Pune Festival | IAS Vikra Kumar | सौ.व श्री विक्रम कुमार यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना संपन्न

Categories
cultural social पुणे

IAS Vikra Kumar |Pune Festival |  सौ.व श्री विक्रम कुमार यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना संपन्न

 

IAS Vikra Kumar | Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हलच्या (35th Pune Festival) श्रींची (Ganesh Utsav) प्रतिष्ठापना  सकाळी १०.३० वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे सौ. स्वाती व  श्री. विक्रम कुमार (आयुक्त, पुणे महानगरपालिका) यांच्या शुभहस्ते विधिवत संपन्न झाली. याप्रसंगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि प्राजक्ता गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

पुणे फेस्टिव्हलचे  उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, , माजी महापौर कमल व्यव्हारे , डेक्कन मुस्लिम इंस्टीट्यूटचा अध्यक्षा आबेदा इनामदार ,बाळासाहेब अमराळे , राजू साठे , द.स पोळेकर, अतुल गोंजारी , राजू साठे, अशोक मेंमजादे, रवींद्र दुर्वे , सुप्रिया ताम्हाणे, संयोगिता कुदळे, अनुराधा भारती ,निकिता मोघे , विद्या खळदकर, विनोद सुर्वे,नामदेव चाळके, सचिन साळुंखे , सचिन खवले , विजय शेटे , सागर बाबर ,अहमद शेख , सुभाष सुर्वे  व  कार्यकर्ते मोठ्ये संख्येने उपस्थित होते. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरूजी यांनी  पौराहित्य केले. यासाठी हॉटेल सारस नेहरू स्टेडीयम येथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

Voice of Pune Festival | पुणे फेस्टिव्हल अंतर्गत ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’ स्पर्धा 

Categories
Breaking News cultural social पुणे

Voice of Pune Festival | पुणे फेस्टिव्हल अंतर्गत ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’ स्पर्धा

 

Voice of Pune Festival |पुणे फेस्टिव्हलचे (Pune Festival) यंदाचे ३५ वे वर्ष आहे. त्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धापैकी एक स्पर्धा म्हणजे ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’. (Pune Festival) ही हिंदी सुगम संगीत स्पर्धा असून वय वर्ष ४० च्या आतील व ४० च्या पुढे, महिला व पुरुष अशा चार वयोगटात स्पर्धा घेतली जाते. सर्वोत्कृष्ट गायक व गयिकेस,’व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’ पुरस्कार देण्यात येतो.

सदरील स्पर्धेचे यंदाचे तेरावे वर्ष असून, सदरील स्पर्धा या दिनांक 16 व 17 सप्टेंबर रोजी M स्टुडिओ मुकुंद नगर पुणे, घेण्यात आल्या. यावर्षीपासून प्रथमच अंतर महाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण १० कॉलेजेस पैकी तीन कॉलेजेसची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे. डी वाय पाटील कॉलेज पिंपरी सर परशुराम महाविद्यालय (एस पी कॉलेज) व पुणे विद्यार्थी गृहाचे कॉलेजऑफ सायन्स अँड कॉमर्स (PVG)  असे तीन महाविद्यालयांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका श्रुती करंदीकर, गझल गायक डॉक्टर अविनाश वाघ व ज्येष्ठ अकॉर्डियन वादक अनिल गोडे आणि परीक्षक म्हणून काम पाहिले.

अंतिम फेरी बालगंधर्व रंगमंदिर येथे 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेचार पासून सुरु होणार आहेत. अंतिम फेरीसाठी प्रसिद्ध संगीतकार अविनाश विश्वजीत या जोडीत परीक्षक म्हणून बोलवलेलं आहे. त्याचप्रमाणे ‘बाई पण भारी देवा’ चित्रपटाचे उभरते संगीतकार साई पियुष यांनाही आमंत्रण केलेलं आहे.

अंतिम फेरीमध्ये जे महाविद्यालय विजेते ठरेल, त्यास यंदाच्या वर्षीचा ‘प्रथम पुणे फेस्टिवल करंडक’ देण्यात येणार आहे. हा फिरता करंडक/ चषक असून पुढील गणेश उत्सवा पर्यंत तो चषक त्या कॉलेज कडे राहील. पुढील वर्षीच्या गणेश उत्सवा अंतर्गत होणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’ स्पर्धेमध्ये होणाऱ्या विजेत्या महाविद्यालयाकडे, तो चषक/ करंडक जाईल.

35th Pune Festival | Cultural Extravaganza in Balgandharva

Categories
Breaking News cultural social पुणे

35th Pune Festival | Cultural Extravaganza in Balgandharva


This year Pune will pulsate with the vibrant cultural celebrations of the 35th Pune Festival, as Balgandharva Rangmandir becomes the stage for a magnificent extravaganza from September 22nd to 27th. Puneites will get to experience cultural delight with an array of exciting events, including Kathak Dance, Indradhanu, Kerala Festival, Marathi Poets Meet, Hindi-Marathi Songs, Abhang, Ghazal, Sufi Music, Lavani, and the Voice of Pune Festival. All these events are free for all, said Pune Festival Vice President Krushnakumar Goyal and Chief Coordinator Abhay Chhajed during the press conference. Atul Gonjari, Head of Pune Festival Cultural Programs at Balgandharva Rangmandir and Coordinators Mohan Tillu and Shrikant Kamble were present on this occasion.


Over the past 35 years, Pune Festival President Suresh Kalmadi consistently extended invitations to artists from Maharashtra and around the country, fostering a diverse cultural exchange. Therefore the people of Pune had the privilege to witness and enjoy performances by renowned artists of both national and international acclaim.  In his pursuit of national unity, President Suresh Kalmadi curated dance performances representing various cultures, such as Kerala Festival, Bengal Festival, Kolhapur Festival alongside showcasing the artistic talents of students from Jammu and Kashmir and Northeast India studying in Pune.

 

On Saturday, September 23rd at 11.00 am, the MahilaMahotsav at BalgandharvaKaladalan will witness the ceremonial inauguration by Pune Festival’s patron, actress and danseuse HemaMalini (MP). In a delightful convergence of artistry, she will also inaugurate an exhibition featuring paintings crafted in her honor by talented women artists. This artistic tribute will graciously open to the public, offering free access from 10.00 am to 8.00 pm on September 23rd, 24th, and 25th.Adv. Anuradha Bharti will be the coordinator for this.

 

On Saturday, September 23rd, from 12.00pm to 3.00pm internationally acclaimed Kathak dancers V.Anuradha Singh from Bhopal and NilanganiKalantre from Jabalpur will captivate the audience with their exceptional devotional and Kathak dance performances at BalgandharvaRangmandir.

 

On the same day, at 5.00 pm, the ‘Indradhanu’ program will take center stage, featuring young talents in the age group of 18 to 28 years. This diverse showcase will encompass a multitude of art forms, including Kathak, Bharatanatyam, Kuchipudi, Odissi, Western dance, classical singing, devotional songs, instrumental music, film songs, theater songs, and Powade, all performed by emerging and budding artists. The program has been organized by Ravindra Durve.

 

On Sunday, September 24th, an exciting event awaits as the Mrs. Pune Festival Competition unfolds at BalgandharvaRangmandir from 12.00 pm to 4.00 pm, featuring two age groups: 26 to 36 and 37 to 50 years. This competition, designed to showcase the talents of married women, has garnered enthusiastic participation and a remarkable response from women of diverse backgrounds. The event has been meticulously organised under the creative direction of AmrutaJagdhane.

 

On the same day, as tradition dictates, the Kerala Festival is set to grace the city from 5.00 pm to 12.00 night, celebrating the vibrant culture of Kerala. With a significant population of 4.5 lakh Keralites residing in Pune district, the event is orchestrated by Rajan Nair, Chairman of the Pune Malayali Federation, along with the coordination of Babu Nair. The festival will feature talented Kerala artists from Pune, who will mesmerize the audience with classical dances and various cultural performances, offering a glimpse into the rich heritage and traditions of Kerala.

 

On Monday, September 25th, at 12:00 pm, an exhilarating dance competition is organized at Balgandharva Rang mandir. This event will showcase a 3-minute solo dance competition in two age groups, 18 to 35 years and 36 to 50 years, along with a dynamic 5-minute group dance contest, with a maximum of 10 talented female contestants spanning ages 18 to 50. An enchanting blend of dance styles, including Bollywood, Kathak, Odissi, Kathakali, Lavani, and mesmerizing folk songs will be performed. It has been organized by Sanyogita Kudale and Dipali Pandhare.

 

OnTuesday September 25th at 5:00 pm, The Voice of Pune Song Competition, is set to ignite the stage with the Hindi Sugam contest, catering to participants aged 18 to 40 and those above 40, embracing both men and women. The competition will yield one female and male singer. The preliminary rounds are slated for the 16th and 17th of September, culminating in the grand final on the 25th. Numerous prestigious Pune colleges have enthusiastically joined this melodious journey, and for the first time, the ‘Pune Festival FirtaKarandak’ will be awarded. Renowned composer Avinash Vishwajit will be the judge, while the esteemed composer SaiPiyush graces the occasion as a special guest, said Voice of Pune Song Competition Coordinator, Adv. Anuradha Bharti during a press conference.

 

On the same day at 9:00 pm, Marathi poets meeting ‘Hasyadhara’ will light up the evening. Renowned poet Ramdas Phutane will steer the event, while a constellation of eminent poets including Ashok Naigaonkar, Mahesh Keluskar, Sandeep Khare, Vaibhav Joshi, NeelamMangave, Anjali Kulkarni, Harshada Sukhtankar, Prashant Kendale, and others will grace the occasion with their poetic brilliance.

 

On Tuesday, September 26th, at 12:00 pm Punekars will experience the enchanting rhythms of ‘LavanichaKhankhanat and GhungarnchaChanchanat’ presented by Kavita Band and Pappu Band of Kavita Productions. The stage will shine with the talents of Reel Star SonaliGaikwad, Reel Star Chitra, DivyaKadam, Dancer Swapna, and Dancer Radhika as they grace the event. Joining them on stage will be 5 female and 2 male dancers, accompanied by 2 talented chorus dancers, creating a mesmerizing ensemble of performers. Additionally, it will feature both male and female singers and narrators, but the showstopper of the evening promises to be the electrifying item song.

 

At 5 pm on the same day, audience will groove to the tunes of ‘P Se Pancham RD Burman Live,’ presented by the acclaimed singer Shraddha Gaikwad of Orchestra Hertz Music. An ensemble of vocal talents, including ShraddhaGaikwad, Surya Sivaraman, Leena Kale, ShraddhaKamble, Bhavika Kulkarni, Anupama Kulkarni, and the melodious voices of PrashantSalvi, Umesh Kulkarni, AdvaitLele, HimanshuJaiswal, and Nikhil Deshpande, will grace the stage with RD Burman’s timeless classics. They’ll be backed by a musical team consisting of Aman Syed (Synthesizer), Rituraj Kore (Octopad, Rhythm Machine), Hardik Rawal (Lead Guitar), Lijesh Sasidharan (Bass Guitar), Shripad Solapurkar (Saxophone), Nitin Shinde (Tabla, Dholak), and Ayush Shekhar (Drums). It has been organized by ShraddhaGaikwad.

 

At 9:00 pm, the renowned SaiBhajan Singer RavirajNaseri will enrapture the audience with Abhangs, Ghazals, Sufi Songs, and Old Hindi Songs. With a rich history of performances across India and abroad, the event promises to be a soulful experience.

 

On Wednesday, September 27th, from 12:00 pm to 4:00 pm, a thrilling bridal make-up competition will be held at Balgandharva. It is coordinated by DipaliPandhare.

 

Following that, at 9:00 pm, renowned singer JitendraBhuruk and his talented colleagues will serenade the audience with a delightful program of romantic Hindi and Marathi songs titled ‘Pyaar Ka Mausam.’ Singers JitendraBhuruk, AshwiniVaze, AshwiniKurpe, and Akash Solanki will grace the stage, delivering enchanting renditions of romantic melodies from both Hindi and Marathi cinema, promising an evening filled with love and nostalgia.

 

Balgandharva Rangmandir cultural programs are headed by Atul Gonjari, and Coordinators are Mohan Tillu and Shrikant Kamble.


Maharashtra Tourism Development Corporation and Kohinoor Group are the main sponsors of the 35th Pune Festival with Jamnalal Bajaj Foundation, Panchsheel, Suma Shilp Ltd. and National Egg Coordination Committee are co-sponsors.Bharat Forge, Kumar Realty, Ahura Builders, Sinhagad Institute and Badhekar group are the associate sponsors.

35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्वमध्ये सांस्कृतिक मेजवानी

Categories
Breaking News cultural social पुणे

35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्वमध्ये सांस्कृतिक मेजवानी

35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हल (35th Pune Festival) अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharv Rangmandir) येथे दि २२ ते २७ सप्टेंबर या काळात   रसिक प्रेक्षकांना जणू सांस्कृतिक मेजवानीच मिळणार आहे. कथ्थक, नृत्य, इंद्रधनू, केरळ महोत्सव, मराठी कवी संमेलन, हिंदी-मराठी गाणी, अभंग, गझल, सुफी संगीत, लावणी, व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिव्हल अशा मनोहारी कार्यक्रमांची रेलचेल पुणेकरांना अनुभवायला मिळेल.  हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य आहेत. अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे  उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल (Krishnkumar Goyal) व मुख्य समन्वयक अभय छाजेड (Abhay Chajed) यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी बालगंधर्व रंगमंदिर येथील पुणे फेस्टिव्हल सांस्कृतिक कार्यक्रमांचे  प्रमुख अतुल गोंजारी व  संयोजक मोहन टिल्लू व श्रीकांत कांबळे उपस्थित होते. (35th Pune Festival)

पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी गेल्या ३५ वर्षात प्रत्येकवेळी महाराष्ट्रातील कलावंतांन समवेतच देशातील परराज्यातील कलावंत देखील नेहमी आमंत्रित केले. त्यामुळे, राष्ट्रीय – आंतर राष्ट्रीय कीर्तीचे कलावंत बघण्याची व ऐकण्याची संधी पुणेकरांना लाभली. या प्रमाणेच राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये केरळ महोत्सव, बंगाल महोत्सव, कोल्हापूर महोत्सव या प्रमाणेच जम्मू काश्मीर व ईशान्य भारतातील पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर केले. ही महत्वाची बाब मानली पाहिजे असे ते म्हणाले.

शनिवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वा बालगंधर्व कलादालन येथे महिला महोत्सवाचे उद्घाटन पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री व नृत्यांगना खा. हेमा मालिनी करणार आहेत. तसेच हेमा मालिनी यांच्यावर महिला चित्रकारांनी रंगवलेल्या पेंटिंग्ज प्रदर्शनाचे उद्घाटनही त्या या प्रसंगी करणार आहेत.  हे पेंटिंग्ज एक्सिबिशन दि.  २३, २४ व २५ सप्टेंबर या काळात सकाळी १०.०० ते रात्री ८.०० यावेळेत विनामुल्य खुले असेल.

बालगंधर्व रंगमंदिरमध्ये दि. २३ सप्टेंबर रोजी दु. १२.०० ते ३.०० या वेळेत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भोपाळच्या कथ्थक नृत्यांगना व्ही. अनुराधा सिंह आणि जबलपूरच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कथ्थक नृत्यांगना निलांगिनी कलंत्रे यांच्या कथ्थक नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे.

याच दिवशी सायं. ५.०० वा. १८ ते २८ वर्षे वयोगटातील तरुण कलावंतांचा ‘इंद्रधनू’ कार्यक्रम सादर होईल. यामध्ये कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी, ओडिसी, पाश्चात्य नृत्य, शास्त्रीय गायन, भक्तीगीते, वाद्य संगीत, चित्रपटगीते, नाट्यगीते, पोवाडे, गायन असे विविध कलाप्रकार उदयोन्मुख व नवोदित कलाकारांकडून सादर केले जातील. याचे संयोजन रविंद्र दुर्वे यांनी केले आहे.

रविवार, दि. २४ सप्टेंबर रोजी  दु. १२.०० ते ४.०० या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात २६ ते ३६ व ३७ ते ५० वर्ष असे दोन वयोगट असणार आहेत. विवाहित महिलांच्या कलागुणांना  वाव देणाऱ्या  या स्पर्धेस महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. याचे संयोजन अॅड. अमृता जगधने यांनी केले आहे.

याच दिवशी सायं. ५. ००  ते रात्री १२. ०० या वेळेत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही केरळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात ४.५ लाख केरळवासीय राहत असून त्यांच्या 32 संस्थांच्या पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर आणि कॉ-ऑर्डिनेटर बाबू नायर यांनी याचे आयोजन केले आहे. पुण्यातील केरळचे कलावंत अनेक शास्त्रीय नृत्याविष्कार सादर करतील.

सोमवार , दि. २५ सप्टेंबर रोजी दु. १२. ०० वा महिला नृत्य स्पर्धा आयोजित केल्या असून यामध्ये  १८ ते ३५ वर्षे आणि ३६ ते ५० वर्षे  अशा २ वयोगटात ३ मिनिटाच्या एकल नृत्य स्पर्धा आणि १८ ते ५० वर्ष वयोगटात जास्तीत जास्त १० महिला स्पर्धकांचा समावेश असणाऱ्या ५ मिनिटांची समूह नृत्य स्पर्धा पार पडतील. फ्युजन बॉलीवूड, कथ्थक, ओडिसी, कथकली, लावणी, लोकगीतांवर आधारित नृत्ये यांमध्ये सादर होतील.

दि. २५ सप्टेंबर रोजीचं सायंकाळी ५. ०० वा. व्हाईस ऑफ पुणे सॉंग कोम्पिडीशन आयोजित केली असून यामध्ये १८ ते ४० वर्षे आणि ४० वर्षावरील स्त्री पुरुषांसाठी हिंदी सुगम स्पर्धा आयोजित केलेली आहे. यातून स्त्री व पुरुष गटातून प्रत्येकी एक प्रथम क्रमांकाचे गायक व गायिका  निवडले जातील . पुण्यातील विविध महाविद्यालयांनी यात भाग घेतला असून यंदापासून प्रथमच ‘पुणे फेस्टिव्हल फिरता करंडक’ दिला जाणार आहे. अॅड. अनुराधा भारती यांनी याचे संयोजन केले आहे.

याच दिवशी रात्री ९.०० वा. ‘हास्यधारा’ हे मराठी कवी संमेलन आयोजित होईल. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे याचे सूत्रसंचालन करतील. यामध्ये अशोक नायगावकर, महेश केळुसकर, संदीप खरे, वैभव जोशी, नीलम माणगावे, अंजली कुलकर्णी, हर्षदा सुंठणकर, प्रशांत केंदळे व इतर मान्यवर कवी असणार आहेत.

मंगळवार दि २६ सप्टेंबर रोजी दु १२. ०० वा. लावणीचा खणखणाट व घुंगरांचा चणचणाट हा लावणी कार्यक्रम कविता प्रोडक्शनचे कविता बंड व पप्पू बंड सादर करतील. यामध्ये , रील स्टार सोनाली गायकवाड , रील स्टार चित्रा, दिव्या कदम , डान्सर स्वप्ना, डान्सर राधिका यांचा सहभाग आहे. २ कोरस डान्सर सोबत ५ महिला  आणि  २ पुरुष डान्सरही असतील. तसेच, पुरुष व महिला गायक देखील असतील. तसेच, एक निवेदक असतील. बैठकीची लावणी, आयटम सॉंग हे याचे मुख्य आकर्षण आहे.

याच दिवशी सायंकाळी ५. वा. ‘पी से पंचम आर. डी. बर्मन लाईव्ह’ हा ऑर्केस्ट्रा हर्ट्झ म्युझिकच्या प्रख्यात गायिका श्रद्धा गायकवाड सादर करणार आहेत. यामध्ये गायिका   श्रद्धा गायकवाड,सूर्या शिवरामन,लीना काळे,श्रद्धा कांबळे, भाविका कुलकर्णी,अनुपमा कुलकर्णी आणि गायक प्रशांत साळवी , उमेश कुलकर्णी, अद्वैत लेले, हिमांशू जयस्वाल, निखील देशपांडे हे आर. डी. बर्मन यांनी गायलेली व संगीत दिलेली लोकप्रिय गाणी सादर करणार आहेत. अमन सय्यद (synthesizer), ऋतुराज कोरे (ऑक्टोपॅड, रीदम मशीन), हार्दिक रावल (लीड गीटार), लिजेश शशिधरन (बेस गिटार),श्रीपाद सोलापूरकर (Saxophone) , नितीन शिंदे (तबला, ढोलक),आयुष शेखर (ड्रम) हे वाद्यसंगत करतील.

रात्री ९.०० वा. प्रख्यात साई भजन गायक रविराज नासेरी अभंग , गझल, सुफी गाणी ,  जुनी हिंदी गाणी  सादर करणार आहेत. संपूर्ण भारतात व देशाबाहेरही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.

बुधवार दि. २७ सप्टेंबर रोजी दु १२.०० ते ४.०० यावेळेत महिला महोत्सवातील नववधू मेकअप स्पर्धा होणार असून दिपाली पांढरे यांनी याचे संयोजन केले आहे.

यानंतर रात्री ९ .०० वा प्रख्यात गायक जितेंद्र भूरुक सहकाऱ्यांसमवेत ‘प्यार का मौसम’ हा मधुर रोमँटिक हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करतील. यामध्ये जितेंद्र भुरुक, अश्विनी वझे, अश्विनी कुरपे, आकाश सोळंकी हे गायक सहभागी असतील. हिंदी व मराठी चित्रपटातील रोमँटिक मधुर गीते ते सादर करतील.

बालगंधर्व रंगमंदिर सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख अतुल गोंजारी, असून  बालगंधर्व रंगमंदिर व कलादालनाची पुणे फेस्टिव्हल संयोजक मोहन टिल्लू  व श्रीकांत कांबळे आहेत.

३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प लि. आणि  नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी,अहुरा बिल्डर्स आणि  सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्पनॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्जकुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, सिंहगड इन्स्टिट्यूट, बढेकर ग्रुप हे उपप्रायोजक आहेत.

35th Pune Festival | Hema Malini | ३५ व्या पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवाचे २३ ला हेमा मालिनी यांच्या हस्ते उद्घाटन

Categories
Breaking News cultural पुणे

35th Pune Festival | Hema Malini | ३५ व्या पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवाचे २३ ला हेमा मालिनी यांच्या हस्ते उद्घाटन

 

35th Pune Festival |Hema Malini | ३५व्या पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवात यंदा मिस पुणे फेस्टिव्हल, मिसेस पुणे फेस्टिव्हल, पेंटिंग, नृत्य, ब्रायडल मेकअप, पाककला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबरच महिला कीर्तनकारांचा महोत्सव हे देखील विशेष आकर्षण असणार आहे. या महिला महोत्सवाचे उद्घाटन शनिवार  २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता बालगंधर्व कलादालन येथे पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी दीपप्रज्वलन करून करतील. तसेच देशातील महिला चित्रकारांनी त्यांच्यावर रेखाटलेल्या ‘कॅनव्हास ऑफ अ ड्रीम गर्ल’ पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शनाचे देखील त्या उद्घाटन करतील.

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पुणे फेस्टिव्हलच्या स्थापनेपासूनच पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी महिला महोत्सवा अंतर्गत महिलांच्या विविध स्पर्धांना प्रोत्साहन दिले. महिलांच्या स्पर्धांमध्ये आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांच्या विविध स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे असे पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड यांनी सांगितले.

पेंटिंग स्पर्धा –

पेंटिंग स्पर्धे बाबत संयोजिका निवेदिता प्रतिष्ठानच्या अॅड. अनुराधा भारती (मो. 9422078956) यांनी सांगितले की, देशातील ३५० हून अधिक महिला चित्रकारांच्या ‘आकृती’ ग्रुपतर्फे यंदा पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व कलादालन येथे ‘कॅनव्हास ऑफ अ ड्रीम गर्ल’ पोट्रेट व कंपोझिशन अशी चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन शनिवार दि. २३ ते २५ सप्टेंबर या काळात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. याचे उद्घाटन शनिवार, दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री व नृत्यांगना खा. हेमा मालिनी यांच्या हस्ते होईल. विशेष म्हणजे या स्पर्धेत हेमा मालिनी यांचीच पोट्रेट किंवा त्यांच्या कोणत्याही चित्रपटाचे पोस्टर या महिला स्पर्धक काढतील. स्पर्धेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व चित्रांचे  प्रदर्शन तीन दिवस म्हणजेच शनिवार दि. २३ सप्टेंबर पासून सोमवार दि. २५ सप्टेंबर सकाळी १०.०० ते रात्री ८.०० पर्यंत भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असेल. हेमा मालिनी यांच्या पोट्रेट व्यतिरिक्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अन्य शंभर चित्रं प्रदर्शनात मांडली जातील.

यामध्ये पेन्सिल स्केच, चारकोल, ऍक्रेलिक कलर, ऑइल पेंट, वॉटर कलर अशा सर्व माध्यमातून १८ x २२ पासून २२ x ३० इंच साइजच्या कॅनव्हासपर्यंत चित्र प्रदर्शित होणार आहेत.  त्याचप्रमाणे हेमामालिनी यांचे ऑइल पेंट व वॉटर कलर अशा दोन्ही माध्यमातून लाईव्ह पोट्रेट काढले जाणार आहे.

यंदाच्या वर्षी या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे, ‘आकृती’ ग्रुपच्या  पंजाब, हरियाणा, केरळ, उत्तरप्रदेश, उत्तराखंड अशा वेगवेगळ्या राज्यातून  आलेल्या 50 महिला चित्रकार, साधारण ८ फुट रुंद व १८ फुट लांब, कॅनव्हासवर पुणे फेस्टिवलच्या प्रसिद्ध ‘गणेशाची प्रतिमा’ असलेला लोगो, हाताने पेंट करून दोन्ही बाजूला ४-४ अशा अष्टविनायकाच्या प्रतिमा पेंट करून ‘पुणे फेस्टिव्हल’ला भेट म्हणून देणार आहेत. डॉ. राजेत्री कुलकर्णी प्राध्यापिका एस.एन.डी.टी. कॉलेज व श्रीमती हेमा जैन माजी प्राध्यापक जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. श्री राहुल बळवंत, प्रिन्सिपल अभिनव कला विद्यालय, पुणे यांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत. यासाठी प्रींट मीडीया पार्टनर वरद इन्फोटेक असून पहाडी नॅचरल व पिडिलाइट या दोन कंपन्यांकडून बक्षीस दिले जाणार आहेत.

मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा 

मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या संयोजिका सुप्रिया ताम्हाणे (मो. 9881149995) म्हणल्या की, ही देशामध्ये आकर्षण बनलेली आणि तरुणींमध्ये लोकप्रिय असलेली स्पर्धा यावर्षी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मंगळवार दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४.०० ते सायं. ७.०० यावेळेत संपन्न होत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक तरुणी पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा, टी.व्ही. चॅनेल्स व मॉडलिंग क्षेत्रात चमकल्या आहेत. स्पर्धेचे यंदाचे ९वे वर्ष आहे. ही महिलांचे व्यक्तिमत्व आणि सौंदर्य या बरोबरच कुटुंब व समाजाबद्दलचा दृष्टीकोन, प्रेझेंटेशन अशा विविध पातळ्यांवर घेतली जाते.

१८ ते २८ वर्षे वयोगटातील ३०० युवतींनी यामध्ये भाग घेतला होता. त्यातून अंतिम फेरीसाठी २० तरुणींची निवड करण्यात आली. फिटनेस चाचणी, दंतचिकित्सा, नृत्य सराव, फोटो शूट इत्यादी निरनिराळ्या चाचण्या स्पर्धकांना पार पाडाव्या लागणार आहेत. त्याप्रमाणेच अंडर वॉटर फोटोग्रॅफीचाही यामध्ये समावेश असेल.

अंतिम फेरीत ३ भाग असून पहिल्या फेरीत लेहेंगा, साडी, घाघरा (एथनिक) अशी वेशभूषा असून या तरुणी स्वपरीचय करून देतील.  दुसऱ्या भागात पार्टीवेयर टॉप ही वेशभूषा असून त्यांची नृत्याची फेरी होईल त्यातून अंतिम फेरीसाठी 10 जणी निवडल्या जातील आणि अंतिम फेरीसाठी गाऊन अशी वेशभूषा असून प्रशोत्तरानंतर तिघींची निवड होईल त्यातील १ विनर व २ रनरअप असतील. याशिवाय बेस्ट टॅलेंट, मिस फोटोजनिक, बेस्ट फिटनेस, बेस्ट हेअर, बेस्ट स्माइल यांची निवडही केली जाईल.

रेधून डान्स अकादमीचे आशुतोष राठोड स्पर्धकांच्या तसेच अंतिम फेरीतील नृत्यरचना सादर करणार आहेत. भावेश भतेजा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. फैशन अँड डांस कोरियोग्राफर, ग्रूमिंग मेंटर, शो डायरेक्टर आणि कॉस्टयूम स्टाइलिस्ट जुई सुहास या सर्व महिला स्पर्धकांना पूर्वतयारी व प्रशिक्षण याचे मार्गदर्शन करीत आहेत. या वर्षीचे परीक्षक दिग्दर्शक योगेश देशपांडे, संगीत दिग्दर्शक विश्वजीत जोशी, अभिनेत्री ऋतुजा शिंदे, अभिनेता स्तवन शिंदे, नृत्य दिगदर्शक ओंकार शिंदे आणि फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र अपूर्वा चव्हाण हे आहेत. कोहिनूर ग्रुप याचे प्रायोजक आहेत.

मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा –

मिसेस पुणे फेस्टिवल स्पर्धेच्या संयोजिका अमृता जगधने (मो. 9637758906) यांनी सांगितले की, विवाहित महिलांसाठी ‘मिसेस पुणे फेस्टिवल’ व्यक्तिमत्व स्पर्धा बालगंधर्व येथे दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० ते ४.०० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. यात २६ ते ३६ व ३७ ते ५० वर्ष असे दोन वयोगट असणार आहेत. १४० हून अधिक विवाहित महिलांनी यात भाग घेतला आहे. यांची प्राथमिक निवड स्वपरिचय व प्रेझेंटेशन वरून केली जाईल व त्यातून अंतिम फेरीसाठी पहिल्या गटात १० व दुसऱ्या गटात १० अशा २० महिलांची निवड करण्यात येईल. त्यांचे सलग तीन दिवस ग्रुमिंग केले जाईल व त्यामध्ये टॅलेंट राऊंडही घेतली जाईल. स्पर्धेच्या दिवशी या निवड केलेल्या दोन्ही गटातील प्रत्येकी १० महिला स्वपरिचय व नंतरच्या फेरीत प्रश्न उत्तरे यांना सामोरे जातील. यातून ६ महिलांची निवड करण्यात येईल. यातून एक विजेती व दोन उपविजेत्या यांची निवड दोनही गटातून करण्यात येईल. रविबाला काकतकर, प्रचिती पुंडे व ओंकार शिंदे हे परीक्षक म्हणून काम बघणार आहेत. याची ग्रुमिंग डॉ. ऐश्वर्या जाधव करणार असून संयोजन अॅड. अमृता जगधने यांच्या समवेत अर्चना सोनावणे व आशुतोष जगधने करीत आहेत. या कार्यक्रमास मेकअपसाठी प्रायोजक वीएलसीसी व ब्लेझ अकॅडमी आहेत तर फोटोशूटसाठी प्राजक्ता जोगळेकर या आहेत.

ब्रायडल मेकअप स्पर्धा –

ब्रायडल मेकअप स्पर्धेच्या संयोजिका दीपाली पांढरे (मो. 9923040444) यांनी सांगितले की, महिला महोत्सवा अंतर्गत यंदा पहिल्यांदाच  ब्रायडल मेकअप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुलींच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस म्हणजे ज्या दिवशी त्या दोन कुटुंबांना जोडल्या जातात, पत्नी धर्म स्वीकारतात त्या दिवशी चांगले दिसणे/सजणे हे ओघानेच आले. महिला सुंदर तर असतेच पण तिला देखणे बनवण्याचे काम मेकअप आर्टिस्ट करतात. त्या  मेकअप आर्टिस्टना पुणे फेस्टिवल हे व्यासपीठ निर्माण झाले आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवार दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत महाराष्ट्रीयन नववधू किंवा साउथ इंडियन नववधू या दोन पैकी एक नववधूचा मेकअप करायचा आहे. या स्पर्धेत ६ बक्षिसे असणार आहेत. या स्पर्धेत १०० हून अधिक महिलांनी भाग घेतला असून यामध्ये मेकअप आर्टिस्ट स्पर्धेच्या वेळी सोबत आलेल्या मॉडेल्सवर त्या मेकअप करतील. या स्पर्धेचे परीक्षक अतुल सदय, अंजली जोशी आणि भक्ती साप्ते आहेत. यामध्ये प्रियाज डान्स अकॅडमी, प्री नृत्य अकॅडमी व फँटॅस्टिक फोर ग्रुप बहारदार नृत्य सादर करणार आहेत.

नृत्य स्पर्धा –

नृत्य स्पर्धेच्या संयोजिका संयोगिता कुदळे (मो. 9921030001) व दीपाली पांढरे (मो. 9923040444) असून या स्पर्धेच्या बाबत संयोगिता कुदळे यांनी सांगितले की, महिला महोत्सव अंतर्गत महिलांसाठी नृत्य स्पर्धा गुरुवार दि. २५ सप्टे. रोजी दु. १२.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होतील. यामध्ये  १८ ते ३५ वर्षे आणि ३६ ते ५० वर्ष अशा २ वयोगटात ३ मिनिटाच्या एकल नृत्य स्पर्धा आणि १८ ते ५० वर्ष वयोगटात जास्तीत जास्त १० महिला स्पर्धकांचा समावेश असणाऱ्या ५ मिनिटांची समूह नृत्य स्पर्धा पार पडतील. फ्युजन बॉलीवूड, कथक, ओडीसी, कथकली, लावणी, लोकगीतांवर आधारीत नृत्ये यामध्ये सादर होतील. या स्पर्धेतील एकल नृत्य स्पर्धेसाठी दोन्ही वयोगटात ३२ महिला आणि १८-५० या ग्रुप मध्ये समूह नृत्यसाठी १२ ग्रुप्सनी भाग घेतला आहे. या नृत्य स्पर्धेचे परीक्षक नृत्य दिगदर्शक ओंकार शिंदे व अन्य आहेत.

पाककला स्पर्धा –

पाककला स्पर्धेच्या संयोजिका करूना पाटील (मो. 9860402780) यांनी सांगितले कि, यंदा महिला महोत्सवात पाककला स्पर्धेचे आयोजन सोमवार, दि. २५ सप्टें. रोजी दु. १२.०० ते सायं. ५.०० या  वेळेत ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, शिवाजी नगर येथे संपन्न होईल. यामध्ये 2 विभाग असून त्यात महिला आणि हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थी असे गट आहेत. या स्पर्धेत ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरई/भगर, राळे यापैकी एक अथवा मिक्स भरड वापरून पदार्थ बनवायचे आहेत. दुसऱ्या विभागात गोड आणि तिखट पदार्थ यांचा समावेश असेल. पदार्थाची चव, पौष्टिकता, नाविन्य, सादरीकरण आणि स्वच्छ्ता गृहीत धरले जाणार आहे. पदार्थासोबत थोडक्यात लिहिलेली पाककृती असावी ज्यामधे वापरलेले जिन्नस आणि प्रमाणाचा उल्लेख असावा. या स्पर्धेत आतापर्यंत ५० महिलांनी सहभाग घेतला आहे. अंजली वागळे पाककला स्पर्धेच्या मेंटर आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरे आणि मधुरा रेसिपीच्या मधुरा बाचल यांचा टॉक शो असणार आहे.

 

महिलांचा कीर्तन महोत्सव –

महिलांच्या कीर्तन महोत्सवाच्या संयोजिका ह.भ.प. कीर्तन विशारद निवेदिता मेहेंदळे (मो. 9850891512) यांनी सांगितले की, महिला महोत्सवा अंतर्गत नारदीय कीर्तन महोत्सव रविवार दि. २४ सप्टेंबर रोजी सायं. ५.०० ते ८.०० या वेळेत श्री हरीकीर्तनोत्तेजक सभेचे व्यास सभागृह, टेलीफोन एक्स्चेंज समोर, बाजीराव रस्ता येथे संपन्न होईल. यावेळी “वंदे विनायकम्” हा कार्यक्रम सादर होईल. यामध्ये नमनाचे श्लोक, सामुहिक नारदीय नमन, जयोस्तुते श्री महन मंगले हा अभंग आणि त्यावर आधारित पूर्वरंग युवती कीर्तनकार तन्मयी मेहेंदळे सादर करतील.  त्याला अनुसरून उत्तररंगात महिलांची चक्री, झाशीची राणी, महाराणा प्रताप आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या राष्ट्रीय क्रांतीकारकांची चरित्रात्मक आख्याने व ३ बाल आख्याने असे विषय सादर होतील.

यात अनुक्रमे बालकीर्तनकार लोपामुद्रा सिंग, कौमुदी मराठे आणि अनुश्री ब्रम्हे, ह.भ.प. अर्चना कुलकर्णी, युवती कीर्तनकार तन्मयी मेहेंदळे, ह.भ.प. निर्मला जगताप आणि संयोजिका कीर्तन विशारद ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे हे कीर्तनकार सहभागी होणार आहेत. यावेळी गौरी पवार (तबला), प्रांजली पाध्ये (हार्मोनियम), संध्या साठे (झांज व टाळ) आणि सहगायन माधवी राजे करतील.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हरीकीर्तनोतेजक सभेच्या उपाध्यक्ष ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. नंदिनी पाटील भूषवतील. यावेळी ज्येष्ठ सतार वादक उस्ताद उस्मान खाँ, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि वारकरी कीर्तनकार उल्हास पवार, प्रसिद्ध गायक दयानंद घोटकर व ज्येष्ठ संगीतकार नकुल तळवलकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. अॅड. धनदा कुलकर्णी गदगकर करतील. वैद्य जेम्स आणि डायमंड, पुणे हे प्रायोजक आहे.

महिला महोत्सवातील या सर्व स्पर्धांना प्रवेश फी नसून पुणेकरांनी या सर्व स्पर्धांसाठी आवर्जून यावे असे आव्हान पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी केले.

35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन !

Categories
Breaking News cultural पुणे

35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन !

 

 35th Pune Festival |  कलासंस्कृतीगायन, वादननृत्यसंगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असूनयाचे उद्घाटन शुक्रवा २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वामहाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेटपुणे येथे संपन्न होईल. (35th Pune Festival)

राज्याचे पर्यटनमंत्री  गिरीश महाजनउच्च  तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,द्योगमंत्री नाउदय सामंत हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पस्थित राहतीलतसेच खा. रजनी पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले,खाश्रीरंग बारणेमहाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रधानसचिव राधिका रस्तोगी हे या प्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहती अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी राज्यमंत्री श्री. रमेश बागवे आणि डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट पुणेच्या अध्यक्षा सौ. अबेदा इनामदार यावेळी उपस्थित होत्या.

 

          ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना खाहेमामालिनी यांचा गंगा’ बॅलेलोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगम म्युझिकल नाईटऑल इंडिया मुशायराजाणताराजामिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धामहिला महोत्सव,केरळ महोत्सवकीर्तन महोत्सवमराठी कवी संमेलन,इंद्रधनुकथ्थकभरतनाट्यमलावणीविविध नृत्यअविष्कारमराठी हिंदी गीते या बरोबरच पुणे गोल्फकप टूर्नामेंटबॉक्सिंगकुस्ती  मल्लखांब अशा क्रीडा स्पर्धाही यंदाच्या पुणे फेस्टीव्हलची वैशिष्ट्येआहेत

 

          लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलात्यावेळी त्यामध्ये कथाकथनकीर्तनपोवाडेलोककलामेळे असे कार्यक्रम होत असतयापासूनच प्रेरणा घेऊन१९८९ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेअध्यक्ष खासुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केलीसलग १० दिवस आणि ३५ वर्षे चालूअसलेला पुणे फेस्टिव्हल देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातोयापासून प्रेरणा घेऊन अनेक सांस्कृतिक महोत्सव सुरु झालेत्यामुळेच पुणे फेस्टिव्हलला मदर ऑफ  फेस्टिव्हलस’ म्हटले जातेभारतरत्न पंभीमसेन जोशी प्रथमपासून पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष होते

 

          ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना पद्मश्री खा.हेमामालिनी पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन असून पुणे फेस्टिव्हलच्या स्थापने पासून सलग ३५ वर्षे पुणे फेस्टिव्हलमध्ये त्या सक्रियपणे सहभागी होत असतात. स्वाईन फ्ल्यू (२००९आणि कोरोना (२०२०२०२१)अशी ३ वर्षे पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम झाले नाहीत.उर्वरित ३२ वर्षात नृत्यांगना हेमामालिनी यांनी तब्बल३० वर्षे बॅलेगणेश वंदना अथवा शिवस्तुती पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर सादर केली आहे. त्यांचा प्रत्येक पहिला बॅले त्या प्रथम पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर सादर करतातत्यांच्या कन्या ईशा आणि अहाना यांच्या पहिल्या स्टेज शोची सुरुवात त्यांनी पुणे फेस्टिव्हल पासूनच केलीपुणे फेस्टिव्हलमध्ये त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल यंदा उद्घाटन सोहळ्यात त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे

 

            पुणे फेस्टीव्हल कमिटीपुणेकर नागरिकमहाराष्ट्र पर्यटन विका महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टीव्हलचे आयोजन केले जातेपुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल् असतात

 

            ३५व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना मंगळवार दि१९ सप्टेंबर रोजी सकाळी१०.३० वा हॉटेल सारसनेहरू स्टेडियम, येथे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांच्या हस्ते विधीवत संपन्न होईलवेदमूर्ती पंधनंजय घाटेगुरुजी याचे पौरहित्य करतील

 

            ३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजकअसून जमनालाल बजाज फौंडेशनपंचशीलसुमाशिल्प, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक हेतभारत फोर्जकुमार रिअॅलीटीमायर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनसिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत