Pune Congress | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून उभारण्यात आली ‘न्यायाची गुढी’

Categories
Breaking News cultural Political पुणे

Pune Congress | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून उभारण्यात आली ‘न्यायाची गुढी’

 

Pune Congress | Gudhipadwa – (The Karbhari News Service) – पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून शेतकरी न्याय, महिला न्याय, युवा न्याय, भागीदारी न्याय आणि श्रमिक न्यायाची गुढी आज महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे उभारण्यात आली.    (Pune News)

यावेळी महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे निवडणुकीचे सन्मवयक अरविंद शिंदे, काँग्रेस नेते अभय छाजेड,  अजित दरेकर,  अशुतोष शिंदे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

    यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले की, ‘‘मी सध्या सर्वांना भेटतोय सर्वांशी चर्चा करतोय. येणारा काळ इंडिया आघाडीचा आणि काँग्रेसचा असणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रीत येऊन काम करणे आणि आपण केलेले काम तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

    शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘निवडणूक प्रचाराचा वेग आता वाढवायचा असून कशाप्रकारे प्रचार करायचा त्याची व्युहरचना कशी असावी, जाहिरनाम्यात या पाच न्याय गोष्टींचा समावेश असावा, यासारख्या मुद्दयांवर बैठक होणार आहे. तसेच न्याय कार्ड प्रत्येकाच्या घरी पोच केले जाणार असून त्यावेळी न्यायचे मुद्दे समजून सांगितले जाणार आहेत.’’

    पुण्यात राष्ट्रसेवादलाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला असून, तसे पत्र त्यांनी दिले आहे. त्यांच्याकडूनही पथनाट्य माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे.

    यावेळी ॲड. अभय छाजेड यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | काँग्रेस कडून पुणे लोकसभा समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | काँग्रेस कडून पुणे लोकसभा समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे!

| पुण्यातील पदाधिकारी यांच्याकडे देखील विविध लोकसभा मतदार संघाची जबाबदारी

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress |  पुणे | प्रदेश काँग्रेसने (Maharashtra Congress) लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपला (BJP) या निवडणुकीत मात देण्यासाठी काँग्रेस (Congress) ने कंबर कसली आहे. खासकरून पुणे शहरावर काँग्रेसने (Pune City Congress) चांगलेच लक्ष दिले आहे. दरम्यान पुणे लोकसभा मतदार संघ (Pune Lok Sabha Constituency) समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्याकडे देण्यात आली आहे. नुकतीच प्रदेश काँग्रेस ने राज्यातील मतदार संघाच्या समन्वयक पदाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. (Pune Lok Sabha Constituency | Pune Congress)
विश्वजित कदम (Vishwajeet Kadam Congress) यांनी देखील पुणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना भाजपसमोर हार पत्करावी लागली होती. तेव्हापासून पुण्याकडे त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. सध्या ते विधानसभेचे आमदार आहेत. पुण्याची जागा निवडून आणण्यासाठी आता कदम यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश ने नुकतीच त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे.  (Pune News)
दरम्यान लोकसभा निवडणुकी साठी प्रदेश काँग्रेस कमिटी कडून पुण्यातील पदाधिकारी यांच्या कडे देखील विविध मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 १) माजी आमदार मोहन जोशी – अहमदनगर २) आमदार रवींद्र धंगेकर – सातारा ३) संजय बालगुडे – माढा ४) अभय छाजेड – हातकंनगले अशा या जबाबदाऱ्या आहेत.

35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्वमध्ये सांस्कृतिक मेजवानी

Categories
Breaking News cultural social पुणे

35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्वमध्ये सांस्कृतिक मेजवानी

35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हल (35th Pune Festival) अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharv Rangmandir) येथे दि २२ ते २७ सप्टेंबर या काळात   रसिक प्रेक्षकांना जणू सांस्कृतिक मेजवानीच मिळणार आहे. कथ्थक, नृत्य, इंद्रधनू, केरळ महोत्सव, मराठी कवी संमेलन, हिंदी-मराठी गाणी, अभंग, गझल, सुफी संगीत, लावणी, व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिव्हल अशा मनोहारी कार्यक्रमांची रेलचेल पुणेकरांना अनुभवायला मिळेल.  हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य आहेत. अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे  उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल (Krishnkumar Goyal) व मुख्य समन्वयक अभय छाजेड (Abhay Chajed) यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी बालगंधर्व रंगमंदिर येथील पुणे फेस्टिव्हल सांस्कृतिक कार्यक्रमांचे  प्रमुख अतुल गोंजारी व  संयोजक मोहन टिल्लू व श्रीकांत कांबळे उपस्थित होते. (35th Pune Festival)

पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी गेल्या ३५ वर्षात प्रत्येकवेळी महाराष्ट्रातील कलावंतांन समवेतच देशातील परराज्यातील कलावंत देखील नेहमी आमंत्रित केले. त्यामुळे, राष्ट्रीय – आंतर राष्ट्रीय कीर्तीचे कलावंत बघण्याची व ऐकण्याची संधी पुणेकरांना लाभली. या प्रमाणेच राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये केरळ महोत्सव, बंगाल महोत्सव, कोल्हापूर महोत्सव या प्रमाणेच जम्मू काश्मीर व ईशान्य भारतातील पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर केले. ही महत्वाची बाब मानली पाहिजे असे ते म्हणाले.

शनिवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वा बालगंधर्व कलादालन येथे महिला महोत्सवाचे उद्घाटन पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री व नृत्यांगना खा. हेमा मालिनी करणार आहेत. तसेच हेमा मालिनी यांच्यावर महिला चित्रकारांनी रंगवलेल्या पेंटिंग्ज प्रदर्शनाचे उद्घाटनही त्या या प्रसंगी करणार आहेत.  हे पेंटिंग्ज एक्सिबिशन दि.  २३, २४ व २५ सप्टेंबर या काळात सकाळी १०.०० ते रात्री ८.०० यावेळेत विनामुल्य खुले असेल.

बालगंधर्व रंगमंदिरमध्ये दि. २३ सप्टेंबर रोजी दु. १२.०० ते ३.०० या वेळेत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भोपाळच्या कथ्थक नृत्यांगना व्ही. अनुराधा सिंह आणि जबलपूरच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कथ्थक नृत्यांगना निलांगिनी कलंत्रे यांच्या कथ्थक नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे.

याच दिवशी सायं. ५.०० वा. १८ ते २८ वर्षे वयोगटातील तरुण कलावंतांचा ‘इंद्रधनू’ कार्यक्रम सादर होईल. यामध्ये कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी, ओडिसी, पाश्चात्य नृत्य, शास्त्रीय गायन, भक्तीगीते, वाद्य संगीत, चित्रपटगीते, नाट्यगीते, पोवाडे, गायन असे विविध कलाप्रकार उदयोन्मुख व नवोदित कलाकारांकडून सादर केले जातील. याचे संयोजन रविंद्र दुर्वे यांनी केले आहे.

रविवार, दि. २४ सप्टेंबर रोजी  दु. १२.०० ते ४.०० या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात २६ ते ३६ व ३७ ते ५० वर्ष असे दोन वयोगट असणार आहेत. विवाहित महिलांच्या कलागुणांना  वाव देणाऱ्या  या स्पर्धेस महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. याचे संयोजन अॅड. अमृता जगधने यांनी केले आहे.

याच दिवशी सायं. ५. ००  ते रात्री १२. ०० या वेळेत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही केरळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात ४.५ लाख केरळवासीय राहत असून त्यांच्या 32 संस्थांच्या पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर आणि कॉ-ऑर्डिनेटर बाबू नायर यांनी याचे आयोजन केले आहे. पुण्यातील केरळचे कलावंत अनेक शास्त्रीय नृत्याविष्कार सादर करतील.

सोमवार , दि. २५ सप्टेंबर रोजी दु. १२. ०० वा महिला नृत्य स्पर्धा आयोजित केल्या असून यामध्ये  १८ ते ३५ वर्षे आणि ३६ ते ५० वर्षे  अशा २ वयोगटात ३ मिनिटाच्या एकल नृत्य स्पर्धा आणि १८ ते ५० वर्ष वयोगटात जास्तीत जास्त १० महिला स्पर्धकांचा समावेश असणाऱ्या ५ मिनिटांची समूह नृत्य स्पर्धा पार पडतील. फ्युजन बॉलीवूड, कथ्थक, ओडिसी, कथकली, लावणी, लोकगीतांवर आधारित नृत्ये यांमध्ये सादर होतील.

दि. २५ सप्टेंबर रोजीचं सायंकाळी ५. ०० वा. व्हाईस ऑफ पुणे सॉंग कोम्पिडीशन आयोजित केली असून यामध्ये १८ ते ४० वर्षे आणि ४० वर्षावरील स्त्री पुरुषांसाठी हिंदी सुगम स्पर्धा आयोजित केलेली आहे. यातून स्त्री व पुरुष गटातून प्रत्येकी एक प्रथम क्रमांकाचे गायक व गायिका  निवडले जातील . पुण्यातील विविध महाविद्यालयांनी यात भाग घेतला असून यंदापासून प्रथमच ‘पुणे फेस्टिव्हल फिरता करंडक’ दिला जाणार आहे. अॅड. अनुराधा भारती यांनी याचे संयोजन केले आहे.

याच दिवशी रात्री ९.०० वा. ‘हास्यधारा’ हे मराठी कवी संमेलन आयोजित होईल. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे याचे सूत्रसंचालन करतील. यामध्ये अशोक नायगावकर, महेश केळुसकर, संदीप खरे, वैभव जोशी, नीलम माणगावे, अंजली कुलकर्णी, हर्षदा सुंठणकर, प्रशांत केंदळे व इतर मान्यवर कवी असणार आहेत.

मंगळवार दि २६ सप्टेंबर रोजी दु १२. ०० वा. लावणीचा खणखणाट व घुंगरांचा चणचणाट हा लावणी कार्यक्रम कविता प्रोडक्शनचे कविता बंड व पप्पू बंड सादर करतील. यामध्ये , रील स्टार सोनाली गायकवाड , रील स्टार चित्रा, दिव्या कदम , डान्सर स्वप्ना, डान्सर राधिका यांचा सहभाग आहे. २ कोरस डान्सर सोबत ५ महिला  आणि  २ पुरुष डान्सरही असतील. तसेच, पुरुष व महिला गायक देखील असतील. तसेच, एक निवेदक असतील. बैठकीची लावणी, आयटम सॉंग हे याचे मुख्य आकर्षण आहे.

याच दिवशी सायंकाळी ५. वा. ‘पी से पंचम आर. डी. बर्मन लाईव्ह’ हा ऑर्केस्ट्रा हर्ट्झ म्युझिकच्या प्रख्यात गायिका श्रद्धा गायकवाड सादर करणार आहेत. यामध्ये गायिका   श्रद्धा गायकवाड,सूर्या शिवरामन,लीना काळे,श्रद्धा कांबळे, भाविका कुलकर्णी,अनुपमा कुलकर्णी आणि गायक प्रशांत साळवी , उमेश कुलकर्णी, अद्वैत लेले, हिमांशू जयस्वाल, निखील देशपांडे हे आर. डी. बर्मन यांनी गायलेली व संगीत दिलेली लोकप्रिय गाणी सादर करणार आहेत. अमन सय्यद (synthesizer), ऋतुराज कोरे (ऑक्टोपॅड, रीदम मशीन), हार्दिक रावल (लीड गीटार), लिजेश शशिधरन (बेस गिटार),श्रीपाद सोलापूरकर (Saxophone) , नितीन शिंदे (तबला, ढोलक),आयुष शेखर (ड्रम) हे वाद्यसंगत करतील.

रात्री ९.०० वा. प्रख्यात साई भजन गायक रविराज नासेरी अभंग , गझल, सुफी गाणी ,  जुनी हिंदी गाणी  सादर करणार आहेत. संपूर्ण भारतात व देशाबाहेरही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.

बुधवार दि. २७ सप्टेंबर रोजी दु १२.०० ते ४.०० यावेळेत महिला महोत्सवातील नववधू मेकअप स्पर्धा होणार असून दिपाली पांढरे यांनी याचे संयोजन केले आहे.

यानंतर रात्री ९ .०० वा प्रख्यात गायक जितेंद्र भूरुक सहकाऱ्यांसमवेत ‘प्यार का मौसम’ हा मधुर रोमँटिक हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करतील. यामध्ये जितेंद्र भुरुक, अश्विनी वझे, अश्विनी कुरपे, आकाश सोळंकी हे गायक सहभागी असतील. हिंदी व मराठी चित्रपटातील रोमँटिक मधुर गीते ते सादर करतील.

बालगंधर्व रंगमंदिर सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख अतुल गोंजारी, असून  बालगंधर्व रंगमंदिर व कलादालनाची पुणे फेस्टिव्हल संयोजक मोहन टिल्लू  व श्रीकांत कांबळे आहेत.

३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प लि. आणि  नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी,अहुरा बिल्डर्स आणि  सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्पनॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्जकुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, सिंहगड इन्स्टिट्यूट, बढेकर ग्रुप हे उपप्रायोजक आहेत.

35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन !

Categories
Breaking News cultural पुणे

35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन !

 

 35th Pune Festival |  कलासंस्कृतीगायन, वादननृत्यसंगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असूनयाचे उद्घाटन शुक्रवा २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वामहाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेटपुणे येथे संपन्न होईल. (35th Pune Festival)

राज्याचे पर्यटनमंत्री  गिरीश महाजनउच्च  तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,द्योगमंत्री नाउदय सामंत हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पस्थित राहतीलतसेच खा. रजनी पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले,खाश्रीरंग बारणेमहाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रधानसचिव राधिका रस्तोगी हे या प्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहती अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी राज्यमंत्री श्री. रमेश बागवे आणि डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट पुणेच्या अध्यक्षा सौ. अबेदा इनामदार यावेळी उपस्थित होत्या.

 

          ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना खाहेमामालिनी यांचा गंगा’ बॅलेलोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगम म्युझिकल नाईटऑल इंडिया मुशायराजाणताराजामिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धामहिला महोत्सव,केरळ महोत्सवकीर्तन महोत्सवमराठी कवी संमेलन,इंद्रधनुकथ्थकभरतनाट्यमलावणीविविध नृत्यअविष्कारमराठी हिंदी गीते या बरोबरच पुणे गोल्फकप टूर्नामेंटबॉक्सिंगकुस्ती  मल्लखांब अशा क्रीडा स्पर्धाही यंदाच्या पुणे फेस्टीव्हलची वैशिष्ट्येआहेत

 

          लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलात्यावेळी त्यामध्ये कथाकथनकीर्तनपोवाडेलोककलामेळे असे कार्यक्रम होत असतयापासूनच प्रेरणा घेऊन१९८९ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेअध्यक्ष खासुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केलीसलग १० दिवस आणि ३५ वर्षे चालूअसलेला पुणे फेस्टिव्हल देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातोयापासून प्रेरणा घेऊन अनेक सांस्कृतिक महोत्सव सुरु झालेत्यामुळेच पुणे फेस्टिव्हलला मदर ऑफ  फेस्टिव्हलस’ म्हटले जातेभारतरत्न पंभीमसेन जोशी प्रथमपासून पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष होते

 

          ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना पद्मश्री खा.हेमामालिनी पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन असून पुणे फेस्टिव्हलच्या स्थापने पासून सलग ३५ वर्षे पुणे फेस्टिव्हलमध्ये त्या सक्रियपणे सहभागी होत असतात. स्वाईन फ्ल्यू (२००९आणि कोरोना (२०२०२०२१)अशी ३ वर्षे पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम झाले नाहीत.उर्वरित ३२ वर्षात नृत्यांगना हेमामालिनी यांनी तब्बल३० वर्षे बॅलेगणेश वंदना अथवा शिवस्तुती पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर सादर केली आहे. त्यांचा प्रत्येक पहिला बॅले त्या प्रथम पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर सादर करतातत्यांच्या कन्या ईशा आणि अहाना यांच्या पहिल्या स्टेज शोची सुरुवात त्यांनी पुणे फेस्टिव्हल पासूनच केलीपुणे फेस्टिव्हलमध्ये त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल यंदा उद्घाटन सोहळ्यात त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे

 

            पुणे फेस्टीव्हल कमिटीपुणेकर नागरिकमहाराष्ट्र पर्यटन विका महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टीव्हलचे आयोजन केले जातेपुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल् असतात

 

            ३५व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना मंगळवार दि१९ सप्टेंबर रोजी सकाळी१०.३० वा हॉटेल सारसनेहरू स्टेडियम, येथे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांच्या हस्ते विधीवत संपन्न होईलवेदमूर्ती पंधनंजय घाटेगुरुजी याचे पौरहित्य करतील

 

            ३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजकअसून जमनालाल बजाज फौंडेशनपंचशीलसुमाशिल्प, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक हेतभारत फोर्जकुमार रिअॅलीटीमायर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनसिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत

 

 

           

PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला काँग्रेस, भाजपचा पाठिंबा 

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला काँग्रेस, भाजपचा पाठिंबा

PMC Teachers Agitation Update | पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागात (PMC Education Department) काम करणाऱ्या रजा मुदतीतील ९3 शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी २०१७ (एप्रिल) पासून लागू करावी. या मागणीसाठी सर्व शिक्षण सेवक महापालिका भवनासमोर आमरण उपोषणास (Agitation) बसले आहेत. या आंदोलनाला काँग्रेस आणि भाजपने पाठिंबा दिला आहे. तसेच महापालिका प्रशासनासोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची मागणी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी केली आहे.   (PMC Teachers Agitation Update)

काँग्रेस कडून सकाळी आमदार रविंद्र धंगेकर(MLA Ravindra Dhangekar), मोहन जोशी (Mohan Joshi), अभय छाजेड (Abhay Chajed) या नेत्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांची समस्या जाणून घेतली. तसेच प्रशासनासोबत चर्चा करून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली. तर दुपारी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City President Jagdish mulik) यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. मुळीक यांनी देखील प्रशासना सोबत चर्चा केली. तसेच याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. (Pune Municipal Corporation)

आंदोलनकर्त्यांनी सांगितले कि, पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पुणे महापालिकेच्या प्रशासनाने अति तत्परता दाखवत तब्बल २१९ शिक्षकां साठी एकतर्फी व पती-पत्नी अंतर्गत आंतर जिल्हा बदलीने सदर २१९ शिक्षकांना पुणे महापालिकेच्या सेवेत सामावून घेतले आहे.पुणे महापालिकेचे प्रशासन या २१९ शिक्षकांसाठी पायघड्या घालून त्यांचे स्वागतासाठी सज्ज आहेत.. त्यांना विशेष ट्रीटमेंट दिली जात आहे. परंतु  याच पुणे महापालिकेच्या शाळेत गेली सुमारे १५ वर्षापासून ६००० रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर शिकवणारे ९३ रजा मुदत शिक्षकांकडे दुर्लक्ष करण्यामागे नक्की काय दडलय हा संशोधनाचाच विषय आहे. असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. (PMC Pune News)
93 शिक्षकांनी त्यांची नियमित तीन वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली.  पण त्यांचे निवेदनाला कोणीही दाद दिली नाही म्हणून या 93 शिक्षकांनी गेल्या पंधरा वर्षात अनेक वेळा निदर्शने,धरणे ,उपोषण या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याची खूप प्रयत्न केले. सदर शिक्षकांना प्रशासनाने कागदपत्रांचा ससेमिरा मागे लावत एकदा महापालिकेच्या आस्थापना विभागात ,शिक्षण विभागात व नगर विकास विभागात अनेक वेळा पत्र व्यवहार करून नियमित  सेवेत घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. परंतु पुणे मनपाचे ढीम्म प्रशासनाने सदर शिक्षकांना कुठलीही खबरदात किंवा त्यांची दखल घेतली नाही अखेर या शिक्षकांनी मुंबई  उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्यावरती झालेला अन्याय दूर करण्याबाबत याचिका दाखल केली होती . मुंबई उच्च न्यायालयाने सदर 93 शिक्षकांवरती खूप अन्याय झालेला आहे व यांना तात्काळ सहा आठवड्याच्या आत महापालिकेच्या सेवेत समावून घेऊन वेतनश्रेणीवर नियमित वेतन अदा करण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा गेली चार महिन्यापासून सदर पुणे मनपाचे प्रशासन याकडे जाणून बुजून कानाडोळा करत आहे. असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला. (PMC Pune Education Department)
News Title | PMC Teachers Agitation Update | Congress, BJP support hunger strike of education workers during leave period

SIC Law | RSM | PMC employee | मनपातील कंत्राटी कामगारांनी एस आय सी चे लाभ घ्यावेत

Categories
Breaking News PMC Political social पुणे

मनपातील कंत्राटी कामगारांनी एस आय सी चे लाभ घ्यावेत

– चंद्रकांत पाटील

पुणे :- राष्ट्रीय मजदूर संघातर्फे पुणे महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन (एस आय सी) कामगार राज्य विमा महामंडळ आचे उपायुक्त चंद्रकांत पाटील यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट अभय छाजेड हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, पुणे महानगर पालिके मधील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना एस आय सी हा कायदा लागू होतो. या सर्व कामगारांनी लाभ घेतले पाहिजेत. वैद्यकीय कारणासाठी लहान-मोठे आजार, त्याचप्रमाणे मोठी ऑपरेशन्स यासाठी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांना लाभ दिले जातात. त्याचप्रमाणे इतरही लाभ कसे व कोणते मिळतात याचे विवेचन त्यांनी यावेळी केले. जर एखादा कंत्राटदार ई एस आय सी चे फायदे कर्मचाऱ्यांना देत नसेल, किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, त्यावर खडक कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये राष्ट्रीय मजदूर संघाने पुढाकार घ्यावा व अशा कंत्राटदारांची नावे आम्हाला कळवावे असेही सांगितले.

यावेळी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे इतरही अनेक प्रश्न कसे सोडवावेत व संघटनेच्या माध्यमातून संघर्ष कसा उभारावा, यासंदर्भात मार्गदर्शन केले या मार्गदर्शन शिबिरात पुणे महानगरपालिकेतील विविध विभागातील कंत्राटी कामगार उपस्थित होते.

congress Agitation : सर्व सामान्य महिलांसाठी मोदी हे विकास पुरुष नसून विनाश पुरुष  :  अभय छाजेड

Categories
Breaking News Political पुणे

सर्व सामान्य महिलांसाठी मोदी हे विकास पुरुष नसून विनाश पुरुष  :  अभय छाजेड

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष  नानाभाऊ पटोले तसेच पुणे शहर अध्यक्ष  रमेश बागवे यांच्या सूचनेनुसार पंडित नेहरू स्टेडियम ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दांडेकर पूल चौक येथे ‘ महागाई जुमला आंदोलन ‘ घेण्यात आले.

यावेळी बोलताना कमलताई व्यवहारे म्हणाल्या ” मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारला आहे. महिलांच्या डोळ्यातून महागाईचे अश्रू वाहत असून महिलांसाठी मोदी हे महागाईचे प्रतीक झाले असून अनेक ठिकाणी महिला रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा व भाजपा सरकारचा धिक्कार करीत आहेत.”

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यावेळी म्हणाले ” केंद्रातील भाजपा प्रणित सरकारमधील सर्वेसर्वा असलेले नरेंद्र मोदी हे हुकूमशहा प्रमाणे काम करीत असून केवळ जुमलेबाजी करणारे प्रचार मंत्री म्हणून काम बघत आहेत. नोटबंदी सारख्या देशाला मागं येणाऱ्या घोषणेनंतर जीएसटी ची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी तसेच निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये खोटी आश्वासने देणे , देशातील प्रमुख राज्यांमध्ये निवडणुका असताना संपूर्ण देशामध्ये पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ न करता निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर घरगुती गॅस दर पेट्रोल डिझेल खाद्यतेल सर्व जीवनावश्यक वस्तू मध्ये वाढ करणे अशा प्रकारे मोदी सरकारने सर्वसामान्यांना देशोधडीला लावले असून मोदी हे विकास पुरुष नसून सर्वसामान्यांसाठी व महिलांसाठी विनाश पुरुष झाले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणाऱ्या या केंद्रातील मोदी सरकारचा मी जाहीर निषेध करतो.”

सदर आंदोलनामध्ये पं. नेहरू ब्लॉक कांग्रेसचे अध्यक्ष सचिन आडेकर , द स पोळेकर , सौ अनिता अनिल धिमधिमे , रोहिणी मल्हाव , स्वाती शिंदे , पपीता सोनवणे सोनिया ओव्हाळ , किरण मात्रे , अविनाश खंडारे , अविनाश अडसूळ , राजाभाऊ नकाते , किरण सोमवंशी , विजय घोलप , अमित काळे , अजय खुडे, दिलीप लोळगे उपस्थित होते.