Tag: Arvind Shinde
PMC Pune Property Tax Department |कर आकारणी विभागात पुन्हा येण्यासाठी कर निरीक्षक यांची लॉबिंग
| कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप
PMC Pune Property Tax Department | कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (Congress city president Arvind Shinde) यांनी आरोप केला आहे कि, सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठांना हाताशी धरून येनकेन मार्गाने पुन्हा कर संकलन विभागात घुसखोरी करण्याच्या हालचाली कर निरीक्षक (Tax inspector) लॉबिंग द्वारे करत आहेत . त्यामुळे कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील बदली झालेल्या सेवकांची तसेच ३ वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचारी यांची पुन्हा कोणत्याही कारणास्तव कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडे तात्पुरती बदली अथवा प्रशासकीय कामकाजासाठी बदली अथवा प्रत्यक्ष कामास घेण्यात येऊ नये. अशी मागणी अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे.
शिंदे यांच्या पत्रानुसार महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासानाकडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, अनुरेखक, अधिक्षक, उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक अशा हुद्द्यावरील अधिकारी व कर्मचारी हे अनेक वर्ष एकाच खात्यात एकाच क्षेत्रासाठी काम करीत असून (उदा.बांधकाम विभागाकडील अभियंते, विभागीय निरीक्षक, पेठ निरीक्षक) पर्यायाने त्यांची मक्तेदारी तयार होत असल्याने अनेक लोकप्रतिनिधींनी मनपा अधिकारी व कर्मचारी यांची बदली करणेची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या शासन धोरणानुसार २०% नियतकालिक बदल्या झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने महसुलाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे खाते कर आकारणी व कर संकलन विभागाकडील गेली १० ते १२ वर्षे सेवकांची बदली न झाल्याने मक्तेदारी झाली होती. सबब संदर्भ क्र.१ ते ६ अन्वये कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील सेवकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. (PMC pune)
शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि, कर आकारणी व कर संकलन विभाग हा मनपाच्या महसुलाच्या दृष्टीने महत्वाचा विभाग आहे. या विभागात अनुभवी सेवक यांची अत्यंत गरज दाखवण्यासाठी कर संकलन विभागाच्या कामकाजात जाणीवपूर्वक विस्कळीतपणा आल्याचे भासविला जात आहे. वास्तविक संगणक युगात अवघ्या चार दिवसाच्या प्रशिक्षणाने कोणीही नवीन सेवक कर आकारणी विभागाचे कामकाज आत्मसात करू शकतो. यापूर्वी प्रस्थपित सेवकवर्ग बदलून नवीन सेवक वर्ग आणल्यावर मनपाचे महसुली उत्पन्न वाढल्याचा प्रशासनाला अनुभव आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठांना हाताशी धरून येनकेन मार्गाने पुन्हा कर संकलन विभागात घुसखोरी करण्याच्या हालचाली आर्थिक हितसंबंध दुरावलेले कर निरीक्षक लॉबिंग द्वारे करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. उपनगरामध्ये कर निरीक्षक पदी तात्पुरता अधिभार घेण्यास आर्थिक गैरव्यवहार सुरु आहेत अशी चर्चा आहे. (PMC pune news)
आमची या पत्राद्वारे मागणी आहे कि कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील बदली झालेल्या सेवकांची तसेच ३ वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचारी यांची पुन्हा कोणत्याही कारणास्तव कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडे तात्पुरती बदली अथवा प्रशासकीय कामकाजासाठी बदली अथवा प्रत्यक्ष कामास घेण्यात येऊ नये. यापूर्वी कर आकारणी व कर संकलन विभागाकडील गैरव्यवस्थापन आपल्या निदर्शनास आणून दिले असून त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही. अनेक लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणीतील तथ्य न तपासण्याचा आलेला दुर्दैवी पायंडा आपण बदलावा, कर निरीक्षकाच्या लॉबिंग पुढे प्रशासनाने न झुकता खंबीरतेने शहराच्या महसूल वाढीसाठी कार्यरत राहावे. असे शिंदे यांनी म्हटले आहे. (Pune Property Tax)
News Title | PMC Pune Property Tax Department |Lobbying of tax inspectors to rejoin taxation department| Allegation of Congress City President Arvind Shinde
PMC property Tax Department | टॅक्स विभागातील प्रशासन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वशिलेबाजीने
| काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीने ईआयएल या त्रयस्थ संस्थेकडून भ्रष्टाचार
| कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप
मनपाच्या बहुतांशी सर्व विकासकामांवर दर्जा तपासणीसाठी ई आय एल या संस्थेची नेमणूक वादग्रस्त रित्या प्रशासनाने केलेली आहे. सदर नेमणूक ही आयुक्तांचे परिपत्रकाशी पूर्णतः विसंगत आहे सदर परिपत्रकानुसार आयुक्तांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षा साठी त्रयस्थ संस्थेची निवड केवळ निविदा पद्धतीने काढण्यास मान्यता दिलेली होती. मात्र मनपा च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयुक्तांची दिशाभूल करून तब्बल 2500 कोटींच्या विकासकामे दर्जा तपासणी काम EIL यांना विना टेंडर विना स्पर्धा दिलेले आहे .तसेच त्रयस्थ संस्थेची निवड मान्यतेनुसार केवळ 2 वर्षा करिता करणे अपेक्षित असताना प्रशासनाने ही निवड 5 वर्षांकरता केलेली आहे. असा आरोप कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे.
याबाबत शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार मनपाच्या अख्यतारीत जवळपास 30 वर्षं सेवा कालावधी असलेले प्रथम श्रेणी उत्तीर्ण जवळपास 500 चे आसपास स्थापत्य अभियंते आहेत .त्यातील जवळपास 150 च्या आसपास स्ट्रक्चर, पर्यावरण, ट्रासपोर्टेशन, टाऊन प्लांनिंग या विषयात मास्टर डिग्री असलेले अभियंते आहेत. तर काहींच्या स्थापत्यशास्त्र निगडित पुस्तकांना, लेखांना पुरस्कार मिळालेले आहेत.या अभियंत्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह ठेवून अवघे 16 अभियंते (त्यातही काही फ्रेशर) असलेल्या त्रयस्थ संस्थेवर टेंडर न मागविता स्पर्धेला सामोरे न जाता विश्वास ठेवणे ही निश्चितच अनाकलीय बाब आहे
प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने पद प्रतिष्ठेचा गैरवापर करून EIL या संस्थेस काम मिळवून दिल्याने या संस्थेच्या मनमानी व दादागिरी बद्दल कोणताही अधिकारी धजवत नाहीत. EIL चे पदाधिकारी तर शहर अभियंत्यांच्या थाटात वावरत असतात. असे शिंदे यांनी म्हटले आहे.
| शिंदे यांनी खालील मागण्या आयुक्ताकडे केल्या आहेत.
1) Skada यंत्रणेचा दर घेऊन नॉन skada काम करणाऱ्या ठेकेदारांना गेले 10 वर्ष तब्बल जवळपास 500 कोटी रुपये रक्कम कन्सल्टंट च्या भ्रष्टतेमुळे जास्त गेलेत .सदर रक्कम ठेकेदार ,कन्सल्टंट ,अधिकारी यांच्या कडून वसूल करून घ्यावी
2) EIL दर्जाच्या जवळपास 25 कंपन्या अस्तित्वात आहेत नवीन आर्थिक वर्षांपासून त्रयस्थ संस्थेचे काम टेंडर काढून स्पर्धात्मक रित्या देण्यात यावे
3) EIL संस्थेला ज्या पद्धतीने भ्रष्ट पद्धतीने विना निविदा काम दिले याची चौकशी करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी
हे प्रकरण भ्रष्टाचाराचे उघड प्रतीक असून आपण प्रशासक या नात्याने संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी. …प्रशासनाने वरिष्ठ अधिकारी यास वाचवण्यासाठी पुरेश्या गांभीर्याने कारवाई न केल्यास लोकप्रतिनिधी या नात्याने योग्य ती कायदेशीर दाद मागण्यात येईन याची दखल घ्यावी. असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या बदली प्रक्रियेत सरकारने हस्तक्षेप करावा
| पुणे काँग्रेस ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
या आहेत मागण्या
महापालिकेत तब्बल 6 वर्षांनी होणार बदल्या!
| मात्र राजकीय नेते पूर्ण समाधानी नाहीत
गेल्या काही दिवसापासून मनपा वर्तुळात तसेच शहरभरात चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा आहे. पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बादल्या दर तीन वर्षांनी करणे, असे धोरण असून या धोरणास हरताळ फासला जात आहे. तसेच बदल्यांमध्ये लाखोंची उलाढाल होत आहे. असा आरोप राजकीय नेत्यांकडून केला जात होता. लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, उप अधीक्षक, अधिक्षक, प्रशासन अधिकारी या पदांवर काम करणारे अधिकारी यांच्या खूप वर्षांपासून पासून दर तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे बदल्या करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 132 कनिष्ठ अभियंत्यांचा यात समावेश आहे. त्यामध्ये स्थापत्य पदावरील 109, विद्युत पदावरील 17 आणि यांत्रिकी पदावरील 6 कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. (Pune Municipal Corporation)
| मनपा प्रशासनाचे परिपत्रक जारी
महापालिका प्रशासनाच्या परिपत्रकानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील ज्या सेवकांची एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झाली आहे, अशा सेवकांच्या अन्य खात्यात बदल्या कराव्या लागतात. खात्याच्या एकूण पदांपैकी दरवर्षी जास्तीत जास्त २०% अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या कराव्यात, अशा बदल्या करणेविषयीचे धोरण आहे. या मंजूर बदली धोरणातील तरतुदी विचारात घेऊन ३१/०३/२०२३ अखेर एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) या पदावरील सेवकांची नियतकालिक बदल्या करण्याची कार्यवाही अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांचे अध्यक्षतेखाली प्रस्तावित केलेली आहे.
या नियतकालिक बदल्यांची कार्यवाही बुधवार, दिनांक १२/०४/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता, जुना जी.बी. हॉल, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, तिसरा मजला, येथे होईल.
महापालिका सभेने मंजूरी दिलेल्या बदली धोरणाप्रमाणे नियतकालिक बदलीस पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी संबंधित सेवकांचे माहितीसाठी पुणे महानगरपालिका संकेत स्थळावरील कार्यालय
परिपत्रक प्रणालीवर (https://pmc.gov.in/en/
| लेखनिकी संवर्गासाठी हाच न्याय अपेक्षित
महापालिका प्रशासनाने 132 JE च्या बदल्या करण्याबाबत निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र बदली केल्यानंतर संबंधित सेवक कामाला एका ठिकाणी आणि पगाराला दुसऱ्या ठिकाणी, असे प्रशासनाने होऊ देऊ नये. तसेच आम्ही एकच खाते किंवा ठराविक सेवकांच्या बदल्या करण्याची मागणी केली नव्हती. नियमानुसार ज्यांनी 3 वर्ष एका खात्यात काम केले आहे आणि बदलीस पात्र असणाऱ्या अशा सर्वांच्या बदल्या आम्हाला अपेक्षित आहेत. टप्प्या टप्प्याने बदल्या आम्हाला मंजूर नाहीत.
आमच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने बदल्या करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल आम्हाला आनंद आहे. मात्र मलईदार खात्यात गेल्या कित्येक वर्षांपासून जे सेवक काम करताहेत, त्यांच्या तात्काळ बदल्या होणे अपेक्षित आहे. जेणेकरून सर्वांना सर्व खात्यात काम करण्यास प्राधान्य मिळेल.
पुणे महापालिकेतील बदली घोटाळा रोखा
| अरविंद शिंदे यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार सर्वसामान्यांसाठी नसून अदानीसाठी काम करत आहे | अरविंद शिंदे
महाराष्ट्रात सर्व सामान्य घरगुती वीज दरात ६% वीजदरवाढ राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने केली त्याच्या निषेर्धात आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता पेठ येथील वीज नियामक मंडळाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आहे.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदेम्हणाले की, ‘‘राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे फक्त आणि फक्त अदानी, अंबानी यांच्यासाठी काम करीत आहेत. वीज दरवाढ ही कंपनीचे प्रायव्हेटायजेशन करून अदानीच्या घशात MECB घालण्याचा हा डाव आहे. सर्वसामान्य जनेतेच्या खिशाला कात्री लावून अडाणीचे घर भरण्याचे काम हे करीत आहेत. वीज दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार असून ऐन उन्हळ्यात त्यांना या गतिमान सरकारने शॉक दिला आहे. महागाई वाढत चाललेली असताना हा शॉक सर्वसामान्यांचे जीवन उध्वस्त करेल याचा आम्ही निषेध करतो. ही वीजदर वाढ रद्द केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. जनता येत्या काळात या सरकारमधील मंत्र्याना जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांसाठी नसून आदानीसाठी काम करणारे सरकार आहे त्याचा आम्ही निषेध करतो.’’
यावेळी म.प्र.काँ. उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी यांचीही भाषणे झाली.
यावेळी म.प्र.काँ. NSUI अध्यक्ष अमीर शेख, माजी नगरसेवक मनिष आनंद, अविनाश बागवे, रफिक शेख, अजित दरेकर, सुजाता शेट्टी, गोपाळ तिवारी, मेहबुब नदाफ, भीमराव पाटोळे, राजेंद्र शिरसाट, सुनिल शिंदे, सुजित यादव, रमेश अय्यर, शेखर कपोते, यशराज पारखी, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, सतिश पवार, सुनिल घाडगे, रमेश सोनकांबळे, प्रदीप परदेशी, रमेश सकट, शोएब इनामदार, साहिल केदारी,
शिलार रतनगिरी, नितीन परतानी, राजू शेख, गौतम अरकडे, प्रा. वाल्मिक जगताप, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, अनुसया गायकवाड, सुंदरा ओव्हाळ, अंजली सोलापूरे, ज्योती परदेशी, सोनिया ओव्हाळ, माया डुरे, लतेंद्र भिंगारे, देवीदास लोणकर, शाबीर खान, दत्ता पोळ, सादिक कुरेशी, रवि पाटोळे, हेमंत राजभोज, मंगेश निरगुडकर, जयकुमार ठोंबरे, परवेज तांबोळी आदींसह काँग्रेस पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.