You are Prize | महापालिका कर्मचाऱ्यांनो आणि अधिकाऱ्यांनो तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या! | तुमच्यापेक्षा कुणीही आणि काहीही महत्वाचे नाही! 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

You are Prize | महापालिका कर्मचाऱ्यांनो आणि अधिकाऱ्यांनो तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या! | तुमच्यापेक्षा कुणीही आणि काहीही महत्वाचे नाही!

PMC Employees – PMC Officers – (The Karbhari News Service) – गेल्या काही दिवसांपासून आणि वर्षांपासून पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अकाली निधनाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यातील बरेचसे मृत्यू हे हृदय रोगांशी (Heart Attack) संबंधित होते. कमी वयात आणि नोकरीचा चांगला काळ सुरु असताना एखाद्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याचे असे अचानक निघून जाणे, हे नक्कीच वेदनादायक आहे. मात्र या गोष्टीला काही अंशी आपली जीवनशैली (Lifestyle) देखील कारणीभूत आहे. (Pune Municipal Corporation Employees and Officers)
काही आजारांचा अपवाद वगळता बरेचसे आजार हे चुकीच्या खाण्याने होतात. यात मधुमेह (Type 2 Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension), अल्सर (Ulcer), पोटाचे विकार, यात तुमचाही दोष नाही. कारण तुम्हांला नेहमी चुकीचं मार्गदर्शन केलं जातं. तुमचा डॉक्टर तुम्हांला नीट मार्गदर्शन करू शकत नाही. तुम्ही बघितले असेल तुम्हांला मेडिसिन देणारे डॉक्टरांचेच पोट पुढे आलेले असते. त्यालाच चांगल्या आहाराबाबत माहित नसते. तो तुम्हांला काय सल्ले देणार? तो फक्त मेडिसिन देऊन तात्पुरती मलमपट्टी करणार.
याचाच अर्थ काय तर तुमच्या आरोग्याची काळजी कुणीही घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी आधी तुम्हाला तुम्ही स्वतः किती महत्वाचे आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. हे फक्त तुमच्या कुटुंबा पुरते मर्यादित नाही. हे तुमच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. तुम्ही या जगात अस्तित्वात असणे, हे सगळ्यात मोठं prize आहे. त्या गोष्टीचा आदर करा. स्वतःचा सन्मान करा. वेळ निघून जाण्याआधी हे तुम्हांला लक्षात घ्यावे लागेल. तुमची नोकरी आणि पैसा देखील तुमच्यापेक्षा मोठा नाही. या गोष्टी महत्वाच्या आहेतच. पण सगळ्यात महत्वाचे तुम्ही आहात. स्वतःच्या असण्याचा आदर करा आणि एक चांगली जीवनशैली जागा.

त्यासाठी या गोष्टींवर आजपासूनच अंमल करायला सुरुवात करा.

1. साखर, कर्बोदके टाळा (Stay Away from Sugar, Carbohydrates) 
तुमची जीवनशैली ही तुमच्या आहारापासून सुरु होते. तुमच्या पोटात पोषणयुक्त अन्न जाते कि नाही, यावर तुम्हांला बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. कारण आज तुमच्यापैकी बरेच लोक जे खातात, त्या सगळ्यात साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. परिणामी इन्सुलिन लेव्हल वाढते. त्याचाच अर्थ रक्तातील साखर वाढत जाते. त्यामुळेच पुढे लठ्ठपणा, डायबेटीस, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, अशा आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे याचे जे मूळ आहे साखर आणि कर्बोदके, ते तुम्हांला आहारातून कमी करावे लागेल. पोषणयुक्त अन्न खायला तुम्हाला सुरुवात करावी लागेल. त्यासाठी प्रोटीन आणि आरोग्यदायी फॅट यांना आहारात महत्वाचे स्थान द्यावे लागेल. यामध्ये अंडी, मटण, मासे, सगळ्या पालेभाज्या यांचा समावेश आहे. तसेच पनीर, बटर, चीज, दही यांचे आहारात प्रमाण वाढवावे लागेल.
2. तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी तेल कुठले वापरता? (Stay Away from Seed Oil) 
तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील, आम्ही बाहेरचे अन्न टाळतो. घरीच शिजवून खातो. तरीही आमचे पोट वाढते. याला प्रमुख दोन कारणे. एक म्हणजे आहारात असलेले पिष्टमय पदार्थ आणि साखरेचे प्रमाण आणि दुसरे म्हणजे तुमचे तेल. तुम्ही जर स्वयंपाकासाठी सोयाबीन, सूर्यफूल, अशी seed oil वापरत असाल तर तुमचा लठ्ठपणा हा वाढतच राहणार आहे. हे मूळच तुम्ही घरातून हद्दपार करा. त्यासाठी तुमचे अन्न तुम्ही coconut oil, तूप, बटर यात शिजवा. तुम्हांला घाण्याचे शेंगदाणा तेल मिळत असेल तर उत्तमच आहे.
3. ब्रेकफास्ट टाळाच (Skip Breakfast) 
तुमच्या शरीरासाठी ब्रेकफास्ट गरजेचा नसतोच. हे विज्ञान देखील सांगतं. मात्र आपण पाश्चिमात्य जीवनशैली अंगिकारली आहे. आपण त्यांचेच अनुकरण करतो आणि मग सकाळ पासूनच रक्तातील साखर वाढवत राहतो. तुमच्या रक्तातील साखर ही सकाळी आधीच high असते. रिकाम्या पोटीच तुम्ही व्यायाम करायला हवाय. भारतीय संस्कृतीत  किंवा पूर्वीच्या काळी लोक बघा दिवसातून दोनच वेळा जेवण करायचे. दुपारी आणि सायंकाळी. आणि याच जेवणाच्या प्रमाणवेळा आहेत. ब्रेकफास्ट वर खर्च करू नका. तुम्हांला सकाळी भूक लागत नाही. सवय लागली म्हणून तुम्ही खाता. ज्या लोकांना शेतात जाऊन नांगर चालवायचा असतो त्यांना ब्रेकफास्ट ची गरज असते. तुम्हांला बिलकुल नाही. आजपासूनच यावर अंमल करायला सुरुवात करा.
4. उपवास करा (Fasting/ Intermittent fasting) 
उपवास करा, याचा चुकीचा अर्थ लावू नका. उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी आणि फराळाचे पदार्थावर ताव मारणे नव्हे. आपल्याला हेच सांगितलं जाते. मात्र उपवासा मागचे विज्ञान समजून घ्या. उपवासाचा अर्थ आहे कि तुम्ही जाणूनबुजून काही काळासाठी पोट रिकामे ठेवणे. यात 14 तासांपासून ते 24 तास, 72 तास, 120 तासांचा समावेश आहे. तर तुम्ही 14 तासांपासून आजपासूनच सुरुवात करा. हळूहळू तास वाढवा. या काळात काही खायचं नाही. फक्त प्यायचं. ते ही पाणी, मीठ पाणी, ब्लॅक कॉफी (Without Sugar), ब्लॅक टी (Without Sugar), ग्रीन टि आणि ऍपल सीडार व्हिनेगार. असं केलं तरच उपवास फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही 24 तास 48 तास उपवास केला तर तुमचे वजन तर कमी होणारच आहे. शिवाय तुमचे पोटाचे विकार दूर होतील. एकूणच आरोग्य सुधारेल, फोकस वाढेल, आयुष्यमान वाढेल. ही गोष्ट गंभीरपणे घ्या. त्यासाठी तुम्हांला जेवणाच्या वेळा ठरवाव्या लागतील. संध्याकाळी तुम्हांला 7 च्या आत जेवण संपवावे लागेल. फार तर 8 वाजता. त्यापुढे नाही. सकाळी ब्रेकफास्ट नाही. सरळ जेवण. तेही दुपारी. समजा रात्री 8 ला तुमचे जेवण झाले असेल आणि दुपारी 12 वाजता तुम्ही जेवण केले तर मधला 16 तासाचा काळ ही तुमचा झाला फास्टिंग. 16 तास नसेल जमत तर 14 तास करा. पण हळूहळू वाढवत न्या. 24 तास,  48 तासाचे ध्येय ठेवा. आजपासून सुरुवात करा आणि बघा पुढील तीन महिन्यात फरक पडतो की नाही ते.
5. व्यायाम करा पण जिम ला जाऊनच (Gym Exercises)
तुमच्या शरीराला व्यायाम ही गरज आहे. कारण जसे तुमचे वय वाढत जाते, तसे स्नायू ठिसूळ होत जातात. त्यात तुमच्यातील बऱ्याच लोकांना बैठे कामच असते. स्नायूंना मजबूत करण्यासाठी तुम्ही व्यायाम करणे महत्वाचे आहे. आणि व्यायाम हा वजन उचलण्याचाच असायला हवाय. त्यासाठी जिम गरजेची असते. वय जसे वाढत जाते, तसे हा वजन उचलण्याचा व्यायाम महत्वाचा असतो. असे केले तरच तुम्ही फिट राहू शकता. चालणे तर महत्वाचे आहेच. पण सोबत आठवड्या तुन तीन वेळा तुम्ही जिम ला जाऊन वजन उचलायला हवंय. वेळेची कारणे देऊ नका. जिम परवडत नसेल तर Push up, squats, Wall sits, किमान असे व्यायाम करा. पण काहींना काही हालचाल करा.
6. पुस्तके वाचा, जर्नल लिहा (Read Books, Journal) 
वरील सगळ्या गोष्टी या तुमच्या शारीरिक आरोग्याशी निगडित आहेत. त्या सोबतच तुमच्या मनाचे आरोग्य देखील महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही पुस्तक वाचण्यापासून सुरुवात करा. हा सगळ्यात फायदेशीर मानसिक व्यायाम आहे. तुम्हांला आवडत नसेल तर पुस्तक वाचनाची आवड लावून घ्या. तुम्ही काहीही वाचू शकता. कादंबरी, कथा संग्रह, कविता, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिमत्व विकास, आर्थिक विषयक, विज्ञान विषयक असे सगळे साहित्य वाचा. एक वेळ ठरवून घ्या. किमान अर्धा तास ते एक तास तुम्ही दररोज पुस्तक वाचायलाच हवं. लिहिण्याची आवड जोपासा. साहित्यपर लिहिणं गरजेचं नाही. तुमचे विचार लिहून काढा. एखादी समस्या सतावत असेल तर ती लिहून काढा. बघा तुम्हांला उत्तर मिळते का नाही? ध्यान करा. तुमच्या अंतर्मनाचा अभ्यास करा. त्याला कामाला लावा.
7. बचत करा, गुंतवणूक करा (Save and Invest) 
तुम्हांला बचतीची सवय असायला हवीय. अनावश्यक गोष्टीवर तुम्ही खर्च हा टाळायलाच हवा. त्याचसोबत तुम्ही गुंतवणूक करायला हवीय. फंड काय असतात, स्टॉक मार्केट काय आहे. हे शिकून घ्या. त्याचा अभ्यास करा. तुम्ही तुमच्या गावी जमीन विकत घ्या. दुसरं घर घ्या. काहीही करा पण पैसे उधळू नका. पैसे कमी असतील तर बचत करा. जास्त असतील तर गुंतवणूक करा.
8. पैशाचे स्रोत वाढवा (Raise your income streams) 
तुम्हांला तुमच्या नोकरीतून पैसे मिळतात. ही चांगलीच गोष्ट आहे. पण फक्त त्याच पैशावर अवलंबून राहू नका. नवीन स्रोत वाढवा. याचा अर्थ असा नाही कि तुम्ही अनैतिक मार्गाने पैसे मिळवा. तुमच्या नोकरीचा गैरफायदा घ्या. तसे करू नका. कर्माची फळे, ही संकल्पना लक्षात ठेवा. चांगल्या मार्गाने पैसे मिळवा. आजकाल खूप चांगले ऑनलाईन मार्ग आहेत. ते शोधा. त्याचा अभ्यास करा. ऑनलाईन कोर्स करा. नवीन कौशल्य शिकून घ्या.
9. वरिष्ठांचा सन्मान करा (Honor the seniors)
तुम्ही कुठल्याही खात्यात कामाला असा, जुनियर असा, सिनियर असा, तुम्हांला कुणीतरी वरिष्ठ असणारच. तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा सन्मान करायला हवाय. तुम्ही वरिष्ठाना आव्हान देऊ नका. त्याने तुमचेच मानसिक नुकसान होते. वरिष्ठ कसा का असेना तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करा. बाकी सूड उगवण्याचं काम नियतीवर सोपवून द्या. मात्र नसते ताण घेऊन आजारांना निमंत्रण देऊ नका. सहकाऱ्यांशी प्रेमाने वागा. एकूणच तुमच्या व्यक्तिमत्वासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत.
10. जमिनीवर या! (Grounding, Earthing)
जमिनीवर या, याचा अर्थ इथे वेगळा आहे. म्हणजे तुम्ही जमिनीशी, निसर्गाशी नाते जोडा.  दर रविवारी किमान अर्धा तास ते 1 तास अनवाणी चाला. वाळू, माती किंवा गवत कशावरही चाला. याने तुमच्य. पायाचे Biomechanics सुधारेल. जमिनीवर झोपा. बेडवर नाही. हे दररोज करा. डोक्याखाली उशी सुद्धा घेऊ नका. बघा तुमची पाठदुखी कशी पळून जाईल.
या सगळ्या गोष्टी वाचायला तशा सोप्या आहेत. मात्र प्रत्यक्षात अंमल करताना कळेल किती अवघड आहे ते. पण हीच आपली जीवनशैली असायला हवीय. यावरच तुम्ही अभ्यास करायला हवाय.

NCP – Sharadchandra Pawar Pune | महापुरुषांच्या स्मारकांना पोलिस संरक्षण द्यावे | सामाजिक सलोखा राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मनपा आयुक्तांना निवेदन

Categories
Breaking News PMC Political पुणे

NCP – Sharadchandra Pawar Pune | महापुरुषांच्या स्मारकांना पोलिस संरक्षण द्यावे

| सामाजिक सलोखा राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मनपा आयुक्तांना निवेदन

 

Pune News – (The Karbhari News Service) – महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना झाली म्हणून समाजात तणाव निर्माण झाल्याच्या, जातीय दंगली झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी महाराष्ट्रात घडल्या आहेत. १३ जून २०२४ रोजी हडपसर येथे एका मनोरुग्णाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दगड फेकून मारल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. सुदैवाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, परंतू भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पक्षाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त  यांना निवेदन सादर करण्यात आले.

शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारके, सामाजिक, राजकीय नेत्यांचे पुतळे अशा ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात यावे, तसेच प्रत्येक ठिकाणी २४ तास पोलिस कर्मचारी तैनात करण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Dr Rajendra Bhosale IAS | खातेप्रमुखांच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या कडक सूचना | आपत्कालीन परिस्थितीशी तोंड देण्यास सज्ज राहण्याचे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

Dr Rajendra Bhosale IAS | खातेप्रमुखांच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या कडक सूचना | आपत्कालीन परिस्थितीशी तोंड देण्यास सज्ज राहण्याचे आदेश

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – शहरात शनिवारी झालेल्या जोरदार पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडवली. याबाबत सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या टीकेचा सामना महापालिका (Pune PMC) प्रशासनास करावा लागला. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी याबाबत नियोजन करण्यासाठी खाते प्रमुखांसोबत बैठक घेतली. (PMC Pune Municipal Corporation)

 परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार रहा, नागरीकांचे फोन येण्याची वाट पाहत बसु नका, रिस्पॉन्स टाईम हा कमी झाला पाहीजे अशा कडक सुचना महापालिका (Pune Municipal Corporation) आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. यामुळे प्रशासनावर सर्वच स्तरावरून जोरदार टिका होऊ लागली आहे. भाजप, मनसे, शिवसेना , कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी आयुक्त भोसले यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. यामुळे बुधवारी आयुक्त भोसले यांनी सर्व खाते प्रमुख, उपायुक्त, क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक घेऊन कडक सुचना केल्या आहेत. सुमारे तीन तास ही बैठक चालली होती. (Pune PMC News)

या बैठकीविषयी आयुक्त भोसले म्हणाले, सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना त्यांच्या भागातील नालेसफाईचा आढावा घेण्यास सांगितले आहे. संबंधित ठेकेदाराकडून उर्वरीत कामे करुन घेण्याचे आदेश दिले आहे. पावसाळा संपेपर्यंत काम करण्याची जबाबदारी त्या ठेकेदाराची आहे. त्यादृष्टीने पाहणी करून कामे करून घ्या, अशा सुचना दिल्या आहेत. झाडे पडण्याच्या घटना कमी करण्यासाठी फांद्या छाटणीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशही दिले आहेत.

या बैठकीत क्षेत्रीय कार्यालय आणि मुख्य खाते यांच्यात समन्वय वाढविणे, पुढील काळात प्रतिबंधित उपाययोजना काय करता येतील यावरही चर्चा झाली. गेल्या आठवड्यात पावसामुळे बाधित झालेल्या क्षेत्रात काय करता येईल याविषयी चर्चा झाली असल्याचे नमूद करीत डॉ. भोसले म्हणाले, क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्याकडील उपलब्ध मशीनरी, साधन सामुग्री याची माहीती घेण्यास सांगितले असुन, त्यानुसार ते उपलब्ध करून द्यावे, तसेच वेळ पडली तर खरेदी करावी अशा सुुचना केली आहे. संपुर्ण पावसाळ्याच्या कालावधीत क्षेत्रिय कार्यालयांनी मुख्य खात्याच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. तसेच संबंधित भागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी, त्यांनी केलेल्या सुचनानुसार कामे पुर्ण करावीत, यातुन पुढील काळात निर्माण होणार्‍या आत्पकालीन परिस्थितीला तोंड देण्याची तयारी झाली पाहीजे. नेहमीच पाणी साठणारा भाग, नागरी वस्तीत पाणी शिरण्याची ठिकाणांविषयी विशेष काळजी घ्यावी, तेथे आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

RPI on Pune Rain | पावसाळ्यात नुकसान झालेल्या नागरिकांना प्रशासनाचा आर्थिक मदतीचा हात | प्राथमिक टप्यात तात्काळ अडीच हजार रुपयांची मदत मिळणार

Categories
Breaking News PMC Political social पुणे

RPI on Pune Rain | पावसाळ्यात नुकसान झालेल्या नागरिकांना प्रशासनाचा आर्थिक मदतीचा हात | प्राथमिक टप्यात तात्काळ अडीच हजार रुपयांची मदत मिळणार

| आरपीआयच्या शिष्टमंडळाच्या निवेदनानंतर जिल्ह्याधिकारी, महापालिकेची कार्यवाही

 

RPI on Pune Rain – (The Karbhari News Service) – वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाळ्यात ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ आर्थिक मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मकता दाखवली आहे. सुरुवातीच्या टप्यात तातडीची मदत म्हणून अडीच हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहे. त्यानंतर आणखीन मदतीसाठी सकारात्मक प्रयत्न केले जाणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले. या वेळी प्रशासनाकडून तातडीने सकारात्मक पाऊले उचलत ही घोषणा केली. (Pune Municipal Corporation (PMC)

या वेळी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, वसंत बनसोडे, शाम सदाफुले आदींसह आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आरपीआयच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, देशासह राज्यात मान्सून दाखल झाला आहे. उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना त्यामुळे एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. बळीराजा देखील सुखावला आहे. ही एक बाजू असताना दुसऱ्या बाजूला गेली दोन आठवडे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची संततधार कायम राहत असल्यामुळे पुणे शहरातील रस्त्यांवर पाणी साचण्याच्या मोठ्या घटना घडल्या. नागरीवस्तीत पाण्याचा शिरकाव झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला आणि नुकसानीला सामोरे जावे लागले. अनेकांच्या घरांची दुरवस्था झाली. यासह वाहनधारकांचे देखील मोठे नुकसान झाले. अनेकांची वाहने वाहून गेली तर काहींची वाहने बंद पडली.

The Karbhari - Pune Rain RPI

वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे पडली. अनेकांच्या वाहनांवर देखील झाडे पडण्याच्या घटना घडल्या. या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आणखीन खर्चाचा बुर्दंड बसला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या नुकसानीची पाहणी करून आर्थिक मदत मिळावी. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. याबाबत त्वरित शासकीय पातळीवर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात आली.

यावर दोन्ही प्रशासनाने सुरुवातीच्या टप्यात तातडीची मदत म्हणून अडीच हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देण्याचे जाहीर केले. त्यानंतर शासन स्तरावर पाठपुरावा करून आणखीन मदतीसाठी प्रयत्न करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ओढ्यावरील अतिक्रमण हटवा –

तसेच शहरातील ओढ्यांच्या बाजूला केंद्रीय संरक्षण विभागाने सीमा भिंती घातलेल्या आहेत. वडगाव शेरी सह पुण्यातील विविध परिसरात ही परिस्थिती आहे. त्यामुळे या सीमाभिंती काढून ओढ्यांचे पात्र मोठे करण्याबाबत कार्यवाही करावी. पावसामध्ये जीवितहानीची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफचे पथक पुण्यात कायमस्वरूपी तैनात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे ऐनवेळी होणाऱ्या धावपळीपासून मुक्तता होईल. याबरोबरच शहरातील नाल्यांवर अतिक्रमण झालेले आहे. हे अतिक्रमण काढून विकसित आराखड्याप्रमाणे नाल्यांचे रुंदीकरण करावे. तसे आदेश पुणे महापालिकेला द्यावे. विशेषता धानोरी रस्ता ते साठे बिस्कीटकडे जाणारा तसेच धानोरी ते नगररोड मार्गे नदीला मिळणाऱ्या नाल्यांवर अतिक्रमण झाले असून त्याच्या रुंदीकरणाची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात आली.

 पुणेकरांसाठी आरपीआयची धाव –

यंदाच्या वर्षी झालेल्या पावसात शहरात ठिकठिकाणी दुर्घटना घडल्या. साचलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. नुकसानीला सामोरे जाताना नागरिकांच्या नाकी नऊ येत आहे. या दरम्यान शासनाकडे मदतीसाठी कोणी पाठपुरावा करत नसल्याचे चित्र आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून आरपीआयचे शिष्टमंडळ धावून आले. नागरिकांना मदत मिळावी म्हणून मागणी केली. त्या मागणीला यश आले आहे.
——————————————-

MP Supriya Sule | पुणे शहरातील ड्रेनेज व्यवस्थेची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी

Categories
Breaking News PMC social पुणे

MP Supriya Sule | पुणे शहरातील ड्रेनेज व्यवस्थेची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी

 

Supriya Sule on Pune Rain – (The Karbhari News Service) – पुणे शहराची पावसाने केलेल्या दुर्दशेची खासदार सुप्रिया ताई सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पाहणी केली. शिवाजीनगर, पर्वती, खडकवासला, हडपसर या मतदारसंघात परिस्थिती अत्यंत बिकट असून विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा संताप पुणेकरांकडून व्यक्त केला जात आहे.

अगदी १५ मिनिटांच्या पावसानेही पुणे शहर अक्षरशः पाण्यात बुडताना आपण गेल्या १० दिवसांत अनेकदा पाहिलं. असंख्य नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, कोट्यावधींची मालमत्ता अक्षरशः पाण्यात गेली. गेली जवळपास १० वर्षे गल्ली ते दिल्ली एकच पक्षाचा एकछत्री अंमल असताना महाराष्ट्रातील महत्वाच्या शहराची अशी अवस्था का झाली हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांच्या मनात आहे.

खा. सुप्रिया सुळे यांच्या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी पावसाळी कामे पूर्णच झाली नाहीत, तर अनेक ठिकाणी ऐन पावसाळ्यात खड्डे खोदून ठेवलेले आहेत हे निदर्शनास आले. ड्रेनेजसाठी टाकलेल्या पाईप मधून काही ठेकेदारांनी केबल टाकल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला. हा सगळा गैरप्रकार सुरू असताना शहरातील महायुतीचे आमदार झोपले होते का हा प्रश्न नागरिक विचारात आहेत.

The karbhari - MP Supriya sule met to IAS Rajendra Bhosale
नागरिकांच्या याच संतप्त भावना घेऊन खा. सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महानगरपालिका प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला.

या प्रसंगी उदय महाले, निलेश निकम, श्रीकांत पाटील, विशाल तांबे, सचीन दोडके, काकासाहेब चव्हाण, नमेश बाबर, अमृताताई बाबर, अश्विनीताई कदम, नितीन कदम , किशोर कांबळे उपस्तिथ होते.

Pune Fir Brigade | मुसळधार पावसात अग्निशमन दलाचे मदतकार्य | कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता द्या | आमदार धंगेकर यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pune Fir Brigade | मुसळधार पावसात अग्निशमन  दलाचे मदतकार्य | कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता द्या | आमदार धंगेकर यांची मागणी

 

Pune Fire Brigade – (The Karbhari News Service) – मुसळधार पावसात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी महापालिका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री सलग बारा तास अथक परिश्रम केले, त्यांचे कौतुक आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar)!यांनी केले असून, महापालिका आयुक्तांनी अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि जवानांचा योग्य तो सन्मान करावा, अशी मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली आहे. (PMC Pune Fire Brigade)

महापालिकेच्या अग्निशमन दलाची २० केंद्र आणि सुमारे २०० कर्मचारी या मदतकार्यात अखंडपणे काम करत होते. पावसाने साचलेल्या पाण्यातून अनेक नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली, हे कार्य कौतुकास्पदच आहे. महापालिका आयुक्तांनी या कामाची दखल घेऊन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी म्हणून भारतीय जनता पक्षाने पुण्याचा गवगवा केला. परंतु नाला सफाई, नेहमी पाणी साठणाऱ्या रस्त्यांवर, चौकांमध्ये उपाययोजना महापालिकेने केलेल्या नाहीत, केवळ गेल्या पाच, सात वर्षांत या कामांच्या निविदांमध्ये सत्ताधाऱ्यांनी घोटाळे केले. या घोटाळ्यांची रिंग मोडून काढावी, असेही धंगेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

PMC Pune Disaster Management | पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्कालीन कार्यकेंद्र स्थापन होणार! | महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Disaster Management | पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्कालीन कार्यकेंद्र स्थापन होणार!

| महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश

PMC Pune Disaster Management – (The Karbhari News Service) – पावसाळ्यापुर्वी (Premonsoon) व पावसाळ्यादरम्यान (Monsoon) करावयाची आपत्कालीन कामे व आपत्ती व्यवस्थापन याकरीता आपत्कालीन कार्यकेंद्र (Disaster Centre) स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर (Ward office) आपत्कालीन केंद्र आणि पूर नियंत्रण कक्ष (Flood control room) स्थापन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले  (PMC commissioner Dr Rajendra Bhosale IAS) यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. (PMC Pune Disaster management)

पावसाळ्यापुर्वी व पावसाळ्या दरम्यान आणि आपत्ती व्यवस्थापनाकरीता महापालिका सहाय्यक आयुक्त स्तरावर  आपत्कालीन कार्य केंद्र असणे आवश्यक आहे. आपत्कालीन कार्यकेंद्रात संपर्क यंत्रणा उभारुन क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक करावी व याकरीता नोडल ऑफिसरची नेमणुक करण्यात यावी.  1 जुन पासून क्षेत्रिय कार्यालय स्तरावर स्वतंत्र वॉर रूम / पूर नियंत्रण कक्ष (War room) स्थापन करावा. असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. (PMC Pune Marathi News)
आयुक्तांनी पुढे म्हटले आहे कि  31 डिसेंबर 2024  पर्यंत आपत्कालीन केंद्र २४x७ तास सुरु राहील याची दक्षता घ्यावी व याकरीता स्टाफची नेमणुक करण्यात यावी. आपत्कालीन केंद्रामध्ये २४ तास संपर्क होऊ शकेल असा दुरध्वनी क्रमांक, नोडल ऑफिसरचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आय. डी व त्याचप्रमाणे क्षेत्रीय स्तरावर पुरविण्यात आलेल्या वायरलेसयंत्रणा यांचा उपयोग करुन मुख्य आपत्कालीन केंद्राशी जोडण्यात यावा व आपत्कालीन परिस्थितीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील संपुर्ण माहिती मुख्य आपत्कालीनकेंद्र, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका येथे दुरध्वनी क्रमांक०२० – २५५०६८००/1/2/3 व ०२० २५५०१२६९ या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा. (PMC Pune disaster management department)
2024 मध्ये पावसाळी लाईनची साफसफाई, ड्रेनेज लाईनची साफसफाई तसेच नाले व कलव्हर्टची साफसफाईची कामे मुख्य खात्यांमार्फत करण्यात आली आहेत. त्याअनुषंगाने मुख्य खात्यामार्फत क्षेत्रिय स्तरावरनैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती ओढविल्यास तात्काळ प्रतिसाद देणेकरीता टिम तयार ठेवावी जेणे करुन इमारतकोसळणे, नाला- ओढयाचे पाणी शहरातील विविध भागात शिरणे, नागरिकांना स्थलांतरीत करणे इत्यादी घटनांमध्ये सदर कर्मचाऱ्यांची मदत होईल. अग्निशमन दला मार्फत प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयास आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात घ्यावी. असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)
—-

34 Villages Committee | समाविष्ट गावासाठीची समिती म्हणजे कार्यकर्ते संभाळण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न | शिवसेना (UBT) ची टीका 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

34 Villages Committee | समाविष्ट गावासाठीची समिती म्हणजे कार्यकर्ते संभाळण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न | शिवसेना (UBT) ची टीका

34 Villages Committee – (The Karbhari News Service) – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 34 गावांच्या मूलभूत सुविधांच्या साठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून यामध्ये राजकीय पुढाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुका लागण्याआधी महायुती सरकारने आपले कार्यकर्ते संभाळण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. अशी टीका शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी केली आहे.
थरकुडे म्हणाले कि, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय व पालिकेतील माजी नगरसेवकांना या समाविष्ट गावातील समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.  ही समिती पालिका निवडणूक होत नसल्यामुळे राजकीय पदाधिकारी व मंत्र्यांच्या संपर्कात असलेल्या नेतृत्वांचे विकासाच्या नावाखाली पुनर्वसन करण्यात आले आहे. समाविष्ट गावातील लोकप्रतिनिधी व निवडून आलेले सरपंच यांना या याद्यांमध्ये स्थान नाही तर पुणे महानगरपालिकेत माजी नगरसेवक असलेल्या तसेच राजकीय पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना या पदांवर घेण्यात आल्याने राजकीय फायद्यासाठी केलेला हा प्रयत्न हा गावांच्या विकासासाठी दिसून येत नाही.
थरकुडे पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुका लागण्याआधी महायुती सरकारने आपले कार्यकर्ते संभाळण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. हे पुणेकर व पुण्यात समाविष्ट झालेल्या गावांच्या नागरिकांच्या लक्षात आला आहे. यामुळे याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर होणार नाही.
पुण्यामध्ये भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी यांची होत असलेली पीछेहाट व नागरिकांची कामे झाल्यामुळे निर्माण झालेले उदासीनता यावर उपाय म्हणून हा विकास समितीचा शासनाने केविलवाना प्रयत्न केला आहे. असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी सांगितले.

34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठीच्या लोकप्रतिनिधी समितीत नवीन 9 सदस्यांच्या यादीत बाबुराव चांदेरे यांचा समावेश

Categories
Breaking News PMC Political पुणे

34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठीच्या लोकप्रतिनिधी समितीत नवीन 9 सदस्यांच्या यादीत बाबुराव चांदेरे यांचा समावेश

34 Villages Committee – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत ( Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. हा प्रश्न मागील काही दिवसांपासून गंभीर होत चालला आहे.  आता यावर तोडगा काढण्यात आला असून यासाठी विभागीय आयुक्तांच्या (Pune Divisional Commissioner) अध्यक्षतेखाली १८ लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दरम्यान याबाबत काही सदस्यांनी आम्हांला डावलले गेल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार या यादीत अजून 9 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून नुकतेच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचा समावेश आहे.

       बाणेर – बालेवाडी या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यामध्ये यशस्वी ठरलेले त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये एक वर्ष स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून अतिशय उत्कृष्टपणे काम पाहणारे सलग दोन अर्थसंकल्प सादर करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांची नवीन समाविष्ट ३४ गावांच्या लोकप्रतिनिधी म्हणून सुस, महाळुंगे व बावधान या गावांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Relief to the citizens of 34 included villages! Important decision of the state government!

Categories
Breaking News PMC social पुणे

Relief to the citizens of 34 included villages! Important decision of the state government!

 

PMC Included Villages Property Tax – (The Karbhari News Service) – Pune Municipal Corporation (PMC) has been ordered by the state government to suspend collection of 2 percent penalty on illegal construction and annual overdue property tax in 34 villages newly included in PMC Pune have been given. Due to this, the citizens of the villages have got relief. (Pune Municipal Corporation Property tax)

Complaints were coming from citizens

Income tax has been levied in the villages included in the Pune Municipal Corporation (PMC). These 34 villages included in 2017 and 2022 are being taxed in a phased manner. The income of these villages has been assessed according to the ready reckoner of the adjoining villages in the old limits of the Municipal Corporation. This tax is higher than Gram Panchayats and the amount is huge as penalty is imposed on arrears. The municipality is threatening to take confiscation action by sending notices to defaulters. Although the villages have come under the Municipal Corporation, there are no roads, water, drainage line facilities. There were angry reactions from the citizens of this village due to the large amount of taxes being levied in the absence of facilities. (Pune Property Tax)

Ajit Pawar took the initiative

In this background, Guardian Minister and Deputy Chief Minister Ajit Pawar had recently held a meeting with the delegation of the citizens of the village at the Government Rest House. MLAs Bhimrao Tapkir, Sunil Tingre, Chetan Tupe, Nationalist Congress Party Mahila Aghadi President Rupali Chakankar and Municipal Commissioner Vikram Kumar were present on the occasion. After hearing the views of the citizens, Guardian Minister Ajit Pawar will discuss with Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis about taxation in the included villages and take a strategic decision. Until then, the municipal administration had ordered that no action should be taken to recover the arrears. It was also promised to take strategic decisions. Accordingly this decision has been taken.

——