोडून गेल्यावर शरद पवारांनी आपल्या राजकारणाचा डाव नव्याने मांडण्यास सुरुवात केली आहे. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना आजही शरद पवारांच्या नेतृत्वाची भुरळ असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षात जोरदार इंनकमिंग सुरू आहे. असे ही जगताप म्हणाले.

 

“सर्व मान्यवरांच्या प्रवेशाने पक्षाला नक्कीच ताकत मिळेल हा विश्वास आहे.
सर्वांचे स्वागत व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !” अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी यावेळी दिली.

“India” Aghadi meeting in Pune |24 फेब्रुवारी रोजी “इंडिया” आघाडीचा महामेळावा होणार पुण्यात! | शिरूर, बारामती व पुणे  लोकसभेसाठी इंडिया आघाडीचा एल्गार

Categories
Political पुणे महाराष्ट्र

“India” Aghadi meeting in Pune |”इंडिया” आघाडीचा 24 फेब्रुवारी रोजी होणार पुण्यात महामेळावा  !

| शिरूर, बारामती व पुणे  लोकसभेसाठी इंडिया आघाडीचा एल्गार

 

“India” Aghadi meeting in Pune |राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar)  पक्षाचे नेते शरद पवार यांच्या मोदी बाग या कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन नाव व नवीन चिन्हसह आगामी लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) इंडिया आघाडी एकत्रितपणे लढणार पासून या अनुषंगाने शरद पवार यांच्या नेतृत्वात 24 फेब्रुवारी रोजी इंडिया आघाडीचा मेळावा पुणे शहरात संपन्न होणार आहे.

इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष या मेळाव्यात सामील होणार असून या तीनही लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत MP सुप्रिया सुळे, खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, खा. वंदना चव्हाण, खा. डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

Pune Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar | पुणेकरांनो सावधान.. खतरे में संविधान.. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशा घोषणा देत  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा एल्गार

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Pune Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar | पुणेकरांनो सावधान.. खतरे में संविधान.. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशा घोषणा देत  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा एल्गार

Pune Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar |  निर्भय बनो (Nirbhay Bano Pune) चे कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Journalist Nikhil Wagle), ॲड. असीम सरोदे (Aseem Sarode), विश्वंभर चौधरी (Vishwanbhar Chaudhari) यांच्यावर त्यांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap Pune NCP) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या (Pune Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) वतीने बालगंधर्व चौक (Balghandhrav Chowk pune) येथे आंदोलन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, मोदी सरकार चले जाव, पुणेकरांनो सावधान खतरे में है संविधान अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
The karbhari You tube video | https://youtu.be/td-03m-uCeE
प्रशांत जगताप म्हणाले कि, सरकारी आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या गुंडांनी पुण्यात केलेला लोकशाहीचा खून सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितला. “हा हल्ला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कार्यकर्ते सरसावले तेव्हा गुंडांनी महिला, युवती कार्यकर्त्यांची मर्यादा न पाळता सर्वांवरच हल्ला केला.
“माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारांनी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी समृद्ध अशा पुण्यभूमीत, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुणे शहरात काल हुकूमशाहीची दहशत सर्वांनीच अनुभवली. सत्तेत असलेल्या महायुतीच्या तीनही पक्षांच्या गुंडांकडून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. जगताप पुढे म्हणाले, आपल्या डोळ्यांसमोर पुरोगामी विचारांवर प्राण घातक हल्ला होतो हे पाहून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वयं स्फूर्तीने त्यांना सुरक्षा पुरवली. यानंतर महायुतीच्या गुंडांनी आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला, महिला भगिनींवर युवती कार्यकर्त्यांवर निर्लज्जपणे हात उभारला. या दडपशाहीला न घाबरता यापुढेही पुणे शहरात जिथे अन्याय दिसेल तिथे  पवार साहेबांच्या विचारांचा सच्चा कार्यकर्ता न्यायासाठी उभा असेल.” असे ही प्रशांत जगताप म्हणाले.
या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रवींद्र माळवदकर, डॉ.शशिकांत कदम, उदय महाले, मयूर गायकवाड, रूपालीताई शिंदे, भक्त्ति कुंभार, पायल चव्हाण, ऋतुजा देशमुख, ज्योतीताई सूर्यवंशी, नीताताई गलांडे,आसिफ शेख, सुवर्णाताई माने, जावेद शेख, मंगलताई पवार यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह पुरोगामी विचारांवर निष्ठा असणारे सामान्य पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharad Pawar NCP | आमचं नाव आमचं चिन्ह म्हणजे शरद पवार | निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी | प्रशांत जगताप 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Sharad Pawar NCP | आमचं नाव आमचं चिन्ह म्हणजे शरद पवार | निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी | प्रशांत जगताप

Sharad Pawar NCP | मूळ पक्षातून फुटून बाजूला गेलेल्या एका गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह आंदण देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे.  हा निर्णय क्लेशदायक असून देशातील हुकूमशाही कोणत्या स्तराला गेली आहे, याचं हे समर्पक उदाहरण आहे. प्रत्यक्ष जनतेत जाऊन मोत्यासारखा एक एक मोहरा निवडून त्यातून आदरणीय पवार साहेबांनी नेते घडवले, संपूर्ण राज्य अनेकदा पिंजून पक्षाची संघटना विणली आणि आज निवडणूक आयोगाने कष्टाने उभारलेला पक्ष सत्तेसाठी विचारांशी प्रतारणा करणाऱ्या एका गटाच्या हातात दिला. अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली आहे. (Prashant Jagtap Pune)

जगताप पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी कोणीच अस्तित्वात राहू नये या हीन मानसिकतेतून भारतीय जनता पक्षाने देशभरातील पक्ष फोडण्याचा, ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून पक्ष व चिन्ह हिसकावून घेण्याचा किळसवाण धोरण राबवलं आहे, भाजपच्या हातातील बाहुलं असलेल्या निवडणूक आयोगाचं सहकार्य त्यांना नेहमीच लाभलं, भारतातील लोकशाही संपवण्याचा हा प्रयत्न असून भाजपचा हा प्रयत्न आम्ही नक्कीच हाणून पाडू.
अस्तित्वाचा हा लढा आम्ही न्यायालयीन मार्गाने तर लढूच, परंतु देशातील सर्वात मोठे न्यायालय असलेल्या जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही आता न्याय मागू. राज्यात घडलेल्या सर्व घटना जनतेने अनुभवल्या आहेत, म्हणूनच भारतीय जनता पार्टीला व त्यांच्या आहारी जाऊन आपल्या मूळ पक्षाशी गद्दारी करणाऱ्या सर्वांनाच जनता कायमचा धडा शिकवेल हा आम्हाला विश्वास आहे. असे देखील जगताप म्हणाले.

—–

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे केवळ चिन्ह नव्हे, तर लोकनेते  शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. चिन्ह आणि नाव गेलं तरी आदरणीय पवार साहेब आमच्याकडे आहेत, साहेबांचा विचार आमच्याकडे आहे. म्हणूनच, यापुढे साहेब हेच आमचं चिन्ह आणि साहेब हाच आमचा पक्ष मानून आम्ही ही लढाई लढणार आहोत.

प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष