NCP – Sharadchandra Pawar Pune | भाजपच्या रंगरंगोटी विरोधात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पार्टी कडून आंदोलन!

Categories
Breaking News Political पुणे

NCP – Sharadchandra Pawar Pune | भाजपच्या रंगरंगोटी विरोधात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पार्टी कडून आंदोलन!

 

NCP – Sharadchandra Pawar Pune – (The Karbhari News Service) – | पुणे शहराच्या विदृपीकरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात मित्र मंडळ चौक पर्वती येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. (Prashant Jagtap Pune)

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या सरकारने खरंतर जनतेसमोर विकासाचा पाढा वाचायला हवा. मात्र दहा वर्षे सत्ता उपभोगूनही विकासाची पाटी कोरीच असल्याने भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत मते मागण्यासाठी पुणे शहर रंगवून विद्रूप करण्यापलीकडे गत्यंतर उरले नाही. भारतीय जनता पार्टीच्या या मतांच्या राजकारणात सुंदर पुणे शहर मात्र पक्षाच्या घोषणांनी रंगवून विद्रुप केले जात आहे.

जगताप पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. दहा वर्षात देशावर वाढलेला कर्जाचा बोजा, ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी, महागाई, भारतातून बाहेर गेलेले उद्योगधंदे, महिलांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचारात झालेली वाढ, शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, ढिसाळ निर्यात धोरणाने बळीराजाचे झालेले नुकसान अशा सर्वच बाबतीत मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. डोक्यावर अपयश घेऊन लोकांसमोर मत मागायला लाज वाटते; म्हणून भारतीय जनता पार्टीने “दिवार लेखन” अभियान राबवत शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी भाजपच्या घोषणा रंगवून सुंदर पुणे शहर विद्रूप करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. या शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले.

“India” Aghadi meeting in Pune |24 फेब्रुवारी रोजी “इंडिया” आघाडीचा महामेळावा होणार पुण्यात! | शिरूर, बारामती व पुणे  लोकसभेसाठी इंडिया आघाडीचा एल्गार

Categories
Political पुणे महाराष्ट्र

“India” Aghadi meeting in Pune |”इंडिया” आघाडीचा 24 फेब्रुवारी रोजी होणार पुण्यात महामेळावा  !

| शिरूर, बारामती व पुणे  लोकसभेसाठी इंडिया आघाडीचा एल्गार

 

“India” Aghadi meeting in Pune |राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar)  पक्षाचे नेते शरद पवार यांच्या मोदी बाग या कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन नाव व नवीन चिन्हसह आगामी लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) इंडिया आघाडी एकत्रितपणे लढणार पासून या अनुषंगाने शरद पवार यांच्या नेतृत्वात 24 फेब्रुवारी रोजी इंडिया आघाडीचा मेळावा पुणे शहरात संपन्न होणार आहे.

इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष या मेळाव्यात सामील होणार असून या तीनही लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत MP सुप्रिया सुळे, खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, खा. वंदना चव्हाण, खा. डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते.