PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला काँग्रेस, भाजपचा पाठिंबा 

Categories
Breaking News Education PMC Political पुणे
Spread the love

PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला काँग्रेस, भाजपचा पाठिंबा

PMC Teachers Agitation Update | पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागात (PMC Education Department) काम करणाऱ्या रजा मुदतीतील ९3 शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी २०१७ (एप्रिल) पासून लागू करावी. या मागणीसाठी सर्व शिक्षण सेवक महापालिका भवनासमोर आमरण उपोषणास (Agitation) बसले आहेत. या आंदोलनाला काँग्रेस आणि भाजपने पाठिंबा दिला आहे. तसेच महापालिका प्रशासनासोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची मागणी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी केली आहे.   (PMC Teachers Agitation Update)

काँग्रेस कडून सकाळी आमदार रविंद्र धंगेकर(MLA Ravindra Dhangekar), मोहन जोशी (Mohan Joshi), अभय छाजेड (Abhay Chajed) या नेत्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांची समस्या जाणून घेतली. तसेच प्रशासनासोबत चर्चा करून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली. तर दुपारी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City President Jagdish mulik) यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. मुळीक यांनी देखील प्रशासना सोबत चर्चा केली. तसेच याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. (Pune Municipal Corporation)

आंदोलनकर्त्यांनी सांगितले कि, पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पुणे महापालिकेच्या प्रशासनाने अति तत्परता दाखवत तब्बल २१९ शिक्षकां साठी एकतर्फी व पती-पत्नी अंतर्गत आंतर जिल्हा बदलीने सदर २१९ शिक्षकांना पुणे महापालिकेच्या सेवेत सामावून घेतले आहे.पुणे महापालिकेचे प्रशासन या २१९ शिक्षकांसाठी पायघड्या घालून त्यांचे स्वागतासाठी सज्ज आहेत.. त्यांना विशेष ट्रीटमेंट दिली जात आहे. परंतु  याच पुणे महापालिकेच्या शाळेत गेली सुमारे १५ वर्षापासून ६००० रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर शिकवणारे ९३ रजा मुदत शिक्षकांकडे दुर्लक्ष करण्यामागे नक्की काय दडलय हा संशोधनाचाच विषय आहे. असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. (PMC Pune News)
93 शिक्षकांनी त्यांची नियमित तीन वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली.  पण त्यांचे निवेदनाला कोणीही दाद दिली नाही म्हणून या 93 शिक्षकांनी गेल्या पंधरा वर्षात अनेक वेळा निदर्शने,धरणे ,उपोषण या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याची खूप प्रयत्न केले. सदर शिक्षकांना प्रशासनाने कागदपत्रांचा ससेमिरा मागे लावत एकदा महापालिकेच्या आस्थापना विभागात ,शिक्षण विभागात व नगर विकास विभागात अनेक वेळा पत्र व्यवहार करून नियमित  सेवेत घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. परंतु पुणे मनपाचे ढीम्म प्रशासनाने सदर शिक्षकांना कुठलीही खबरदात किंवा त्यांची दखल घेतली नाही अखेर या शिक्षकांनी मुंबई  उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्यावरती झालेला अन्याय दूर करण्याबाबत याचिका दाखल केली होती . मुंबई उच्च न्यायालयाने सदर 93 शिक्षकांवरती खूप अन्याय झालेला आहे व यांना तात्काळ सहा आठवड्याच्या आत महापालिकेच्या सेवेत समावून घेऊन वेतनश्रेणीवर नियमित वेतन अदा करण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा गेली चार महिन्यापासून सदर पुणे मनपाचे प्रशासन याकडे जाणून बुजून कानाडोळा करत आहे. असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला. (PMC Pune Education Department)
News Title | PMC Teachers Agitation Update | Congress, BJP support hunger strike of education workers during leave period