PMC Engineer Promotion | अधीक्षक अभियंता नियुक्तीच्या मुख्य सभा ठरावाला न्यायालयात आव्हान देणार | अरविंद शिंदे

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

 PMC Engineer Promotion | अधीक्षक अभियंता नियुक्तीच्या मुख्य सभा ठरावाला न्यायालयात आव्हान देणार | अरविंद शिंदे

PMC Engineer Promotion | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) नुकतीच अधीक्षक अभियंता (स्थापत्य अभियांत्रिकी) पदोन्नती (Promotion) देण्यात आली आहे. मात्र याबाबत होत असलेली कार्यपद्धती आक्षेपार्ह असल्याचा आरोप शहर काँग्रेस चे अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी केला आहे. तसेच याबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा देखील शिंदे यांनी दिला आहे. (PMC Pune News)

याबाबत शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. शिंदे यांच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिका मध्ये अभियांत्रिकी पदाच्या बढती प्रक्रिया चे कामकाज सामान्य प्रशासन विभाग पुणे म.न.पा. मार्फत चालु आहे. सदस्थितीत ‘अधिक्षक अभियंता’ स्थापत्य अभियंत्रिकी पदाच्या बढतीचे मुख्य समेत ठराव करण्यात आल्याचे समजते. सदर चुकीच्या व आक्षेपार्ह ठरावामुळे मुळ (सेवेत रुजु होण्यापूर्वी) पदवीधारक यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय होत आहे. सदर ठरावातील निवड यादी करताना सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिका चांच्याकडून मनमानी पद्धतीने त्यांच्या मर्जीतील तत्कालीन डिप्लोमाधारक (पदविका धारक) वायदंडे श्रीकांत व अमर शिंदे यांना बढतीत प्राधान्य दिलेले आहे. वास्तविक शासन निर्णय नुसार २५.०५.२००४ रोजी किंवा त्यापुर्वीची सेवा ज्येष्ठतेनुसार पुढील पदोन्नतीस पात्र ठरतील, असे नमूद आहे. म्हणजेच यापदासाठी तत्कालीन अभियंत्रिकी स्थापत्य पदवी आवश्यक / बंधनकारक आहे. मात्र त्यावेळी डिप्लोमाधारक (पदविका) असणाऱ्या सेवकांचा या पदासाठी प्रशासक प्रशासनाने विचार केल्यामुळे, तत्कालीन पदवीधारक असणाऱ्या सेवकांवर अन्याय होत आहे. (PMC Employees promotion)
शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि, सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेत प्रशासक यांच्याकडून मुळ तत्कालीन पदवीधारक यांनी केलेल्या तक्रारींचे/अर्जाचे विचार केला जात ना , ही वस्तुस्थिती आहे. याबाबत केलेल्या तक्रारींचे लेखी उत्तर म.न.पा. सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून दिले जात नाही. तसेच शासन निर्णय बाबत चूकीचा अर्थ लावून सदर अधिक्षक अभियंता या पदासाठी चूकीची निवड यादी करून शहर अभियंता यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात येत आहे. त्यामुळे तत्कालीन पदवीधारक यांच्या नैसर्गिक हकावर गदा येत आहे. तसेच त्यामुळे महानगरपालिकेतील मुळ तत्कालीन पदवीधारक यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक स्वरूपाचा अन्याय होत आहे. (Pune Municipal Corporation)

शिंदे यांनी म्हटले आहे कि, सद्य स्थितीत प्रशासन, पुणे महानगरपालिका यांच्याकडून तत्कालीन सेवक श्री. अमर शिंदे व श्री. श्रीकांत वायदंडे या सेवकांची मुख्य सभेकडे केलेली शिफारस ही अक्षेपार्ह वादग्रस्त व संशयास्पद आहे. सदर पदोन्नतीबाबत आर्थिक गैरव्यवहार व वशिलेबाजी झाल्याचे नाकरता येत आहे. यामुळे शासनाच्या परिपत्रक व नियमावलीस विसंगत भूमिका घेत अभियंता श्री. अमर शिंदे व श्री. श्रीकांत वायदंडे यांच्या पदोन्नतीस मुख्य सभेने दिलेल्या मान्यतेस भी हरकत घेत आहे. सदर निर्णयाचा फेरविचार करून शासकीय नियमावलीनुसार पात्र मुळ पदवीधर यांचा अधिक्षक अभियंता पदासाठी विचार करावा. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन व न्यायालयीन दाद मागावी लागेल. असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.